Maharashtra

Nagpur

CC/10/82

Shri Dhnyaneshwar B. Ninave - Complainant(s)

Versus

M/s. SBI and Payment Services Pvt. Ltd. - Opp.Party(s)

30 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/82
 
1. Shri Dhnyaneshwar B. Ninave
Lalganj, Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. SBI and Payment Services Pvt. Ltd.
New Delhi
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

श्री. विजयसिंह राणे, मा. अध्‍यक्ष यांचे कथनांन्‍वये.
 
 
 
 
- आदेश -
(पारित दिनांक – 30/12/2011)
 
 
 
1.                 तक्रारकर्त्‍यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांचे कथनानुसार, त्‍यांचेकडे गैरअर्जदाराचे क्रेडीट कार्ड क्र. 4006661017019428 होते. गैरअर्जदाराने‍ दि.21.08.2006 रोजी रु.15,720.48 इतक्‍या रकमेचे बील तक्रारकर्त्‍यास पाठविले. 13.09.2006 ला त्‍याचे खाते बंद करण्‍यात आल्‍याची सूचना प्राप्‍त झाली. त्‍यांनी गेरअर्जदारासोबत तडजोड करुन, रु.12,000/- चा धनादेश दिला. त्‍यानंतरही गैरअर्जदाराने पुढे नोटीस देऊन तक्रारकर्त्‍याकडे रकमेची मागणी केली, त्‍यावर पुन्‍हा रकमेची मागणी केली, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने ही तक्रार दाखल केली व गैरअर्जदाराने रकमेची मागणी करु नये, मानसिक त्रासासाठी रु.20,000/-, तक्रारीचा खर्च, नोटीसचा खर्च मिळावा अशा मागण्‍या केल्‍या.
 
 
2.                गैरअर्जदारांना नोटीस पाठविला, गैरअर्जदार क्र. 2 हजर होऊन व मंचाने वेळोवेळी संधी देऊनही, त्‍यांनी आपला लेखी जवाब दाखल केला नाही, म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द विना लेखी जवाब कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित केला. गैरअर्जदार क्र. 1 मंचासमोर हजर झाले नाही व लेखी जवाब दाखल केला नाही, म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फी कारवाई चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला. प्रकरण युक्‍तीवादाकरीता आल्‍यानंतर मंचाने तक्रारकर्त्‍यांचा युक्‍तीवाद त्‍यांचे वकील प्रतिनीधीमार्फत ऐकला. गैरअर्जदार गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल करण्‍यात आलेल्‍या दस्‍तऐवजांचे व शपथपत्रांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
 
-निष्‍कर्ष-
 
3.                सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍यांचे जे काही म्‍हणणे आहे, ते प्रतिज्ञापत्रावर आहे आणि त्‍यासंबंधी त्‍यांनी दस्‍तऐवज दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्‍यांनी रु.12,000/- एवढी रक्‍कम ते म्‍हणतात त्‍याप्रमाणे गैरअर्जदारांनी दिल्‍याचे पासबुकवरुन स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराने यासंबंधीची बाब नाकारली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांची तक्रार खरी आहे हे स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदाराने तडजोडीची रक्‍कम स्विकारल्‍यानंतरही गैरअर्जदारांकडून वेळोवेळी रकमेची मागणी करणे हे चुकीचे आहे व तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र  आहे. यास्‍तव खालीलप्रमाणे आदेश.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
2)    गैरअर्जदारांनी यापुढे रकमेची मागणी करु नये.
3)    गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला रु.2,000/- मानसिक त्रासापोटी व     रु.1,000/- तक्रारीच्‍या खर्चापोटी आदेश प्राप्‍त झाल्‍यापासून एक महिन्‍याचे आत  द्यावे.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.