Maharashtra

Nagpur

CC/11/21

M/s. Advance Vision Through Prop. Madhavi Milind Khekale - Complainant(s)

Versus

M/s. Saibaba Goods Garage - Opp.Party(s)

Adv. Jayesh Vora

12 Dec 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/21
 
1. M/s. Advance Vision Through Prop. Madhavi Milind Khekale
Office- Block No. 1, Jumma Masjid, Near Gandhi Gate, Mahal
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Saibaba Goods Garage
Offic- Prop. Near Andhra Bank, In front of Hotel Chirag,
Wardha
Maharashtra
2. M/s. Saibaba Goods Garage
Office- Near Mahanagar Transport, Wadi
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HON'ABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:Adv. Jayesh Vora, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 12/12/2011)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दि.18.01.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत
तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
2.                प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्तीचे म्‍हणण्‍यानुसार तिने मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर, आय.टी.आय. कॉलेज रोड, आर्वी नाका, वर्धा यांनी केलेल्‍या मागणीनुसार एच.सी.एल. कंपनीचा मॉडेल क्र. AE 1 B 2065 N  किंमत रु.28,625/- दि.28.10.2010 रोजी सदर कंपनीला पाठविण्‍यासाठी गैरअर्जदारांच्‍या स्‍वाधीन केला. मालाच्‍या वाहतुकीची रक्‍कम, माल प्राप्‍त करणा-या सदर मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीने द्यावयाची होती. म्‍हणून सदर माल ‘टू-पे’, या तत्‍वावर गैरअर्जदारांकडे बुक करण्‍यांत आले. त्‍यापोटी गैरअर्जदारांनी रु.2/- तक्रारकर्त्‍याकडून स्विकारुन मालाची पावती क्र.111854 दि.28.10.2010 निर्गमीत केली व सदरचा माल दुस-या दिवशी 16.00 वाजता पोहचता होईल असे आश्‍वासन दिले. तक्रारकर्त्‍याने सदर लॅपटॉप बुक केल्‍याचे तसेच दुस-या दिवशी दि.29.10.2010 रोजी 16.00 वाजता सदर माल पोचता होईल अशी सुचना सदर कंपनीला दिली.
 
3.          सदरचा लॅपटॉप संबधाने सदर मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीने गैरअर्जदारांशी वारंवार संपर्क केला असता गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर लॅपटॉपची डिलेव्‍हरी त्‍याना दिली नाही. तक्रारकर्त्‍याने देखिल गैरअर्जदार क्र.2 यांचेशी संपर्क करुन संबंधीत बाबींसंदर्भात विचारणा केली असता त्‍यांनी कुठलेही समाधारकारक उत्‍तर दिले नाही. सदर मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीने कंटाळून शेवटी तक्रारदाराची सदर लॅपटॉपची ऑर्डर रद्द केली. त्‍यामुळे संबंधीत घटनेमुळे तक्रारकर्त्‍याचे आर्थीक नुकसान तर झालेच, परंतु तिचे व्‍यापारीक प्रतिष्‍ठेला सुध्‍दा धक्‍का पोचला. गैरअर्जदारांची सदरची कृति ही सेवेतील कमतरता असुन तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल करुन एच.सी.एल. कंपनीचा मॉडेल क्र. AE 1 B 2065 N  किंमत रु.28,625/- गैरअर्जदार क्र.2 यांचे स्‍वाधीन केला होता त्‍याच परिस्‍थीतीत परत करावा किंवा लॅपटॉपची किंमत रु. 28,625/- दि.28.10.2010 पासुन 24% व्‍याजासह द्यावे,मानसिक शारीरिक व आर्थीक त्रासाबद्दल रु.1,00,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.20,000/- द्यावे अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
 
4.          मंचामार्फत गैरअर्जदारांना नोटीस बजावण्‍यांत आली असता ते मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
 
            गैरअर्जदारांनी आपल्‍या कथनात त्‍यांचा मालवाहू ट्रान्‍सपोर्टचा व्‍यवसाय असल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे मान्‍य केले आहे, परंतु तक्रारकर्त्‍याचे इतर सर्व आरोप अमान्‍य केलेले आहेत. त्‍यांच्‍यामते सदरची तक्रारचालवण्‍याचा या मंचाला अधिकार नाही. गैरअर्जदारांच्‍या मते तक्रारकर्त्‍याने सदर लॅपटॉप कधीही बुक केला नव्‍हता, त्‍यामुळे त्‍याची डिलेव्‍हरी देण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.
 
5.          गैरअर्जदार यांच्‍या कथनानुसार त्‍यांच्‍या नेहमीच्‍या व्‍यवसायाच्‍या पध्‍दतीनुसार त्‍यांच्‍या नागपूर येथील गॅरेजमधे पार्सलची कन्‍साईटमेंट नोट देण्‍यांत येते, त्‍यानंतर ठरलेल्‍या ठिकाणी माल पोहचल्‍यावर भाडयाचे पैसे घेऊन पार्सलची डिलेव्‍हरी देण्‍यांत येते. या संदर्भात विशिष्‍ट माल मिळाल्‍याची किंवा दिल्‍याची कोणतीही पावती देण्‍यांत येत नाही. वर्धा हे शहर छोटे असल्‍यामुळे तेथील व्‍यावसायीकांचा परिचय असल्‍यामुळे तेथून ठराविक जागी नोकर मालाची डिलेव्‍हरी नेण्‍यासाठी येतो. अशाच पध्‍दतीने मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीला वेळोवेळी मालाची डिलेव्‍हरी देण्‍यांत आलेली आहे. दि. 29.10.2010 रोजी सदर मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीकडून त्‍यांचा गॅरेजचा नोकर तौसीफ मोहम्‍मद अली हा दि.29.10.2010 रोजी रु.40/- पार्सल पावती क्र.6095 प्रमाणे घेऊन गेलेला आहे, सदर नोकराची कोणतीही पावती घेण्‍यांत आली नाही किंवा तक्रारकर्त्‍याला सुध्‍दा तशी पावती लिहुन देण्‍यांत आलेली नाही.
6.          दि.29.10.2010 पासुन तक्रारकर्त्‍यातर्फे किंवा मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीतर्फे दि.02.12.2010 पर्यंत कोणतीही विचारणा किंवा पत्र गैरअर्जदारांना प्राप्‍त झालेले नाही. अचानक तक्रारकर्त्‍याकडून नोटीस प्राप्‍त झाल्‍यावर दि.11.12.2010 रोजी गैरअर्जदारांतर्फे सदर नोटीसला उत्‍तर देण्‍यांत आले. वास्‍तविक पार्सल बुकींगवर दिलेल्‍या अटींनुसार पार्सल गहाळ झाल्‍यावर त्‍याची कल्‍पना 15 दिवसांच्‍या आंत गैरअर्जदारांना द्यावयास पाहिजे. परंतु तशी तक्रार तक्रारकर्त्‍याने किंवा मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीने केलेली नाही. मात्र गैरअर्जदारांनी या घटनेबद्दल वर्धा पोलिस स्‍टेशनला तक्रार केलेली आहे.
7.           सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्‍तीवादाकरीता दि.03.12.2011 रोजी आली असता दोन्‍ही पक्षांचा त्‍यांचे वकीलांमार्फत युक्तिवाद ऐकण्‍यांत आला. तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
 
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
 
8.         प्रस्‍तुत प्रकरणातील दाखल केलेले दस्‍तावेज क्र.2 व रील पावती पाहता असे दिसुन येते की, तक्रारकर्त्‍याने दि.28.10.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 साईबाबा गुड्स गॅरेज यांना एक एच.सी.एल. कंपनीचा लॅपटॉप वर्धा येथील मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीला देण्‍यासाठी दिलेला होता. तसेच सदर माल टू-पे या तत्‍वावर बुक करण्‍यांत आलेला होता, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याकडून रु.2/- रोख घेतलेली होती (दस्‍तावेज क्र.2).
9.          तक्रारकर्त्‍याची महत्‍वाची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदारांनी कराराप्रमाणे सदरचा लॅपटॉप मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीला पाहचविला नाही. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याने लॅपटॉप त्‍यांचेमार्फत पाठविल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले. तसेच त्‍यांच्‍या मते तक्रारकर्त्‍याने दिलेले पार्सल त्‍याच्‍या व्‍यवसायाचे पध्‍दतीप्रमाणे मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीचा नोकर मौसीफ मोहम्‍मद अली हा आल्‍यावर गैरअर्जदारांच्‍या कर्मचा-याने सदर व्‍यक्तिकडून भाडयापोटीचे रु.40/- स्विकारुन दोन पार्सलचे डब्‍बे त्‍याला दिले. तसेच त्‍याच्‍या व्‍यवसायाच्‍या पध्‍दतीनुसार ग्राहकांच्‍या नेहमीच्‍या व्‍यवहारावरुन कोणतीही पावती न देता फेर पावती पाहून व्‍यक्तिला माल देण्‍यांत आला. सदर माल कोणता आहे हे तक्रारकर्त्‍याकडून कधीही सांगण्‍यांत आले नाही, तसेच संबंधीत बाबीची तक्रार कराराच्‍या अटीप्रमाणे 15 दिवसांच्‍या आंत तक्रारकर्त्‍याने किंवा मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीने गैरअर्जदाराकडे केलेली नाही.
10.         दस्‍तावेज क्र.2 वरील गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास दिलेल्‍या पावतीवरुन तसेच दाखल दस्‍तावेजांवरुन तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांमार्फत एच.सी.एल. कंपनीचा लॅपटॉप वर्धा येथे मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीला देण्‍यासाठी पाठविला होता, असे दिसुन येते. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर पार्सल गैरअर्जदारांना लॅपटॉप दिलेला नव्‍हता हे गैरअर्जदारांचे म्‍हणणे या मंचाला मान्‍य नाही.
 
11.        त्‍याच बरोबर गैरअर्जदारांनी मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीचा माणून मौसीफ मोहम्‍मद अली याच्‍याकडून भाडयाच्‍या बिलापोटी रु.60/- घेऊन पार्सल सुपूर्द केल्‍याचे आपल्‍या जबाबात म्‍हटले आहे. परंतु त्‍याच्‍या व्‍यवसायाच्‍या पध्‍दतीनुसार माल मिळाल्‍याची किंवा दिल्‍याची कोणतीही पावती देण्‍यांत येत नाही, असे म्‍हटले आहे. परंतु व्‍यवसायातील प्रचलित पध्‍दत पाहता गैरअर्जदारांचे हे म्‍हणणे विश्‍वासार्ह वाटत नाही. तसेच गैरअर्जदारांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे कराराप्रमाणे 15 दिवसाच्‍या आत माल गहाळ झाल्‍याची तक्रार तक्रारकर्त्‍याने अथवा मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीने त्‍यांचेकडे केली नाही. मे. इन्‍फोसोफ्ट कॉम्‍प्‍युटर कंपनीचे प्रोप्रायटर श्री. नरेश मा. फाटे यांनी त्‍यांचे दस्‍तावेज क्र.17 वरील शपथपत्रात दि.29.10.2010 ते 18.11.2010 या कालावधीमधे गेरअर्जदाराकडे प्रत्‍यक्षात जाऊन सदर लॅपटॉपचे पार्सलबाबत विचारणा केल्‍यावर देखिल सदर पार्सल मिळाले नाही, असे नमुद केले आहे. त्‍यामुळे 15 दिवसांचे आत कराराप्रमाणे गैरअर्जदारांकडे तक्रार करण्‍यांत आली नाही असे गैरअर्जदारांचे म्‍हणणे मान्‍य नाही.
 
12.        वरील सर्व वस्‍तुस्थिती पाहता गैरअर्जदारांनी कराराप्रमाणे मोबदला स्विकारुन तक्रारकर्त्‍याचे लॅपटॉपचे पार्सल घेऊन ठरलेल्‍या ठिकाणी न पोहचवुन सेवेत कमतरता दिलेली आहे व याकरीता ते तक्रारकर्त्‍यास नुकसान भरपाई देण्‍यांस जबाबदार आहेत. तक्रारकर्त्‍याचे शपथपत्र व दस्‍तावेज क्र.2 वरील पावतीवरुन सदर लॅपटॉपची किंमत वॅट वगळून रु.27,261.90/- असल्‍याचे दिसुन येते. सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
                        -// अं ति म आ दे श //-
 
 
 
 
 
1.                  तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.                  गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास लॅपटॉपची किंमत    रु.27,262/- परत करावी.
2.3.    गैरअर्जदारांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक  त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
2.4.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची छायांकित प्रत मिळाल्‍याचे      दिनांकापासुन 30 दिवसांचे आत करावी.
 
 
 
[HON'ABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.