Maharashtra

Nagpur

CC/415/2020

SHRI. PANKAJ BHIKAMCHAND KESHARWANI - Complainant(s)

Versus

M/S. SAI TOURS & TRAVELS THROUGH PROPRIETOR/ PARTNER/ AOUTHORIZED SIGNATORY SHRI. SOURABH THAKUR - Opp.Party(s)

ADV. UDAY P. KSHIRSAGAR

29 Oct 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/415/2020
( Date of Filing : 19 Oct 2020 )
 
1. SHRI. PANKAJ BHIKAMCHAND KESHARWANI
R/O. ANAND NAGAR, PLOT NO.699, NEAR NIKUNJ SCHOOL, BINAKI, JOSHIPURA, DR. AMBEDKAR MARG, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. SAI TOURS & TRAVELS THROUGH PROPRIETOR/ PARTNER/ AOUTHORIZED SIGNATORY SHRI. SOURABH THAKUR
OFF./R/O. PLOT NO.337, KATOL ROAD, NEAR GITTIKHADAN POLICE STATION, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. UDAY P. KSHIRSAGAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 29 Oct 2021
Final Order / Judgement

मा. सदस्या श्रीमती चंद्रिका बैस, यांच्या आदेशान्ये -

  1. तक्रारकर्ता सादर करतो की, त्याच्या मावशीच्या मूलीचे लग्न दिनांक 16.2.2020 ला बिलासपूर येथे ठरल्यामूळे त्यांनी दिनांक 25.10.2019 रोजी वि..ची भेट घेतली व प्रवासी बस प्रवाशांना बिलासपूर येथे ने-आण करण्‍याकरिता एकुण रुपये 1,00,000/- मधे ठरविले व त्यावेळी रुपये 100/- टोकन म्हणुन दिले. वि.. यांचा ट्रॅव्ल्सचा व्यवसाय असून ते लग्रसमारंभ व इतर कार्यक्रमाकरिता प्रवासी वाहन सुध्‍दा पूरवितात. तक्रारकर्ता नमुद करतो की, दिनांक 5.11.2019 रोजी वि.. यांना रुपये 30,000/- खात्यातुन परस्पर ऑनलाईन वळते केले व वि.. यांना तसे कळविले. परंतु वि.. काही ना काही कारण काढुन तक्रारदारास ठरविल्याप्रमाणे बस दाखविणे टाळत राहिले. तक्रारकर्ता सतत मागे लागल्यानंतर वि.. ने शेवटी दिनांक 02.01.2020 रोजी रक्कम जमा केल्याबाबत पावती तक्रारदारास दिली परंतु बस दाखविली नाही. तकारदाराने शेवटी दिनांक 14.1.2020 रोजी बस दाखवा अन्यथा पैसे परत करा असा निर्वाणीचा इशारा दिला तेव्हा वि..ने त्यांना कळविले की, ते एलॅक्सीस दवाखान्यात आहे तुम्हाला वाटेल ते करा. त्यामूळे तक्रारदाराने त्याच दिवशी पोलीस स्टेशन यशोधरानगर येथे वि.. विरुध्‍द तकार दाखल केली. परंतु पोलीसांनी सुध्‍दा त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. शेवटी तक्रारदाराने दिनांक 5.3.2020 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून पैसे परत करा अन्यथा कायदेशीर कारवाई करु असे कळविले. परंतु वि..ने सदर नोटीसची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारदारास सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करावी लागली. वि..ने एैनवेळी बस न दिल्याने वैक्लपीक व्यवस्था करण्‍याकरिता तक्रारदाराची धावपळ झाली त्यामूळे त्याचे भरपूर मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला व आर्थिक नुकसान झाले.
  2. तकारदाराने आपले तक्रारीत पूढील प्रमाणे मागणी केली आहे. वि..ने तक्रारदारास प्रवासी वाहन- बस पुरविण्‍याकरिता वि..कडे बसचे आरक्षणाकरिता जमा केलेली रक्कम रुपये 30,100/-, दिनांक 05.01.2020 पासून द.सा..शे.18 टक्के व्याजासह देण्‍याचे आदेश व्हावे. तसेच तकारदारास झालेल्या मानसिक,शारिरिक त्रासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 20,000/- ची मागणी केलेली आहे.
  3.  सदर प्रकरणात दैनिक वृत्तपत्र ‘दैनिक भास्कर’ मधे दिनांक 04.08.2021 रोजी जाहिर नोटीस प्रसिध्‍द करुनही वि..हजर झाले नाही म्हणुन दिनांक 20.10.2021 रोजी सदर प्रकरण त्यांचे विरुध्‍द एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.  
  4. तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत वि..कडे रुपये 30,000/- जमा केल्याची पावती, तक्रारदाराचे बॅंक खात्यातून वि..चे बॅंक खात्यात रक्कम वळती झाल्याबाबत खाते उतारा, तक्रारदाराने वि.. यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस व वरिष्‍ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे इत्यादी अभिलेखावर दाखल आहे.
  5. तक्रारदाराची तक्रार व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता खालील मुद्दे उपस्थीत होतात.

मुद्दे                                                                  उत्तरे

  1. तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय?          नाही
  2.       विरुध्‍द पक्षाने तक्राराचे सेवेत त्रुटी व अनुचित

व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ?                     नाही

  1.       आदेश   ?                                                                अंतीम आदेशाप्रमाणे.

का   मि मां सा

 तक्रारकर्ता सादर करतो की, त्याच्या मावशीच्या मूलीचे लग्न दिनांक 16.2.2020 ला बिलासपूर येथे ठरल्यामूळे त्यांनी वि.प.कडुन प्रवासी बस प्रवाशांना बिलासपूर येथे ने-आण करण्‍याकरिता एकुन रुपये 1,00,000/- मधे ठरविले व त्यावेळी रुपये 100/- टोकन म्हणुन दिले. त्यानंतर तक्रारदाराने दिनांक 5.11.2019 रोजी वि.प. यांना रुपये 30,000/- ऑनलाईन वळते केले. परंतु वि.प.ने तक्रारदाराला आजतागायत बस दाखविली नाही. तकारदाराने शेवटी दिनांक 14.1.2020 रोजी बस दाखवा अन्यथा पैसे परत करा असा निर्वाणीचा इशारा दिला असता वि.प.ने त्यांना कळविले की, ते एलॅक्सीस दवाखान्यात आहे तुम्हाला वाटेल ते करा. त्यामूळे तक्रारदाराने त्याच दिवशी पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे वि.प. विरुध्‍द तकार दाखल केली. परंतु पोलीसांनी सुध्‍दा त्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यामूळे शेवटी तक्रारदाराने दिनांक 5.3.2020 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून पैसे परत करा अन्यथा कायदेशीर कारवाई करु असे कळविले परंतु वि.प.ने सदर नोटीसची दखल घेतली नाही. त्यामूळे तक्रारदारास सदर तक्रार आयोगासमक्ष दाखल करावी लागली. वि.प.ने एैनवेळी बस न दिल्याने वैकल्पीक व्यवस्था करण्‍याकरिता तक्रारदाराची धावपळ झाली त्यामूळे त्याचे अत्यंत आर्थिक नुकसान झाले व तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत वि.प.कडे रुपये 30,100/- जमा केल्याची पावती , तक्रारदाराचे बॅंक खात्यातून वि.प.चे बॅंक खात्यात रक्कम वळती झाल्यबाबत खाते उतारा ,तक्रारदाराने वि.प. यांना पाठविलेली कायदेशीर नोटीस इत्यादी अभिलेखावर दाखल आहे. तक्रारकर्ते यांनी रक्कम दिल्यानंतरही वि.प. यांनी बससेवा दिली नाही यावरुन तक्रारदाराने वि.प.कडे प्रवासी बस आरक्षीत केल्याचे सिध्‍द होते व वि.प.ने तक्रारदाराचे प्रती सेवेत त्रुटी केल्याची बाब निर्देशनास येते असे या आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.  सबब हे आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करित आहे.

अंतीम आदेश

  1. तक्रारदाराने  वि..कडे जमा केलेली रक्कम रुपये 30,100/- ही  दिनांक 5.01.2020 पसुन ते रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा..शे 12 टक्के व्याजासह तक्रारदारास वि..ने परत करावी.
  2. तक्रारदारास झालेल्या मानसिक, शारिरिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/-(रुपये दहा हजार फक्त)तक्रारदारास देण्‍यात यावे.
  3. वि..ने सदर आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
  4. तक्रारकर्त्याला आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  5. तक्रारीची ब व क प्रत तक्रारकर्त्यास परत करण्‍यात यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.