(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी ज. भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 28 एप्रिल 2010)
अर्जदार, श्री रविंद्र बाबुराव कातरकर यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा थोडक्यात आशय असा की,
1. अर्जदार यांनी, गैरअर्जदार यांचेकडून दिनांक 19/01/2010 रोजी Beztonz चा कंपनीचा DVD प्लेअर हा रुपये 2050/- ला विकत घेतला. गैरअर्जदार हे राजलक्ष्मी मार्केटींग, मुल रोड, गडचिरोली या फर्मचे मालक असून इलेक्ट्रानिक वस्तु विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. गैरअर्जदार यांनी DVD प्लेअरचे बिल अर्जदार यांना दिलेले आहे.
2. अर्जदार यांनी घेतलेला DVD प्लेअर हा व्यवस्थीत सुरु होत नव्हता व वाजतही नव्हता. तेंव्हा, अर्जदार यांनी तक्रार केली, तेंव्हा घरी येवून बरोबर करुन देतो असे सांगितले. परंतु, दुकानदाराने DVD प्लेअर दुरुस्त करुन दिला नाही व वारंवार विचारणा केली असता टाळाटाळ करुन दूर्लक्ष केले.
... 2 ... ग्रा.त.क्र.15/2010.
3. अर्जदार यांनी दिनांक 28/01/2010 रोजी पञ पाठविले. परंतु, गैरअर्जदार यांनी पञ घेण्यास नकार दिला, या सर्व प्रकारामुळे अर्जदार यांना ञास सहन करावा लागला व वेळ सुध्दा वाया गेला.
4. अर्जदार मागणी करतात की, दिनांक 19/01/2010 रोजी खरेदी केलेला DVD प्लेअर गैरअर्जदार यांनी बदलून द्यावा किंवा त्याची रक्कम 18 % व्याजाने परत करावी. तसेच, गैरअर्जदाराने, शारिरीक, मानसीक व आर्थिक ञासापोटी रुपये 5,000/- अर्जदार यांना द्यावेत.
5. गैरअर्जदार यांनी नि.क्र.5 नुसार नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे, नोटीस तामील झाले असे गृहीत धरुन गैरअर्जदार यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात येत आहे, असा ओदेश निशाणी क्र. 1 वर पारीत करण्यात आला.
// कारणे व निष्कर्ष //
अर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ, दस्ताऐवज व केलेला युक्तीवाद यावरुन असे दिसून येते की,
6. अर्जदार यांनी, गैरअर्जदार यांच्या दुकानातून DVD प्लेअर खरेदी केलेला आहे. तसेच, गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांना बिल सुध्दा दिलेले आहे. त्यामुळे, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत, यात वाद नाही.
7. अर्जदार यांनी पुराव्यादाखल DVD प्लेअरचे बिल दाखल केले आहे, त्यात एक वर्षाची वॉरंटी असल्याचे लिहीले आहे. तसेच, गैरअर्जदार यांना पाठविलेले पञ रेकॉर्डवर दाखल केलेले आहे. वारंवार सांगूनही अर्जदार यांचा DVD प्लेअर दुरुस्त करुन न देणे आणि अर्जदाराने पाठविलेले पञ गैरअर्जदार यांनी हजर असतांना सुध्दा न घेता, परत पाठविलेले आहे. यावरुन, गैरअर्जदार हे अर्जदाराकडे जाणूनबुजुन दूर्लक्ष करीत आहेत. किंवा टाळाटाळ करीत आहेत व ञास देत आहेत असे दिसून येते. यावरुन, गैरअर्जदार हे अर्जदार यांना नाहक ञास देत आहेत, असे न्यायमंचाचे मत आहे.
8. गैरअर्जदार यांनी हजर राहूनही नोटीस घेण्यास नकार दिला. त्यामुळे, नोटीस तामील झाला असे समजून एकतर्फी आदेश निशाणी क्र. 1 वर पारीत करण्यात आला. त्यामुळे, तक्रारीत अर्जदाराचे म्हणणे व युक्तीवाद ग्राह्य धरण्यात येवून तक्रार गुणदोषावर निकाली काढण्यात येत आहे.
9. गैरअर्जदार यांनी एक वर्षाची वॉरंटी देऊन सुध्दा अर्जदाराने DVD बद्दल लगेच तक्रार करुनही दुरुस्ती करुन दिेले नाही. तसेच, DVD ची पाहणी सुध्दा केले नाही, ही गैरअर्जदार यांची अनुचीत व्यापार पध्दत आहे. अर्जदाराने, प्रत्यक्ष भेटून DVD बाबत तक्रार दिली तरी सेवा योग्य प्रकारे दिली नाही.
... 3 ... ग्रा.त.क्र.15/2010.
10. अर्जदाराने DVD बाबत सुचना गैरअर्जदार यास दिले आहे. अर्जदाराने घेतलेली DVD योग्य प्रकारे काम करीत नसल्याने, ती वॉरंटी मध्ये असल्यामुळे दुरुस्ती करुन देण्यास गैरअर्जदार जबाबदार आहे.
अशा परिस्थितीत, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर.
(2) गैरअर्जदार यांनी, अर्जदार यांचा DVD प्लेअर अर्जदाराने DVD दिल्यापासून 10
दिवसात कोणताही खर्च न घेता दुरुस्त करुन द्यावे. तसेच, DVD प्लेअर दुरुस्त करुन दिल्याच्या तारखेपासून एक वर्षाची DVD प्लेअरची गॅरंटी अर्जदाराला द्यावी.
(3) अर्जदाराने, आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 8 दिवसाचे आंत DVD गैरअर्जदार
यांचे दुकानात दुरुस्ती करीता नेऊन द्यावे.
(4) गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक, शारिरीक ञासापोटी व तक्रारीचा खर्च
रुपये 500/- द्यावे.
(5) उभयतांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/04/2010.