Maharashtra

Nagpur

CC/393/2020

MR. RAJA DEVAJI WAGHADE - Complainant(s)

Versus

M/S. RAINBOW CORPORATION THROUGH PROPRIETOR/DIRECTOR (AUTHORIZED FRANCHISEE FOR EUREKA FORBES LTD.) - Opp.Party(s)

ADV. TUSHAR M. BARAPATRE

25 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/393/2020
( Date of Filing : 08 Oct 2020 )
 
1. MR. RAJA DEVAJI WAGHADE
R/O. AT PLOT 69, SAI HOME GOURAKHNATH HOUSING SOCIETY GAYATRI NAGAR, NEAR NIT GARDEN ZINGABI TAKLI, KORADI ROAD, NAGPUR-440030
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. RAINBOW CORPORATION THROUGH PROPRIETOR/DIRECTOR (AUTHORIZED FRANCHISEE FOR EUREKA FORBES LTD.)
OFF. AT, K 4 AMRAVATI ROAD, BHARAT NAGAR, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. TUSHAR M. BARAPATRE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 25 Mar 2022
Final Order / Judgement

मा. सदस्‍याश्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे. वि.प.हे युरेका फोब्स या कंपनीचे अधिकृत व नोंदणीकृत डिलर असुन ते युरेका फोब्स कंपनीचे अॅक्वा गार्ड वॉटर कुलरचे विक्रेते आहेत. तकारदाराने त्यांचे कडुन Aqua Guard Reviva UV Nxt  Serial No.1231407296004566 of Cash Rs.12,090/- including Gst  vide date 14.1.2020, invoice No.IN-19-20-01-00000.
  2. तक्रारदाराने वि.प.कडुन घेतलेले सदरचे वॉटर कुलर खराब होता त्यांत विविध प्रकारे तांत्रीक दोष होते. तकारदाराने वि.प.ला वारंवार त्यांबाबत सांगीतले होते व युरेका फोब्स कंपनीला सुध्‍दा टोल फ्री नंबरवरुन वारंवार कळविले होते. परंतु वि.प.ने त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले नाही. सदरचे युरेका फोब्स कंपनी वॉटर कुलर वॉरन्टी मधे असल्यामूळे वि.प.ने त्यांना मोफत सेवा देणे आवश्‍यक होते परंतु वि.प.च्या टेक्नीशियने तक्रारदाराला मशीन दुरुस्तीकरिता भेट देण्‍याचे व देखभाल करण्‍याकरिता वेगळया रक्कमेची मागणी केली. त्यामूळे तक्रारदारास आर्थिक व शारिरिक त्रास सहन करावा लागता.  त्यामूळे कंटाळून तक्रारदाराने वि.प.ला दिनांक 13.7.2020 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस वि.प. ने स्वीकारली नाही म्हणुन   तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 1,24,090/-, व्याजासह परत मिळावे.
  3. विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प. नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 01.09.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  4. तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असता निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

मुद्दे                                                                           उत्तरे

  1.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                होय
  2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                होय
  3.  विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?         होय
  4.  काय आदेश ?                                                                        अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. वि.प.हे युरेका फोब्स या कंपनीचे अधिकृत व नोंदणीकृत डिलर असुन ते युरेकाफोब्स कंपनीचे अॅक्वा गार्ड वॉटर कुलरचे विक्रेते आहेत. तकारदाराने त्यांचे कडुन Aqua Guard Reviva UV Nxt  Serial No.1231407296004566 of Cash Rs.12,090/- including Gst  vide date 14.1.2020, invoice No.IN-19-20-01-00000.
  2. तक्रारदाराने वि.प.कडुन घेतलेल्या वॉटर कुलरचे देयक व वकीलातर्फे पाठविलेल्या नोटीसची प्रत  यांचे अवलेाकन केले असता खालील बाबी आढळून आल्या.
  3. तक्रारदाराने वि.प.कडुन घेतलेले सदरचे वॉटर कुलर खराब होता व त्यांत विविध प्रकारे तांत्रि‍क दोष होते. तकारदाराने वि.प.ला वारंवार त्यांबाबत सांगीतले होते व युरेका फोब्स कंपनीला सुध्‍दा टोल फ्री नंबरवरुन वारंवार कळविले होते. परंतु वि.प.ने त्यांच्या तक्रारीचे निराकरण केले नाही. सदरचे युरेका फोब्स कंपनी वॉटर कुलर वॉरन्टी मधे असल्यामूळे वि.प.ने त्यांना मोफत सेवा देणे आवश्‍यक होते परंतु वि.प.च्या टेक्नीशियने तक्रारदाराला मशीन दुरुस्तीकरिता भेट देण्‍याचे व देखभाल करण्‍याकरिता वेगळया रक्कमेची मागणी केली. त्यामूळे तक्रारदारास आर्थिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला म्हणुन तक्रारदारने कंटाळून वि.प.ला दिनांक 13.7.2020 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस वि.प. ने स्वीकारली नाही म्हणुन तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे घोषित करावे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 1,24,090/-, व्याजासह परत दिलेले नाही व याबाबत विरुध्‍द पक्षाकडे तक्रार करुन सुध्दा वि.प.ने त्‍याची दखल घेतलेली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्याचे दिसुन येते. तसेच वि.प.ने वॉरंटी कालावधीमध्‍ये मोफत सेवा देण्‍याचे खोटे वचन दिल्यामूळे तक्रारदाराचे प्रती अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                                      अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  वॉटर कुलर ची किंमत रुपये Rs.12,090/- व त्‍यावर दि. 14.01.2020 पासून रक्कमेच्या  प्रत्‍यक्ष अदायगी पर्यत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह येणारी रक्कम तक्रारदारास परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 5,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.