(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 24/01/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 20.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिने गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांचेकडून संपूर्ण रक्कम अदा करुन सदनिका विकत घेतली. गैरअर्जदार क्र.1 हे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे मुखत्यारपत्र धारक असुन दि.25.09.1996 रोजी सदर मुखत्यारपत्र दुय्यम निबंधक, नागपूर-5 येथे अनुक्रमांक 903 नुसार नोंदविले आहे. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांसोबत दि.29.09.2007 रोजी करारनामा करुन ‘प्रभात-स्मृति’ या अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावरील जी-1 ही सदनिका रु.7,00,000/- ला खरेदी केली. करारनाम्याचे वेळी तक्रारकर्तीने बयाणा रक्कम म्हणून रु.3,00,000/- दिले व रु.4,00,000/- विक्रीपत्राचे नोंदणीच्या वेळेस देण्यांचे ठरविले होते. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तिने गैरअर्जदार क्र.2 यांना दि.12.01.2008 रोजी रु.150,000/- व दि.17.01.2008 रोजी रु.50,000/- व त्याच तारखेला रु.2,00,000/- असे एकूण रु.4,00,000/- अदा केले व त्यानुसार तक्रारकर्तीने गैरअर्जदारांना विक्रीपत्र करुन देण्याची विनंती केली. तक्रारकर्तीचे पुढे असेही नमुद केले आहे की, तिने गैरअर्जदारांना रु.10,000/- जास्तीचे अदा केलेले आहे व सदर रक्कम गैरअर्जदारांना मिळाल्यानंतर त्यांनी सदनिकेचा ताबा दिला तेव्हा पासून ती तेथे राहत आहे, परंतु गैरअर्जदारांनी विक्रपत्र करुन दिले नाही. तक्रारकर्तीने वारंवार विनंती केली व गैरअर्जदारांनी विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे दि.31.03.2009 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठविली. सदर नोटीसला सुध्दा गैरअर्जदारांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे दि.18.01.2010 रोजी परत गैरअर्जदारांना नोटीस पाठविली त्यालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पुन्हा दि.20.05.2010 रोजी परत नोटीस बजाविली त्यानंतर गैरअर्जदारांनी दि.26.05.2010 रोजी सकाळी 11.30 मिनिटांनी महाकाळकर बिल्डींग, छोटा ताजबाग, नागपूर येथे विक्रीपत्र नोंदणीकरुन घेण्याकरीता बोलविले. परंतु गैरअर्जदार नोंदणी कार्यालयात आले नाही. तसेच गैरअर्जदार तक्रारकर्तीस विक्रीपत्र करुन देण्यांस टाळाटाळ करीत असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली व तीव्दारे, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस वादातीत सदनिकेचे विक्रीपत्र करुन द्यावे, शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व आर्थीक नुकसानीकरीता रु.5,000/- तसेच गैरअर्जदारांनी मीटर न लावल्यामुळे रु.15,000/- व कार्पोरेशन टॅक्स व पाणी बिल न भरल्यामुळे त्याचा भुर्दंड तक्रारकर्तीस भरावा लागला त्यासाठी मानसिक व शारीरिक त्रास म्हणून रु.25,000/- तसेच विक्रीपत्र वेळेवर न लावुन दिल्यामुळे तक्रारकर्तीस मालमत्तेचा उपयोग घेता आला नाही, त्यामुळे मानसिक व शारीरिक त्रास म्हणून रु.20,000/- मागणी केली आहे. 3. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्यांत आली असता, गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केलेले आहे. 4. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या लेखी उत्तरात नमुद केले आहे की, त्यांनी स्वतः तक्रारकर्तीसोबत सदनिका क्र.जी-1 (वादग्रस्त सदनिका) विकण्याचा कोणताही प्रकारे करारनामा केला नाही. तसेच त्या संबंधाने गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे आममुखत्यारपत्र त्याला मिळाले नाही. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेला करारनामा हा खोटा आहे. गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना भुखंड क्र.313 चा विकास करण्याकरता मुखत्यारपत्र तयार करुन दिले होते व त्यानुसार विकासाचा करारनाम्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.2 च्या 3032 चौ.फूट जमिनीच्या किमतीच्या बदल्यात गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 ला सदनिका व 800 चौ.फूटचा स्वतंत्र गाळा सदर अपार्टमेंटमध्ये बांधून द्यावयाचा होता. तसेच गैरअर्जदार क्र.3 यांना 3035 चौ.फूट जमीनीचा मालकी हक्काबाबत रु.4,00,000/- द्यावयाचे होते. व उर्वरित सदनिके संबंधात आममुखत्यारपत्रा प्रमाणे गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 व 3 चा मुखत्यार म्हणून उरलेल्या सदनिकांबाबतचे करारनामे व विक्रीपत्र देण्याचा अधिकार दिला होता. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने दि.20.09.2007 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचेशी करारनामा केला. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने करारनाम्याचा खोटा उपयोग करुन विजेचे कनेक्शन घेतले व गैरअर्जदार क्र.2 व त्याचे पत्नीवर दबाव आणला यासंबंधाने गैरअर्जदार क्र.2 च्या पत्नीने पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 ने नमुद केले आहे की, दोन्ही करारनामे एकाच दिवशी झालेले आहेत, तसेच मुळ करारनाम्यातील पहिले पान तसेच ठेवून पान क्र.2 व 3 खोटेपणाने बदलवुन प्रकरणात दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचे इतर सर्व म्हणणे नाकारलेले आहे व सेवेत कोणतीही त्रुटी दिली नसल्यामुळे सदर तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केली आहे. 5. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर तक्रारीला दाखल केलेल्या आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने तक्रारीत दाखल केलेला करारनामा हा खोटा आहे तसेच त्यांनी हस्ताक्षर केलेल्या करारनाम्यातील मजकूर व तक्रारीत दाखल केलेल्या करारनाम्यातील मजकूरामध्ये बराच फरक आहे. त्यांनी पुढे असे नमुद केले आहे की, वादग्रस्त सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्याचे कोणतेही मुखत्यारपत्र गैरअर्जदार क्र.1 यांना करुन दिले नव्हते. तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेला करारनामा हा बनावटी आहे व त्यामधील शेवटची दोन पाने बदललेली आहेत. गैरअर्जदार क्र.2 यांनी नमुद केले आहे की, त्यांच्या पत्नीने खोटया करारनाम्या संबंधी तक्रारकर्ती विरुध्द पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्तीला कोणतीही सेवा प्रदान केलेली नसल्यामुळे ते तक्रारकर्तीला सदनिकेचे विक्रीपत्र करुन देण्यास बाध्य नाही. तसेच त्यांनी तक्रारकर्तीचे इतर सर्व म्हणणे नाकारलेले असुन सदर तक्रार मंचासमक्ष चालविण्याचा मंचाला अधिकार नाही त्यामुळे ती खारिज करण्याची विनंती केली आहे. 6. सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र.3 यांना मंचाने नोटीस बजाविला असता सदर नोटीस मिळून सुध्दा ते हजर न झाल्यामुळे त्यांचे विरुध्द मंचाने दि.01.09.2010 रोजी एकतर्फी आदेश पारित केलेला आहे. 7. सदर प्रकरण मंचासमक्ष दि.12.01.2011 रोजी मौखिक युक्तिवादाकरीता आले त्यावेळी तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे वकील हजर होते, गैरअर्जदार क्र.2 ने लेखी युक्तिवाद दाखल केला. तक्रारकर्तीने प्रतिउत्तर दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला सदर अर्ज मंजूर झाल्यानंतर तक्रारकर्तीने प्रतिउत्तर दाखल केले. सदर प्रतिउत्तराला गैरअर्जदारांनी अतिरिक्त लेखी युक्तिवाद दि.13.01.2011 रोजी दाखल केला. उभय पक्षांचा युक्तिवाद व दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 8. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांसोबत ‘प्रभात स्मृति’ या अपार्टमेंटमधील तळ मजल्यावरील जी-1, आराजी 465.65 चौ.फूट, मौजा-बाबुळखेडा, कार्पोरेशन न्र.573, विश्वकर्मा नगर, साऊथ रिज रोड, नागपूर चा सौदा रु.7,00,000/- मध्ये केल्याचे नमुद केले आहे. त्यामध्ये बयाणा म्हणून रु.3,00,000/- व उर्वरित रु.4,00,000/- गैरअर्जदार क्र.1 चे म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्र.2 ला दिल्याचे म्हटले आहे. सदर बाब स्पष्ट करण्याकरता व सिध्द करण्याकरता तक्रारकर्तीने दस्तावेज क्र.1 दाखल केलेला आहे. सदर दस्तावेज हा विक्रीचा करारनामा असुन तो तक्रारकर्ती सौ. ज्योती संजय खोब्रागडे व गैरअर्जदार क्र.2 विष्णुजी दामाजी बांबोळे व गैरअर्जदार क्र.3 दत्तात्रय गो. जोशी यांच्यामधील आहे. सदर करारनाम्यात गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे करारनामा लिहून देणार म्हणून गैरअर्जदार क्र.1 मिलींद प्रभाकर देशपांडे यांनी आममुखत्यारपत्र धारक म्हणून सही केली आहे. तसेच सदर करारनामा हा दि.20.09.2007 रोजी केल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेल्या पावत्यांवरुन रु.1,50,000/-, रु.50,000/- व रु.2,00,000/- मिळाल्याचे पावत्यांसुध्दा दाखल केलेल्या आहेत. सदर पावत्यांनुसार तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.2 यांना A/c payee धनादेशाव्दारे रक्कम अदा केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, तक्रारकर्तीने दाखल केलेला तक्रारीसोबतचा करारनामा खोटा आहे. त्यावर गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे आममुखत्यारपत्र धारक म्हणून करारनामा केलेला नाही. तसेच तक्रारकर्तीने दि.20.09.2007 रोजीच्या करारनाम्यातील शेवटची दोन पाने बदलविली असुन मुळ करारनामा व तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेला करारनामा यात तफावत आहे. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, दि.20.09.2007 रोजी झालेला करारनामा तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र.2 यांच्यामध्येच झालेला होता. सदनिका क्र.जी-1 व 800 चौ.फूट गाळा गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 ला विकासाच्या करारनाम्याप्रमाणे मोबदल्याचे स्वरुपात बांधून द्यावयाचा होता. गैरअर्जदार क्र.1 यांनी याबाबत उपरोक्त कथन स्पष्ट करण्याचे दृष्टिने सौ. सुमन विष्णु बांबोळे हीने पोलिसात दिलेल्या तक्रारीची प्रत, गैरअर्जदार क्र.2 यांचेमध्ये झालेला विक्रीचा करारनामा तसेच माहितीच्या अधिकारा अंतर्गत प्राप्त केलेली त्याच दिवशीच्या दुस-या विक्रीचा करारनामा, गैरअर्जदार क्र.1,2 व 3 मध्ये झालेला विकासाचा करारनाम्याच्या प्रति दाखल केलेल्या आहेत. गैरअर्जदार क्र.2 याचे सुध्दा सदर तक्रारीच्या उत्तरामध्ये त्यांनी गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर सदनिका विकण्या संबंधाने कोणतेही आममुखत्यारपत्र दिलेले नव्हते, असे नमुद केलेले आहे, तसेच ते तक्रारकर्तीस विक्रीपत्र करुन देण्यास बाध्य नसल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार क्र.2 ने आपल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की, तक्रारकर्तीने मुळ करारनाम्याचे पहिले पान कायम ठेवून इतर दोन पाने बदलवुन खोटा करारनामा तक्रारीत दाखल केलेला आहे. त्यांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, विकासाच्या करारनाम्या अंतर्गत गैरअर्जदार क्र.1 ने गैरअर्जदार क्र.2 यांना स्वतंत्र सदनिका व 800 चौ.फूटचा गाळा बांधून द्यावयाचा होता व गैरअर्जदार क्र.3 यांना जमीनीचा मालकी हक्काबाबत रु.4,00,000/- द्यावयाचे होते. तक्रारकर्तीचे कथन व त्या कथनाच्या पृष्ठयर्थ दाखल दस्तावेज तसेच गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या उत्तरात केलेले कथन व त्या पृष्ठयर्थ दाखल दस्तावेजांचे अवलोकन केले असता ही बाब स्पष्ट होते की, दि.20.09.2007 रोजी विक्रीपत्राचा करारनामा झाला होता. व सदर करारनामा हा तक्रारकर्ती व गैरअर्जदारांमध्ये झाला होता. कारण तक्रारकर्तीने दाखल केलेला करारनामा हा दस्तावेज क्र.1 म्हणून दाखल केलेला आहे व सदर करारनामा हा गैरअर्जदार क्र.1 यांनी त्यांच्या उत्तरासोबत माहितीचा अधिकारा अंतर्गत प्राप्त केलेल्या करारनाम्याशी सुसंगत आहे. सदर करारनामा हा माहितीच्या अधिकारा अंतर्गत गैरअर्जदार क्र.2 यांनी नागपूर महानगर पालिका, कर व कर आकारणी विभाग यांचेकडून मागितला आहे. यावरुन तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेला करारनामा हा नागपूर महानगर पालिकेकडे, कर आकारणी विभागाला सादर केला होता ही बाब स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरासोबत दाखल केलेला दस्तावेज क्र.2 म्हणून जो करारनामा दाखल केलेला आहे, त्या करारनाम्याचे अवलोकन केले असता सदर करारनामा सुध्दा दि.20.09.2007 रोजीचा असुन तो तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र.2 यांचे मधील असल्याचे दिसते, त्या करारनाम्यावर तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र.2 यांच्या सह्या आहेत. परंतु तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल केलेला करारनामा व गैरअर्जदार क्र.1 यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत प्राप्त केलेल्या करारनाम्यावर तक्रारकर्ती व गैरअर्जदार क्र.1 यांची गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे आममुखत्यारपत्र धारक म्हणून सह्या आहेत. 9. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात बचावात्मक मुद्दा असा घेतला आहे की, तक्रारकर्तीने करारनाम्यातील शेवटची दोन पाने बदलली आहे व प्रत्यक्षात तक्रारकर्तीचा करारनामा हा फक्त गैरअर्जदार क्र.2 यांचे सोबत त्यांचे मालकीचे सदनिके संदर्भात आहे. यावर तक्रारकर्तीने प्रतिउत्तरामध्ये स्पष्ट नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी मंचासमक्ष खोटे कथन केलेले आहे. तक्रारकर्तीचा गैरअर्जदार क्र.2 सोबत झालेला करारनामा हा गैरअर्जदार क्र.2 यांनी गैरअर्जदार क्र.1 यांना कळविला तेव्हा गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर करारनामा चुकला असुन त्यामध्ये संपत्तीचे विवरण चुकले आहे असे गैरअर्जदार क्र.2 यांना सांगितले व त्यानुसार शेवटची दोन पाने बदलवुन गैरअर्जदार क्र.1 सही करतील असे ठरले. त्यानुसार शेवटची दोन पाने बदलविण्यांत आली व गैरअर्जदार क्र.1 यांनी स्वाक्षरी केली व जुनी दोन पाने गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्याजवळ ठेवली. 10. मंचाने तक्रारकर्तीने दाखल केलेला करारनामा व गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरासोबत दाखल केला. त्यांचे म्हणण्यानुसार खरा असलेला करारनामा यांचे अवलोकन केले असता संपत्तीचे विवरणात तफावत दिसते. त्यामुळे तक्रारकर्तीने आपल्या प्रतिउत्तरात केलेल्या कथनाला बळ मिळते. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्तीने दाखल केलेल्या करारनाम्यावर त्याची स्वाक्षरी कशी आली याबाबत काहीही म्हटले नाही, फक्त सदर स्वाक्षरी ही त्यांची नाही एवढेच म्हटले आहे. मंचाचे असे मत आहे की, जर तक्रारकर्तीने दाखल केलेल्या विक्रीपत्राचे करारनाम्यावरील स्वाक्षरी गैरअर्जदार क्र.1 ची नव्हती तर अशा परिस्थितीत गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर करारनाम्यावरील स्वाक्षरी व त्यांची स्वाक्षरी तपासण्याकरीता तज्ञांकडे पाठविण्याबाबतचा अर्ज करणे गरजेचे होते, तसे त्यांनी केले नाही. फक्त स्वाक्षरी नाही म्हणून नकारात्मक कथन करुन बचाव करण्याचा गैरअर्जदार क्र.1 यांचा प्रयत्न दिसतो. 11. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या उत्तरासोबत विकासाचा करारनामा दाखल केलेला आहे. सदर विकासाच्या करारनाम्याचे अवलोकन केले असता त्यामधील 3-ब चे अवलोकन केले असता त्यामध्ये खालिल बाबी नमुद आहे... B) It agrees that Owner No.2 shall provide 1535 sq.ft. area of his own share of plot 3035 sa.ft. to the Developers and Developers shall construct one independent tenement of 800 sa.ft. built-up area and one flat as sanction by the competent authority on retained share of 1500 sa.ft. with F.S.I. and the cost of the 1535 sa.ft. shall he adjusted towards the balance consideration as mentioned earlier. यामध्ये कुठेही गैरअर्जदार क्र. 2 यांनी सदनिका क्र.जी-1 चे क्षेत्रफळ 465.65 चौ.फूट आहे याचा उल्लेख नाही. तसेच गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे गैरअर्जदार क्र.1 यांनी दिलेले आममुखत्यारपत्र सुदा सदनिका क्र.जी-1 विकण्याचा अधिकार गैरअर्जदार क्र.1 यांना नाही असा कुठेही उल्लेख नाही. सदर प्रकरणामध्ये तक्रारकर्तीने दाखल केलेल्या पावत्यांचे अवलोकन केले असता त्या सर्व धनादेशाव्दारे दिलेल्या रकमा संबंधीच्या आहेत व त्या गैरअर्जदार क्र.2 यांना दिलेल्या आहेत. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र.1 यांनी गैरअर्जदार क्र.2 व 3 मार्फत तक्रारकर्ती सोबत विक्रीचा करारनामा केला होता व त्यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ ठरते. 12. तक्रारकर्तीने सदनिके संबंधातील पूर्ण रक्कम ही गैरअर्जदार क्र.1 व गैरअर्जदार क्र.2 यांना दिलेली आहे व त्या संबंधाने विक्रीचा करारनामा हा गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे मार्फत आममुखत्यारपत्र धारक म्हणून गैरअर्जदार क्र.1 यांनी करुन दिलेला आहे. तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस सदनिकेचा ताबा सुध्दा दिलेला आहे व त्या आधारेच तक्रारकर्तीने नागपूर महानगर पालिका, कर आकारणी विभागामध्ये स्वतःच्या नावाची नोंदणी केलेली आहे व तिचेच नावाने नागपूर महानगर पालिकेने पाण्याचे बिल सुध्दा दिलेले असुन तक्रारकर्तीचे नावाचा कब्जेदार म्हणून समावेश आहे. तसेच तक्रारकर्तीने दाखल केलेल्या महावितरणाच्या विद्युत बिलांवर सुध्दा तक्रारर्तीचे नाव समाविष्ट आहे. जर गैरअर्जदारांना तक्रारकर्तीचे करारनाम्याबद्दल काही संशय होता व ते खोटे आहे असे म्हणणे आहे, अश्या परिस्थितीत त्यांनी पोलिसात तक्रार करण्यापेक्षा योग्य न्याय प्रक्रियेचा अवलंब करावयास पाहिजे होता, ते त्यांनी केले नाही व सदर प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करुन स्वतःचा बचाव करण्याचा गैरअर्जदार प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट होते. पोलिस विभागाने सुध्दा सदर प्रकरण हे दिवाणी स्वरुपाचे असल्या संबंधी एन.सी. रिपोर्ट दिलेला आहे, सदर दस्तावेज निशाणी क्र.22 वर पान क्र.123 वर दाखल आहे. तरी सुध्दा गैरअर्जदारांनी कोणताही दिवाणी स्वरुपाचा दावा तक्रारकर्तीवर केलेला नाही. 13. गैरअर्जदार क्र.1 यांचा डेव्हलपर्स ऍन्ड बिल्डर चा व्यवसाय आहे व त्यांनी गैरअर्जदार क्र.2 व 3 कडून आममुखत्यारपत्र घेतले होते. तसेच त्यांनी तक्रारकर्ती सोबत वादग्रस्त सदनिकेचा करारनामा केला होता व तक्रारकर्तीकडून संपूर्ण रक्कम स्विकारुन गैरअर्जदारांनी तिला सदनिकेचे विक्रीपत्र करुन दिले नाही ही त्यांचे सेवेतील त्रुटी असुन अनचित व्यापार पध्दत आहे. त्यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस भुखंड क्र.313, विश्वकर्मानगर, साउथ ऑफ रिज रोड, नागपूर येथील मौजा- बाबुळखेडा, सिटी सर्वे नं.733, कार्पोरेशन नं. 573 या भुखंडावर निर्माण केलेल्या ‘प्रभात-स्मृति’ या अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील जी-1 या 465.65 चौ.फूट सदनिकेचे विक्रीपत्र तक्रारकर्तीस आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आंत करुन द्यावे तसेच विक्रीपत्र करुन घेण्याकरता तक्रारकर्ती ‘ग्राहक’ या नात्याने पात्र ठरते असे मंचाचे मत आहे. 14. तक्रारकर्तीस विक्रीपत्र करुन न दिल्यामुळे झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.5,000/- गैरअर्जदारांनी द्यावे. तक्रारकर्तीच्या इतर मागण्या पुराव्या अभावी अमान्य करण्यांत येते. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच वरील निष्कर्षांवरुन खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस सेवेत त्रुटी देऊन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस भुखंड क्र.313, विश्वकर्मानगर, साउथ ऑफ रिज रोड, नागपूर येथील मौजा- बाबुळखेडा, सिटी सर्वे नं.733, कार्पोरेशन नं. 573 या भुखंडावर निर्माण केलेल्या ‘प्रभात-स्मृति’ या अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील जी-1 या 465.65 चौ.फूट सदनिकेचे विक्रीपत्र आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करुन द्यावे. अन्यथा प्रतिमाह रु.5,000/- दंडनिय खर्च तक्रारकर्तीस देय राहील. 4. गैरअर्जदारांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्तीस मानसिक व शारीरिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.5,000/-
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |