(आदेश पारीत व्दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्या)
1. तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात येणे खालील प्रमाणेः-
तक्रारदार हे रा.जवकमळा रांजणगांव ता.पारनेर जि.अहमदनगर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी त्यांचे कुटूंबाचे उपजिवीकेसाठी स्मॉलस्केल इंडस्ट्रीज या नावाने डाळ मिल चालविण्याच्या व्यवसाय करण्यासाठी त्यांना सामनेवाला यांचेकडून डाळ मिल व फ्लोअर मिल करीता लागणा-या मशिनरी घेण्याचे ठरविले. तक्रारदार यांनी त्याबाबत सामनेवाला यांचेकडे चौकशी करण्यास गेले असता सामनेवालाने तक्रारदार यांना पल्वरायजर (विदाऊट मोटार) 20 एच.पी.ची किंमत रुपये 1,00,000/- तसेच फिल्टर (विदाऊट मोटार) किंमत रुपये 90,000/- इलेव्हेटर (विदाऊट मोटार) किंमत रक्कम रु.15,000/- व ब्लोअर (विदाऊट मोटार) किंमत रुपये 15,000/- अशी एकुण रक्कम रुपये 11,000/- अशी एकुण रक्कम रुपये 2,31,000/- स वरील प्रमाणे मशिनरी तक्रारदार यांना ताबडतोब तक्रारदार यांचे वरील पत्त्यावर पोहोच देण्याचे मान्य व कबुल केले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना त्याच दिवशी तारीख 25.01.2018 रोजी त्यांचे खाते असलेले एच.डी.एफ.सी.बँक शाखा पारनेर चा चेक नंबर 000018 तारीख 25.01.2018 रोजीचा रक्कम रुपये 90,000/- चा सामनेवालास अॅडव्हॉन्स म्हणुन दिला व उर्वरीत रक्कम सदर मशिनरीची पोहोच दिल्यानंतर सामनेवालास द्यावयाची ठरले. परंतू सामनेवाला यांनी तक्रारदार मशिनरी पोहोच केली नाही. त्यानंतर तक्रारदाराने सामनेवालास फोन करुन मशिनरी पोहोच झाली नाही याबाबत विचारणा केली. त्यानंतर दिनांक 29.03.2018 रोजी तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे चौकशी करण्याकरीता गेले. परंतू सामनेवाला यांनी ठरल्याप्रमाणे मशिनरी कोणतीही तयार केलेली नव्हती. व त्याचे सुटे भाग अर्धवट तसेच पडलेले होते. त्यावेळी सामनेवाला यांना तक्रारदार यांनी विचारले असता सामनेवाला यांनी ताबडतोब मशिनरी तयार करुन पाठवितो असे सांगितले. परंतू मशिनरी पाठविली नाही. त्यामुळे रक्कम रुपये 40,000/- ची मागणी केली. म्हणून तक्रारदार यांनी 40,000/- ची रोख स्वरुपात सामनेवाला यांना दिले व उर्वरीत रक्कम रुपये 1,00,000/- चेकने देण्यास कळविले. त्याप्रमाणे तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेवर विशवास ठेवून त्यांचे खाते असलेल्या लातुर अर्बन को.ऑप बँक शाखा अहमदनगर यांचा धनादेश क्र.000685 रक्कम रुपये 1,00,000/- तारीख 03.04.2018 चा सामनेवाला यांना दिला. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाला यांना वेळोवेळी फोन केला. सामनेवाला यांनी दिनांक 31.03.2018 रोजी रात्री आयशर ट्रक 1109 या वरील ड्रायव्हर गोर्ले यांचे मार्फत तक्रारदार यांचे वरील पत्त्यावर सदरची मशिनरी पाठविली. त्यानंतर अर्धवट बांधणी करुन त्यामधील बरेच महत्वाचे सुटे भाग अस्तित्वात नव्हते. पल्वराझर या मशिनला रोटर, हॅमर, बेअरींग, हॉपर, अंतर्गत जाळी, स्टॅन्ड, पाईप, पुली व बेल्ट तसेच इतर छोटे मोठे भाग देखील त्यास नव्हते. तसेच सदर पल्वरायझरला रंग देखी दिलेला नव्हता. त्याच प्रमाणे फिल्टर या मशिनरी बाहेरील काप, आतील स्क्रिन कापड, बेअरींग, पुली, बेल्ट, साक्लॉन, औटपुट पाईप तसेच इतर छोटे भाग यास देखील रंग दिलेला नव्हता. त्याच प्रमाणे इलेव्हेटर या मशिनला बेल्ट, बेअरींग, नटबोल्ट, पुली, बेल्ट व इतर छोटे मोठे छोटे भाग अस्तीत्वात नव्हते. तसेच ग्लोअर या मशिनला आतील फिरणारे प्रॉपेलर (फॅन), रोटर, बेअरींग, नटबोल्ट, पुली बेल्ट व इतर छोटे मोठे भाग तसेच रंग देखील दिलेला नव्हता असे साधारण एकुण रक्कम रु.1,00,000/- किंमतीचे सुटे भाग नसल्याचे लक्षात आले. तक्रारदाराने सदरची बाब सामनेवाला यांना फोन करुन कळविण्याचा प्रयत्न केला. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा फोन स्विकारला नाही. त्यानंतर तक्रारदाराने लातून अर्बन को.ऑप बँकेचा चेक न वटविण्याबाबत कळविले. तसेच स्टॉप पेमेंटची सुचना बँकेस दिली. तसेच सामनेवाला यांनी ताबडतोब संपुर्ण मशिनरीचे भाग जोडून पुर्ण करुन द्यावे अशी विनंती केली. त्यानंतर रक्कम रु.1,00,000/- स्वरुपात अदा करुन अशा प्रकारे सामनेवाला यांनी अद्याप मशिनरीचे काम पुर्ण करुन दिले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना सदर मशिनरी वापरणे अशक्य झालेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांचे व्यापारावर देखील मोठया प्रमाणावर त्यांचे दैनंदिन रक्कम रुपये 20 ते 25 हजाराचे नुकसान होत आहे. सदर मशिनरी दुरुस्त करुन पुर्ण करण्यास व सुटे भाग जोडण्यास अद्याप रक्कम रुपये 1,00,000/- खर्च येणार आहे. त्यामुळे तक्रारदारानी सामनेवालाला अनेकदा कळविले. त्यांनी मशिनरीचे सुटे भाग जोडून दिले नाही. दिनांक 11.04.2018 रोजी तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलामार्फत नोटीस पाठवून अर्धवट पाठविलेल्या मशिनरीचे सुटे भाग जोडून काम पुर्ण करुन द्यावे व त्यांचे राहाते ठिकाणी चालू करुन द्यावे असे कळविले. दिनांक 03.04.2018 रोजी दिलेल्या धनादेशाचा सामनेवाला यांनी त्याचा दुरुपयोग करु नये किंवा वटविण्याचा प्रयत्न करु नये असे कळविण्यात आले. मात्र सामनेवाला यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे तक्रारदाराने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करुन परीच्छेद क्र.7 प्रमाणे मागणी केली आहे.
3. सामनेवाला यांना मंचाची नोटीसची बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द सदरची तक्रार एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्र.1 वर दिनांक 12.11.2018 रोजी पारीत करण्यात आला.
4. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, शपथपत्र यांचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार यांचे वकीलानी दाखल केलेला लेखी युक्तीवाद यावरुन न्याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
| मुद्दे | उत्तर |
1. | तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे काय.? | ... होय. |
2. | सामनेवाला यांनी त्यांचे सेवेत त्रुटी दिलेली आहे काय.? | ... होय. |
3. | तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय.? | ... होय. |
4. | आदेश काय ? | ...अंतीम आदेशानुसार. |
का र ण मि मां सा
5. मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार यांनी त्यांचे कुटूंबाचे उपजिवीकेसाठी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज या नावाने डाळमिल सुरु करण्यासाठी सामनेवाला यांचेकडून मशिनरी खरेदी करावाची होती, म्हणून समानेवाला यांचेकडे चौकशी केली. व त्यानुसार सामनेवाला यांनी त्यांना मशिनरीसाठी लागणा-या सर्व परिस्थितीविषयी माहिती दिली व त्याचे प्रत्येकाची किंमत सांगितली. त्याबाबतचे कोटेशन सामनेवाला यांनी तक्रारदाराला दिले आहे. सदरचे कोटेशन प्रकरणात दाखल आहे. तसेच दिनांक 25.01.2018 रोजी सामनेवाला यांचे तक्रारदाराला आलेले पत्र त्यानुसार तक्रारदाराने सामनेवाला यांना अॅडव्हान्स रक्कम रुपये 90,000/- दिल्याचे प्रकरणात नमुद केलेले आहे. तसेच त्यानुसार पत्र दिनांक 29.03.2018 चे नुसार रक्कम रु.1,00,000/- चा धनादेश लातूर अर्बन को.ऑप बँक शाखा अहमदनगर चा सामनेवाला यांना दिल्याचे पत्र सामनेवालाने दाखल केलेले आहे. यावरुन तक्रारदाराने सदरची मशिनरी खरेदीसाठी 90,000/- रुपयाचा धनादेश क्र.000018 व 1,00,000/- चा धनादेश लातूर अर्बन को.ऑप बँकेचा दिल्याचे स्पष्ट होते. यावरुन ही बाब स्पष्ट होते की, मशिनरी खरेदीचा व्यवहार झाला आहे. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक होत आहेत ही बाब स्पष्ट होते. सबब मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
6. मुद्दा क्र.2 व 3 – तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून मशिनरी खरेदी केली आहे ही बाब दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होते. सदरहू मशिनरी तक्रारदाराने 90,000/- रुपयास एच.डी.एफ.सी.बँक शाखा पारनेर या बँकेचा धनादेश क्र.000018 प्रमाणे हा धनादेश सामनेवाला यांना तक्रारदार यांनी दिला आहे ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या दिनांक 25.01.2018 च्या सामनेवाला यांना दिलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते. कारण सदरचे पत्र सामनेवाला यांनी सदरहू रकमेचा धनादेश प्राप्त झाला आहे असे नमुद केलेले आहे. तसेच सामनेवालाने दिनांक 29.03.2018 रोजी तक्रारदाराला पत्र पाठवून त्यांनी दिलेल्या रक्कम रुपये 1,00,000/- चे अॅडव्हान्सपोटी व रक्कम रुपये 1,00,000/- सामनेवाला यांना धनादेशाव्दारे दिलेले आहेत. तक्रारदाराने त्याचे तक्रारीमध्ये असे कथन केलेले आहे की, सदरहू मशिनरी तक्रारदाराला ब-याच कालावधीनंतर दिली. सदर मशिनरी अर्धवट होती. त्यामुळे वारंवार फोन करुन सामनेवाला यांना त्याबद्दल विचारणा केली असतांना त्यांनी तक्रारीमध्ये कथन केल्याप्रमाणे काही भाग लावलेले नाहीत असे निदर्शनास आले, त्यामुळे सामनेवाला यांना विचारणा केली असता सामनेवालाने संपुर्ण मशिनरीचे पार्ट लावून देतो असे आश्वासन दिले. त्यानंतर सदरची मशिनरी तक्रारदाराला दिनांक 31.03.2018 रोजी सामनेवाला यांनी पाठविली. तक्रारदाराने सदरचे मशिनरीची पाहाणी केली असता त्यामध्ये महत्वाचे सुटे भाग म्हणजेच रोटर, बेरींग, हॅमर, हॉपर, अंतर्गत जाळी, स्टॅन्ड, पाईप, पुल्ली व बेल्ट तसेच छोटे मोठे भाग लावलेले नाहीत. काही पार्टला रंग दिलेला नव्हता असे निदर्शनास आले. याबाबत तक्रारदाराने सामनेवाला यांना कळविले. परंतू त्यांनी सदरचे मशिनरीचे सुटे भाग लावून दिले नाहीत. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे रक्कम रु.1,00,000/- किंमतीचे सुटे भाग सदरचे मशिनरीला लावलेले नव्हते. त्यामुळे फोनवरुन तक्रारदाराने सामनेवाला यांना विचारणा केली. सामनेवाला यांनी अर्धवट मशिनरी पाठविल्याचे कबुल केले असे तक्रारीत नमुद आहे. सामनेवाला यांनी सुटे भाग लावून दिलेले नव्हते. अशा प्रकारे तक्रारदाराला अर्धवट सुटे भाग लावून मशिनरी दिलेली आहे ही बाब तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र दाखल करुन तसेच सामनेवाला यांना नोटीस पाठवून मंचासमक्ष सिध्द केलेली आहे. सामनेवाला यांना सदरहू तक्रारीची नोटीस प्राप्त झाली मात्र ते सदर प्रकरणात हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांनी तक्रारदाराने तक्रारीत केलेले कथन खोडून काढण्याची संधी गमावली आहे. तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र, शपथपत्र हाच सदरचे तक्रारीचे निकालासाठी पुरक असा पुरावा आहे. सबब सदरची तक्रार अंशतः मंजूर करण्याचे निष्कर्षाप्रत हे मंच येते. सबब मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
7. मुद्दा क्र.4 – मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.4 चे उत्तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येत आहे.
- अं ति म आ दे श -
1) तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना अर्धवट पाठविलेल्या मशिनरीचे सुटे भाग लावून काम पुर्ण करुन देऊन सदरची मशिनरी चालू करुन द्यावी.
3) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना शारीरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- [रक्कम रुपये पाच हजार फक्त] व या तक्रारीचा खर्च रक्कम रु.3,000/- [रक्कम रुपये तीन हजार फक्त] तक्रारदार यांना द्यावा.
4) वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.
5) या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्क द्यावी.
6) या प्रकरणाची “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदारास परत करावी.