Maharashtra

Nagpur

CC/497/2015

Shri. Prashant Mahadevrao Ambhore - Complainant(s)

Versus

M/s. Pawansut Real Estate & Land Developers - Opp.Party(s)

A.M. Patankar

24 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/497/2015
( Date of Filing : 11 Sep 2015 )
 
1. Shri. Prashant Mahadevrao Ambhore
R/o. Smruti nagar , koradi Road, Bhokra, Shrikant automobiles, Nagpur.
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Pawansut Real Estate & Land Developers
3rd floor, prince complex, chhatrapati square, wardha road, nagpur-25/block no. 28, Nanix Alankar, opp. Poddar world school, bhokra road, Godhani, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Suresh Kondbaji Burrewar
R/o Satyam Apartment Flat no 602, 6th floor, opp. Big bazar, wardha road, Nagpur.
Nagpur
Maharashtra
3. Smt. Dnyandevi S. Burewar
R/o. Plot no. C-5, Cosmo Politian society, near Railway crossing, Manish nagar, Somalawada, Nagpur.
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:A.M. Patankar, Advocate
For the Opp. Party:
Dated : 24 Feb 2020
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 हे पवनसुत रिअल इस्‍टेट अॅन्‍ड लॅन्‍ड डेव्‍हल्‍पर्स या नांवाने व्‍यवसाय करतात.  या फर्मचे प्रोपा. संतोष कोंडबाजी बुरेवार यांचे दि. 28.06.2013 रोजी निधन झाल्‍याने त्‍यांचा व्‍यवसाय विरुध्‍द पक्ष क्रं. 2 (भाऊ) सुरेश कोंडबाजी बुरेवार,  व विरुध्‍द पक्ष क्रं.3 मृतक संतोष कोंडबाजी बुरेवार यांची पत्‍नी श्रीमती ज्ञानदेवी संतोष बुरेवार हया पाहतात.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍यानी दि. 03.11.2006 रोजी विरुध्‍द पक्षा मार्फत मौजा – वडध, शेत सर्व्‍हे नं. 97, तह.उमरेड, जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 38, एकूण क्षेत्रफळ 1604.06 चौ.फु. प्रति.रुपये 50/- फुट प्रमाणे एकूण किंमत रुपये 80,730/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा बयाणापत्र दि. 04.11.2006 रोजी केले आहे. उपरोक्‍त भूखंडाकरिता विरुध्‍द पक्षाला अग्रिम राशी म्‍हणून रुपये 10,000/- धनादेशा द्वारे दिले होते व उर्वरित रक्‍कम प्रतिमाह रुपये 1,000/- देण्‍याचे ठरले होते.  अशा प्रकारे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 80,730/- पैकी रुपये 78,000/- चा भरणा केला आहे. परंतु आजतागायत विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदरच्‍या भूखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही. याकरिता तक्रारकर्ता अनेक वेळा विरुध्‍द पक्षाच्‍या कार्यालयात गेला असता विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीची दखल घेतली नाही.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍यांने सदरच्‍या भूखंडासंबंधी माहिती काढली असता असे निदर्शनास आले की, विरुध्‍द पक्ष क्रं. 1, 2 व 3 यापैकी कुणी सदरच्‍या जमिनीचे मालक नाही आणि त्‍यांनी कंपनीच्‍या नांवाने खोटे दस्‍तवेज बनवून तक्रारकर्ता व इतर व्‍यक्तिनां सुध्‍दा भूखंड विकले आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षा विरुध्‍द फसवणूक व धोखाधडीकरिता पोलिस स्‍टेशन हिंगणा, जि. नागपूर येथे दि. 30.07.2014 रोजी तक्रार दिली. परंतु आजतागायत पोलिसां द्वारे सदरच्‍या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विक्रीपत्र अथवा रक्‍कम परत करण्‍याची मागणी करुन ही त्‍याच्‍या मागणीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष सदरच्‍या जमिनीचा मालक नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने भूखंड क्रं. 38 करिता विरुध्‍द पक्षाकडे जमा केलेली रक्‍कम रुपये 78,000/- द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजसह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा अशी विनंती केली आहे.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 3 यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा दि. 02.12.2015 रोजी आदेश पारित करण्‍यात आला. त्‍याचप्रमाणे विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांच्‍या विरुध्‍द दि. 25.02.2016 रोजी दैनिक नवभारत या वृत्‍तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिध्‍द केल्‍यानंतर सुध्‍दा विरुध्‍द पक्ष 2 गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 07.04.2016 रोजी  पारित करण्‍यात आला.
  5.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्‍यांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतले असता मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला.

 

          अ.क्रं.       मुद्दे                                                उत्‍तर

1 तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय

  1.      विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला काय? होय

        3.     काय आदेश                              अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा – वडध, शेत सर्व्‍हे नं. 97, तह.उमरेड, जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 38, एकूण क्षेत्रफळ 1604.06 चौ.फु. एकूण किंमत रुपये 80,730/- मध्‍ये खरेदी करण्‍याचा इसारपत्र/बयाणापत्र दि. 04.11.2006 रोजी केले असून सदरच्‍या भूखंडाकरिता विरुध्‍द पक्षाला अग्रिम राशी म्‍हणून रुपये 10,000/- धनादेशा द्वारे दिले होते व उर्वरित रक्‍कम प्रतिमाह रुपये 1,000/- देण्‍याचे ठरले होते हे दाखल दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 80,730/- पैकी रुपये 78,000/- चा भरणा केला असल्‍याबाबतच्‍या पावत्‍या व बॅंकेचे पासबुकचे विवरण सोबत जोडलेले आहे. त्‍याचप्रमाणे दि. 30.07.2014 रोजी पोलिस स्‍टेशन, हिंगणा, जि. नागपूर येथे तक्रार केली असल्‍याचे पत्र दाखल केले आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे उपरोक्‍त भूखंड क्रं. 38 चे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा भूखंडापोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 78,000/- परत केली नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 2 यांना वृत्‍तपत्रातून जाहीर नोटीस प्रसिध्‍द केल्‍याची वृत्‍तपत्र अभिलेखावर दाखल आहे. त्‍यानंतर सुध्‍दा विरुध्‍द पक्ष 2 मंचासमक्ष हजर झाले नाही. तसेच विरुध्‍द पक्ष क्रं. 1 व 3 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा ते ही मंचासमक्ष उपस्थित झाले नाही अथवा आपले म्‍हणणे दाखल केले नसल्‍याचे ही स्‍पष्‍ट होते.  यावरुन विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला असून सेवेत त्रुटी केली असल्‍याचे निष्‍पन्‍न होते.

      

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 78,000/- व सदरहू रक्‍कमेवर दिनांक 01.09.2008 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कमेच्‍या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 14 टक्‍के दराने व्‍याजसह रक्‍कम अदा करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. उपरोक्‍त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.