DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR | New Administrative Building | 5th Floor, Civil Lines, | Nagpur-440 001 | 0712-2548522 |
|
|
Complaint Case No. CC/142/2021 | ( Date of Filing : 18 Feb 2021 ) |
| | 1. SAU. PARVATI SURESH WAKODIKAR | R/O. GANJAKHET CHOWK, NANDBACHI DOB, WAKODIKAR CYCLE STORE, NAGPUR-18 | NAGPUR | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S. PAWANSUT REAL ESTATE AND LAND DEVELOPERS | R/O. PLOT NO. C-5, COSMOPOLITAN SOCIETY, NEAR RAILWAY CROSSING, MANISH NAGAR, SOMALWADA, NAGPUR. | NAGPUR | MAHARASHTRA | 2. SURESH KONDBAJI BURREWAR | R/O. PLOT NO. C-5, COSMOPOLITAN SOCIETY, NEAR RAILWAY CROSSING, MANISH NAGAR, SOMALWADA, NAGPUR. | NAGPUR | MAHARASHTRA | 3. SMT. DNYANDEVI SANTOSH BUREWAR | R/O. PLOT NO. C-5, COSMOPOLITAN SOCIETY, NEAR RAILWAY CROSSING, MANISH NAGAR, SOMALWADA, NAGPUR. | NAGPUR | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
|
BEFORE: | | | HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT | | HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER | | HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER | |
|
PRESENT: | ADV. ABHAY M. PATANKAR, Advocate for the Complainant 1 | | NARESH WADIYALWAR/ PRATIK MEHTA,, Advocate for the Opp. Party 1 | | ADV. B.N.MOHTA/SANJAY MOHTA/SWAPNIL KSHIRSAGAR, Advocate for the Opp. Party 1 | |
Dated : 24 Aug 2023 |
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्या आदेशान्वये – - तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 35 अन्वये दाखल केली असून त्यात असे नमूद केले की, विरुध्द पक्ष 1 हे पवनसुत रिअल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हल्पर्स या नांवाने व्यवसाय करतात. या फर्मचे प्रोपा. संतोष कोंडबाजी बुरेवार यांचे दि. 28.06.2013 रोजी निधन झाल्याने त्यांचा व्यवसाय विरुध्द पक्ष क्रं. 2 (भाऊ) सुरेश कोंडबाजी बुरेवार व विरुध्द पक्ष क्रं.3 मृतक संतोष कोंडबाजी बुरेवार यांची पत्नी श्रीमती ज्ञानदेवी संतोष बुरेवार हया पाहतात. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून मौजा – फुकेश्वर , प.ह.नं. 14, खसरा क्रं. 28, तह. जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 116, भूखंड एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फुट एकूण किंमत रुपये 30,000/- मध्ये खरेदी करण्याचे ठरविले व त्याकरिता दि. 11.06.2006 रोजी रुपये 10,000/- देऊन इसारपत्र बनविले. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे भूखंडा पोटी असलेली उर्वरित रक्कम जमा करण्याकरिता दि. 11.08.2012 पर्यंत मुदत वाढ दिली होती आणि त्यानंतर विरुध्द पक्ष भूखंडाचे विक्रीपत्र करुन देणार होते. तक्रारकर्त्याने वेळोवेळी विरुध्द पक्षाकडे दि. 28.12.2008 पर्यंत संपूर्ण रक्कम रुपये 30,000/- जमा केले असून त्याची नोंद मासिक किस्त पुस्तिकेत आहे. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाकडे भूखंडाचे विक्रीपत्र करुन मिळण्याकरिता विरुध्द पक्षाच्या कार्यालय गेला असता कार्यालय सतत बंद असल्याचे निदर्शनास आले.
- तक्रारकर्त्याने पुढे नमूद केले की, त्याने विरुध्द पक्षाकडे भूखंड क्रं. 116 चे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्याकरिता सन 2013 पासून अनेक वेळा विनंती करुन सुध्दा त्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षा विरुध्द पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, सिव्हील लाईन्स नागपूर यांच्याकडे दि. 12.11.2020 रोजी गुन्हा नोंदविला. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला दि. 11.11.2020 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस बजाविली होती. या सर्व बाबीची विरुध्द पक्षाला माहिती असतांना सुध्दा वि.प.ने त.क.च्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे प्रस्तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, भूखंड क्रं. 116 चे कायदेशीर नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे. सदरच्या भूखंडाचे विक्रीपत्र कायदेशीर अथवा तांत्रिक दृष्टया नोंदवून देणे शक्य नसल्यास तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये 30,000/- द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याजासह परत करण्याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
- विरुध्द पक्ष 1 ला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन सुध्दा विरुध्द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश व विरुध्द पक्ष 2 ने विहित मुदतीत लेखी जबाब दाखल न केल्यामुळे वि.प. 2 विरुध्द विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्याचा दि. 07.01.2022 रोजी आदेश पारित करण्यात आला.
- विरुध्द पक्ष 3 श्रीमती ज्ञानदेवी विधवा / संतोष बुरेवार यांनी आपला लेखी जबाब दाखल केला असून त्यात नमूद केले की, त्या पवनसुत रिअल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हल्पर्स या कंपनीची प्रोप्रायटर नाही. वि.प. 3 चे पती स्व. संतोष कोंडबाजी बुरेवार यांचे हृदयविकारामुळे दि. 28.07.2013 रोजी निधन झाले असून त्यावेळी त्यांच्यावर 3.5 करोडचे कर्ज होते. तसेच स्व. संतोष बुरेवार हे जिवंत असतांनाच त्यांनी त्यांच्या सर्व चल व अचल संपत्तीचे विक्रीपत्र करुन दिले होते. तक्रारकर्त्याचा स्व. संतोष बुरेवार यांच्या सोबत भूखंडाबाबतचा करारनामा झालेला होता. वि.प.ने पुढे नमूद केले की, उभय पक्षात झालेला मौजा – फुकेश्वर , प.ह.नं. 14, खसरा क्रं. 28, तह.जि. नागपूर येथील ले-आऊट मधील भूखंडाबाबतचा करारानामा कायदेशीररित्या अस्तित्वात नाही. तसेच पवनसुत रिअल इस्टेट अॅन्ड लॅन्ड डेव्हलपर्सचे कार्यालय क्राईम ब्रान्च, ई.ओ.डब्ल्यू नागपूर यांनी सील केलेले आहे. वि.प. 3 च्या पतीचा मृत्यु झाल्यामुळे तक्रारकर्त्याने व अनेक ग्राहकांनी त्यांच्या नावाचा व खोटया सहीचे करारनामे केलेले आहेत. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याच्या करारनाम्यावर व पावतीवर देखील वि.प. 3 च्या पतीची स्वाक्षरी नाही. तक्रारकर्त्याचा वि.प. 3 च्या पती सोबत भूखंडाबाबतचा करारनामा करण्यात आला असून त्याकरिता वि.प. 3 ही सदर करारपत्राकरिता जबाबदार नाही. तक्रारकर्त्यांना सदरची बाब माहिती असतांना सुध्दा त्यांनी जाणूनबुजून वि.प. 3 विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे. स्व. संतोष बुरेवार यांच्या कोणत्याही मालमत्तेची ती वारसदार नसल्यामुळे वि.प. 3 विरुध्द दाखल केलेली तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केलेली आहे.
- उभय पक्षाने दाखल केलेले दस्तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले. तसेच त्यांच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतला असता खालील मुद्दे विचारार्थ घेतले. तसेच सदर प्रकरण कोणत्याही वरिष्ठ न्यायालयात प्रंलबित नसल्याबाबतची तक्रारकर्त्या तर्फे दि. 24.08.2023 रोजीची पुरसीस अभिलेखावर दाखल केली आहे.
1 तक्रारकर्ता विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे काय ? होय - विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा देऊन
अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला काय? होय - काय आदेश ? अंतिम आदेशानुसार
निष्कर्ष - मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून मौजा – फुकेश्वर , प.ह.नं. 14, खसरा क्रं. 28, तह.जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 116, एकूण क्षेत्रफळ 1500 चौ.फु. असून एकूण किंमत रुपये 30,000/- मध्ये खरेदी करण्याचा इसारपत्र दि. 11.06.2006 रोजी केले होते, हे दाखल दस्तऐवजावरुन स्पष्ट होते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक असल्याचे सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे रुपये 30,000/- चा भरणा केला असल्याबाबतच्या पावत्या व बॅंकेचे पासबुकचे विवरण सोबत जोडलेले आहे. त्याचप्रमाणे दि. 12.11.2020 रोजी पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा, सिव्हील लाईन्स नागपूर येथे तक्रार केली असल्याचे पत्र नि.क्रं. 2 वर दाखल केले आहे. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याच्या नांवे उपरोक्त भूखंड क्रं. 116 चे विक्रीपत्र करुन दिले नाही अथवा भूखंडापोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 30,000/- सुध्दा परत केली नाही. तसेच विरुध्द पक्ष हे मौजा – फुकेश्वर , प.ह.नं. 14, खसरा क्रं. 28, तह. जि. नागपूर येथील ले-आऊट चे मालक नसल्यामुळे ते तक्रारकर्त्याच्या नांवे कायदेशीररित्या विक्रीपत्राची नोंदणी करुन देण्यास असमर्थ आहेत. विरुध्द पक्ष 1 व 2 हे उपरोक्त ले-आऊटचे मालक नसतांना सुध्दा त्यांनी तक्रारकर्त्याकडून भूखंड विक्रीपोटी तक्रारकर्त्याकडून रक्कम स्वीकारलेली आहे. विरुध्द पक्ष 3 ही विरुध्द पक्ष 1 ची पत्नी या नात्याने त्याच्या सर्व चल व अचल संपत्तीची वारसदार आहे. त्यामुळे विरुध्द पक्षाचे पती स्व. संतोष बुरेवार यांनी तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम परत करण्यास विरुध्द पक्ष 3 ही सुध्दा जबाबदार असतांना विरुध्द पक्ष 3 ही जाणूनबुजून आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते व ही विरुध्द पक्ष क्रं. 1 ते 3 च्या सेवेतील त्रुटी असून त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्याचे दिसून येते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याकडून भूखंड विक्रीपोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 30,000/- व सदरहू रक्कमेवर शेवटचा हप्ता जमा केल्याच्या दि. 28.12.2008 पासून ते प्रत्यक्ष रक्कमेच्या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्के दराने व्याजासह रक्कम परत करावी.
- विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या तक्रारकर्त्याला शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 45 दिवसाच्या आंत विरुध्द पक्ष 1 ते 3 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्तरित्या करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
- तक्रारकर्त्याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
| |
|
| [HON'BLE MR. ATUL D. ALSI] | PRESIDENT
| | | [HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS] | MEMBER
| | | [HON'BLE MR. SUBHASH R. AJANE] | MEMBER
| | |