निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- :::::निकालपत्र ::::: तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणे: प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये, मूळ तक्रार क्र.116/2003 व मूळ तक्रार क्र.117/2003 या निकाली निघालेल्या व त्यामध्ये मूळ सामनेवाला यांनी तक्रारदारांना वसुली रक्कम परत करावी असे आदेश झाले. त्या आदेशानुरुप, तक्रारदारांनी वसुली अर्ज क्र.1/2006 व क्र.2/2006 दाखल केले व प्रस्तुत मंचाने कलम-25 प्रमाणे जिल्हाधिकारी ठाणे, यांचेकडे वसुली कामी प्रमाणपत्र पाठविले. त्या प्रमाणपत्रामध्ये एकूण वसुली योग्य रक्कम रु.1,80,696/- अशी नमुद करण्यात आली. 2 तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे, प्रस्तुत मंचाने प्रमाणपत्र जारी करावे. मूळ एकूण देय रक्कम रु.1,91,696/- अशी नमुद करणे आवश्यक होते परंतु रक्कम रु.1,80,696/- ही रक्कम नमुद केल्याने प्रत्येक तक्रारदारांना प्रत्येकी रक्कम रु.11,000/- कमी वसूल झाले. कमी वसूल रक्कम रू.11,000/-, पुन्हा वसुल करणे कामी कलम-25 प्रमाणे तक्रारदारांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 3 सामनेवाला यांना नोटीस पाठविण्यात आली होती. तथापि सुचना देऊनही सामनेवाला यांनी नोटीस स्विकारली नाही. 4 तक्रारदारांचे प्रतिनिधी हजर आहेत, त्यांचा युक्तीवाद ऐकला. मूळचा आदेश तसेच मूळ कलम-25 प्रमाणे जारी केलेली प्रमाणपत्रे यांची पडताळणी केली, त्यावरुन असे दिसते कि, कलम-25 प्रमाणे प्रमाणपत्र जारी करीत असताना प्रस्तुत मंचाने रु.11,000/- प्रमाणपत्रामध्ये कमी दाखविले, त्यावरुन दोन्हीं अर्जातील कथने योग्य व बरोबर आहेत असे दिसून येते. सबब, या प्रकरणी पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश (1) अंमलबजावणी अर्ज क्र.64/2010 व अंमलबजापणी अर्ज क्र.65/2010 मंजूर करण्यात येतात. (2) प्रत्येक अंमलबजावणी अर्जामध्ये कलम-25 प्रमाणे रक्कम रु.11,000/- सामनेवाला यांचेकडून वसूल होऊन तक्रारदारांना देय करणे कामी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या नावे प्रमाणपत्र पाठविण्यात यावे. (3) वसुली अर्ज निकाली काढण्यात येतो. (4) आदेशाच्या प्रमाणिंत प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य देण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |