तक्रारदार :स्वतः हजर.
सामनेवाले :गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ना.द. कदम, सदस्य - ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सामनेवाले हे इलेक्ट्रानीक वस्तुंचे उत्पादक असून इतर वस्तुबरोबर ते धुलाई यंत्राची सुध्दा निर्मीती करतात. हयांचे कार्यालय मालाड (प.), येथे आहे.
तक्रारदारांनी सा.वाले यांचे अधिकृत मे-गाला अॅण्ड सन्स मालाड (प.), यांचेकडून दि, 31.08.2010 रोजी पॅनासॉनिक कंपनीची पूर्णतः स्वयंचलित धुलाई यंत्र 10,500/-, एवढया रक्कमेस विकत घेतले. पावती क्र. 24210 Exhibit B पृष्ठ 6 ः
2. तक्रारदारांच्या कथनानूसार सदर यंत्र खरेदी केल्यानंतर 3 महिण्याच्या आतच वेळोवळी चालु केल्यावर मध्येच बंद पडू लागले. त्यामूळे कपडयाची धुलाई पूर्णतः न होता कपडे ओलेच राहत असत. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 04.11.2010 ते 24.12.2010 पर्यंत 8 वेळा संपर्क साधला परंतू प्रत्येकवेळा सामनेवाले यांचे प्रतिनीधी स्वतः तपासणीसाठी आले परंतू त्यांनी दुरूस्तीबाबत कोणतीही उचित कार्यवाही केली नाही. यानंतर सामनेवाले यांना अनेक पत्रे पाठवुन ही सामनेवाले यांचेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी कंटाळून प्रस्तुत तक्रार सादर केली व त्यामध्ये तक्रारदारांना सा.वाले यांनी पुरविलेल्या सेवेमधील कमतरता असल्याचे तसेच, अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे जाहिर करावे अशी मागणी करून त्यांना देण्यात आलेली नादुरूस्त धुलाई यंत्र परत घेऊन जाण्याचे आदेश दयावेत व सदर यंत्राची किंमत परत मिळावी याबरोबरच त्यांना झालेल्या गैरसोयीबद्दल रू.1500/-,इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
3. सामनेवाले यांनी आपली कैफियत सादर केली आहे. त्यामध्ये त्यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारीत नमूद केलेल्या सर्व बाबी पूर्णतः असत्य आहेत. त्यांनी पुढे असे नमूद केले की, तक्रारदारांची दिनांक 02.11.2010 ची तक्रार प्राप्त होताच सामनेवाले यांनी कंट्रोल पॅनल बदलले. त्यानंतर दि. 17.11.2010 च्या तक्रारीनूसार सदर धुलाई मशीन तपासली असता त्यामध्ये कोणताही दोष आढळून आला नाही. उलट मशीन व्यवस्थित चालू झाली होती व ती व्यवस्थित असल्याचे तक्रारदारांनी मान्य केले. यानंतर सामनवाले यांनी दि. 18.11.2010 व दि. 25.11.2010 रोजी तक्रारदारांशी स्वतः संपर्क साधुन सदर मशीन योग्यप्रकारे चालते याची स्वतःहून खात्री केली तद्नंतर दि. 22.12.2010 रोजी तक्ररादाराच्या तक्रारी मशीनची पुन्हा तपासणी केली असता मशिनच्या धुलाईमध्ये व स्पीनमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळून आला नाही. तर मशीन व्यवस्थित चालू असल्याचे आढळून आले व ते तक्रारदारांनी मान्य केले. यानंतर सामनेवाले यांनी दि. 27.01.2011 व 28.02.2011 रोजी तक्रारदारांशी संपर्क साधून मशीन व्यवस्थित चालु असल्याची खातरजमा केल्याचे कथन केले आहे. त्या पृष्ठर्थ सामनेवाले यांनी, जॉब कार्डच्या प्रती सादर केल्या आहेत.
4. तक्रारदाराने तक्रारीसोबत आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत तर सामनेवाले यांनी आपली कैफियत, शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली आहेत.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफियत, कागदपत्रे व लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले त्यावरून तक्रारीचे निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना सदोष धुलाई यंत्राची विक्री करून अनुचित प्रथेचा अवलंब केला हे ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय? |
नाही. |
2 |
सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या तक्रारीनुसार वेळोवळी दुरूस्ती सेवा पुरविण्यात असल्याबद्दल तक्रार सिध्द करतात काय? |
नाही. |
3. |
तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय? |
नाही. |
4. |
अंतीम आदेश |
तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो. |
कारण मिमांसा
6. तक्रारदाराने सामनेवाले यांच्या अधिकृत विक्रेत्याकडून दि. 31.08.2010 रोजी धुलाई यंत्र रू. 10,500/-, इतक्या किंमतीत विकत घेतल्यानंतर लगेचच 3 महिन्यात म्हणजे दि. 02.11.2010 रोजी बंद पडल्याचे तक्रारदारांच्या कथनावरून दिसून येते. त्या तक्रारीनूसार सामनवाले यांनी कंट्रोल पॅनेल बदलल्याचे आपल्या कैफियतमध्ये नमूद केले आहे. तो मशीनमधील मुलभूत दोष म्हणता येणार नाही. या संदर्भातील जॉब कार्डचे अवलोकन केले असता सदर मशीन दिनांक दुरूस्तीनंतर दि. 18.11.2010, 25.11.2010 व 27.11.2010 रोजी व्यवस्थित चालू होती अशी नोंद आहे. व या जॉबकार्डवर तक्रारदारांची स्वाक्षरी आहे. यानंतर दि. 27.12.2010, 08.01.2011, 27.01.2011 रोजी सामनेवालेच्या प्रतिनीधीने सदर धुलाई यंत्राची तक्रारीनूसार पाहणी करून ती व्यवस्थित रित्या चालू असल्याचे जॉब कार्डावरील नोंदीवरून दिसून येते. दि. 08.01.2011 रोजीच्या जॉबकार्डावरील नोंदीवरून असेही आढळून येते की, तक्रारदाराने मशीनला जोडलेल्या इलेक्ट्रीक फ्लग हा लूज असल्याने मशीन चालत नसल्याची नोंद आहे. म्हणजेच तक्रारदारांच्या स्वतःच्या काही चुका असताना त्यांनी मशीन व्यवस्थित चालू नसल्याची तक्रार केली आहे.
7. सामनेवाले यांनी तक्रारदारास पुरविलेल्या सेवाबद्दलचा पुरावा जॉब कार्डद्वारे सादर केला आहे. सदर जॉब कार्डवरील नोंदीनूसार सामनेवाले यांनी ब-याचवेळा स्वतःहून ही तक्रारदाराशी संपर्क साधुन मशीन व्यवस्थित चालते का याबाबतची विचारपूस केली आहे त्यावर तक्रारदारांनी त्या त्या वेळी मशीनबाबत तक्रार नसल्या बाबतच्या नोंदी जॉब कार्डवर आहेत.
8. या संदर्भात, तक्रारदारांच्या कथनानूसार तक्रारीमध्ये त्यांनी (परिशिष्ट बी पृ. 7 ते 21), केलेल्या 12 तक्रारीपैकी किमान 4 तक्रारीवर सामनेवाले यांनी कार्यवाही केल्याचे दिसून येते. तथापी तक्रारदार, सामनेवाल्याच्या प्रत्येक कार्यवाहीवर असंतुष्ट असल्याचे त्यांच्या तक्रारीवरून दिसून येते.
या संदर्भात सामनेवाले यांच्या अधिकृत विक्रेते यांनी तक्रारदारास विकलेल्या धुलाई यंत्रामध्ये काही मूलभूत दोष होता काय? याबाबत तक्रारदारांनी, त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीमार्फत सदर यंत्राची तपासणी करून, त्यांचा अहवाल घेणे आवश्यक होते. तथापी तसे न करता तक्रारदार वारंवार तक्रार करत राहीले व प्रत्येक वेळा धुलाई यंत्र खराब असून ते बदलून मिळावे असे सातत्याने मागणी करीत राहीले. एकुनच सदर मशीनमध्ये मुलभुत दोष असल्याचे तक्रारदार सिध्द करू शकले नाहीत. साहजिकच तक्रारदार मशीन बदलुन मिळणे अथवा किंमतीचा परतावा मागणेस पात्र नाहीत.
9. या शिवाय, सामनेवाले यानी तक्रारदाराच्या तक्रारीनूसार सेवा पुरविल्यानंतर मशिन प्रत्येकवेळी व्यवस्थित चालु असल्याचे, तक्रारदारांनी जॉबकार्डवर सही करून मान्य ही केली आहे. परंतु त्याचवेळी त्यांनी लगेच तक्रार करून, देण्यात आलेली सेवा अयोग्य असल्याची तक्रार केल्याचे उपलब्ध अभिलेखावरून दिसून येते.
यापुढे असे नमूद करण्यात येते की, सदर धुलाई यंत्राची सद्दःस्थिती म्हणजे ते चालू आहे किंवा कसे, याबद्दल तक्रारदारानी आपल्या कथनामध्ये कुठेही स्पष्ट केल्याचे दिसून येत नाही.
10 याप्रकारे सामनेवाले यांनी अनुचित प्रथेचा अवलंब केला अथवा सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली हे तक्रारदार सिध्द करू शकले नाहीत.
11. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 180/2011 रद्द करण्यातयेते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.