Maharashtra

Thane

CC/794/2014

Mr.Suresh Shantaram Ghadi - Complainant(s)

Versus

M/s. Om sai Dreamhomes Builder and Developers - Opp.Party(s)

Adv.J.T.Bhoyarkar

28 Jul 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/794/2014
 
1. Mr.Suresh Shantaram Ghadi
Municiple Kamgar Vasahat,Room No.6,Bal Govind Das Road,Dadar(w),Mumbai-400028
Mumbai
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Om sai Dreamhomes Builder and Developers
C/o Santosh Pote,Matoshree Apt.,Near Ganesh Temple,Dwarli,ambernath,Thane
Thane
Maharashtra
2. Sunil Damodar Pote
Sarvodaya Garden,3.303,Near Bhanusagar,Kalyan(W) Thane
Thane
Maharashtra
3. Amol Shedge
A.10.503,Panhalgad CHS,Shree Complex,Opposite Mohan Rejensi,Adharwadi Road,Kalyan(W) Thane
Thane
Maharashtra
4. Rajesh Singh Thakur
Near Lalchowki,Adharwadi Road,Kalyan(W) Thane
Thane
Maharashtra
5. Anant Sadashiv Shinde
C/O Adharwadi Road,Kalyan(W) Thane
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 28 Jul 2016
Final Order / Judgement

                                 द्वारा- श्री.ना.द.कदम...................मा.सदस्‍य.        

1.                सामनेवाले नं.1 ही इमारत बांधकाम व्‍यावसायिक संस्‍था असुन सामनेवाले नं. 2 ते 5 हे त्‍या संस्‍थेचे भागिदार आहेत.  तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून विकत घेतलेल्‍या सदनिकेचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिला नसल्‍याने प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे. 

     

2.                तक्रारदाराच्‍या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांना दिलेल्‍या जाहिरातीवर विश्‍वास ठेऊन, सामनेवाले यांनी मौजे वसार, ता.अंबरनाथ जिल्‍हा-ठाणे गावठाण विभाग येथील सर्व्‍हे नंबर-43, हिस्‍सा नं.3, या भुखंडावर विकसित करावयाच्‍या प्रायोजित इमारतीमध्‍ये 250 चौरस फुट क्षेत्रफळाची एक रुम किचन सदनिका रु.2,28,000/- इतक्‍या किंमतीस विकत घेण्‍याचे निश्चित करुन तक्रारदार यांनी ता.08/08/2012 ते 03/08/2014 दरम्यान रु. 2,27,752/- तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिली.   तथापि, यानंतर बराचकाळ सामनेवाले यांनी बांधकाम केले नाही.  त्‍यामुळे तक्रारदार यांना आपण फसवलो गेलो असल्‍याचे ज्ञात झाल्‍यावर त्‍यांनी सामनेवाले यांचेकडे दिलेली रक्‍कम परत मागितली, परंतु प्रत्‍येकवेळी त्‍यांनी टाळाटाळ केली व यानंतर आपला पत्‍ता बदलून अन्‍य ठिकाणी गेले, व त्‍यांनी नविन नांवाने व्‍यवसाय चालु केला.  त्‍याठिकाणी सुध्‍दा त्‍यांना गाठून पैसे परत मागितले, परंतु त्‍यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.  शेवटी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस दिली.  परंतु सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही.  त्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन तक्रारदार यांची रक्‍कम रु.2,27,252/-, 18 टक्‍के व्‍याजासह परत मिळावी, मानसिक त्रासाबद्दल रु.2,00,000/- तसेच तक्रार खर्चाबद्दल रु.50,000/- अशी व्‍याजासह एकूण रक्‍कम रु.6,00,738/- मिळावी अशा मागण्‍या केल्‍या आहेत.  

 

3.                सामनेवाले यांना पाठविण्‍यात आलेली तक्रारीची नोटीस, अपुरा पत्‍ता/ लेफ्ट/अन्‍क्‍लेम्‍ड या शे-यासह परत आल्‍याने, सामनेवाले यांना जाहिर नोटीस देण्‍यात आली.  तथापि,नमुद तारखेस तसेच त्‍यानंतर संधी देऊनही सामनेवाले हजर न झाल्‍याने, त्‍यांच्‍या विरुध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍यात आली. 

 

4.                तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला.  तोंडी युक्‍तीवादाची पुरसिस दिली.  तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, व लेखी युक्‍तीवादाचे वाचन मंचाने केले.  त्‍यावरुन प्रकरणात खालील प्रमाणे निष्‍कर्ष निघतात.   

 

5.                                         कारण मिमांसा

अ. सामनेवाले यांनी ‘चौफेर’ वृत्‍तपत्रामध्‍ये दिलेल्‍या जाहिरातीचे कात्रण तक्रारदार यांनी दाखल केले आहे. त्‍यानुसार, सामनेवाले यांनी वसार 2,3,4, वसार फ्रन्‍ट लाईन, भाल बस डेपो, व्‍दार्लीपाडा असे विविध प्रकल्‍प प्रायोजित केले होते. त्‍यामधील सामनेवाले यांनी वसार ता.अंबरनाथ येथील सर्व्‍हे नंबर-43, हिस्‍सा नं.3, या भुखंडावर विकसित करावयाच्‍या प्रायोजित वसार बिल्‍डींग इमारतीमधील 250 चौरस फुट क्षेत्रफळाची सदनिका रु.2,28,000/- किंमतीस विकत घेण्‍याचे निश्चित करुन त्‍याबद्दल नोटराईज्‍ड करारनामा / खरेदीखत उभय पक्षामध्‍ये ता.29/09/2013 रोजी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते त्‍यानुसार तक्रारदार यांनी एकुण किंमत 2,18,000/- पैंकी रु. 2,27,752/- वेळोवेळी सामनेवाले यांना दिल्‍याचे दिसून येते.

ब. सामनेवाले यांनी, तक्रारदाराशी वसार बिल्‍डींग मधील सदनिका विकण्‍याचा व्‍यवहार करुन दि.29/09/2013 रोजी लिखित करारनामा करुन व त्‍याबाबत रु.2,27,752/- स्विकारुन कोणतेच बांधकाम केले नाही, व तक्रारदाराचे पैसे परत केले नाहीत, हे तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन स्‍पष्‍ट होते.     

 

6.                     उपरोक्‍त चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.  या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही . 

                            आदेश

1. तक्रार क्रमांक- 794/2014 अंशतः मान्‍य करण्‍यात येते. 

2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विकलेल्‍या सदनिकेसंबंधी त्रुटीची सेवा दिल्‍याचे व

   अनुचित प्रथेचा वापर केल्‍याचे जाहिर करण्‍यात येते. 

3. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून स्विकारलेली रक्‍कम रु.2,27,752/- (अक्षरी रुपये दोन लाख सत्‍तावीस हजार सातशे बावन्‍न फक्‍त) ता.29/11/2012 पासुन द.सा.द.शे 12% व्‍याजासह ता.15/09/2016 पुर्वी परत करावी. आदेशपुर्ती नमुद कालावधीमध्‍ये न केल्‍यास ता.29/11/2012 पासुन आदेशपुर्ती होईपर्यंत द.सा.द.शे 15% व्‍याजासह परत करावी.

4. तक्रार खर्चाबद्दल रक्‍कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) ता.15.08.2016 पुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावेत.  व्‍याज दिल्‍यामुळे नुकसान भरपाईचा आदेश नाही. 

5. आदेशाच्‍या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्‍य व विनाविलंब पोस्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

ठिकाण ठाणे.

दिनांक28/07/2016

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.