1. सामनेवाले नं.1 ही इमारत बांधकाम व्यावसायिक संस्था असुन सामनेवाले नं. 2 ते 4 हे त्या संस्थेचे भागिदार आहेत. तक्रारदार 1 ते 4 यांनी सामनेवाले यांचेकडून विकत घेतलेल्या सदनिकेचा ताबा सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दिला नसल्याने प्रस्तुत वाद निर्माण झाला आहे.
2. तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांना दिलेल्या जाहिरातीवर विश्वास ठेऊन, सामनेवाले यांनी मौजे वसार, ता.अंबरनाथ जिल्हा-ठाणे गावठाण विभाग येथील सर्व्हे नंबर-43, हिस्सा नं.3, या भुखंडावर विकसित करावयाच्या प्रायोजित इमारतीमध्ये सदनिका विकत घेण्यासाठी सामनेवाले यांचेशी सदनिका / खोली खरेदी व्यवहार केला व वेळोवेळी त्यांनी विक्री व्यवहारामध्ये ठरवलेली बरीचशी रक्कम सामनेवाले यांना दिली. तथापि, यानंतर बराचकाळ सामनेवाले यांनी बांधकाम केले नाही. त्यामुळे तक्रारदार यांना आपण फसवलो गेलो असल्याचे ज्ञात झाल्यावर त्यांनी सामनेवाले यांचेकडे दिलेली रक्कम परत मागितली, परंतु प्रत्येकवेळी त्यांनी टाळाटाळ केली व यानंतर आपला पत्ता बदलून अन्य ठिकाणी गेले, व त्यांनी नविन नांवाने व्यवसाय चालु केला. त्याठिकाणी सुध्दा त्यांना गाठून पैसे परत मागितले, परंतु त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस दिली. परंतु सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार दाखल करुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांना दिलेली रक्कम 18% व्याजासह मिळावी, नुकसान भरपई मिळावी, अशा मागण्या केल्या आहेत.
3. सामनेवाले यांना पाठविण्यात आलेली तक्रारीची नोटीस, अपुरा पत्ता / लेफ्ट / अन्क्लेम्ड या शे-यासह परत आल्याने, सामनेवाले यांना जाहिर नोटीस देण्यात आली. तथापि, नमुद तारखेस तसेच त्यानंतर संधी देऊनही सामनेवाले हजर न झाल्याने, त्यांच्या विरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली.
4. तक्रारदार यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला. तोंडी युक्तीवादाची पुरसिस दिली. तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, व लेखी युक्तीवादाचे वाचन मंचाने केले. त्यावरुन प्रकरणात खालील प्रमाणे निष्कर्ष निघतात.
5. कारण मिमांसा
अ. सामनेवाले यांनी ‘चौफेर’ वृत्तपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातीचे कात्रण तक्रारदार यांनी दाखल केले आहे. “त्यानुसार, सामनेवाले यांनी वसार 2, 3, 4, वसार फ्रन्ट लाईन, भाल बस डेपो, व्दार्लीपाडा असे विविध प्रकल्प प्रायोजित केले होते. त्यामधील सामनेवाले यांनी वसार ता.अंबरनाथ येथील सर्व्हे नंबर-43, हिस्सा नं. 3, या भुखंडावर विकसित करावयाच्या प्रायोजित वसार बिल्डींग तसेच द्वार्लिनपाडा इमारतीमधील खाली नमुद केलेल्या सदनिका विकत घेण्याचा व्यवहार सामनेवाले यांचेशी करुन खाली दर्शविल्याप्रमाणे रकमा सामनेवाले यांना दिल्या असल्याचे खालील तक्त्यामधील पावत्यावरुन दिसुन येते.
तक्रारदाराचे क्र. व नाव. | विकत घेतलेल्या खोलीचा तपशिल | विक्री किंमत | सामनेवाले यांना दिलेली रक्कम | पावती क्र. | दिनांक |
1.सुरेशकुमार दुबे | द्वालीपाडा 1 आरके | 3,40,000/- | 80,000/- | 35 | 02/01/2013 |
40,000/- | 147 | 02/01/2012 |
1,00,000/- | 397 | 28/10/2012 |
| | एकुण | 2,20,000/- | | |
2. रामपाल यादव | वसार द्वालीपाडा फेज 1, 250 चौ.फु | 3,40,000/- | 14,000/- | 181 | 30/01/2013 |
50,000/- | 327 | 16/09/2012 |
9,000/- | 282 | 09/09/2012 |
80,000/- | 396 | 28/10/2012 |
2,000/- | 148 | 02/09/2012 |
80,000/- | 36 | 02/01/2013 |
| | एकुण | 2,35,000/- | | |
3. धमेंद्रकुमार गुप्ता | वसार 1 आरके, 250 चौ.फुट | 2,80,000/- | 70,000/- | 351 | 18/02/2013 |
87,000/- | 434 | 16/03/2013 |
11,000/- | 283 | 09/09/2012 |
70,000/- | 177 | 30/01/2013 |
7,000/- | 463 | 22/03/2013 |
| | एकुण | 2,38,000/- | | |
4. सितलाप्रसाद यादव | वसार चाळ, 1 आरके, 250 चौ.फु | 2,80,000/- | 3,00,000/- | | 23/01/2014 च्या खरेदी खताप्रमाणे |
ब. सामनेवाले यांनी, तक्रारदाराशी वसार बिल्डींग मधील सदनिका विकण्याचा व्यवहार करुन तसेच उपरोक्त नमुद तक्रारदाराकडुन रक्कम स्वीकारल्यानंतर कोणतेच बांधकाम केले नाही, व तक्रारदाराचे पैसे परत केले नाहीत, हे तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.
6. उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. “या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
आदेश
1. तक्रार क्रमांक 717/2015 अंशतः मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विकलेल्या सदनिकेसंबंधी त्रुटीची सेवा दिल्याचे व
अनुचित प्रथेचा वापर केल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. 1 कडुन स्विकारलेली रक्कम रु.2,20,000/- (अक्षरी रुपये दोन लाख वीस हजार फक्त) दि.01/02/2013 पासून तक्रारदार क्र. 2 कडुन स्वीकारलेली रक्कम रु.2,35,000/- (अक्षरी रुपये दोन लाख पस्तीस हजार फक्त) दि.01/02/2013 पासून, तक्रारदार क्र. 3 यांचेकडुन स्वीकारलेली रक्कम रु.2,38,000/- (अक्षरी रुपये दोन लाख अडतीस हजार फक्त) दि.01/02/2013 पासून, सामनेवाले 4 कडून स्विकारलेली रक्कम रु.2,38,000/- (अक्षरी रुपये दोन लाख अडतीस हजार फक्त) दि.01/04/2013 पासून 12% व्याजासह, तक्रारदार क्र.1 यांना दि.01/02/2013 पासून, तक्रारदार क्र. 2 यांना दि.01/02/2013 पासून, तक्रारदार क्र. 3 यांना दि.01/02/2013 पासून तक्रारदार क्र. 4 यांना दि.01/04/2013 पासून व 15% व्याजासह संपुर्ण रक्कम द्यावी.
4. तक्रार खर्चाबद्दल रक्कम प्रत्येकी रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) ता.15/08/2016 पुर्वी सामनेवाले यांनी तक्रारदार क्र. 1 ते 4 यांना दयावेत. व्याज दिल्यामुळे नुकसान भरपाईचा आदेश नाही.
5. आदेशपुर्तीसाठी सामनेवाले 1 ते 4 हे वैयक्तिक तसेच संयुक्तपणे जबाबदार असतील.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांना परत करण्यात यावेत.