Maharashtra

Gadchiroli

EA/6/2017

Government Of Maharashtra, Assistant Conservator of Forest, Gadchiroli Throudh Ashok Ram Parhad - Complainant(s)

Versus

M/S. Nitin Motors Through Shri. Mahohar Khushalchand Kachela - Opp.Party(s)

Adv. P.J. Ghongade

18 Jan 2018

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Gadchiroli.
M.I.D.C. Road, T - Point, Navegaon,
Tah. Dist. Gadchiroli.
Pin No. 442605.
Maharashtra
 
Execution Application No. EA/6/2017
In
Complaint Case No. CC/32/2016
 
1. Government Of Maharashtra, Assistant Conservator of Forest, Gadchiroli Throudh Ashok Ram Parhad
Age- 29 Yr., Occu.- Service, At. Forest Division, Gadchiroli, Potegaon Road, Gadchiroli, Tah.Dist. Gadchiroli
Gadchiroli
Maharashtra
...........Appellant(s)
Versus
1. M/S. Nitin Motors Through Shri. Mahohar Khushalchand Kachela
Near Police Head Office, Mul Road, Chandrapur, Tah. Dist. Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MS. Roza F. Khobragade PRESIDENT
 HON'BLE MR. Sadik M. Zaveri MEMBER
 
For the Appellant:Adv. P.J. Ghongade, Advocate
For the Respondent:
Dated : 18 Jan 2018
Final Order / Judgement

(मंचाचे निर्णयान्‍वयेश्री. सादिक मोहसिनभाई झवेरीसदस्‍य) 

           अर्जदाराने सदर चौकशी अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 25 अंतर्गत दाखल केली असुन अर्जाचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे...

      अर्जदार मुळ तक्रार क्र.32/2016 दि.31.05.2016 रोजी दाखल केली होती. सदर तक्रारीवर अंतिम आदेशाप्रमाणे गैरअर्जदारास मुळ तक्रारीतील मागणी रु.16,68,002/- द.सा.द.शे.12% व्‍याजासह व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.5,000/- आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन 45 दिवसांचे आंत द्यावे असे आदेश होऊन सुध्‍दा गैरअर्जदाराने सदर आदेशाची अंमलबजावणी केली नसल्‍यामुळे अर्जदाराने सदर चौकशी अर्ज दाखल केला आहे. 

  • // कारणमिमांसा//  -

1.    सदर चौकशी अर्जावर सुनावणी ऐकूण या मंचाने गैरअर्जदारास नोटीस काढली. गैरअर्जदारास नोटीस तामिल होऊन ‘दिलेल्‍या पत्‍त्‍यावर हाजर मिळाले नाही’, या  शे-यासह परत आले. त्‍यानंतर अर्जदाराने निशाणी क्र.9 व 12 नुसार गैरअर्जदारावर ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25 नुसार मा. जिल्‍हाधिकारी यांचेमार्फत जप्‍तीची कार्यवाही करण्‍यात यावी असा अर्ज दाखल केला. सदर अर्ज दाखल झाल्‍यानंतर गैरअर्जदाराने ग्राहक तक्रार 32/2016 मध्‍ये पारित आदेशा विरुध्‍द मा. राज्‍य आयोग येथे अपील केली आहे का ?  याचा अहवाल मागविण्‍यांत आला असता गैरअर्जदाराने कुठलीही अपील केलेली नाही, असा शेरा प्राप्‍त झाला.

2.     या मंचाव्‍दारे पारित आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले असल्‍यास व विरुध्‍द पक्षास दिलेली नोटीस परत आली असल्‍यामुळे विरुध्‍द पक्षाविरुध्‍द निशाणी 1 वर प्रकरण एकतर्फी चालविण्‍यात यावे असा आदेश पारित करण्‍यांत आला व चौकशी अर्जावर सुनावणी ऐकण्‍यांत आली.

3.    एकंदरीत गैरअर्जदाराने अर्जदाराची ग्राहक तक्रार क्र.32/2016 च्‍या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्‍यामुळे व सदर तक्रारीतील आदेशाविरुध्‍द मा. राज्‍य आयोगामध्‍ये अपील सुध्‍दा केली नसल्‍यामुळे या मंचाचा आदेश हा अंतिम आदेश झालेला आहे व गैरअर्जदाराने आदेशाची पूर्तता आजपर्यंत केलेली नाही. म्‍हणून ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 25(3) प्रमाणे अर्जदार हा गैरअर्जदाराचे विरुध्‍द वसुली दाखला मिळण्‍यांस पात्र आहे. सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                                      - // अंतिम आदेश // - 

1.प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, गडचिराली  यांना आदेशीत करण्‍यांत येते की, त्‍यांनी ग्राहक तक्रार क्र.32/2016 यातील दि.31.05.2016 मधील या मंचाचे आदेशान्‍वये आज रोजी असलेल्‍या व थकीत झालेल्‍या रकमेचा हिशोब करावा व तेवढी रक्‍कम थकीत झाली म्‍हणून त्‍या रकमेच्या वसुली दाखल जिल्‍हाधिकारी, गडचिरोली यांचेकडे पाठविण्‍यांत यावा.

2.जिल्‍हाधिकारी, चंद्रपूर यांना आदेशीत करण्‍यांत येते की, त्‍यांना तसा दाखला प्राप्‍त झाल्‍यानंतर गैरअर्जदारांची स्‍थावर तसेच जंगम मालमत्‍तेचा शोध घेऊन वसुली दाखल्‍यातील थकीत रक्‍कम वसुलीसाठी त्‍वरेने कार्यवाही करावी.

3.जिल्‍हाधिकारी, चंद्रपूर यांना आदेशीत करण्‍यांत येते की, जाहीर लिलावाची फी तसेच इतर प्रशासनिक खर्च व प्रस्‍तुत अर्जाचा खर्च रु.5,000/- गैरअर्जदाराकडून वसून करावा.

4.वसुली दाखल्‍याबरोबर प्रस्‍तुत न्‍याय निर्णयाची प्रत देखिल जिल्‍हाधिकारी, चंद्रपूर यांना पाठविण्‍यांत यावी.

5.वरील न्‍यायनिर्णयाच्‍या प्रती उभय पक्षांना विनामुल्‍य देण्‍यांत याव्‍यात.

 

 
 
[HON'BLE MS. Roza F. Khobragade]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Sadik M. Zaveri]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.