Maharashtra

Additional DCF, Pune

EX/10/5

Mr. Vinayak Kondiba Barne - Complainant(s)

Versus

M/s. Nirmiti Developers Through its Prop. Shri. Madhusudan Ramswami - Opp.Party(s)

23 Jan 2012

ORDER

 
Execution Application No. EX/10/5
 
1. Mr. Vinayak Kondiba Barne
R/o. Post=Kohinde, Tal.Khed, Dist. Pune
...........Appellant(s)
Versus
1. M/s. Nirmiti Developers Through its Prop. Shri. Madhusudan Ramswami
Saikripa Niwas, Rajgurunager, Tal.Rajgurunager, Dist.Pune
...........Respondent(s)
 
BEFORE: 
  Smt. Pranali Sawant PRESIDENT
  Smt. Sujata Patankar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

// निशाणी 1 वरील आदेश //


 

 


 

            प्रस्‍तुत प्रकरणातील आरोपीने मंचाच्‍या आदेशाची अंमलबजावणी केली नाही म्‍हणून अर्जदारांनी सदरहू अंमलबजावणी अर्ज दि.2/2/2010 रोजी मंचापुढे दाखल केला आहे. अर्जदारांच्‍या अर्जास अनुसरुन आरोपीविरुध्‍द समन्‍स काढण्‍यात आले होते. यानंतर समन्‍सप्रमाणे आरोपी हजर न झाल्‍याने त्‍यांचेविरुध्‍द वॉरंट काढले असता ते मंचापुढे हजर राहिले व निशाणी 13/1 अन्‍वये अर्जदारांच्‍या सहीची ताबा पावती त्‍यांनी मंचापुढे दाखल केली. या ताबा पावतीचे अवलोकन केले असता फलॅट, फलॅटच्‍या अमेनिटीज व फलॅटच्‍या ताब्‍याबाबत कोणतीही तक्रार राहिलेली नसून यासंदर्भात कोणत्‍याही न्‍यायालयात वाद करायचा नाही असा उल्‍लेख या ताबेपावतीवर आढळतो. या ताबेपावती‍चा दि.18/5/2010 असून यावर तक्रारदारांची सही आढळून येते. ही ताबापावती दाखल केल्‍यानंतर आरोपीने निशाणी 34 अन्‍वये आदेशाप्रमाणे अंमलबजावणी केल्‍याची 11 छायाचित्रे मंचापुढे दाखल केली व आदेशाप्रमाणे पूर्तता झालेली असल्‍याने अर्ज निकाली करावा असा अर्ज मंचापुढे दाखल केला. दि.2/11/2011 रोजी ही छायाचित्रे व अर्ज दाखल झाल्‍यानंतर याबाबत म्‍हणणे दाखल करण्‍याचे निर्देश अर्जदारांना देण्‍यात आले होते. मात्र आदेशित केल्‍यानंतर अर्जदारांनी कोणतेही म्‍हणणे मंचापुढे दाखल केले नाही. तसेच यानंतर नेमलेल्‍या तारखेला ते सातत्‍याने मंचापुढे गैरहजर आहेत तर सर्व तारखांना आरोपी हजर राहिलेले आहेत. आरोपीने मंचाच्‍या आदेशाप्रमाणे पूर्तता केलेली असल्‍यामुळे अंमलबजावणी अर्ज काढून टाकावा असा अर्ज आरोपीने पुन्‍हा एकदा मंचापुढे दाखल केला. आरोपीच्‍या अर्जाच्‍या अनुषंगे दाखल सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता आरोपीने मंचाच्‍या आदेशाप्रमाणे पूर्तता केलेली आहे ही बाब सिध्‍द होते. अर्जदारांनी अर्ज दाखल केल्‍यानंतर जी ताबा पावती लिहून दिली आहे त्‍यामध्‍येही या आशयाचा उल्‍लेख आढळतो. तसेच आरोपीने छायाचित्रे दाखल केल्‍यानंतर ती अमान्‍य करावीत अशा आशयाचे काही निवेदन अथवा पुरावा अर्जदारांतर्फे दाखल नाही. अशा परिस्थितीत आरोपीने आदेशाप्रमाणे पूर्तता केलेली आहे हा निष्‍कर्ष काढून सदरहू अंमलबजावणी अर्ज निकाली करणे योग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे. 


 

 


 

सबब मंचाचा आदेश की,



 

// आदेश //


 

सदरहू अंमलबजावणी अर्ज निकाली करण्‍यात येत आहे.


 

खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.


 

 
 
 
[ Smt. Pranali Sawant]
PRESIDENT
 
[ Smt. Sujata Patankar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.