अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, पुणे
मा. अध्यक्षा : श्रीमती. प्रणाली सावंत
मा. सदस्या : श्रीमती. सुजाता पाटणकर
**************************************
ग्राहक तक्रार अर्ज क्रमांक:एपीडीएफ/102/08
तक्रार अर्ज दाखल दिनांक: 19/11/2004
तक्रार निकाल दिनांक : 21/11/2011
1. श्री. तुकाराम गंगाराम काळे, ..)
2. सौ. वासंती तुकाराम काळे, ..)
दोघेही राहणार :- फलॅट नं. 31, शिरोळे बाग बिल्डींग, ..)
गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे – 16. ..).. तक्रारदार
विरुध्द
मे. मेडिनोव्हा डायग्नोस्टिक सर्व्हीसेस लिमीटेड, ..)
पत्ता :- 1. 6-3-652, सोमाजीगडा, हैद्राबाद, ..)
हैद्राबाद – 500 082. ..)
..)
पत्ता :- 2. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर, ..)
पुणे – 5. ..).. जाबदार
*******************************************************************
// निशाणी 1 वरील आदेश //
प्रस्तूतचे प्रकरण सन 2005 मध्ये दाखल झालेले आहे. सदरचा तक्रार अर्ज तक्रारदारांनी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे दाखल केला होता तेव्हा त्यास पीडीएफ/121/2005 असा नोंदणीकृत क्रमांक देण्यात आला होता. मा.राज्य आयोग, मुंबई यांचे आदेशान्वये सदरचे प्रकरण अतिरिक्त पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच येथे वर्ग केल्यानंतर सदरचा तक्रार अर्ज एपीडीएफ/102/2008 असा नोंदविण्यात आला आहे.
प्रस्तूत प्रकरणातील तक्रारदार व जाबदारांचे दरम्यान तडजोड झालेली असून या तडजोडीचा मसुदा त्यांनी निशाणी 16 अन्वये मंचापुढे दाखल केला आहे. तडजोडीच्या मसुदयाप्रमाणे पूर्तता झालेली असल्यामुळे सदरहू प्रकरण निकाली करण्यात येत आहे.
(श्रीमती. सुजाता पाटणकर) (श्रीमती. प्रणाली सावंत)
सदस्या अध्यक्षा
अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे अतिरिक्त पुणे जिल्हा मंच, पुणे
पुणे.
दिनांक – 21/11/2011