Maharashtra

Nagpur

CC/11/54

Hiteshchandra Tekchandani - Complainant(s)

Versus

M/s. Map Infrastructure Through, Shri Anil Mangilal Jain, Partner - Opp.Party(s)

Adv. D.P. Lalwani

20 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/54
 
1. Hiteshchandra Tekchandani
1/B, Kohad Bhawan, Opp. Batukbhai Jewellers, Khare Town,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Map Infrastructure Through, Shri Anil Mangilal Jain, Partner
104, Wardhman Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Prakash Vitthalrao Ikhankar
49/A, Hill Road, Gokulpeth
Nagpur
Maharashtra
3. Prosper Real Estate Management Group
C\o.- Shri Mukesh Chadrashekhar Kumaran, Partner, 76, Hill Road, Ramnagar,
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. D.P. Lalwani, Advocate for the Complainant 1
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
 
                          -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 20/03/2012)
 
 
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दि.02.02.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांच्‍या खसरा क्र.66/ए व 66/बी, प.ह.नं.38, मौजा बेसा, नागपूर (ग्रामीण) येथील ‘ड्रीम हाईटस’, या योजनेतील तळ मजल्‍यावरील दुकान क्र.जी-6 एकूण क्षेत्रफळ 275 चौ.फूट एकूण रु.6,05,044/- एवढयात खरेदी करण्‍यांचा गैरअर्जदारांशी दि.03.11.2007 रोजी करार केला होता. सदरची रक्‍कम बांधकामाचे टप्‍प्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना अदा करावयाची असे उभय पक्षांत ठरले होते. सदर रकमेपैकी तक्रारकर्त्‍याने रु.1,41,261/- एवढी रक्‍कम धनादेशांव्‍दारे दि.12.11.2007 रोजी तक्रारकर्त्‍यास अदा केले त्‍याबद्दलची पावती देखिल गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास दिली. सदर करारानुसार 15 महिन्‍यांचे आंत सदर दुकानाचे विक्रीपत्र करुन देण्‍याचे उभय पक्षांमधे ठरले होते, परंतु गैरअर्जदारांनी ठरल्‍याप्रमाणे प्रस्‍तावित इमारतीचे बांधकाम सुरु केले नाही. त्‍यामुळे गैरअर्जदारांना बांधकाम पूर्ण करण्‍यांस व विहीत मुदतीत रक्‍कम स्विकृत करण्‍याची विनंती केली, परंतु गैरअर्जदारांनी नियोजीत बांधकामावर ठरलेला खर्च केला नाही व कराराच्‍या अटी व शर्तींचे उल्‍लंघन करुन केवळ तक्रारकर्त्‍याकडून रक्‍कम घेऊन फसवणूक केली. तक्रारकर्त्‍याने वारंवार विनंती करुनही गैरअर्जदारांनी कुठलीही कारवाई केली नाही, ही त्‍यांचे सेवेतील कमतरता असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
 
3.          तक्रारकर्त्‍यानी प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र. 3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात दस्‍तावेज क्र.1 ते 3 च्‍या छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या आहेत.
4.          गैरअर्जदारांना प्रस्‍तुत प्रकरणात नोटीस बजावला असता गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना पाठविलेल्‍या नोटीसचा रिपोर्ट “Delivered”, म्‍हणून प्रकरणात दाखल आहे. गैरअर्जदार क्र.2 व3 यांचा पुकारा केला असता ते गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने दि.15.09.2011 रोजी पारित केला. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांना पाठविलेल्‍या नोटीसची पोच प्रकरणात दाखल असुन त्‍यांचा पुकारा केला असता ते ही गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दचे प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने दि.18.10.2011 रोजी पारित केला. तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व तक्रारकर्त्‍याने वकीलामार्फत केलेल्‍या युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
                - // नि ष्‍क र्ष // -
 
 
5.          सदर प्रकरणातील एकंदर वस्‍तुस्थिती पाहता निर्वीवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांचे खसरा क्र.66/ए व 66/बी, प.ह.नं.38, मौजा बेसा, नागपूर (ग्रामीण) येथील ‘ड्रीम हाईटस’, या योजनेतील तळ मजल्‍यावरील दुकान क्र.जी-6 एकूण क्षेत्रफळ 275 चौ.फूट एकूण रु.6,05,044/- एवढयात खरेदी करण्‍यांचा गैरअर्जदारांशी दि.03.11.2007 रोजी करार केला होता. तसेच तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांवरुन असेही दिसुन येते की, तक्रारकर्त्‍याने दि.12.11.2007 रोजी अनामत रक्‍कम म्‍हणून तक्रारकर्त्‍याने रु.1,41,261/- अदा केली होती. तक्रारकर्त्‍याचे शपथपत्रावरील कथनामधे असे नमुद केलेले आहे की, गैरअर्जदारांनी सदरचे बांधकाम विहीत मुदतीत ठरल्‍याप्रमाणे पूर्ण केलेले नाही व तक्रारकर्त्‍यास सदर दुकानाचे विक्रीपत्र करुन दिले नाही, गैरअर्जदारांची सदरची कृति ही सेवेतील कमतरता आहे. तसेच गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोडून काढले नाही किंवा कुठलाही पुरावा सादर केला नाही. दाखल दस्‍तावेजांवरुन असेही दिसुन येते की, तक्रारकर्त्‍याने मोबदला रकमेपैकी अनामत रक्‍कम म्‍हणून दि.12.11.2007 रोजी रु.1,41,261/- अदा केले होते व त्‍यानंतर कुठलीही रक्‍कम गैरअर्जदारांना अदा केलेली दिसुन येत नाही.
6.          वरील सर्व बाबी लक्षात घेता व प्रकरणातील एकंदरीत वस्‍तुस्थिती पाहता तक्रारकर्त्‍याची सदर दुकानाचे विक्रीपत्र करुन देण्‍याची मागणी या मंचास मान्‍य करता येणार नाही. परंतु तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना दिलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यांस तो पात्र आहे, असे या मंचाचे मत आहे.
            सबब हे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडून  दुकानापोटी घेतलेली रक्‍कम रु.1,41,261/- दि.11.11.2007 पासुन रक्‍कम अदा       होईपर्यंत द.सा.द.शे.12% व्‍याजासह परत करावी.
3.    गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास       झालेल्‍या मानसिक शारीरिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी     रु.2,000/- अदा करावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी आदेशाची प्रत       मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्‍यथा पुढील  कालावधीकरीता आदेश क्र.2 मधील रकमेवर द.सा.द.शे.15% व्‍याज देय राहील.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.