तक्रार क्रमांक – 17/2009 तक्रार दाखल दिनांक – 0/0/200 निकालपञ दिनांक – 11/03/2010 कालावधी - 00 वर्ष 0महिने 00दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर मिलींद जीतेंद्र पाठक 704/3, मानस आनंद अर्पाटमेंट, गाव कविसर डोंगरी पाडा, घोडबंदर रोड, ठाणे(पश्चिम) .. तक्रारदार विरूध्द मे. मानस एन्टरप्रायजेस, 403, नवरंग शॅपिंग आर्केड, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (पश्चिम) .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. भावना पिसाळ - प्र. अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल श्री. एस.एस.पालकयी वि.प तर्फे वकिल श्री.आर.डी.रशिनकर एकतर्फा आदेश (पारित दिः 11/03/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार मिलिंद पाठक यांनी मे.मानस एन्टरप्रायजेस श्री.मुकेश चावला यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडुन सदनिकेमधील गळतीच्या दुरुस्तीचा खर्च किंवा तत्सम दुरुस्ती करुन मागितली आहे. तसेच OC, CC व कन्व्हेयन्स व सोसायटी करुन मागितली आहे. ड्रेनेज दुरुस्तीचा खर्च रु.2,665/- मागितले आहे व इतर नुकसान भरपाई व्याजासकट मागितली आहे. 2. तक्रारदार यांनी सदनिका नं.704/3 सुमारे 905 चौ.फु क्षेत्रफळ 7वा मजला मानस आनंद बिल्डींग नं.3, कावेसार गावी डोंगरी पाडा, घोडबंदर रोड येथे विरुध्द पक्षकारा बरोबर दि.03/03/2006 रोजी नोंदणीकृत करारनामा करुन विकत घेतली. सदर सदनिकेचा ताबा दि.20/03/2006 रोजी घेतला. परंतु रहायला गेल्यानंतर सदर सदनिकेमध्ये सिलींग बाथरुम व टॉयलेटच्या भिंती यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाल्याचे निदर्शनास आले. तसेच जमीनीचे टाईल व भिंतीचे प्लॉस्टरींग निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. दि.20/11/2008 रोजी शेवटी सिव्हिल इंजिनियर श्री.पाटसकर यांचा आर्किटेक्ट तर्फे दुरूस्तीचे एस्टीमेट काढले ते सुमारे रु.42,000/- चे निघाले विरुध्द पक्षकार यांना कळवुनही ते सदर दरुस्ती करण्यास किंवा दुरुस्तीचा खर्च करण्यास तयार नाहीत. .. 2 .. 3. तक्रारदार यांनी पाण्याचे व एम.एस.ई.बी चार्जेस रु.23,750/- आजपर्यंत भरले आहे. विरुध्द पक्षकार यांनी आजपर्यंत सोसायटी बनवुन दिलेली नाही व विजेचे मिटर आजही विरुध्द पक्षकार यांच्याच नावावर आहे. विरुध्द पक्षकार आजही तक्रारदार यांचे कडुन रक्कम रु.34,329/-व रु.8,587/- मेन्टेनंस चार्जे पत्राद्वारे मागतात. वास्तविक विरुध्द पक्षकार यांनी अजुनपर्यंत तक्रारदार यांना OC, CC व कन्व्हेयन्स करुन दिलेले नाही. या सर्व गोष्टींची पुर्तता करण्याची मागणी तक्रारदार यांनी केलेली आहे. 4. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत नि.-8 व दि.09/03/2008 रोजी दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी तक्रारदाराचे म्हणणे खोटे आहे. तक्रारदाराला व प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र पाण्याचे मिटर देता येत नाही तसेच त्यांनी कोणत्याही मेन्टेनंस रक्कमेची मागणी तक्रारदाराकडे केली नाही. व इलेक्ट्रीक मिटर तक्रारदारांच्या नावावर बदलुन देण्यास ते तयार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. OC देण्यास विरुध्द पक्षकार तयार आहेत परंतु सदर इमारतीची जागा जंगल खात्यात येत होती व आता ती रेव्हेन्यु मध्ये करण्यात आल्यामुळे मुनीसिपल कॅरर्पोरेशनच्या कायदेशीर पुर्ततेसाठी विलंब झाला आहे. तक्रारदारांच्या सदनिकेमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाल्याबद्दल तत्सम पुरावा किंवा नोद विरुध्द पक्षकाराकडे नाही. तक्रारदार यांनी रु.2,665/-रक्कम खर्चुन ड्रेनेजचा वास येऊ नये म्हणुन लाकडी व गॅल्वनाईज शिट टाकणे म्युनीसीपालीटी नियमांच्या विरुध्द आहे, बेकायदेशीर आहे. म्हणुन सदर रक्कम देण्यास विरुध्द पक्षकार तयार नाहीत. 5. उभय पक्षकारांची शपथपत्र, पुरावाजन्या कागदपत्रे लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पळताडुन पाहिले व पुढील प्रमाणे एकमेव प्रश्न मंचासमोर उपस्थित होतो. विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी आढळतात का? या प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारदारांने सदर सदनिकेचा ताबा घेतल्यानंतरही विरुध्द पक्षकार यांनी सोसायटी बनवुन दिलेली नाही तसेच OC, CC, कन्व्हेयन्स करुन दिलेले नाही. विरुध्द पक्षकार हे कायद्याने यासर्व गोष्टींची पुर्तता करण्यास बांधिल आहे परंतु त्या न केल्यामुळे त्यांच्या सेवेत त्रृटी आढळतात व तोपर्यंत तक्रारदार यांच्या सदनिकेमध्ये जि गळती सुरु आहे व निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे. त्या सर्व गोष्टी दुरुस्त करण्यास विरुध्द पक्षकार बांधील आहेत. तसेच पाण्याचा टॅक्स व मेन्टेनन्स चार्जे व त्याच्या संबंधात हिशोब देण्यास विरुध्द पक्षकार जबाबदार आहेत. विरुध्द पक्षकारांनी स्वतःच्या नावे असलेले इलेक्ट्रीक मिटर तक्रारदाराच्या नावे बदलुन दिले पाहिजे असे या मंचाचे मत आहे. त्यामुळे हे मंच पुढील प्रमाणे अंतीम आदेश पारित करित आहेत.
.. 3 .. अंतीम आदेश
1.तक्रार क्र. 17/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी या तक्रारीचा खर्च रु.2,000/-(रु. दोन हजर फक्त) तक्रारदार यांस द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदार यांच्या सदनिकेची आर्किटेक्टचा रिपोर्ट घेऊन सिव्हील इंजिनियरच्या देखरेखीखाली निष्णात गवंडी वापरुन सदनिकेचे सिलींग, बाथरुम टाईल्स, प्लास्टरिंग मध्ये असलेले तढे, भेगा यांची दुरुस्ती करुन यांची गळती थांबवुन द्यावी. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास सोसायटी बनवुन OC, CC, व कन्व्हेयन्स करुन द्यावे. तोपर्यंतचे पाण्याचे चार्जेस व टॅक्स विरुध्द पक्षकारांने भरावा तसेच इलेक्ट्रीक मिटर तक्रारदारांच्या नावे करुन द्यावे व या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्यात करावे. 4.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक त्रास व नुकसान भरपाई पोटी रु.5,000/-/-(रु. पाच हजार फक्त) द्यावे. 5.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 11/03/2010 ठिकान - ठाणे
(सौ.भावना पिसाळ ) (श्री.पी.एन.शिरसाट ) प्र.अध्यक्षा सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|