तक्रार क्रमांक – 480/2008 तक्रार दाखल दिनांक – 10/11/2008 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी - 01 वर्ष 05 महिना 07 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्री. ज्ञानप्रकाश रामाशंकर श्रीवास्तव रा. रुम नं.1162, दिघा, नवी मुंबई. जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द मे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी डिस्ट्री. कं.लि.,
एरोली डिव्हिजन, एरोली नवी मुंबई- 400708 समंस साठीचा पत्ता- कार्यकारी अभियंता, कॉमर्स वाशी डिव्हिजन, नवी मुंबई. .. विरुध्दपक्ष समक्ष - सौ. शशिकला श. पाटील – अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल श्री. एस.एस.शिवशरन वि.प तर्फे वकिल श्री.सुचीता केतकर एकतर्फा आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. प्र. अध्यक्षा सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री. ज्ञानप्रकाश श्रीवास्तव यांनी इलेक्ट्रीक बोर्ड M.S.C.D.C यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकार यांनी 2005 पासून तक्रारदारांच्या दुकानाचा इलेक्ट्रीक सप्लाय कापल्यामुळे त्यांच्या दुकानाचा जो तोटा सहन करावा लागला त्याची नुकसान भरपाई रु.15,00,000/- इतकी मागणी केली आहे.
2. तक्रारकर्ता यांचा मीटर नं.8007131558 व क्रन्झ्युमर नं. 000091500788 ऐरोली रुम नं.2290, विष्णुनगर दीघा नवी मुंबई येथे आहे दि.27/11/1996 रोजी विरुध्द पक्षकार यांच्या ज्युनियर सब इंजिनियर यांनी मीटर faulty म्हणुन ते बदलुन नवीन मिटर लावले होते कारण तेव्हाही जादा बील आले होते
.. 2 .. 3. दि.27/03/1997 रोजी ज्युनियर इंजिनियर M.S.C.D.C यांच्या रिपोर्टनुसार तक्रारकर्ता यांच्या वापर 75 units प्रती महीना दर्शवला आहे. तरीसुध्दा प्रत्यक्षात तक्रारकर्ता यांना 198 units प्रमाणेच विरुध्द पक्षकार यांनी बील दिले आहे. दि.22/01/2002 रोजी तक्रारकर्ता यांना रु.50,890/- इतके बील पाठवले वास्तवीक तक्रारकर्ता यांच्या कडे 2 टयुबलाईट, 1 फ्रीज व 1 फॅन एवढेच इलेक्ट्रीकवर चालणारी उपकरणे असतांना इतके जादा बील आल्याबद्दल सिव्हील कोर्टाने सांगितल्याप्रमाणे 20% बील भरण्यास तक्रारकर्ता तयार झाले. तरीही मार्च 2005 मध्ये पुन्हा विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांच्या या औषधाच्या दुकानाचा इलेक्ट्रीक सप्लाय खंडित केला. त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये औषधाचा माल कमी किंमतीत विकायला लागल्यामुळे तक्रारकर्ता यांचा आर्थिक तोटा होऊन आर्थिक बोजा पडल्यामुळे त्यांची नुकसान भरपाई तक्रारकर्ता हे मागत आहेत.
4. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.12/01/2009 रोजी दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी 1997 मध्ये नवीन मीटर लावले होते व जानेवारी 2002 मध्ये रु.50,890/- चे बील, आगोदरच्या बीलाची थकबाकी, थेफ्ट चार्चेस व सरचार्चेस असे मिळुन पाठवले आहे असे विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यातील आरसीएस 56/2002 C.B.D कोर्टात वाशी येथे तक्रार अर्ज दाखल आहेत. तसेच विरुध्द पक्षकार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्ता यांनी नियमित बील भरणा केला नसल्यामुळे सप्टेंबर 2005 पासून विरुध्द पक्षकार यांनी त्यांचा इलेक्ट्रीक सप्लाय पुन्हा खंडित केला आहे.
5. उभयपक्षकारांची शपथपत्रे, पुरावा, कागदपत्रे विरुध्द पक्षकार यांची लेखी कैफीयत व तक्रारदाराची लेखी युक्तीवाद तपासुन पाहीले व मंचापढे एकमेव प्रश्न उपस्थित झाला. प्र.तक्रारकर्ता हे त्यांच्या मागणी नुसार परंतु वाजवी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन पुढील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांचा विज पुरवठा 2005 सालापासुन खंडित केला त्यांच्या 2004 व 2002 च्या वादीत बीलापैकी थेफ्ट बील रु.10,789/- व सरचाजेस दाखवलेले दिसतात सिव्हिल कोर्ट निर्णयानुसार व थेफ्ट स्पेश्ाल कोर्टात सिध्द होईल त्याप्रमाणे विरुध्द पक्षकार यांनी लावायला हवे होते. तसे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही. थेफ्ट सिध्द न झाल्यास ते चार्चेस विरुध्द .. 3 .. पक्षकार यांना आकारता येणार नाहीत. विरुध्द पक्षकार यांनी 2005 पासून इलेक्ट्रीकसीटी खंडीत केलेली आहे त्यामुळे सेवा दिलीच नसल्याने त्याबद्दलचा मोबदला विरुध्द पक्षकार घेऊ शकत नाहीत असे या मंचाचे मत आहे शिवाय विरुध्द पक्षकार यांच्या ज्युनियर सब इंजिनियरच्या रिपोर्ट प्रमाणे दरमहा 75 units तक्रारकर्ता यांच्या दुकानातील विजेचे उपकरणाचे वापरात असतात असे निदर्शनास येते विरुध्द पक्षकार त्यांच्या (faulty) दोषी मीटरने पाठवलेल अवाजवी बील वसुल करण्यासाठी सतत 3 वर्षे बीज पुरवठा खंडीत करणे तक्रारकर्ता यांच्या औषधाच्या मान्यताप्राप्त दुकानाच्या धंद्याचा, औषधांना नाशवंत निरुपयोगी करण्याचे कारण ठरु शकतात असे या मंचाचे मत आहे. परंतु तक्रारकर्ता यांनी मागणी केलेल्या नुकसान भरपाईचा ठोस पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही परंतु औषधाच्या स्टॉकचे नुकसान झाले होते म्हणुन हे मंच पुढील निर्णय देत आहे. अंतीम आदेश
1.तक्रार क्र.480/2008 हि अंशतः मंजुर करण्यात येत असुन या तक्रारीचा खर्च रु.1,000/- (रु.एक हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास 3 वर्ष वीज पुरवठा खंडीत केल्याने मान्यताप्राप्त दुकानातील औषधाच नुकसान झाल्याबद्दल सदर तक्रार दाखल तारखेपासुन दरवर्षी रु.5,000/-(रु. पाच हजार फक्त) प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी या आदेशाचे पालन ह्या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत करावे. तसेच तक्रारदाराने वीजपुरवठा पुनश्च सुरु झाल्यावर दरमहा चालु बील नियमीत भरावे. विरुध्द पक्षकार यांनी नवीन व सुधारीत, वाजवी बीलप्रमाणे चालु दरमहा बील स्वीकारावे. 3 .उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 17/04/2010 ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
D:\judg.aft.02-06-08\Pisal Madam
|