Maharashtra

Akola

CC/13/128

Ashok Gopalrao Pohare - Complainant(s)

Versus

Ms. Mahalakshami Seeds & Proccesing Plant through Proprietor - Opp.Party(s)

Rajiv Patil

31 Aug 2015

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum Akola ( Maharashtra )
District Consumer Disputes Redressal Forum Akola ( M.S.)
 
Complaint Case No. CC/13/128
 
1. Ashok Gopalrao Pohare
R/o. Nishant Tower, Gandhi Rd.Akola
Akola
M S
...........Complainant(s)
Versus
1. Ms. Mahalakshami Seeds & Proccesing Plant through Proprietor
MIDC-IV, Akola
Akola
M S
2. Ms. National Seeds Corporation Ltd.
through Area Manager,Tapdiya Nagar, Akola
Akola
M S
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. S.M. Untawale PRESIDENT
 HON'ABLE MRS. Bharati Ketkar MEMBER
 HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

::: आ दे श प त्र  :::

मा. अध्‍यक्षा, सौ. एस.एम. उंटवाले यांनी निकाल कथन केला :-

     तक्रारकर्ता हा शेतकरी असून मागील बरेच वर्षापासून शेतीपासून उत्‍पन्‍न काढीत आहे.  तक्रारकर्त्‍याचे मालकीची मौजे उरळ बु. ता. बाळापूर, जि. अकोला येथे खालील वर्णनाची शेत जमीन आहे.

अ.क्र.

भुमापन क्रमांक /गट क्रमांक

क्षेत्रफळ

आकार

हिस्‍सा

1

126

4 हे. 42 आर

28.75

 पूर्ण

2

128

4 हे. 36 आर

28.00

 

 पूर्ण

3   

133

4 हे. 36 आर

28.00

 पूर्ण

4

125

1 हे. 06 आर

06.90

 पूर्ण

5

178

1 हे. 40 आर

08.50

 पूर्ण

6

179

1 हे. 65 आर

09.00

 पूर्ण

    विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 हे बियाणे विक्रीचा व्‍यवसाय करीत असून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 मे. नॅशनल सिडस कॉर्पोरेशन लिमिटेड, तापडिया नगर, अकोला यांनी निर्मित केलेले सोयाबिन बियाण्‍यांवर प्रक्रिया करुन विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 विक्रीचा व्‍यवसाय करतात.  तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वरील वर्णनाच्‍या शेत जमिनीकरिता खरीप हंगाम 2011 मध्‍ये योग्‍य प्रकारे मशागत व खते देवून त्‍यांच्‍या एकूण 40 एकर शेतीमध्‍ये सोयाबीन जे.एस. 335 या वानाची लागवड करण्‍याकरिता विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून दिनांक 15-06-2011 रोजी बिल क्रमांक 329 अन्‍वये 40 बॅग सोयाबीन जे.एस. 335 लॉट क्रमांक 9215 हया वाणाची रक्‍कम ₹ 28,200/- मध्‍ये खरेदी केली.  तक्रारकर्त्‍याने सदरहू बियाणे त्‍यांचेवरील शेतामध्‍ये पेरणी केली असता सदरची बियाण्‍याची उगवण शक्‍ती नसल्‍याने व ते पाणी खाल्‍लेले असल्‍याने व पेरणी योग्‍य नसल्‍याने, बाद झालेले असल्‍याने त्‍यांची कोणत्‍याही प्रकारे उगवण झाली नाही.  तक्रारकर्त्‍याने सदरचे शेतांमध्‍ये काडीकचरा वेचून नागरणी, पेरणीपूर्वी वाई, डवरणी, वखरणी, मजुरी, शेणखत, रासायनिक खत, पेरणी, फवारणी इत्‍यादीवर खालीलप्रमाणे प्रतिएकरी खर्च केला.  

अ.क्र.

कामाचे स्‍वरुप

रक्‍कम

1       

दिनांक 04-04-011 ते 07-04-2011 पर्यत ट्रॅक्‍टरने शेतात शेत नेणे व ट्रॅक्‍टरमधून खाली करणे व खाली करुन मजुरांकडून मोडणे मजुरीसह व ट्रॉली भाडे प्रति ट्रॉली प्रमाणे 60 ट्रॉलीचे

 

 

₹ 27,000/-

2

दिनांक 15-04-2011 ते 21-04-2011 पर्यंत तिनफळ नागरटी प्रति एकर ₹ 700/- प्रमाणे 40 एकराचे

 

₹  28,000/-

3

दिनांक 22-05-2011 ते 26-05-2011 पर्यंत तिन पासवाई प्रति एकर ₹ 350/- प्रमाणे 40 एकराचे

 

₹ 14,000/-

4

दिनांक 15-06-2011 चाळीस बॅग सोयाबीन व 40 बॅग डी.ए.पी. खत अकोला ते उरळ आणण्‍याकरिता गाडी भाडे प्रति बॅग ₹  30/- प्रमाणे भरणे व उतारणे हमाली सह 80 बॅगचे 

 

 

₹  2400/-

5

दिनांक 26-06-2011 ते 01-07-2011 पर्यंत 40 एकर मधील काळया फन काटया वेचणी करुन उचलून टाकणे प्रति एकर ₹  490/- प्रमाणे

 

 

₹  19,600/-

6

दिनांक 03-07-2011 रोजीचे व्‍हाऊचर प्रमाणे पाऊस पडल्‍यानंतर 40 एकरातील पट्टापास करणे ₹ 250/- प्रति एकर प्रमाणे

 

 

₹ 10,000/-

7

दिनांक 07-07-2011 ते 09-07-2011 पर्यंत सोयाबीन पेरणीसाठी भाडयाचे बैलजोडया व मजूर, तिफनकरी, उनारे, खतउनारे व मजुरीसह ₹ 600/- प्रतिएकर प्रमाणे 40 एकरचे     

 

 

 

₹  24,000/-

8

दिनांक 02-08-2011 ते 05-08-2011 पर्यंत जिल्‍हास्‍तरीय चौकशी  समितीचे शेत पाहणी अहवाल मिळाल्‍यानंतर सोयाबीन न उगवलेले शेत रब्‍बी पिकाकरिता तयार करण्‍याकरिता पंजीपास मारणे प्रतिएकर ₹ 350/- प्रमाणे 40 एकराचे

 

 

 

 

₹  14,000/-

9

दिनांक 08-08-2011 ते 11-08-2011 पर्यंत सोयाबीन न उगवलेले शेत रब्‍बी पिकाकरिता शेत तयार करण्‍याकरिता पट्टापास मारणे

 

₹  10,000/-

10

संजय कृषी सेवा केंद्र अकोला येथून बिल क्रमांक 10839 ने दिनांक 16-05-2011 रोजी डी.ए.पी. खत 40 बॅग ₹ 522/- प्रती बॅग प्रमाणे खरेदी 

 

 

  ₹    20,880/-

11

महालक्ष्‍मी सिडस अन्‍ड प्रोसेडिंग प्‍लॅन्‍ट, अकोला कडून बिल क्रमांक 329 अन्‍वये दिनांक 15-06-2011 रोजी एनएससी सोयाबीन बियाणे 40 बॅग 705/- पमाणे खरेदी

 

 

 ₹ 28,200/-

12

शेतीच्‍या मशागती व पेरणीकरिता व पेरणीनंतर सोयाबीन चे मोडणीपर्यंत आलेला इतर खर्च               

 

 ₹ 84,920/-

एकूण रक्‍कम

₹2,83,000/-

 

      असा एकूण ₹ 2,83,000/- खर्च केला.  चांगला पाऊस व योग्‍यप्रकारे मशागत होऊनही तक्रारकर्त्‍याचे शेतामध्‍ये सोयाबीन वानाची उगवण झाली नाही.

      तक्रारकर्त्‍याने दिनांक 20-07-2011 रोजी जिल्‍हाधिकारी, अकोला तसेच जिल्‍हा कृषी अधिकारी, जिल्‍हा परिषद, अकोला, तहसिलदार बाळापूर, तालुका कृषी अधिकारी, बाळापूर, कृषी विकास अधिकारी पंचायत समिती बाळापूर यांच्‍याकडे रितसर लेखी तक्रार करुन झालेल्‍या पिकाची नुकसानीची पाहणी करण्‍याबद्दल विनंती केली.   त्‍याप्रमाणे जिल्‍हास्‍तरीय चौकशी समितीने विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चे प्रतिनिधीचे उपस्थितीमध्‍ये तक्रारकर्त्‍याचे शेतांची दिनांक 25-07-2011 प्रत्‍यक्ष पाहणी करुन त्‍यांचे पत्र क्रमांक 1855/11, दिनांक 05-08-2011 अन्‍वये चौकशी अहवाल देवून मे. नॅशनल सिडस कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे सोयाबीन जेएस-335 या वाणाचे नोव्‍हे. 10-13-3005-9215 या लॉटचे बियाणे सदोष असल्‍याचे मत दिले.

   तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक असून ग्राहक संरक्षण कायदयान्‍वये ग्राहक या संज्ञेत मोडतो.  विरुध्‍दपक्षाने पूर्णपणे निकृष्‍ट व उगवण क्षमता नसलेले दोषयुक्‍त बियाणे तक्रारकर्त्‍यास विकून त्‍याचे पूर्ण एका वर्षाचे पिकाचे नुकसान केले व येणेप्रमाणे देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये कमतरता व न्‍युनता दर्शवून अनुचित व्‍यापार पध्‍द्तीचा अवलंब केला आहे.  विरुध्‍दपक्षाच्‍या सदर कृत्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास मानसिक, शारिरीक त्रास व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे व त्‍यास पूर्णपणे विरुध्‍दपक्ष हे वैयक्तिकरित्‍या व संयुक्‍तपणे जबाबदार आहे.

       तक्रारकर्त्‍यास सदर बियाण्‍यांचे जर योग्‍य प्रमाणात उत्‍पन्‍न झाले असते तर प्रति एकरी 15 क्विंटल प्रमाणे 40 एकरामध्‍ये 600 क्विंटलचे उत्‍पन्‍न मिळाले असते व सोयाबीन बियाण्‍यांचे ₹ 2,400/- प्रति क्विंटल प्रमाणे भावाने ₹ 14,40,000/- चे उत्‍पन्‍न मिळाले असते.  तसेच सदरचे पिक न आल्‍याने तक्रारकर्त्‍यास झालेला मानसिक, शारिरीक त्रास यापोटी रु. 1,00,000/- असे एकूण ₹ 18,23,000/-  व त्‍यावर दर साल दर शेकडा 24 टक्‍के प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपर्यंत व्‍याजाची मागणी केली. तसेच सदर नोटीस च्‍या खर्चापोटी ₹ 3,000/- मागणी केली.

    तक्रारकर्त्‍याने या संदर्भात मा. जिल्‍हा ग्राहक मंच, अकोला यांच्‍याकडे दिनांक 28-02-2012 रोजी तक्रार क्रमांक 37/2012 दाखल केली होती.  मात्र त्‍या तक्रारीसोबत 2011-12 या वर्षाचे 7-12 चे नमुने जोडलेले नव्‍हते, कारण ते उपलब्‍ध नव्‍हते.  मा. ग्राहक मंचाने दिनांक 12-06-12 रोजी या प्रकरणात अंतिम आदेश पारित करुन तक्रारकर्त्‍याचा अर्ज मंजूर करण्‍यात आला व पुनश्‍च नवीन प्रकरण दाखल करण्‍याची मुभा देऊन तक्रार क्र. 37/2002 ही नस्‍तीबध्‍द् करण्‍यात आली.  यानंतर तक्रारकर्त्‍याने वर्ष 2011-12 चे 7-12 चे उतारे प्राप्‍त करुन घेतलेले आहेत, जे या प्रकरणासोबत जोडण्‍यात येत आहेत.

     तक्रारकर्त्‍याने दिनांक 28-02-2012 रोजी जुनी तक्रार क्रमांक 37/2012 दाखल केल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांच्‍याकडून दिनांक 20-04-2012 रोजी पत्र प्राप्‍त झाले होते ज्‍यानुसार त्‍यांनी या प्रकरणाबाबत तक्रारकर्त्‍याकडून काही माहिती मागविली नाही.  तक्रारकर्त्‍याने संबंधित माहिती विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांना कळविली होती. त्‍यानंतर देखील 18-05-2012 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी तक्रारकर्त्‍याकडून पुन्‍हा काही माहितीची मागणी केली होती.  तक्रारकर्त्‍याने या मागणीची देखील पूर्तता केली होती.  त्‍यानंतर देखील विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी वेळोवेळी तक्रारकर्त्‍याकडून इतर माहिती मागितली होती, ज्‍याची पूर्तता तक्रारकर्त्‍याने केलेली आहे.  मात्र तरी देखील 20-12-12 रोजी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी त्‍यांच्‍या शेवटच्‍या पत्रानुसार तक्रारकर्त्‍याची नुकसान भरपाई मागणी ही मान्‍य करता येत नाही असे तक्रारकर्त्‍याला कळविल्‍यामुळे तक्रारकर्ता पुन्‍हा ही तक्रार दाखल करीत आहे.

     सबब, तक्रारकर्त्‍याची प्रार्थना की, 1) तक्रारकर्त्‍याची तक्रार पूर्णपणे मंजूर करण्‍यात यावी व सदरहू तक्रारीस विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या जबाबदार धरण्‍यात यावे. 2) सोयाबीन बियाणे खरेदी व शेताची मशागत, मजुरी, खत पेरणीकरिता व त्‍याची उगवण न झाल्‍याने सदरचे वाण मोडून काढण्‍याकरिता आलेला संपूर्ण खर्च ₹ 2,83,000/- विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा. 3) तक्रारकर्त्‍यास सदर पिक न उगवल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानासाठी रु. 14,40,000/- विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा.  4) तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रास यापोटी ₹ 1,00,000/-  विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍यास देण्‍याचा आदेश देण्‍यात यावा.  5) वरील संपूर्ण रकमेवर बियाणे खरेदी दिनांकापासून म्‍हणजे दिनांक 15-06-2011 पासून प्रत्‍यक्ष रक्‍कम देईपर्यंत दर साल दर शेकडा 24 टक्‍के व्‍याज देण्‍याचा आदेश विरुध्‍दपक्षास देण्‍यात यावा.  6) तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाला पाठविलेल्‍या नोटीसच्‍या खर्चापोटी  ₹ 3,000/- देण्‍याचा आदेश विरुध्‍दपक्षाला देण्‍यात यावा.   

      सदर तक्रार शपथेवर दाखल केली असून त्‍यासोबत एकंदर 30 दस्‍तऐवज पुरावा म्‍हणून दाखल केलेले आहेत.

विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 चा लेखी जवाब :-

     सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 यांनी  लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्‍हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, तक्रार ज्‍या पध्‍द्तीने दाखल केलेली आहे, ती कायदयाने चालू शकत नसल्‍याकारणाने खर्च व अधिकचा खर्च बसवून खारीज करण्‍यात यावी.  हे म्‍हणणे नाकबूल आहे की, तक्रारकर्ता हा शेतकरी असून शेतीपासून उत्‍पन्‍न काढीत आहे.  हया विरुध्‍दपक्षाच्‍या माहितीप्रमाणे तक्रारकर्ता हा अकोला येथील मोठा व्‍यापारी व व्‍यावसायिक आहे व त्‍याचे मुख्‍य उत्‍पन्‍नाचे साधन व्‍यवसायाद्वारे आहे.  हे म्‍हणणे माहितीअभावी नाकबूल की, तक्रारकर्त्‍याची मालकीची या परिच्‍छेदामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे शेत जमीन आहे.  हे म्‍हणणे ज्‍या पध्‍द्तीने लिहिले आहे ते नाकबूल की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 बियाणे विक्रीचा व्‍यवसाय करीत असून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी निर्मित केलेल्‍या सोयाबीन बियाण्‍यावर प्रक्रिया करुन विक्रीचा व्‍यवसाय करतात.  हे म्‍हणणे नाकबूल की, तक्रारकर्त्‍याने खरीप हंगाम 2011 मध्‍ये योग्‍यप्रकारे मशागत व खत देवून सोयाबीन वाणाची लागवण करण्‍याकरिता विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून या परिच्‍छेदामध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे वाणाची खरेदी केली.  या परिच्‍छेदातील एकूण एक कामाचे स्‍वरुप, व एकूण रक्‍कम ₹ 2,83,000/- ज्‍या पध्‍द्तीने नमूद केले ते स्‍पष्‍टपणे नाकबूल आहे.  हे म्‍हणणे स्‍पष्‍टपणे नाकबूल की, चांगला पाऊस व योग्‍य प्रकारे मशागत होवूनही तक्रारकर्त्‍याच्‍या शेतामध्‍ये सोयाबीन वाणाची उगवण झाली नाही. कोणतीही बाब कबूल न करता तक्रारकर्त्‍याने आवश्‍यक ती निगा, देखरेदख, कास्‍तकारी इत्‍यादी न केल्‍याने या विरुध्‍दपक्षास जबाबदार धरल्‍या जाऊ शकत नाही.

    हे म्‍हणणे स्‍पष्‍टपणे नाकबूल आहे की, तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षाचा ग्राहक या संज्ञेत मोडतो.  हे म्‍हणणे नाकबूल आहे की, विरुध्‍दपक्षाने पूर्णपणे निकृष्‍ठ व उगवण क्षमता नसलेले दोषयुक्‍त बियाणे तक्रारकर्त्‍यास विकून त्‍याचे पूर्ण एका वर्षाचे पिकाचे नुकसान केले व येणेप्रमाणे देण्‍यात येणा-या सेवेमध्‍ये कमतरता व न्‍युनता दर्शवून अनुचित व्‍यापार पध्‍द्तीचा अवलंब केला आहे.  कोणतीही बाब कबूल न करता विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 नम्रपणे नमूद करतात की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ही नामाकिंत बियाणे कपंनी असून त्‍यांचे नाव इत्‍यादी बाबी विचारात घेऊन तक्रारकर्त्‍याने बियाणे विकत घेतले. बियाणे योग्‍य असल्‍याचे प्रमाणित झाले होते. ज्‍या परिस्थितीमध्‍ये बियाणे मिळाले त्‍याच परिस्थितीमध्‍ये ते विकण्‍यात आले.  सबब, जर काही कारणांस्‍तव कोणतीही रक्‍कम देण्‍याचे आदेश पारित झाले तर तशी रक्‍कम, दाद इत्‍यादी देण्‍यास विरूध्‍दपक्ष क्रमांक 2 पूर्णपणे जबाबदार आहेत. या विरुध्‍दपक्षास त्‍याकरिता कसल्‍याहीप्रकारे जबाबदार धरल्‍या जाऊ शकत नाही.

    कोणतेही बियाणे बाजारात विक्रीकरता पाठविण्‍याअगोदर त्‍याचे पात्रतेबाबत परिक्षण महाराष्‍ट्र राज्‍य बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे होते.  प्रकरणामध्‍ये नमूद बियाण्‍यांचे सुध्‍दा परिक्षण होवून महाराष्‍ट्र राज्‍य बीज प्रमाणीकरण यंत्रणा, अकोला यांनी त्‍यांचे मुक्‍तता अहवाल दिनांक 12-05-11 चे जारी केल्‍यावरच आलेले बियाणे जशाच्‍या तसे विकल्‍या गेले.  सबब, हे सिध्‍द् होते की, बियाणे प्रमाणित होते.  वास्‍तविक हयाच लॉटमधील उर्वरित पुष्‍कळशे बियाणे इतर लोकांना सुध्‍दा विकले.  पण इतर कोणाचीही त्‍या बियाण्‍यांबाबत तक्रार आली नाही. हयावरुन हे स्‍पष्‍ट होते की, बियाण्‍यांमध्‍ये कोणताही दोष नव्‍हता.  संदर्भिय प्रकरणामध्‍ये तक्रारकर्त्‍याने नमूद केलेल्‍या काळामध्‍ये योग्‍य त्‍या प्रमाणात पाऊस आला नव्‍हता. हया कारणाने सुध्‍दा हया विरुध्‍दपक्षास जबाबदार धरता येणार नाही.  वर नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कोणतीही रक्‍कम देण्‍यास किंवा दाद इत्‍यादी देण्‍यास जबाबदार नाही.  कोणत्‍याही हक्‍कास बाधा न येता जर काही कारणांस्‍तव विदयमान मंचाने काही मागणी व दाद मंजूर केली तर ती देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 हे जबाबदार आहेत. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार खर्च व अधिकचा खर्च रक्‍कम ₹ 5,000/- बसवून खारीज करण्‍यात यावी.   

विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा लेखी जवाब :-

    सदर तक्रारीची नोटीस मंचातर्फे मिळाल्‍यानंतर विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी  लेखी जवाब दाखल करुन तक्रारीतील सर्व म्‍हणणे फेटाळले व जवाबात असे नमूद केले आहे की, हे म्‍हणणे नाकबूल आहे की, तक्रारकर्ता हा मागील बरेच वर्षापासून उत्‍पन्‍न काढीत असून त्‍याचे मालकीची मौजे उरळ बु., ता. बाळापूर, जि. अकोला येथे विविध गट क्रमांकाची शेतजमीन आहे.  हे म्‍हणणे नाकबूल आहे की, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 हे बियाणे विक्रीचा व्‍यवसाय करीत असून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 ने निर्मित केलेले सोयाबीन बियाण्‍यांवर प्रक्रिया करुन विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 विक्रीचा व्‍यवसाय करतात.  हे म्‍हणणे नाकबूल आहे की, तक्रारकर्त्‍याने वरील वर्णन केलेल्‍या शेतजमिनीकरिता खरीप हंगाम 2011 मध्‍ये योग्‍यप्रकारे मशागत व खते देवून त्‍यांच्‍या एकूण 40 एकर शेतीमध्‍ये सोयाबीन जेएस-335 या वाणाचे लॉट क्रमांक 9215 बिल क्रमांक 329 अन्‍वये 40 बॅग सोयाबीन रक्‍कम ₹  28,200/- मध्‍ये खरेदी केले. 

    विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 हे नॅशनल सिडस कॉर्पोरेशन लिमिटेड चे कार्यालय आहे.  अकोला येथील एरिया मॅनेजर यांना सर्व बाबींविषयी अवगत करण्‍यात आले व महाराष्‍ट्रातील मुख्‍य कार्यालय पुणे यांनी दिलेल्‍या अधिकारांवरुन एरिया मॅनेजर नॅशनल सिड कॉर्पोरेशन अकोलाचे एरिया मॅनेजर श्री. लायकराम गौतम यांचेमार्फत विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 हे सदर प्रकरणात लेखी जवाब सादर करीत आहेत.

    तक्रारकर्त्‍याने प्रार्थना परिच्‍छेदामध्‍ये केलेली विनंती विरुध्‍दपक्षाला नाकबूल असून ती खारीज करावी.  सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खोटी व बिनबुडाची असल्‍यामुळे ती खर्चासह खारीज करावी.

    सन 1966 च्‍या बियाण्‍याच्‍या कायदयाचे अवलोकन केले असता ब-याचशा बाबी सकृतदर्शनीच लक्षात येण्‍यासारख्‍या आहेत.  बियाण्‍याचा दर्जा किंबहुना दर्जेदार बियाणे शेतक-यांना मिळावे यासाठी सदरहू कायदा तयार करण्‍यात आला आणि संपूर्ण बियाणे निर्मितीच्‍या प्रक्रियेत केंद्र सरकार व राज्‍य सरकार यांच्‍या बियाणे प्रमाणित करणा-या खात्‍याचे नियंत्रण असते किंबहुना त्‍यांच्‍या नियंत्रणाखालीच बियाणे तयार केले जाते व त्‍यास प्रमाणपत्र दिल्‍याशिवाय सदरचे बियाणे बाजारात विक्रीसाठी येवू शकत नाही. सदरच्‍या तक्रारीमध्‍ये बियाणे प्रमाणित करणा-या यंत्रणेस पक्ष बनविले नाही.  सबब, सदरहू अर्ज हा चालू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने केलेले आरोप लक्षात घेता तक्रारकर्त्‍याची तक्रार ही बियाण्‍यांच्‍या निर्मितीशी संबंधित आहे.  त्‍यामुळे बियाण्‍याचा कायदा 1966 नुसार बियाणे निर्मितीच्‍या प्रक्रियेत ज्‍या यंत्रणा कार्यरत आहेत व विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 बियाणे कंपनीने जे बियाणे तयार केलेले आहे, त्‍यामध्‍ये ज्‍या शासकीय यंत्रणेचा सहभाग आहे त्‍या यंत्रणेला पक्ष करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे, त्‍यांना पक्ष न करता सदरची तक्रार चालू शकत नाही, सबब खारीज करण्‍यात यावी.

      जून 2011 मध्‍ये पावसाळयाची सुरुवात उशिरा झाली व नंतर पाऊस आलाच नाही. अवर्षणामुळे कित्‍येक हेक्‍टर जमिनीमध्‍ये केलेल्‍या पेरण्‍या हया दुबार कराव्‍या लागल्‍या.  तक्रारकर्त्‍याची शेती ही कोरडवाहू शेती आहे. मागील वर्षी अवर्षणामुळे बाळापूर तालुका हा दुष्‍काळग्रस्‍त म्‍हणून घोषित करण्‍यात आला आहे.  कुठल्‍याही बियाण्‍यांची उगवण होतांना जमीन कशा प्रकारची आहे, तक्रारकर्त्‍याने केलेली पेरणी ही ट्रॅक्‍टरच्‍या सहाय्यानेच केली असणार, त्‍यामुळे जमिनीत पेरलेले बियाणे हे किती खोलवर पेरल्‍या गेले, एकरी किती किलो बियाण्‍याची पेरणी केली, वरच्‍या पावसावर बियाण्‍याची उगवण अवलंबून असतांना बियाण्‍याच्‍या पेरणीनंतर पाऊस किती प्रमाणात पडला, त्‍यावेळेस तापमान किती होते, वर खताच्‍या मात्रा बियाण्‍यासोबत पेरणी करतांना किती दिल्‍या, शेताची उन्‍हाळी, कास्‍तकारी कशी केली, शेतात तण किती प्रमाणात होते, तणनाशकाच्‍या सोयाबीनच्‍या पेरणीनंतर साधारणत: 3 आठवडयापर्यंत फवारणी करावयास हवी असते ती केल्‍यास उगवण शक्‍तीवर त्‍याचा काय परिणाम होतो हया व इतर बाबी बियाण्‍याच्‍या उगवणीच्‍या मुळाशी जातात.  20 ते 30 टक्‍केच्‍या वर बियाण्‍याची उगवण झाल्‍यानंतर त्‍यासाठी नैसर्गिक बाबी या परिणाम करुन जातात.  त्‍यामुळे बियाण्‍यांची उगवण क्षमताच कमी होती हे म्‍हणणे साफ खोटे आहे. या सर्व बाबींचा विचार करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. 

     तक्रारकर्त्‍याची तक्रार ही एकत्रित कारणांवर तक्रार Joinder of Cause of Action  हयामुळे सुध्‍दा चालू शकत नाही. तक्रारकर्त्‍याने किती खर्च झाला, नंतर किती उत्‍पन्‍न निघाले, बियाण्‍याची पेरणी केव्‍हा केली, या बाबी मुद्दाम टाळल्‍या आहेत. तकारकर्त्‍याचे कुठलेही नुकसान झालेले नाही. गोळा केलेल्‍या दस्‍तऐवजांचा व अहवालांचा गैरफायदा घ्‍यावा या एवढयाच उद्देशाने तक्रारकर्त्‍याने ही खोटी तक्रार सादर केली आहे.  तक्रारकर्त्‍याची तक्रार ही निखालस खोटी आहे, सबब, ती खारीज करण्‍यात यावी.

       तक्रारकर्त्‍याने जे बियाणे विकत घेतले त्‍याच लॉटमधील बियाणे हे अन्‍य शेतक-यांनी सुध्‍दा विकत घेतले.  परंतु, त्‍यांच्‍या अशा प्रकारच्‍या काही तक्रारी नव्‍हत्‍या.  एकंदरीतच तक्रारकर्त्‍याने खोटे पुरावे तयार करुन शेतीतून पिक काढून उत्‍पन्‍न घेण्‍यापेक्षा बियाण्‍याच्‍या कंपनीवरच केस दाखल करुन बियाणेच निकृष्‍ट प्रतीचे आहे असे भासवून बियाण्‍याच्‍या कंपनीकडून पैसे उकळण्‍याचा हा सोपा रस्‍ता निवडलेला आहे.

     एकंदरीतच बियाण्‍याची पेरणी झाल्‍यानंतर उगवण व्‍यवस्थित झाली नाही हे लक्षात आल्‍यावर त्‍वरित फेर पेरणी करता आली असती. जास्‍तीत जास्‍त बियाण्‍याच्‍या किंमतीचे व पेरणीच्‍या खर्चपुर्तीचे तक्रारकर्त्‍याचे नुकसान झाले असते. परंतु, असे काहीही न करता खोटे नाटे पुरावे करुन पुढे नुकसानी उकळावी या भावनेतून सदरहू प्रकरण हे अगोदरपासूनच बनावट असे तयार करण्‍यात आले.  एकंदरीतच तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खोटी, पूर्वनियोजित व खोडसाळपणाची, बनावट व कपोलकल्पित आहे, सबब, ती खर्चासह खारीज करण्‍यात यावी.  

    का र णे  व  नि ष्‍क र्ष

   या प्रकरणातील तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 व 2 चा स्‍वतंत्र लेखी जवाब, उभयपक्षाने दाखल केलेले सर्व दस्‍तऐवज, तक्रारकर्ते यांचे प्रतिउत्‍तर, तक्रारकर्ते व विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांचा लेखी व उभयपक्षांचा तोंडी युक्‍तीवाद, उभयपक्षाने दाखल केलेले न्‍यायनिवाडे यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन खालील निष्‍कर्ष कारणे देऊन नमूद केला तो येणेप्रमाणे.

    उभयपक्षाला मान्‍य असलेली बाब अशी की, तक्रारकर्ते यांनी विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 कडून विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 निर्मित, 40 बॅग सोयाबीन जेएस-335 लॉट क्रमांक 9215 हया वाणाची रक्‍कम ₹ 28,200/- मध्‍ये खरेदी बिलानुसार केली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता ग्राहक आहे, याबद्दल वाद नाही.

    तक्रारकर्ते यांनी असा युक्‍तीवाद केला की, सदर बियाण्‍यांची पेरणी त्‍यांच्‍या 40 एकर शेतामध्‍ये पेरणी योग्‍य शेताचे सर्व काम दाखल दस्‍तांवरील रकमेत करुन घेऊन, खरीप हंगाम 2011 मध्‍ये पेरणी केल्‍यानंतर, त्‍यामध्‍ये योग्‍य ती उगवण शक्‍ती नसल्‍यामुळे सदर सोयाबीन बियाण्‍यांची कोणत्‍याही प्रकारे उगवण झाली नाही याबाबत जिल्‍हा कृषी अधिकारी, बाळापूर कडे रितसर लेखी तक्रार करुन झालेल्‍या पिकाच्‍या नुकसानीची पाहणी करण्‍याबाबत विनंती केली असता त्‍यानुसार जिल्‍हास्‍तरीय चौकशी समितीने, तक्रारकर्त्‍याच्‍या शेताची पाहणी करुन अहवाल दिला, त्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कंपनीचे वरील खरेदी केलेले बियाणे सदोष असल्‍याचे मत दिले, त्‍यामुळे सर्व प्रकारची नुकसान भरपाई प्रार्थनेप्रमाणे मिळावी.  विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 चा दर्जा हा बियाणे विक्रेत्‍याचा आहे.  त्‍यामुळे त्‍याचा बहुतांश युक्‍तीवाद विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 सारखा आहे. 

    विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चा युक्‍तीवाद व दाखल दस्‍त मंचाने तपासले असता असे दिसते की, विरुध्‍दक्ष क्रमांक 2 यांनी सदर वरील बियाणे बिजप्रमाणीकरण यंत्रणेकडून तपासून घेतले होते, त्‍याचा मुक्‍तता अहवाल व बीज विश्‍लेषण रिपोर्ट रेकॉर्डवर दाखल आहे.  त्‍याप्रमाणे वादातील बियाण्‍यांची उगवणशक्‍ती 70 टक्‍के व शुध्‍दता 100 टक्‍के आहे असे त्‍यात नमूद असून सदर बियाणे तपासणीमध्‍ये पास झालेले आहे.  तक्रारकर्ते यांनी रेकॉर्डवर दाखल केलेला जिल्‍हा तक्रार निवारण समिती, अकोला यांचा अहवाल व पंचनामा प्रत यामध्‍ये असे नमूद आहे की, तक्रारकर्ते यांच्‍या शेतक्षेत्रामध्‍ये सरासरी 45 ते 52 टक्‍के उगवण झालेली आहे व सदर लॉटचे बियाणे सदोष असल्‍याचे समितीचे मत आहे.  याबद्दल मंचाचे असे मत आहे की, सदर बियाण्‍यांची उगवणशक्‍ती 70 टक्‍के होती व तक्रारकर्त्‍याला 45 ते 52 टक्‍के उगवण झालेली आहे.   सदर पाहणीच्‍या वेळी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 चे प्रतिनिधी हजर होते.  परंतु, त्‍यांनी याबद्दलचा कोणताही आक्षेप नोंदविला नाही उलट तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तात विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 कडून तक्रारकर्त्‍याला नुकसान भरपाई देणेबद्दल काही दस्‍तऐवजांची मागणी झाल्‍याचा बोध होतो व तक्रारकर्ते यांनी विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 च्‍या मागणीपत्रानुसार संबंधित दस्‍तऐवज त्‍यांना पुरविल्‍याचेही ज्ञात होते म्‍हणून नुकसान भरपाईचे मुल्‍यांकन करण्‍याकरिता जेव्‍हा मंचाने तक्रारकर्त्‍याच्‍या सर्व शेत भूमापन/गट क्रमांकाचे सन 2011-12 चे 7-12 या दस्‍ताचे अवलोकन केले तेव्‍हा असे आढळले की, गट क्रमांक 126, 128, व 133 या मध्‍ये सोयाबीनचा पेरा नमूद नसून सोयाबीन मोडून सुर्यफूल असा शेरा नमूद आहे.  गट क्रमांक 125 मध्‍ये सोयाबीन पेरा हा 1.06 क्षेत्र एवढा नमूद आहे. गट क्रमांक 178 व 179 मध्‍ये सोयाबीन पेरा दिसत नाही.

   अशाप्रकारे शेतकी दस्‍तात वरीलप्रमाणे स्थिती असतांना चौकशी समितीने अहवालात पिक 45 ते 52 टक्‍के उगविले असे जे कथन केले ते कोणत्‍या पिकाबद्दल केले? व कोणत्‍या शेत गट क्रमांकाबद्दल केले? याचा उलगडा होत नाही, त्‍यामुळे असा संदिग्‍ध चौकशी अहवाल स्विकारता येणार नाही म्‍हणून विरुध्‍दपक्षाच्‍या पॉलीसीनुसार तक्रारकर्ता हा फक्‍त बियाणे खरेदी किंमत सव्‍याज व प्रकरण खर्चासहित विरुध्‍दपक्षाकडून घेण्‍यास पात्र आहे, या निष्‍कर्षाप्रत हे मंच आले आहे.  तक्रारकर्ते यांनी दाखल केलेल्‍या न्‍यायनिवाडयातील परिस्थिती ही हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडत नाही त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी दाखल केलेले खालील

1)  I(2009)CPJ 180 (NC)

     Maharashtra Hybrid Seeds Co. Ltd., Vs. Parchuri Narayana

 

2)  I(2007) CPJ 266 (NC)

     Maharashtra Hybrid Seeds Co. Ltd., Vs. Gowri Peddanna & Ors.           

 

3)  I(2000) CPJ 439

     Kesari Venkata Reddy Vs. Anaparthy Venkata Chalapathi Rao & Anr.

 

4)  I(1999) CPJ 463

     Haryana Seeds Development Corporation Ltd., Vs. Sunil Kumar

 

5)  II(2010) CPJ 497

     J.K. Seeds, Bheemeshwara Agro Chemicals Vs. Guduri Raji Reddy & Anr.

 

6)  I(2000)CPJ349

    M/s. Cosmo Plantgene Ltd., Vs. Asha Ram Sharma & Ors.

 

7)  III (2011) CPJ 433 (NC)

    Gujarat State Co-op. Mktg., Federation Ltd., Vs. Ghanshyambhai Fulabhai Patel

 

8)  III (2009) CPJ 19 (NC)

     Gyan Chandra Sharda Vs. Prabhari Sachiv Keshetriya Sadhan Sahkari Samiti &

    Ors.  

 

      न्‍यायनिवाडयातील निर्देशांचा आधार हा निवाडा पारित करतांना मंचाने घेतला. सबब, अंतिम आदेश पारित केला तो येणेप्रमाणे.

अं ति म   आ दे श

1)  तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2)  विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 मे. नॅशनल सिडस कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी तक्रारकर्त्‍यास

    बियाणे न उगवल्‍यामुळे झालेल्‍या नुकसानभरपाई पोटी बियाणे खरेदी किंमत

    रक्‍कम 28,200/- ( अक्षरी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे फक्‍त ) खरेदी दिनांक

    15/06/2011 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदाईपर्यंत दर साल दर शेकडा 8 टक्‍के

    व्‍याज दराने व्‍याजासहित दयावी. तसेच प्रकरण खर्च 3,0/- ( अक्षरी रुपये

    तीन हजार फक्‍त ) दयावा.

3 विरुध्‍दपक्ष क्रमांक 1 वर कोणतीही जबाबदारी टाकण्‍यात येत नाही.

4 विरुध्‍दपक्ष क्रमांक 2 यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून

    45 दिवसाचे आंत करावे.  

5 उभयपक्षकारांना आदेशाची प्रमाणित प्रत विनामुल्‍य देण्‍यात यावी.

 
 
[HON'ABLE MRS. S.M. Untawale]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Bharati Ketkar]
MEMBER
 
[HON'ABLE MR. Shri Kailas Wankhade]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.