Maharashtra

Gondia

CC/22/148

SHRI TARACHAND TUKARAMJI RAHILE - Complainant(s)

Versus

MS. LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

Mr. Uday Kshirsagar

20 Apr 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, GONDIA
ROOM NO. 24, SECOND FLOOR, NEW ADMINISTRATIVE BUILDING,
JAYSTAMBH CHOWK, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/22/148
( Date of Filing : 13 Sep 2022 )
 
1. SHRI TARACHAND TUKARAMJI RAHILE
AT DHABETEKADI TAH ARJNI MORGAON
Gondia
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. MS. LIFE INSURANCE CORPORATION OF INDIA THROUGH BRANCH MANAGER
TUMSAR BRANCH BAJAJ NAGAR TUMSAR
BHANDARA
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MS. SARITA B. RAIPURE MEMBER
 
PRESENT:Mr. Uday Kshirsagar , Advocate for the Complainant 1
 MR. ANANT DIXIT, Advocate for the Opp. Party 1
Dated : 20 Apr 2023
Final Order / Judgement

गणपूर्तीः                        मा. भास्‍कर बी. योगी, अध्‍यक्ष,  

                                        मा रायपुरे. सरिता बी ., सदस्‍या,

 

         उपस्थितीः-              तक्रारकर्तातर्फे- अधिवक्‍ता:-  श्री .उदय क्षीरसागर                                     

                                       विरूध्‍द पक्षा तर्फे अधिवक्‍ता:-श्री. अनंत दिक्षीत

 

पारित द्वारा- मा .सरिता बी. रायपुरे  सदस्‍या,,

                                                अंतिम आदेश

           ( पारित दिनांकः- 20/04/2023)

1.       तक्रारकर्त्‍याने पत्‍नीच्‍या अपघाती मृत्‍युमुळे “न्‍यु विमा गोल्‍ड पॉलिसी” योजनेनूसार विमा रक्‍कम मिळण्‍याबाबत विमा दावा विरूध्‍द पक्ष लाईफ इंन्‍शुरन्‍स विमा कंपनीकडे दाखल करूनही तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा अपघाती विमा दावा पूर्णपणे मंजुर केला नाही.  करिता तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 2019  च्या कलम 35 (1) अन्‍वये दाखल केलेली आहे.

तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणेः-

2.       तक्रारकर्त्‍याने लाईफ इंन्‍शुरन्‍स कॉपोरेशन ऑफ इंडिया विरूध्‍द पक्षाकडुन  “न्‍यु विमा गोल्‍ड पॉलिसी” विमा पॉलीसी काढली होती. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून प्रपोजल फॅार्म भरून घेतला तसेच आवश्यक ते सर्व कागदपत्रे घेउन त्‍यानंतर विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या नावाने दिनांक 15/03/2012 पासुन  20 वर्षासाठी विमा पॉलीसी दिली असुन अॅश्‍युअर्ड विमा रक्‍कम रू. 1,05,000/- होती.  विमा पॉलीसी क्रमांक 977937745 आहे. सदर पॉलिसी अंतर्गत अपघाती मृत्‍यु झाल्‍यास विमा रक्‍कमेच्‍या दुप्‍पट विमा रक्‍कम रू. 2,10,000/- मिळणार होती.  

3.       सदर विमा पॉलिसी मुदतीत असतांना दिनांक 08/07/2020 रोजी अज्ञात विषारी किटकाने चावल्‍याने विषबाधा होउन तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु झाला. तक्रारकर्त्‍याने पत्‍नीच्‍या मृत्‍यृनंतर व तक्रारकर्ता हा विमा पॉलिसीमध्‍ये नॉमीनी असल्‍याने विमा पॉलिसी अंतर्गत विमा रक्‍कत रू. 2,10,000/- मिळण्‍यासाठी विरूध्‍द पक्षांकडे अर्ज सादर केला. त्‍यानूसार विरूध्‍द पक्षाने दिनांक 20/08/2020 रोजी अपघाती मृत्‍यु असल्‍याने रू. 2,10,000/- विमा  रक्‍कम जमा करण्‍याऐवजी फक्‍त रू. 1,05,000/- एवढी विमा रक्‍कम जमा केली. तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्षाकडे सदर विमा पॉलीसी नूसार अपघाती विमा रक्‍कम 2,10,000/- देण्‍याची तोंडी विनंती वारंवार केली पंरतु विरूध्‍द पक्षाने पॉलिसी अंतर्गत विमा रक्‍कम तक्रारकर्त्‍यास दिली नाही. करिता तक्रारकर्त्‍याने सदरची तक्रार दाखल करून खालील प्रमाने मागणी केली आहे.

अ )   तक्रारकर्त्‍याचा अर्ज मंजूर व्‍हावा.

ब) विरूध्‍द पक्षानी तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍याची रक्‍कम रू 1,05,000/-  तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्षांकडे दुप्‍पट रककम देण्‍याचा दावा फेटाळल्‍यापासुन व कमी रक्‍कम जमा केल्‍याच्‍या दिनांकापासुन म्‍हणजे दिनांक  20/08/2020 पासुन द.सा.द.शे. 18% व्‍याजासह देण्‍याचे आदेश दयावेत

क) विरूध्‍द पक्षानी तक्रारकर्त्‍यास विम्‍याची रक्‍कम न दिल्‍याने         झालेल्‍या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी रू. 1,00,000/-व     तक्रारिच्‍या खर्चापोटी रू. 20,000/- देण्‍याचे आदेश विरूध्‍द पक्षाला दयावेत.

ड)   मा.  आयोगास योग्‍य वाटेल ते इतर आदेश तक्रारकर्त्‍याच्‍या हक्‍कात दयावेत.

 4.      तक्रारकर्त्‍याची  तक्रार विद्यमान आयोगाने दिनांक  13/09/2022 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्‍द पक्षाना  आयोगामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या. विरूध्‍द पक्षाला  नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी आपला लेखी जबाब दाखल केला.

5.   विरूध्‍द पक्षा तर्फे अधिवक्ता श्री. अनंत दिक्षीत  यांनी आपला  लेखी उत्‍तर  दिनांक 24/11/2022 रोजी आयोगात दाखल केला. विरूध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तरामध्‍ये प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने स्‍वत: तक्रारीमध्‍ये तक्रारीचे कारण दिनांक 08.07.2020 आणि दिनांक 20.08.2020 रोजी घडले असे नमुद केले आहे. सदर तक्रार दिनांक 13.09.2022 रोजी दाखल केली आहे. करिता ही तक्रार विलंबाने दाखल केली आहे. करिता सदर तक्रार या कारणास्‍तव खारिज करण्‍यात यावी.

6.       विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारिचे परिच्‍छेद निहाय उत्‍तर सादर केलेले आहे तसेच आपल्‍या उत्‍तरामध्‍ये विशेष कथन दिले आहे त्‍यात म्‍हटले आहे. तक्रारकर्त्‍याने दुप्‍पट रक्‍कम देण्‍याची विनंती विरूध्‍द पक्षाकडे केली होती पंरतु ती विनंती विरूध्‍द पक्षाने फेटाळली त्‍या संदर्भाचे पत्र तक्रारीसोबत जोडलेले नाही.

7.       तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा अज्ञात विषारी किटकाने चावल्‍याने विषबाधा होउन मृत्‍यु झाला ही बाब अमान्‍य केली आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक  08/07/2020  च्‍या शवविच्‍छेदन अहवालानूसार तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचे मृत्‍युचे संभाव्‍य कारण “ The probable cause of death is cardio arrest secondary to unknown bite poisoning ( Rat bite ??) however to know exact cause of death viscera is preserved and sent for chemical analysis” “Opinion reserved ”असे नमूद केले होते तसेच दिनांक 01/10/2020 च्‍या chemical analysis report नूसार “ General and specific chemical testing does not reveal any poison in exhibit no (1) & (2)” असे स्‍पष्‍ट  नमुद केलेले आहे यावरून मृतक विमाधारकास किटक चावला असू शकतो परंतू तो किटक विषारी नव्‍हता हे सिध्‍द होते त्‍यामुळे अपघाताचा प्रश्‍नच उदभवत नाही. मृतक गीता ताराचंद रहिले यांचा मृत्‍यु कुठल्‍याही अज्ञात विषारी किटक किंवा उंदीर चावल्याने झालेला नाही. तर दुस-या कारणानी झाला असावा. तकारकर्त्‍याने तक्रारित नमुद केलेले मृत्‍युचे कारण अज्ञात विषारी किटकाच्‍या चावल्‍याने हे अपघाती मृत्‍युलाभामध्‍ये समाविष्‍ठ होत नाही कारण Accident is a sudden unforeseen and involuntary event caused by external and violent means.  त्‍यामुळे हे सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु हा अपघाती मृत्‍यु नाही तसेच मृत्‍यु हा अपघाताने झालेला आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी आवश्यक कागदपत्रे  FIR, Post mortem report, Police final summary, S.D.M. order  इत्‍यादी  कागदपत्रे दाखल केलेले नाही. विरूध्‍द पक्ष उत्‍तरात पुढे असे कथन करतात की. तक्रारकर्त्‍याने  दिनांक 15/10/2020 रोजीचा क्‍युरि रिपोर्ट सादर केला आहे त्‍यामध्‍ये “The cause of death is Cardio respiratory attack secondary to unknown bite poisoning ”  असा निष्‍कर्ष दिलेला आहे पंरतु दिनांक 01/10/2020 च्‍या Chemical analysis report नुसार  “General and specific chemical testing does not reveal any poison in exhibit no (1) & (2) ”असे सपष्‍टपणे नमुद केलेले आहे आणि विषबाधाच्‍या केसेस मध्‍ये केमिकल अॅनालेसीस रिपोर्ट हा सर्वात महत्‍वाचा दस्‍तऐवज ठरतो तर डॉक्‍टराचा क्‍युरि  रिपोर्ट हा महत्‍वाचा ठरत नाही. Chemical analysis report आणि Query  Report  यामध्‍ये पुर्ण विरोधाभास दिसत आहे. तसेच दिनांक 15/10/2020 चा  Query Report बनावटी असल्‍यामुळे मृतक गीता ताराचंद रहिले यांचा     मृत्‍यु अज्ञात विषारी किटक चावुन झाला हे सिध्‍द होत नाही. करिता विरूध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यास मृत्‍यु लाभ देय नाही. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीनुसार फक्‍त मृत्‍यु लाभाची रक्‍कम रू. 1,05,000/-एवढी रक्‍कम दिलेली आहे. विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास सेवा प्रदान करण्‍यात कुठलीही त्रुटी केली नाही. करिता सदर तक्रार खारिज करण्‍यात यावी अशी विनंती विरूध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी उत्‍तरात केली आहे.

8.       तक्रारकर्त्‍याचा तक्रार अर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र विरूध्‍द पक्ष यांचे लेखी जबाब यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

. क्र.  

                        मुद्दा

         निःष्‍कर्ष

1.

विरूध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास  सेवा देण्‍यात त्रृटी केली आहे का?

            होय  

2.

तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर होण्यास पात्र आहे का?

            होय.

3.

 

तक्रारीचा  अंतिम आदेश काय?

कारणमिमांसे प्रमाणे

 

:कारणमिमांसा:

मुद्दा क्र.  1 2 बाबत-

9. विरूध्‍द पक्षाने आपल्‍या लेखी उत्‍तरामध्‍ये प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु अपघाती मृत्‍यु नाही तसेच विषारी किटक चावल्‍याने मृत्‍यु झाला यासंबंधी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही  आणि  Chemical analysis report and query report  यामध्‍ये विरोधाभास आहे  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु अपघाताने झालेला आहे हे पुराव्‍या अभावी सिध्‍द होउ शकले नाही करिता तक्रारकर्त्‍यास विम्‍याचा लाभ देय नाही.  या कारणाने अपघाती विम्‍याची रक्‍कम नांमजूर केली. याविषयी ग्रांहक आयोगाच्‍या मते निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविण्‍यात येत आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत सादर केलेली दस्‍तऐवज मर्ग खबरी, इंन्क्‍वेस्‍ट पंचनामा याचे अवलोकन केले असता, तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु अपघाती मृत्‍यु आहे त्‍याचप्रमाणे शवविच्‍छेदन अहवाल मध्‍ये पॅरा क्रमांक 17 मध्‍ये मृतकाच्‍या डाव्‍या      पायाच्‍या अंगढयाजवळ चावल्‍याचे निशान आहे तसेच Query report (Doc. no. 6 ) नूसार डॉक्‍टराचे मत नोंदविले आहे त्‍यात नमुद आहे की,  “The cause of death is cardio respiratory arrest secondary to unknown bite poisoning” परंतु विरूध्‍द पक्षाने मृत्‍युबाबत आक्षेप घेतला असला तरी       तक्रारकर्त्‍याच्‍या पत्‍नीचा मृत्‍यु अपघाताने झालेला आहे हे सिध्‍द करण्‍याची जबाबदारी विमा कंपनीची आहे.  पंरतु विमा कंपनीने कोणताही प्रत्‍यक्षदर्शी साक्ष पुरावा सादर केलेला नाही त्‍यामुळे विमा कंपनीने घेतलेला आक्षेप ग्राहय धरण्‍यात येत नाही. कारण विरूध्‍द पक्षाचे अधिवक्‍त्‍यानी आपल्‍या     बचावाच्‍या समर्थनार्थ व्हिसेरा रिपोर्ट, Query Report यावर आपली भिस्‍त ठेवली आहे. पंरतु त्‍याचे अवलोकन केले असता सदर दस्‍तऐवजामध्‍ये         मृतकाच्‍या मरणासबंधी निश्चित असे कारण नमूद केलेले नाही कारण व्हिसेरा रिपोर्ट मध्‍ये विष जरी आढळले नसले तरी त्‍यामुळे मृतकाचा मृत्‍यृ अपघाती नाही असे म्‍हणता येणार नाही.  तसेच Query Report मध्‍ये डॅाक्‍टरानी मृत्‍यृ सबंधी निश्चितपणे स्पष्‍ट मत दिलेले आहे.

The cause of death is cardio respiratory arrest secondary to unknown bite poisoning” याचा अर्थ अपघाती  मृत्‍यृ झाला हे सिध्‍द  होते.  पंरतु तक्रारकर्त्‍यास विम्‍याची संपुर्ण रक्‍कम न देउन विरूध्‍द पक्षाने आपली जबाबदारी योग्‍यरित्‍या न बजावून तक्रारकर्त्‍यास सेवा देण्‍यात त्रुटी केली आहे असे निदर्शनास येते. तक्रारकर्ता “न्‍यु विमा गोल्‍ड पॉलिसी” चे “लाभार्थी” म्‍हणुन विमा रक्‍कम मिळविण्‍यास पात्र आहे. करिता मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.  .

10.      वरील चर्चेनुरूप व निःष्कर्षावरून मा. आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                  

                               :: अंतिम आदेश ::

1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार  अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.       विरूध्‍द पक्ष विमा कंपनीला आदेश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास तिच्या मृतक पत्‍नीच्‍या “न्‍यु विमा गोल्‍ड पॉलिसी” विम्‍याची रक्‍कम रू. 1,05,000/-(अक्षरी रूपये ए‍क लाख पाच हजार फक्‍त) दयावे आणि या रक्‍कमेवर कमी रक्‍कम जमा केलेल्‍या दिनांकापासुन म्‍हणजेच 20/08/2020 पासुन ते संपूर्ण रक्‍कम तक्रारकर्त्‍यास अदा करेपर्यंत द. सा. द. शे 6 % व्‍याजदराने व्‍याज दयावे.

3.       विरूध्‍द पक्ष विमा कंपनीला आदेश देण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास   झालेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रू. 10,000/-(अक्षरी रूपये दहा  हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च रू. 5,000/- (अक्षरी रूपये पाच हजार फक्‍त)  दयावे.

4.       विरुद्ध पक्ष विमा कंपनी यांना असेही आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी अंतिम आदेशामध्ये नमूद आदेशित रकमा आधार लिंकड बॅंक खात्‍यात  डी.बी.टी. / ईसीएसने, आरटीजीएस ने डायरेक्‍ट जमा कराव्‍यात.

5.       विरूध्द पक्ष विमा कंपनी यांनी सदर आदेशाचे अनुपालन त्यांना निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. वरील आदेश क्र.  2 व 3 चे पालन 30 दिवसांत न केल्‍यास द. सा. द. शे 9 टक्‍के व्‍याज देय राहिल.

6.       निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्‍ध करुन  देण्यांत याव्यात.

7.       प्रकरणाच्या “ब” व “क” फाईल्स तक्रारकर्त्‍याला परत करण्यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MS. SARITA B. RAIPURE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.