Complaint Case No. CC/167/2017 | ( Date of Filing : 23 Mar 2017 ) |
| | 1. Prashant Kushal Chinchkhede | R/o. Bhandar Mohalla, near 10 No. Pulia, Indora, Nagpur 440014 | Nagpur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/s. Laxmi Saur Urja, Through Proprietor/Partner | Khadi Gram Udyog Bhavan, Gandhi Sagar, Mahal, Napgur and Alternate Addressw : Chitnavispura, Shivaji Nagar, Mahal Road, Nagpur 440032 | Nagpur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | आदेश मा. सदस्य, श्री. बाळकृष्ण चौधरी यांच्या आदेशान्वये- तक्रारकर्ता यांनी ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 प्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे. - तक्रारकर्त्याचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, विरुद्ध पक्ष सोलर प्रॉडक्टचे अधिकृत विक्रेते असून ते 'Laxmi solar Urja' या नावाने सोलर पॅनल विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने वि.प. यांचे दि. 23.05.2016 रोजी विरुद्ध पक्ष यांचे कडे सोलर पॅक चा घरगुती वापरा करिता ऑर्डर दिलाव त्याची एकूण किंमत रु.1,50,000/- ठरली होती,वत्यावर 15 टक्के सूट देण्याचे मान्य केले म्हणून वि.प. यांनी ते सोलर एकूण रु.1,27,500/- मध्येबसवून देण्याचे कबुल केले. तक्रारकर्त्याने वि.प. याना दि. 23.05.2016 रोजी रक्कम रु. 20,000/- चेक द्वारे दिले. उर्वरित रक्कम हि 50 टक्के रक्कम पॅनल बसविणे पर्यंत व 50 टक्के रक्कम हि सोलर पॅनल बसविल्यानांतर देण्याचे ठरले होते. वि.प. यांनी कोटेशन दिल्यानंतर techno commercial कडून confirm purchase order आणून दिला नाही म्हणून तक्रारकर्ता 50 टक्के रक्कम जमा करू शकले नाही. तक्रारकर्ता उर्वरित रक्कम वि.प. याना देण्यास तयार होते परंतु वि.प. यांनी सोलर पॅनल बसविन्याकरीता आले नाही व confirm purchase order आणून दिला नाही. ठरल्या प्रमाणे तक्रारकर्त्याला सोलर मशीन बसून दिली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने वि.प. याना आपले वकिला मार्फत दि. 08.11.2016 रोजी नोटीस दिला व सोलर पॅनल बसवून देण्याची मागणी केली परंतु वि.प. यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही व सोलर पॅनल बसवून दिले नाही. म्हणून तक्रारकर्त्याने आयोग समक्ष तक्रार दाखल करून मागणी केली कि, विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून स्वीकारलेली रक्कम रु. 20,000/- त्यावर 18 टक्के व्याजासहित परत करण्याचे आदेश द्यावे.तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक शारीरिक त्रासाबद्दल मोबदला म्हणून रु.25,000/- विरुध्द पक्ष यांनी द्यावे असा आदेश पारित करण्यात यावा व तक्रारीचा खर्च रु.10,000/-देण्याच्या आदेश द्यावा अशी मागणी केली.
- वि.प. यांनी आपला लेखी जबाब दाखल करून मान्य केले कि, तक्रारदार यांनी त्यांचे कडे सोलर ची बुकिंग रक्कम भरून सोलर बुकिंग केले होते . तक्रारकर्त्याने confirm Purchase order दिला नसल्याने सोलर त्यांचे कडे देऊ शकलो नाही व तक्रारकर्त्याने दुसऱ्या व्यक्ती कडून सोलर चा ऑर्डर बुक केला, त्याच प्रमाणे तक्रारकर्त्याने सुरुवातीची 50 टक्के रक्कम अदा केली नाही म्हणून वि.प. यांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित व्यापार प्रथेचा भंग केला नाही म्हणून तक्रार खारिज करण्याची विनंती केली आहे.
- सदर प्रकरण तोंडी युक्तीवादाकरीता आल्यावर आयोगाने तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तीवाद ऐकला व दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता आयोगाचे विचारार्थ उपस्थित मुद्दे आणि त्यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे.
मुद्दे उत्तरे I. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय II. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा देवून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ? होय III. काय आदेश ? अंतिम आदेशानुसार का र ण मि मां सा - मुद्दा क्रं.1 व 2 बाबत - आम्ही तक्रारकर्त्याचे वकील यांचा युक्तीवाद ऐकला. त्यांनी थोडक्यात असे नमुद केले की,तक्रारकर्त्याने वि.प. यांचे दि. 23.05.2016 रोजी वि. यांचे कडे सोलर पॅक चा घरगुती वापरा करिता ऑर्डर दिलाव त्याची एकूण किंमत रु. 1,50,000/- ठरली होती. व 15 टक्के सूट देण्याचे मान्य केले म्हणून वि.प. यांनी ते सोलर एकूण रु. 1,27,500/- मध्येबसून देण्याचे कबुल केले. तक्रार कर्त्याने वि.प. याना दि. 23.05.2016 रोजी रु. 20,000/- चेक द्वारे दिले. वि.प. यांनी कोटेशन दिल्यानंतर techno commercial कडून confirm purchase order आणून दिला नाही म्हणून तक्रारकर्ता50 टक्के रक्कम जमा करू शकले नाही. तक्रारकर्ता उर्वरित रक्कम वि.प. याना देण्यास तयार होते परंतु वि.प. यांनी सोलर पॅनल बसविन्याकरीता आले नाही व confirm purchase order आणून दिला नाही. म्हणुन तक्रारकर्त्याचे प्रती सेवेत त्रुटी केलेली आहे म्हणुन तक्रार मंजूर करण्यात यावी आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावे.
- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष याना सोलर करीता लागणारी सुरुवातीला रक्कमरु. 20,000/- चेक द्वारे दिल्याचे दस्त नि. क्र.2(1) वर दाखल आहे त्याच बरोबर नि.क्र.2 (2) नोटिस या दस्तचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांना रक्कम रु.20,000/-दिल्याचे स्पष्ट दिसून येते म्हणून तक्रारकर्ता विरुध्द पक्षयांचे ग्राहक आहे असे आमचे मत आहे.
- तक्रारकर्त्याने वि.प. याना रक्कम रु. 20,000/- देऊन सुद्धा. वि.प. यांनी कोटेशन दिल्यानंतर techno commercial कडून confirm purchase order आणून दिला नाही.विरुद्ध पक्ष यांनी रक्कम घेऊन सुद्धा सोलर चे पॅनल पुरवठा केला नाही.तक्रारकर्त्याने आपल्या वकिलामार्फत वि.प. याना नोटीस दिलाव सोलर पॅनल बसवून देण्याची मागणी केली परंतु वि.प. यांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही व सोलर पॅनल बसवूनदिले नाहीव नोटीसचे उत्तर सुद्धा दिले नाही. म्हणून विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिल्याचे निष्पन्न होते असे आमचे मत आहे. वरिल सर्व कारणास्तव आम्ही मुद्दा क्रं.1 व 2 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
- विरुध्द पक्ष यांना रक्कम देऊनही तक्रारदाराला कुठलीही सेवा विरुध्द पक्ष यांचे कडून प्राप्त झालेल्या नाही, म्हणुन वि.प. यांनी तक्रारकर्त्याला रक्कम रु. 20,000/- त्यावर दि. 23.05.2016 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत 09 टक्के द.सा.द.शे. दराने व्याजासहित परत करावे असा आदेश देणे योग्य आहे व तक्रारकर्ता यांना झालेल्या शारिरिक मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीबाबत रक्कम रुपये 10,000/- मंजूर करणे तसेच खर्चाबाबत रुपये 5,000/- देणे न्यायोचित आहे असे आमचे मत आहे. आहे.
सबब अंतिम आदेश खालीलप्रमाणे. अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याकडून स्वीकारलेली रक्कम रु.20,000/- परत करावी सदर रक्कमेवर दि. 23.05.2016 पासून ते प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत द. सा. द. शे. 9 टक्के दराने व्याजासह येणारी रक्कम तक्रारकर्त्यास परत करावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 10,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 5,000/- अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेश पारित दिनांकापासून 45दिवसाचे आत करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्क द्यावी.
तक्रारकर्त्याला प्रकरणाची ब व क फाईल परत करावी. | |