द्वारा. श्रीमती प्रतिभा बा. पोटदुखे ः
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेल्या ग्राहक तक्रारीचा आशय असा की, ..........
1. तक्रारकर्ता हे वि.प. यांचे ग्राहक असून त्यांचा ग्राहक क्रमांक 602389 असा आहे. वि.प. हे तक्रारकर्ता यांना दर महिन्याला सहा सिलेंडरचा पुरवठा करावयाचे. परंतु दि. 31/12/07 नंतर वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना सिलेंडरचा पुरवठा करणे अचानकपणे बंद केले.
2. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांचे गॅस कनेक्शन हे व्यावसायीक गॅस कनेक्शनमध्ये रुपांतर करण्याची मागणी केली जी सर्वथा अनुचीत होती. तक्रारकर्ता यांची संस्था ही व्यावसायीक संस्था नाही. तक्रारकर्ता यांचे 1000/- विदयार्थी असून सायंटीफिक लेबोरेटरी, नास्ता व इतर कामांसाठी गॅस सिलेंडरची तक्रारकर्ता यांना गरज आहे. वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना गॅस सिलेंडरचा पुरवठा न करणे ही त्यांच्या सेवेतील न्युनता आहे.
3. तक्रारकर्ता यांनी मागणी केली आहे की, वि.प. यांनी तक्रारकर्ता यांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा असे आदेश व्हावेत व दि. 31/12/07 पासून तक्रारकर्ता यांना वि.प. यांनी गॅस सिलेंडरचा पुरवठा न केल्यामुळे नुकसान भरपाईबद्दल रु. 40000/- मिळावेत.
4. वि.प. यांनी त्यांचा लेखी जबाब नि.क्र. 8 वर दाखल केलेला आहे. वि.प. म्हणतात की, वि.प. हे तक्रारकर्ता यांना पुर्वी महिन्याला सहा सिलेंडरचा पुरवठा करित होते. परंतु कंपनीच्या पॉलीसी मध्ये बदल झाल्यामुळे ती सुविधा बंद करण्यात आली. तक्रारकर्ता यांची संस्था ही व्यावसायीक स्वरुपाची आहे. सदर तक्रार ही दिवाणी न्यायालयात चालावी अशी आहे. वि.प. यांच्या सेवेत कोणतीही न्युनता नसल्यामुळे तक्रारकर्ता यांची तक्रारही नुकसान भरपाईसह खारीज करण्यात यावी.
कारणे व निष्कर्ष
५. . तक्रारकर्ता व वि.प. यांनी दाखल केलेली कागदपत्रे, शपथपत्र, इतर पुरावा व केलेला युक्तीवाद यावरुन असे निदर्शनास येते की, वि.प. हे तक्रारकर्ता यांना 31/12/07 पर्यंत प्रतीमाह सहा सिलेंडरचा पुरवठा करत होते. परंतु त्यानंतर त्यांनी पुरवठा करणे हे बंद केले आहे.
6. तक्रारकर्ता यांनी त्यांच्या ग्राहक तक्रारीत असे नमुद केले आहे की, त्यांच्या संस्थेत 1000 विदयार्थी असून ते गॅस सिलेंडरचा वापर हा पाणी गरम करण्यासाठी, सांयटीफिक लेबोरेटरी व नास्ता यासाठी करत होते. यावरुन तक्रारकर्ता हे 1000 मुलांच्या हॉस्टेल करिता गॅस सिलेंडरचा वापर करायचे असे दिसून येते.
7. वि.प.यांनी रेकॉर्डवर दाखल केलेल्या पेट्रोलीयम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांनी दैनीक हितवाद मध्ये दि. 12/08/08 रोजी प्रकाशीत केलेल्या जाहीरातीमध्ये असे म्हटले आहे की, '14.2 कि.ग्रॅ. चे घरगुती एल.पी.जी. सिलेंडर हे घरगुती वापर जसे स्वयंपाक याशिवाय इतर कामांसाठी वापरता येणार नाही. हॉस्टेलमध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करणे हे बेकायदा आहे'.
8. तक्रारकर्ता यांनी स्वतः रेकॉर्डवर दाखल केलेल्या पेट्रोलीयम व नैसर्गिक वायू मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रकाशनात असे म्हटले आहे की, '14.2 िक.ग्रॅ घरगुती सिलेंडर हे धाबा, रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, कॅन्टीन, हॉस्टेल, लॉज, इंडस्ट्रीज इ. करिता वापरल्याने लिक्वीफाईड पेट्रोलीयम गॅस कंन्ट्रोल ऑर्डर 2001 अन्वये संबंधीत व्यक्तिस 7 वर्षाची शिक्षा व दंड हा होऊ शकतो.
9.घरगुती एल.पी.जी. सिलेंडर हे हॉस्टेल करिता वापरणे हे गुन्हा या सदरात येत असल्यामुळे व याबाबीस प्रतीबंध असल्यामुळे वि.प. यांना हॉस्टेलकरिता घरगुती एल.पी.जी. सिलेंडरचा पुरवठा करावयाचा आदेश देणे हे कायदेशीर ठरणार नाही.
असे तथ्य व परिस्थिती असताना सदर आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
तक्रारकर्ता यांनी दाखल केलेली ग्राहक तक्रार ही खारीज करण्यात येत आहे.