Maharashtra

Nagpur

CC/417/2020

RAJESH NARAYAN PATEL - Complainant(s)

Versus

M/S. KAPALIN MARKETING PRIVATE LIMITED, THROUGH DIRECTOR SHRI. KAJAL VISHWA - Opp.Party(s)

ADV. SHRI. SANJAY BABU SOLAT

24 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/417/2020
( Date of Filing : 20 Oct 2020 )
 
1. RAJESH NARAYAN PATEL
OPP. ANAND CINEMA SOMWAR BAZAR ROAD, SITABULDI, NAGPUR-440012
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. KAPALIN MARKETING PRIVATE LIMITED, THROUGH DIRECTOR SHRI. KAJAL VISHWA
ROOM NO. 102, DN-36, PRIMARC TOWER, SECTOR-V, SALT LAKE, KOLKATA-700091
KOLKATA
WEST BENGAL
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHRI. SANJAY BABU SOLAT, Advocate for the Complainant 1
 
Dated : 24 Aug 2021
Final Order / Judgement

मा. अध्‍यक्ष, श्री. संजय वा. पाटील  यांच्‍या आदेशान्‍वये-

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा  2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हा सुक्षिशीत बेरोजगार असुन त्याला विद्युत उपकरणे दुरुस्त करण्‍याचे ज्ञान आहे. त्याचे सिताबर्डी येथे विद्युत उपकरणे दुरुस्त करण्‍याचे छोटे दुकान असुन तक्रारकर्ता सदरहू व्यवसाय स्वतःचे उपजिविकेसाठी करित आहे.  वि.प. यांनी दिनांक 3.10.2018 रोजी त्यांच्या माल विक्रीसाठी नागपूर येथे वितरक नेमण्‍याचे आहे असे सांगून तक्रारकर्ते यांचे सोबत करारनामा केला. सदरहू करारनाम्याप्रमाणे वि.प. यांनी रक्कम रुपये 1,00,000/- देण्‍याबाबत अट ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे तक्रारकर्ते यांनी धनादेश क्रं.000000801220 प्रमाणे वि.प. यांना रक्कम रुपये 1,00,000/- दिले. त्यानंतर वि.प. यांनी ठरल्याप्रमाणे तक्रारकर्ते यांना मालाचा पूरवठा केला नाहीत. याबाबत तक्रारकर्ते यांनी वि.प.यांचेकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी 21.1.2019 रोजी सदरहू रक्कम रुपये 1,00,000/- एक आठवडयाचे आत परत करणार असा ई-मेल व्दारे कळविले आणि त्याबाबत तक्रारदाराने कागदपत्र क्रं. 3 दाखल केलेले आहे. त्यानंतरही वि.प. यांनी पैसे परत केले नाही आणि पुन्हा दुसरा ई-मेल 7.2.2019 रोजी पाठविला आणि सदरहू रक्कम परत करण्‍याचे वचन दिले आणि कंपनीचे एम.डी भारताबाहेर गेल्याचे कळविले.  तक्रारकर्ता हा स्वतः वि.प. यांचे कार्यालयात कोलकोत्ता येथे दोन-तीन वेळा जाऊन आला आणि त्यावेळेसही वि.प. यांनी पैसे परत करणार असे वचन दिले परंतु वि. प यांनी पैसे परत केले नाही म्हणुन तक्रारकर्ते यांनी दिनांक 8.3.2019 रोजी सिताबर्डी येथे तक्रार दाखल केली. परंतु त्यानंतर वि.प. यांनी रवि इलेक्टॉनिक्स या नावाने (एक्सीस बॅंक,खाते क्रं. 918020001522503, ब्रॉन्च आफीस इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्लेक्स,कोलकत्ता चा धनादेश क्रं.३५३४०९ दिनांक २०/६/२०१९ चा तक्रारकर्ते यांना त्याची छायांकित प्रत पाठविली.परंतु तक्रारकर्ते यांना योग्य नावाने म्हणजे रवि एन्टरप्राईजेस या नावाने धनादेश पाठविण्‍यास सांगीतले. परंतु वि.प.यांनी जाणूनबुजून योग्य नावाचा धेनादेश देण्‍यास टाळाटाळ केली शेवटी तक्रारकर्ते यांनी 26.6.2020 रोजी वि.प. यांना वकीलामार्फत रजिस्टर पोस्‍टाने नोटीस पाठविली. त्यानंतरही वि.प. यांनी सदहू रक्कम तक्रारकर्ते यांना दिली नाही किंवा मालाचा पुरवठाही केला नाही म्हणुन तक्रारकत्याने सदर न तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्ते यांनी सदरहू रक्कम रुपये 1,00,000/- दिनांक 30.11.2018 पासुन 18 टक्के व्याजाने देण्‍यात यावी अशी मागणी केली. आर्थिक नुकसानीपोटी व मानसिक त्रासाबाबत रुपये 50,000/- आणि खर्चाबाबत रुपये 30,000/- ची मागणी केलेली आहे.
  3. वि.प. हे रजिस्टर पोस्‍टाने नोटीस मिळुनही हजर झाले नाही म्हणून सदर तक्रार दिनांक 8.2.2021 रोजी एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  4. सदर तक्रारीतील कागदपत्रे व तक्रारदाराचे युक्तीवादातील मुद्दे विचारात घेऊन व त्यावर खालील प्रमाणे उत्तरे नोंदविण्‍यात येतात.

  अ.क्र.                  मुद्दे                                                                          उत्‍तर

1. ?                 

  1. वि.प. यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे काय ?    होय
  2. वि.प.ने सेवेमधे त्रुटी केली आहे काय ?                       होय

4. ?                                                               

 

कारणमिमांसा

  1. मुद्दा क्रं.1 व 3 बाबत- सदर प्रकरणात तक्रारदारांचे वकीलांनी लेखी युक्तीवादाबाबत पुरसिस दाखल केली आणि तक्रारकर्ते यांचे वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला असता त्यांनी थोडक्यात असे नमुद केले की, वि.प. यांनी पाठविलेल्या ई-मेल व्दारे आणि धनादेशाव्दारे तक्रारकर्ते यांनी वि.प. यांना रक्कम दिल्याचे सिध्‍द होते आणि दस्तऐवज क्रं. 1 प्रमाणे केलेल्या कराराप्रमाणे पैसे मिळाल्यानंतरही कोणताही पाठविलेला नाही आणि सेवेत त्रुटी केले आहे व अनुचित व्रयापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे म्हणुन तक्रार मंजूर करण्‍यात यावी.
  2. आम्ही सदर तक्रारीतील कागदपत्राचे अवलोकन केले असता दस्तऐवज क्रं.1 प्रमाणे वि.प. यांनी करारनामा केल्याचे स्पष्‍ट आहे आणि दस्तऐवज क्रं. 2 प्रमाणे तक्रारदार यांनी वि.प. यांना रक्कम रुपये 1,00,000/- दिल्याचे सिध्‍द होते. त्यानंतर उभयपक्षामधे झालेल्या ई-मेल मधील संवादाप्रमाणे वि.प. यांनी सदरहु रक्कम परत करण्‍याचे आश्‍वासन सुध्‍दा दिलेले आहे. तक्रारकर्ता हा छोटया दुकानामधे स्वतःचे उपजिवीकेसाठी सदरहू व्यवसाय करित असल्यामूळे तो वि.प. चा ग्राहक आहे हे स्पष्‍ट होते. यासाठी आम्ही पूढील न्यायनिवाडयातील निरिक्षणांचा आधार घेतलेला आहे.
  3. (1996) 1 CPJ 7 (NC) KODY ELCOT LTD.  VS.  DR. C.P.GUPTA.

2. (1997) 1 CPJ 23, RAMPION PHARMACEUTICALS VS.  DR PREETAM SHAH.

3. (1995) 3 SCC 583. LAXMI ENGGINERING WORK VS. P.S.G INDUSTRIAL INSTITUTE.

  1. वि..प. यांनी कराराप्रमाणे माल ही पाठविला नाही आणि ई-मेल मधे कळविल्याप्रमाणे तक्रारकर्ते यांना रक्कम परत केली नाही म्हणुन वि.प. यांनी सेवेत त्रुटी केल्याचे आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे स्पष्‍ट होते. म्हणुन मुद्दा क्रं.1 ते 3 यावर होकारार्थी उत्तर नोंदविण्‍यात येते.
  2. मुद्दा क्रं.4 बाबत- वि.प. यांनी करारामधे स्पष्‍टपणे माल पाठविण्‍याबाबत कबुल केलेले आहे आणि त्यातील अटीमाणे तक्रारकर्ते यांनी वि.प. यांना मोठी रक्कम दिल्यानंतरही माल पाठविला नाही आणि रक्कमही परत केली नाही म्हणुन तक्रारकर्ते यांना आर्थिक नुकसान झालेले आहे आणि मानसिक त्रास झालेला आहे. सबब आर्थिक नुकसानी पोटी व मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 30,000/- मंजूर करणे न्‍यायोचित आहे असे आमचे मत आहे. तसेच मूळ रक्कमेवर द.सा.द.शे 12 टक्‍्के दराने व्याज मंजूर करणे व खर्चा पोटी रुपये 20,000 मंजूर योग्य आहे असे आमचे मत आहे.

आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.ने तक्रारदाराकडुन स्व‍िकारलेली रक्कम रुपये १००,०००/- परत करावी. तसेच त्यावर द.सा.द.शे. 12 टक्के दराने दिनांक ३०.११.२०१८ पासुन रक्कमेच्या प्रत्यक्ष अदागीपोवतो व्याज द्यावे.
  3. मानसिक व शारिरीक त्रासाकरीता रुपये ३०,०००/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये २०,०००/- द्यावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.

तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.