(पारित दिनांक-22 जून, 2020)
(पारित व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
01. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम 12 खाली त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा खरेदी केलेला ट्रॅक्टर त्यामध्ये दोष असल्याने त्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विरुध्द ग्राहक मंचा समोर दाखल केली.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय असा आहे की-
तक्रारकर्त्याचे मालकीची शेती असून त्याने शेतीच्या कामा करीता व स्वतःचे उदरनिर्वाहासाठी ट्रॅक्टर विकत घेण्याचे ठरविले. त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित कंपनीचा New TAFEE Tractor MF 7250 with standard Accessories, Engine No.-S-325-F-73811, Chassis No.-MEAOAD-05-EE-2003619 खरेदी करण्याचे ठरविले. विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने त्यास सदरयास ्याने सडक, ट्रॅक्टर संबधात दिनांक-20 जानेवारी, 2015 रोजीची टॅक्स इन्व्हाईस दिली, त्यानुसार ट्रॅक्टरची किंमत रुपये-5,98,500/- व 5 टक्के व्हॅटची रक्कम रुपये-31,500/- असे मिळून एकूण रुपये- 6,30,000/- चे कोटेशन दिले. सदर ट्रॅक्टर खरेदीसाठी त्याला स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पवनी, जिल्हा भंडारा यांनी दिनांक-20 जानेवारी, 2015 रोजी कर्ज मंजूर केले होते. त्या अनुषंगाने भारतीय स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा पवनी जिल्हा भंडारा शाखेचा वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे नावे डीमांड ड्रॉफ्ट क्रं 704851, दिनांक-21 जानेवारी, 2015 रोजीचा एकूण रुपये-6,30,000/- देण्यात आला. संपूर्ण ट्रॅक्टरची किम्मत वि.प.क्रं 1 विक्रेत्यास मिळाल्या नंतर सदर ट्रॅक्टरची नोंदणी आर.टी.ओ. कार्यालय भंडारा येथे करण्यात आली, त्याचा नोंदणी क्रं-MH-36/L-5350 असा आहे. सदर ट्रॅक्टर हा जानेवारी, 2014 मध्ये निर्मित असून तो 40 हॉर्स पॉवरचा आहे.
तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 1 कडून विकत घेतलेल्या ट्रॅक्टर ओनर्स बुक 11 प्रमाणे सदर ट्रॅक्टरची वॉरन्टी 24 महिने किंवा 2200 कामाचे तास यापैकी जे अगोदर घडेल त्या प्रमाणे होती. त्याने विकत घेतलेला ट्रॅक्टर 500 तास चालल्या नंतर ट्रॅक्टरचे मोठे दोन्ही टायर आतल्या बाजुने अर्धवट घासल्या केले, सदर बाब त्याचे लक्षात आल्या नंतर त्याने त्याची माहिती एप्रिल महिन्याचे शेवटचे आठवडयात वि.प.क्रं 1 विक्रेत्याला दिली व ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 विक्रेत्यास शोरुम मध्ये दाखविला, त्यावेळी वि.प.क्रं 1 विक्रत्याने अपोलो टायर कंपनीच्या इंजिनियरला शोरुम मध्ये बोलाविले, सदर इंजिनियरने ट्रॅक्टरचे दोन्ही टायर काढून पाहणी केली व निरिक्षणा अंती असं सांगितले की, ट्रॅक्टरचे निर्मिती मध्ये दोष आहे. विरुध्दपक्षाचे विनंती वरुन तक्रारकर्त्याने सदर ट्रॅक्टर काही दिवस चालविला त्यामुळे ते टायर अधिकच घासल्या गेल्याने त्याची सुचना पुन्हा वि.प.क्रं 1 विक्रेत्यास दिली असता त्याने शोरुम मधून दिनांक-05 जुलै, 2015 रोजी मेकॅनिकला तक्रारकर्त्याचे घरी पाठविले त्याने ट्रॅक्टरची पाहणी करुन शोरुम मध्ये आणण्याची विनंती केली. त्याप्रमाणे तक्रारकर्त्याने दिनांक-06 जुलै, 2015 रोजी सदर ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे शोरुम मध्ये आणला, त्यावेळी ट्रॅक्टर 1000 तास चालला होता. तपासणी केल्या नंतर वि.प.क्रं 1 विक्रेत्याने नविन टायर लावण्याचा सल्ला दिला आणि नविन टायर लावल्या नंतरही ते घासल्या गेलेत तर ट्रॅक्टर मध्ये दोष आहे असे समजण्यात येऊन त्याऐवजी नविन ट्रॅक्टर देण्यात येईल असे सांगितले व टायर विकत घेण्यासाठी तक्रारकर्त्याला रुपये-9000/- दिलेत. वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे शब्दावर विश्वास ठेऊन तक्रारकर्त्याने ट्रॅक्टर परत घेतला आणि त्यानंतर खालसा ऑटोमोबाईल्स, देसाईगंज येथून गुड ईअर कंपनीचे टायर रुपये-34,000/- मध्ये विकत घेऊन सदर ट्रॅक्टरला लावले परंतु नविन टायर बसविल्या नंतर ते सुध्दा दोन ते तीन दिवसात घासायला लागले असता त्याने त्या बाबतची सुचना वि.प.क्रं 1 विक्रेत्यास दुरध्वनीवरुन दिला, त्यावेळी वि.प.क्रं 1 याने इंजिनियर पाठवितो असे आश्वासन दिले परंतु कोणताही इंजिनियर पाठविला नाही, यावरुन वि.प. क्रं 1 विक्रेता टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, सदर ट्रॅक्टरची बनावट ही दोषपूर्ण असल्याने ट्रॅक्टरचे टायर हे आतील बाजूने घासत होते, ट्रॅक्टर मध्ये दोष असलयाने त्याचा उपयोग शेतीचे कामासाठी तसेच चिखल करण्यासाठी होत नव्हता, परिणामी त्याला दुसरी कडून ट्रॅक्टर आणून शेतात नांगरणी करावी लागली व त्यासाठी 30,000/- ते 40,000/- एवढा खर्च आला. हमीच्या कालावधीत ट्रॅक्टर केवळ 1000 तास चालला असताना त्यास दोन टायरच्या जोडया घ्याव्या लागल्यात व त्या करीता रुपये-70,000/- खर्च लागला, त्यामुळे त्याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅक्टर मधील दोषामुळे त्याला अतिरिक्त खर्च करावा लागला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षां कडून ट्रॅक्टर विकत घेतलेला असल्याने तो विरुध्दपक्षांचा ग्राहक होतो परंतु विरुध्दपक्षांनी तयाला दोषपूर्ण सेवा दिली. त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्यास वकील श्री डी.के.वानखेडे यांचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस मिळूनही वि.प.क्रं 1 विक्रेत्याने कोणतेही उत्तर दिले नाही वा प्रतिसाद दिला नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत ग्राहक तक्रार दोन्ही विरुध्दपक्षा विरुध्द ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
(01) विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीचा उपरोक्त नमुद वर्णनातीत ट्रॅक्टर दोषपूर्ण असल्याने तो बदलवून त्याऐवजी नविन ट्रॅक्टर त्याला देण्यात यावा अथवा त्याने विकत घेतलेल्या दोषपूर्ण ट्रॅक्टरची संपूर्ण किम्मत खरेदी दिनांका पासून व्याजासह त्याला परत करण्याचे आदेशित व्हावे.
(02) विरुध्दपक्षांच्या दोषपूर्ण सेवेमुळे त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे.
(03) या शिवाय त्याला ट्रॅक्टरचे टायर खरेदीसाठी आलेला खर्च रुपये-34,000/- तसेच दुसरी कडून ट्रॅक्टर आणून शेतीचे कामा करीता लागलेला खर्च रुपये-40,000/- अशा रकमा विरुध्दपक्षां कडून देण्याचे आदेशित व्हावे. तसेच तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षां कडून देण्यात यावा.
(04) या शिवाय योग्य ती दाद त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03 विरुध्दपक्ष क्रं 1 वादातील ट्रॅक्टर विक्रेत्याने ग्राहक मंचा समोर उपस्थित होऊन लेखी उत्तर पान क्रं 50 ते 54 वर दाखल केले. त्याने आपले लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने त्याचे कडून विकत घेतलेल्या ट्रॅक्टर ओनर्स सर्व्हीस बुक 11 मध्ये सदर ट्रॅक्टरची वॉरन्टी ही 14 महिने किंवा 2200 कामाचे तास यापैकी जे अगोदर घडेल त्या प्रमाणे होती असे नमुद केले. सदर वॉरन्टी ही ट्रॅक्टर, टॅफे पाटर्स, इंजिन, गेअर बॉक्स, रेअर ट्रान्स मशीन, हायड्रोलीक्स केबल इत्यादीचीच वॉरन्टी ही 24 महिने किंवा 2200 कामाचे तास या प्रमाणे असते परंतु वाहनाचे टायर, बॅटरी, एफ.आय.पी., ऑल्टनेटर सेल्फ स्टार्टर इत्यादीची भागाची निर्माता कंपनी वेगळी असते व त्या कंपनी नुसार वॉरन्टी असते. तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या ट्रॅक्टर हा 500 तास चालविल्या नंतर ट्रॅक्टरचे दोन्ही मोठे टायर हे आतील बाजूने अर्धवट घासल्या गेल्याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्त्याने एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडया मध्ये वि.प.क्रं 1 चे शोरुम मध्ये अपोलो टायर कंपनीचे इंजिनियरला सदर ट्रॅक्टर दाखविला होता व इंजिनियरने दोन्ही टायरची पाहणी केली होती ही बाब मान्य केली. परंतु अपोलो टायर कंपनीचे इंजिनियरने त्यावेळी सदर ट्रॅक्टरच्या बनावट मध्ये दोष असल्याचे सांगितल्याची बाब नामंजूर केली. वि.प.क्रं 1 विक्रेत्याने पुढे असे नमुद केले की, अपोलो कंपनीचे इंजिनियरने ज्यावेळी ट्रॅक्टर, ट्राली व टायरचे निरिक्षण केले त्यावेळी टायरची असमानतर झीज झालेली असल्याचे दिसून आले व त्याचे कारण सदर ट्रॅक्टरला लावलेली ट्राली सदोष असून ट्रॉलीचा जास्त वापर केल्यामुळे सदरच्या ट्रायर्सची झाली झाल्याचा अवाल सदर इंजिनियरने दिला. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याचे मेकॅनिकचे सांगण्या वरुन सदर ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 चे शोरुम मध्ये दिनांक-06 जुलै, 2015 रोजी तपासणीसाठी आणला होता, त्यावेळी ट्रॅक्टर हा 1000 तास चालला होता या बाबी नामंजूर केल्यात. पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने दिनांक-06 जुलै 2015 रोजी सदर ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 चे शोरुम मध्ये आणला होता व तो दिनांक-11 जुलै, 2015 पर्यंत शोरुम मध्ये तपासणीसाठी ठेवला होता, सदरचे कालावधीत तक्रारकर्त्याचे भाडयाचे नुकसान झाल्याने त्याने नुकसान भरपाई म्हणून रुपये-9000/- ची मागणी केली होती, वि.प.क्रं 1 चे ख्यातीला धक्का बसू नये म्हणून रुपये-9000/- त.क.ला देण्यात आले होते. वि.प.क्रं 1 ने तक्रारकर्त्याला कधीही नविन टायर बसवून देण्याचा सल्ला दिला नव्हता. वस्तुतः त्याने तक्रारकर्त्याला सदोष ट्राली बदलविण्याची सुचना दिली होती. आपल्या विशेष कथनात वि.प.क्रं 1 ट्रॅक्टर विक्रेत्याने असे नमुद केले की, सदर ट्रॅक्टरला अपोलो कंपनीचे टायर बसविले होते व टायरला झीज असल्याची तक्रार असल्याने अपोलो कंपनीचे इंजिनियरने निरिक्षण केले होते, अशा परिस्थितीत अपोलो कंपनीला तक्रारीत प्रतिपक्ष करणे जरुरीचे आहे, त्यामुळे तक्रार निकाली काढण्यास मदत झाली असती परंतु तक्रारकर्त्याने अपोलो कंपनीला प्रस्तुत तक्रारीत प्रतिपक्ष केलेले नाही. सदर ट्रॅक्टरच्या मागच्या टायरला कोणताही अलाईनमेंट राहत नाही. रेअर अॅक्सला मध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसते तथापी मागच्या एक्सला मध्ये बेरींग असते व त्यामुळे टायर मध्ये झीज होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. जर ट्रॅक्टर मध्ये दोष असता तर तो एवढे तास चाललाच नसता व आता पर्यंत त्याचे मागचे बेअरींग व एक्सल तुटले असते. तक्रारकर्त्याने केवळ त्याचे कडून ट्रॅक्टर विकत घेतला होता परंतु त्याची ट्राली विकत घेतली नव्हती, त्याने जुनी दोषपूर्ण ट्राली ट्रॅक्टरला लावून तो चालविला असल्याने टायरची झाज झाली. ट्राली ट्रॅक्टरला जोडल्या जाते आणि उतार चढावाचे वेळी ब्रेक लागल्याने त्याचा दबाव ट्रालीचे मध्य भागावर आल्याने टायरवर ताण पडून झीज होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरला जुनी दोषपूर्ण ट्राली लावल्याने टायरची झाली, त्यामुळे ट्रॅक्टर दोषपूर्ण होता असे म्हणता येत नाही, करीता तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 1 ट्रॅक्टर विक्रेत्याने केली.
04. विरुध्द पक्ष क्रं 2 ट्रॅक्टर निर्माता कंपनीने आपले लेखी उत्तर पान क्रं 44 ते 48 वर दाखल केले. त्याने तक्रारकर्त्याने तक्रारीत वर्णन केलेला ट्रॅक्टर हा विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून एकूण रुपये-6,30,000/- मध्ये खरेदी केल्याची बाब मान्य केली. ट्रॅक्टर ओनर्स सर्व्हीस बुक11 प्रमाणे ट्रॅक्टरची वॉरन्टी 14 महिने किंवा 2200 कामाचे तास यापैकी जे अगोदर घडेल त्या प्रमाणे असल्याची बाब मान्य केली. ट्रॅक्टर टॅफे पार्टस, इंजीन, गेअरबॉक्स, रेअर ट्रान्समीशन, हायड्रोलीक्स केबल इत्यादीची 24 महिने किंवा 2200 कामाचे तास या प्रमाणे वॉरन्टी असते मात्र् टायर, बॅटरी, एफ.आय.पी. आल्टरनेटर, सेल्फ स्टार्टर या भागाची कंपनी वेगळी असल्याने त्यावर कंपनीचे नियमा प्रमाणे वॉरन्टी असते. तक्रारकर्त्याने विकत घेतलेला ट्रॅक्टर हा 500 तास चालविल्या नंतर ट्रॅक्टरचे मोठे दोन्ही टायर आतल्या बाजूने अर्धवट घासल्या गेले ही बाब नामंजूर केली. एप्रिल महिन्याचे शेवटच्या आठवडयात त.क.ने वि.प.क्रं 1 विक्रेत्यास टायर घासल्याची माहिती दिली होती ही बाब नामंजूर केली. अपोलो कंपनीचे इंजिनियरने टायरची शोरुम मध्ये येऊन पाहणी केली ही बाब मान्य केली मात्र सदर इंजिनीयरने ट्रॅक्टरचे बनावट मध्ये दोष असल्या बाबत सांगितल्याची बाब नामंजूर केली. सदर अपोलो टायर कंपनीचे इंजिनियरने ट्रॅक्टर व ट्रालीची पाहणी केली असता त्याचे निदर्शनास आले की, असमान्तर झीज झालेली असून त्याचे कारण ट्रॅक्टरला लावलेली ट्राली दोषपूर्ण असल्याने व ट्रालीचा जास्त वापर केल्याने सदर टायरची झाली असल्याचा अहवाल इंजिनियरने दिला. प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करण्यापूर्वी तक्रारकर्त्याने वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीला नोटीस पाठविली नाही. आपले विशेष कथनात नमुद केले की, ट्रॅक्टरला अपोलो कंपनीचे टायर लागलेले आहेत व अपोलो कंपनीचे इंजिनियरने ट्रॅक्टरचे निरिक्षण केलेले आहे त्यामुळे अपोलो कंपनीला प्रतिपक्ष करणे आवश्यक होते परंतु योग्य त्या प्रतिपक्षाच्या अभावा मुळे तक्रार खारीज होण्यास पात्रआहे. सदर ट्रॅक्टरच्या मागील टायरला कोणतीही अलाईनमेंट राहत नाही. रेअर एक्सल मध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसते तथापी मागच्या एक्सल मध्ये बेअरींग असते त्यामुळे टायर मध्ये झीज होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. ट्रॅक्टर मध्ये दोष असता तर तो एवढे तास चाललाच नसता व आता पर्यंत त्याचे मागचे बेअरींग एक्सल तुटले असते. तक्रारकर्त्याने केवळ त्याचे कडून ट्रॅक्टर विकत घेतला होता परंतु त्याची ट्राली विकत घेतली नव्हती, त्याने जुनी दोषपूर्ण ट्राली ट्रॅक्टरला लावून तो चालविला असल्याने टायरची झाज झाली. ट्राली ट्रॅक्टरला जोडल्या जाते आणि उतार चढावाचे वेळी ब्रेक लागल्याने त्याचा दबाव ट्रालीचे मध्य भागावर आल्याने टायरवर ताण पडून झीज होते. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरला जुनी दोषपूर्ण ट्राली लावल्याने टायरची झाली, त्यामुळे ट्रॅक्टर दोषपूर्ण होता असे म्हणता येत नाही, करीता तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्ष क्रं 2 ट्रॅक्टर निर्माता कंपनीचे वतीने करण्यात आली.
05 तक्रारकर्त्याने पान क्रं 14 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने ट्रॅक्टरचे कोटेशन, आरटीओ नोंदणी प्रमाणपत्र, कराची पावती, डी.डी. प्रत, बॅंकेतील खाते उतारा प्रत, ट्रॅक्टरचे इतर साहित्याची यादी, खालसा ऑटोमोबाईलचे टायरचे बिल, त.क.ने वि.प.ला पाठविलेली नोटीस अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तसेच पान क्रं 55 ते 58 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
06 वि.प.क्रं 1 विक्रेत्याने लेखी उत्तर पान क्रं 50 ते 54 वर दाखल केले. या शिवाय कोणतेही दसतऐवज दाखल केले नाहीत.
07 वि.प.क्रं 2 निर्मात्याने लेखी उत्तर पान क्रं 44 ते 48 वर दाखल केले. वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीने पान क्रं 60 वरील दस्तऐवज यादी नुसार पान क्रं 61 वर अपोलो टायर कंपनीचे इंजिनिअरचे अहवालाची प्रत दाखल केली. तसेच पान क्रं 62 ते 64 वर लेखी युक्तीवाद दाखल केला.
08 तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्तऐवज व लेखी युक्तीवाद तसेच दोन्ही विरुध्दपक्षांची लेखी उत्तरे, वि.प.क्रं 2 लेखी युक्तीवाद आणि दाखल इंजीनियरचा अहवाल याचे ग्राहक मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद यावरुन ग्राहक मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे देण्यात येतो.
-निष्कर्ष-
09 तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या कडून, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्मित कंपनीचा New TAFEE Tractor MF 7250 with standard Accessories, Engine No.-S-325-F-73811, Chassis No.-MEAOAD-05-EE-2003619 एकूण रुपये-6,30,000/- मध्ये विकत घेतल्याची बाब विरुध्दपक्षांना मान्य आहे.
10. तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे वि.प.क्रं 1 कडून विकत घेतलेल्या ट्रॅक्टर ओनर्स बुक 11 प्रमाणे सदर ट्रॅक्टरची वॉरन्टी 24 महिने किंवा 2200 कामाचे तास यापैकी जे अगोदर घडेल त्या प्रमाणे होती. त्याने विकत घेतलेला ट्रॅक्टर 500 तास चालल्या नंतर ट्रॅक्टरचे मोठे दोन्ही टायर आतल्या बाजुने अर्धवट घासल्या केले, सदर बाब त्याचे लक्षात आल्या नंतर त्याने त्याची माहिती एप्रिल महिन्याचे शेवटचे आठवडयात वि.प.क्रं 1 विक्रेत्याला दिली व ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 विक्रेत्यास शोरुम मध्ये दाखविला, त्यावेळी वि.प.क्रं 1 विक्रत्याने अपोलो टायर कंपनीच्या इंजिनियरला शोरुम मध्ये बोलाविले, सदर इंजिनियरने ट्रॅक्टरचे दोन्ही टायर काढून पाहणी केली व निरिक्षणा अंती असे सांगितले की, ट्रॅक्टरचे बनावटी मध्ये दोष आहे. तक्रारकर्त्याने दिनांक-06 जुलै, 2015 रोजी सदर ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे शोरुम मध्ये आणला, त्यावेळी ट्रॅक्टर 1000 तास चालला होता. तपासणी केल्या नंतर वि.प.क्रं 1 विक्रेत्याने नविन टायर लावण्याचा सल्ला दिला आणि नविन टायर लावल्या नंतरही ते घासल्या गेलेत तर ट्रॅक्टर मध्ये दोष आहे असे समजण्यात येऊन त्याऐवजी नविन ट्रॅक्टर देण्यात येईल असे सांगितले व टायर विकत घेण्यासाठी तक्रारकर्त्याला रुपये-9000/- दिलेत. वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे शब्दावर विश्वास ठेऊन त्याने ट्रॅक्टर परत घेतला आणि त्यानंतर खालसा ऑटोमोबाईल्स, देसाईगंज येथून गुड ईअर कंपनीचे टायर रुपये-34,000/- मध्ये विकत घेऊन सदर ट्रॅक्टरला लावले परंतु नविन टायर बसविल्या नंतर ते सुध्दा दोन ते तीन दिवसात घासायला लागले असता त्याने त्या बाबतची सुचना वि.प.क्रं 1 विक्रेत्यास दुरध्वनीवरुन दिला, त्यावेळी वि.प.क्रं 1 याने इंजिनियर पाठवितो असे आश्वासन दिले परंतु कोणताही इंजिनियर पाठविला नाही. तक्रारकर्त्याने पुराव्यार्थ पान क्रं 23 वर खालसा ऑटोमोबाईल्स देसाईगंज वडसा जिल्हा गडचिरोली यांनी टायर खरेदी बाबत दिनांक-11.07.2015 रोजीचे रुपये-34,000/- चे बिलाची प्रत दाखल केली.
11 विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्याने लेखी उत्तरात तक्रारकर्त्याने दिनांक-06 जुलै 2015 रोजी सदर ट्रॅक्टर त्याचे शोरुम मध्ये आणला होता व तो दिनांक-11 जुलै, 2015 पर्यंत शोरुम मध्ये तपासणीसाठी ठेवला होता, सदरचे कालावधीत तक्रारकर्त्याचे भाडयाचे नुकसान झाल्याने त्याने नुकसान भरपाई म्हणून रुपये-9000/- ची मागणी केली होती, वि.प.क्रं 1 चे ख्यातीला धक्का बसू नये म्हणून रुपये-9000/- त.क.ला देण्यात आले होते. परंतु केवळ 05 दिवसांसाठी कोणीही व्यक्ती रुपये-9000/- भाडयाचे देऊ शकत नाही असा सर्वसाधारण व्यवहारातील अनुभव आहे. याचाच अर्थ असा होतो की, ट्रॅक्टरचे बनावटी मध्ये दोष असल्याची खात्री वि.प.क्रं 1 विक्रेत्याची झालेली असल्याने त्याने टायर खरेदीसाठी सध्याचे रुपये-9000/- त.क.ला दिले होते असा निष्कर्ष काढण्यास काहीही हरकत नाही.
12. दोन्ही विरुध्दपक्षांनी घेतलेल्या बचावा प्रमाणे ट्रॅक्टर टॅफे पार्टस, इंजीन, गेअरबॉक्स, रेअर ट्रान्समीशन, हायड्रोलीक्स केबल इत्यादीची 24 महिने किंवा 2200 कामाचे तास या प्रमाणे वॉरन्टी असते मात्र टायर, बॅटरी, एफ.आय.पी. आल्टरनेटर, सेल्फ स्टार्टर या भागाची कंपनी वेगळी असल्याने त्यावर त्या कंपनीचे नियमा प्रमाणे वॉरन्टी असते. अपोलो टायर कंपनीचे इंजिनियरने ट्रॅक्टर व ट्रालीची वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे शोरुम मध्ये येऊन पाहणी केली व त्याप्रमाणे आपला अहवाल सादर केला. तक्रारकर्त्याने ट्रॅक्टरला जुनी दोषपूर्ण ट्राली लावल्याने टायरची झीज झाली, त्यामुळे ट्रॅक्टर दोषपूर्ण होता असे म्हणता येत नाही असे अहवालात नमुद केले.
13 दोन्ही विरुध्दपक्षां तर्फे अपोलो टायर कंपनीचे इंजिनियरने दिलेल्या अहवालावर भिस्त ठेवलेली असल्याने आम्ही वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीने पान क्रं 61 वर दाखल सदर अहवालाचे अवलोकन केले. सदर अहवाल हा दिनांक-17 एप्रिल, 2015 रोजीचा असून त्यामध्ये पुढील प्रमाणे नमुद केलेले आहे- Customer Complaint-uneven wear on rear right tyre. Observation-Prolonged usage on trolley recommended rotation of tyre. सदर अहवाल हा अपोलो टायर कंपनीचे इंजिनीयरने दिलेला आहे, सदर इंजिनियरला विरुध्दपक्षांनी ट्रॅक्टर निरिक्षणासाठी बोलाविले होते, सर्वसाधारण व्यवहारात कोणताही इंजिनियर हा त्याचे संपर्कात असलेल्या कंपनी विरुध्द अहवाल देणार नाही. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 निर्माता कंपनीने सदर इंजिनियरचे शपथपत्र पुराव्यार्थ सादर केलेले नाही. ट्रॅक्टर हा हमी कालावधीत होता आणि घासलेले टायर बदलवून त्याऐवजी हमी कालावधीत नव्याने टायर खरेदी केल्याचे बिल तक्रारकर्त्याने पुराव्यार्थ दाखल केलेले आहे परंतु नविन टायर खरेदी नंतर सुध्दा टायर घासल्या गेलेत. हमी कालावधीत टायर घासल्या गेल्या नंतर नविन टायर बसविल्या नंतर सुध्दा टायर घासणे सुरुच होते, याचाच अर्थ ट्रॅक्टरचे बनावटी मध्ये उत्पादकीय दोष आहे. विरुध्दपक्षांचा बचाव की, दोषपूर्ण ट्राली बसविल्यामुळे ट्रॅक्टरचे मोठे टायर घासल्या गेलेत यामध्ये काहीही तथ्य दिसून येत नाही. अपोलो टायर कंपनीचे इंजिनियरने ट्रालीचा जास्तीत जास्त दिर्घकाळासाठी वापर झाल्याने टायर घासल्या गेलेत असा जो निष्कर्ष काढला त्यामध्ये सुध्दा काहीही तथ्य दिसून येत नाही. ट्रालीमध्ये नेमका काय दोष होता याचे विस्तृत विवेचन अहवाला मध्ये दिलेले नाही. अशापरिस्थितीत तक्रारकर्ता हा दोषपूर्ण ट्रॅक्टर ऐवजी नविन ट्रॅक्टर परत मिळण्यास पात्र आहे. तसेच दोषपूर्ण ट्रॅक्टरमुळे त्याला झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च विरुध्दपक्षा कडून मिळण्यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे.
14 उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन, ग्राहक मंचाव्दारे प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
-अंतिम आदेश-
(01) तक्रारकर्त्याची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 ट्रॅक्टर विक्रेता आणि विरुध्दपक्ष क्रं 2 ट्रॅक्टर निर्माता कंपनी याचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेत्या व्दारे निर्गमित इनव्हाईस क्रं 254/15-16 दिनांक-20 जानेवारी, 2015 अनुसार वि.प.क्रं 2 व्दारा निर्मित उत्पादकीय दोष असलेला व तक्रारकर्त्यास विक्री केलेला ट्रॅक्टर विरुध्दपक्ष क्रं 1 विक्रेता याला तक्रारकर्त्याने परत करावा व त्याऐवजी विरुध्दपक्ष वि.प.क्रं 2 निर्मिता कंपनीने, वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे मार्फतीने, त्याच मॉडलेचा नविन ट्रॅक्टर तक्रारकर्त्याला दयावा व नव्याने बिल देऊन नव्याने वॉरन्टीचा दस्तऐवज दयावा, असे वि.प.क्रं 1 व 2 यांना आदेशित करण्यात येते. वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीने, वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे मार्फतीने उत्पादकीय दोष असलेला ट्रॅक्टर परत घ्यावा.
(03) मुद्दा क्रं-(02) मध्ये आदेशित केल्या प्रमाणे असा नविन ट्रॅक्टर तक्रारकर्त्याला बदलवून देणे शक्य नसल्यास त्या परिस्थितीत तक्रारकर्त्या कडून उत्पादकीय दोष असलेल्या ट्रॅक्टरचे विक्रीव्दारे वि.प.क्रं 1 विक्रेत्याने स्विकारलेली एकूण रक्कम रुपये-6,30,000/- (अक्षरी रुपये सहा लक्ष तीस हजार फक्त) वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीने तक्रारकर्त्याला परत करावी आणि सदर रकमेवर तक्रार दाखल दिनांक-01 जानेवारी, 2016 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-12 टक्के दराने येणारे व्याज तक्रारकर्त्याला दयावे. तक्रारकर्त्याला व्याजासह रक्कम प्राप्त झाल्या वर त्याने दोषपूर्ण ट्रॅक्टर वि.प.क्रं 1 विक्रेत्याचे ताब्यात दयावा व त्याचे जवळून वि.प.क्रं 2 निर्माता कंपनीने सदर ट्रॅक्टर आपले ताब्यात घ्यावा.
(04) तक्रारकर्त्याला झालेल्या शारिरीक मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-20,000/- (अक्षरी रुपये विस हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला दयावेत.
(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांनी अंतिम आदेशात नमुद केल्या नुसार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 45 दिवसांचे आत करावे.
(06) सदर निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत सर्व पक्षांना निःशुल्क उपलब्ध करुन द्दावी.
(07) तक्रारीचे ब व क संचाची प्रत तक्रारकर्त्याला परत करण्यात यावी.