Maharashtra

Nagpur

CC/323/2019

SHRI. ASHISH SHALIKRAM KAMDE - Complainant(s)

Versus

M/S. K. D. TRADING COMPANY THROUGH DIRECTOR GURUVINDAR PALSINGH - Opp.Party(s)

ADV. P.V. WANKAR

11 Jan 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/323/2019
( Date of Filing : 11 Jun 2019 )
 
1. SHRI. ASHISH SHALIKRAM KAMDE
R/O. PLOT NO. 22, DEVASHISH, GUDADHE LAYOUT, SAPTSHRUNGI JEWELLERS, SWAWLAMBI NAGAR, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. K. D. TRADING COMPANY THROUGH DIRECTOR GURUVINDAR PALSINGH
183-A, NAPIR TOWN, JABLPUR,
JABLPUR
MP
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. P.V. WANKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Jan 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत प्रस्‍तुत तक्रार दाखल केली असून त्‍यात असे नमूद केले की, त्‍याने स्‍वतःच्‍या उपजीविकाकरिता दूध प्रक्रिया सयंत्र उभा करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाकडून दूध प्रक्रिया उपक्रमाकरिता लागणा-या सर्व मशीन संबं‍धी निविदा मागविल्‍या. विरुध्‍द पक्षाने ई- मेल द्वारे तक्रारकर्त्‍याला दुसरी व्‍यक्‍ती ब्रिज राजसिंह यांच्‍या नांवे असलेली निविदा दि.28.11.2016 ला पाठविली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सांगितले की, ते विनामुल्‍य मशिनची स्‍थापना करुन देतील. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 10.03.2017 ला ई-मेल द्वारे बॅंक खाते विषयी माहिती मागितली. विरुध्‍द पक्षाने पुरविलेल्‍या बॅंक खातेनुसार तक्रारकर्त्‍याने  त्‍याचे Citibank खाता क्रं. 5763865117 मधून विरुध्‍द पक्षाच्‍या खात्‍यामध्‍ये मशीन खरेदी पोटी आगाऊ रक्‍कम म्‍हणून दि. 14.3.2017 ला रुपये 2 लाख दि. 16.03.2017 ला रुपये 2 लाख,  दि.17.03.2017 ला रुपये एक लाख आय.एम.पी.एस. द्वारे जमा केले. तसेच तक्रारकर्त्‍याच्‍या AXIS BANK खाते क्रं.  911010037372840 मधून मशीन खरेदी पोटी दि. 14.03.2017 ला रुपये 2,00,000/-,  दि. 16.03.2017 रुपये 2,00,000/- व दि. 17.03.2017 ला रुपये 1,00,000/- असे एकूण रुपये 10,00,000/- विरुध्‍द पक्षाच्‍या खात्‍यात आय.एम.पी.एस. द्वारे जमा केले होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने मे-2017 ला दूध प्रक्रिया उप‍क्रमातील कोल्‍ड स्‍टोरेज मशीन पाठविली, परंतु इतर मशीन पाठविल्‍या नाहीत. तक्रारकर्त्‍याने इतर मशीन पाठविण्‍याबाबत अनेक वेळा विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला असता त्‍याने प्रत्‍येक वेळेस टाळाटाळ करुन उडवाउडवीची उत्‍तरे दिली. तक्रारकर्ता मशीन खरेदी पोटी उर्वरित असलेली रक्‍कम विरुध्‍द पक्षाला अदा करण्‍यास तयार होता परंतु विरुध्‍द पक्षाने  दूध प्रक्रिया सयंत्रना मधील पहिल्‍या टप्‍प्‍यातील मशीन न पाठविता शेवटच्‍या टप्‍्प्‍यातील मशीन पाठविली. तक्रारकर्त्‍याने कोल्‍ड स्‍टोरेज मशिनची पाहणी  केली असता त्‍याच्‍या निदर्शनास आले की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला जुनी वापरलेली मशीन पाठवून त्‍याची फसवणूक केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 28.03.2019 ला विरुध्‍द पक्षाला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याद्वारे मशीन खरेदी पोटी दिलेल्‍या रक्‍कमेची मागणी केली. विरुध्‍द पक्षाला सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही त्‍यावर कुठलीही दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल केली.
  3.      तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अशी मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून मशीन विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 10,00,000/-   व त्‍यावर दि. 17.03.2017 पासून द.सा.द.शे. 18 दराने व्‍याज प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.
  4.      विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस दि.09.12.2019 ला प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द दि. 18.02.2020 ला एकतर्फी प्रकरण चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5.      तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले  व त्‍यावरील कारणमिमांसा खालीलप्रमाणे नमूद केले.

             मुद्दे                                           उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ           होय

 

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ॽ             होय

 

  1.  काय आदेश ॽ                               अंतिम आदेशानुसार     

                

  •                                                                            कारणमिमांसा

 

  1.  मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचा उदरनिर्वाह करण्‍याकरिता  विरुध्‍द पक्षाकडून दूध प्रक्रिया सयंत्र उभारण्‍याकरिता (Milk processing plant)  लागणा-या मशिनची खरेदी करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाने पुरविलेल्‍या खाते क्रमांक मध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या सी.टी.बॅंक व अॅक्सिस बॅंक मध्‍ये असलेल्‍या खात्‍यामधून आय.एम.पी.एस. द्वारे रुपये 10,00,000/- जमा केले असल्‍याबाबतचे दस्‍तावेज दाखल केले आहे. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाला मशीन विक्रीपोटी रुपये 10,00,000/- एवढी रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर निव्‍वळ दूध प्रक्रिया उपक्रमाकरिता पहिल्‍या टप्‍पयात लागणारे सयंत्र न पाठविता शेवटच्‍या टप्‍पयात वापरणारे कोल्‍ड स्‍टोरेज यंत्र पाठविले. परंतु सदरचे यंत्र हे देखील जुने वापरलेले असल्‍याचे तक्रारकर्त्‍याच्‍या निदर्शनास आल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधून मशीन विक्री पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती केली. त्‍यावर ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला उर्वरित सयंत्र पाठविलेले नाही किंवा मशीन विक्री पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम ही परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापार प्रथांचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍ट पणे दिसून येते.

                    सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                                  अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून मशिन विक्री पोटी स्‍वीकारलेली रक्‍कम  रुपये 10,00,000/- त्‍वरित तक्रारकर्त्‍याला अदा करावी व सदरहू रक्‍कमेवर दि. 17.03.2017 पासून ते प्रत्‍यक्ष अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला अदा करावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरीलप्रमाणे संपूर्ण रक्‍कम व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला दिल्‍यानंतर, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेले कोल्‍ड स्‍टोरेज सयंत्र स्‍वखर्चाने परत घेऊन जाण्‍यास तक्रारकर्त्‍याने मदत करावी.   

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या विरुध्‍द पक्ष करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.