::: आदेश निशाणी क्र.1 वर ::: (मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 31.10.2011) 1. अर्जदाराने, सदर दरखास्त, ग्राहक संरक्षण कयदा 1986 चे कलम 27 अन्वये गैरअर्जदाराविरुध्द दाखल केले असून, गैरअर्जदाराविरुध्द कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी, अशी प्रार्थना केली आहे. 2. अर्जदार/फिर्यादीची दरखास्त नोंदणी करण्यात आले. दरखास्त न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व त्याचे प्रतिनिधी आणि गैरअर्जदार हजर होऊन नि.15 नुसार दरखास्तमधील वाद संपुष्टात आला आहे, अर्जदारास गैरअर्जदाराकडून रक्कम रुपये 24,000/- प्राप्त झाली, करीता दरखास्त परत घेण्यात येते, अशी संयुक्त पुरसीस दाखल केली. तसेच, अर्जदार व त्याचे प्रतिनिधी यांनी नि.16 नुसार सदर दरखास्त परत घेण्याची परवानगी मिळण्याबाबत अर्ज दाखल केला व सोबत नि.17 नुसार रुपये 24,000/- प्राप्त झाल्याची पावती दाखल केल्या. नि.16 वर दि.21.10.2011 ला अर्ज मंजूर करुन, दरखास्त पूर्ण कोरम पुढ ठेवण्यात यावी, असा आदेश पारीत केला. 3. आज रोजी, अर्जदार/फिर्यादीने पुरसीस नि.क्र.15 व अर्ज नि.क्र. 16 नुसार दरखास्त परत घेऊन, गैरअर्जदार/आरोपी विरुध्द दरखास्त पुढे चालवू इच्छीत नसल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश // (1) अर्जदाराची दरखास्त परत घेतल्यामुळे निकाली काढण्यात येत आहे. (By way of withdrawal) (2) आरोपी/गैरअर्जदार यांनी दिलेले बेल बॉंन्ड रद्द करण्यात येत आहे. (Their Bail Bond Stand Cancelled) चंद्रपूर, दिनांक :31/10/2011. |