Maharashtra

Nagpur

CC/10/539

Subhash Bhalchandra Dixit - Complainant(s)

Versus

M/s. IndusInd Bank - Opp.Party(s)

Adv. Amit Khare

30 Sep 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/10/539
 
1. Subhash Bhalchandra Dixit
Plot No. 90, Opp. Gajanan High School, Ayodhya Nagar, Nagpur
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. IndusInd Bank
Shri Ram Towers, Ground Floor, Kingsway, Near NIT Office, Nagpur
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                  (पारित दिनांक : 30/09/2011)
 
1.          तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदद्याचे कलम 12 अंतर्गत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांचे विरुध्‍द दाखल करुन मंचास मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.2 ने विमा दाव्‍याचे रकमेच्‍या रुपात रु.7,94,365/- द्यावेत, त्‍यामधून रु.1,12,000/- विरुध्‍द पक्ष क्र.1 यांना द्यावेत व उर्वरित रक्‍कम तक्रारकर्त्‍यास परत करावी. गैरअर्जदार क्र.1 ने बेकायदेशिर व चुकीच्‍या पध्‍दतीने वाहन जप्‍तीची कारवाई केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याकडून एकाही पैशाची वसुली करु नये, विरुध्‍द पक्ष क्र.1 ने चुकीच्‍या पध्‍दतीचा वापर केल्‍यामुळे रु.1,00,000/- दंड व रु.5,00,000/- मानसिक, शरीरिक त्रासाकरीता द्यावे, व तक्रारीच्‍या खर्चाचे रु.1,00,000/- मिळावे अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
            तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात खालिल प्रमाणे...
2.          तक्रारकर्ता एक व्‍यावसायीक असुन त्‍याने स्‍वतःच्‍या कुटूंबाचे पालन पोषन करण्‍यांकरीता स्‍वयंरोजगार म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून टाटा कंपनीचा एम-909 ट्रक विकत घेतला. तक्रारकर्त्‍यास ट्रक घेते वेळी विरुध्‍द पक्ष क्र.1 ने रु.6,40,000/- कर्ज मंजूर केले व तक्रारकर्त्‍याने रु.85,000/- गुंतविले व ट्रकची खरेदी केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 ला दरमहा मासिक रु.18,300/- प्रमाणे हप्‍ता द्यावयाचा होता व तो त्‍याने अपघात होईपर्यंत नियमीतपणे भरला. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 कडून खरेदी केलेला ट्रक नं. एमएच-31, सीबी-6910 च्‍या विम्‍याची रक्‍कम रु.18,679/- देऊन विमा काढला व अपघातात नुकसान झाल्‍यास त्‍याची भरपाई विरुध्‍द पक्ष क्र.2 ने देणे बंधनकारक आहे. तकारकर्त्‍याचे वाहनाचा अपघात दि.16.11.2007 रोजी राट्रीय महामार्ग क्र.6 वर झाला व त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 ला सुचना देण्‍यांत आली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाचे मदतीने अपघातग्रस्‍त वाहन नागपूरला दुरुस्‍तीसाठी मे. मिश्रा गॅरेज येथे आणले व गॅरेजच्‍या मालकाने दुरुस्‍ती करीता रु.7,94,365/- च्‍या खर्चाचे पत्रक दिले. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने 3 ते 4 महिने पर्यंत तक्रारकर्त्‍याचे वाहनाचा सर्वे केला नाही, त्‍यामुळे जुलै-2008 पर्यंत वाहन दुरुस्‍त होऊ शकले नाही.
3.          अपघातामुळे तक्रारकर्त्‍याने मासिक हप्‍त्‍यांची रक्‍कम न भरल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 धमकी व त्रास देत होते. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने वाहनाला झालेल्‍या नुकसानीची दावा रक्‍कम देण्‍यांस नकार दिल्‍यामुळे तो विरुध्‍द पक्ष क्र.1 ची रक्‍कम भरु शकला नाही. तसेच दोन्‍ही पक्षांना तक्रारकर्त्‍याने केलेल्‍या विनंतीकडे त्‍यांनी लक्ष दिले नाही, उलटपक्षी गैरअर्जदार क्र.1 ने जानेवारी-2009 ला तक्रारकर्त्‍याचे वाहन कुठलीही सुचना न देता बेकायदेशिररित्‍या मे. मिश्रा गॅरेज मधून जप्‍त केले. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.1 ने माहिती देण्‍यांस नकार दिला व विरुध्‍द पक्ष क्र.2 ने अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाई दिली नाही.
 
4.          विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्‍याचे वाहन मातीमोल भावाने विकले व आर‍बीट्रेशन कायद्याप्रमाणे उर्वरित रकमेची कारवाई सुरु केली. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून रु.6,40,000/- एवढे कर्ज घेतले होते व रु.3,50,000/- देणे बाकी होते. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने अपघातग्रस्‍त ट्रक हा रु.2,00,000/- ला विकला. विरुध्‍द पक्ष क्र.1 चे पत्रानुसार तक्रारकर्त्‍यास रु.1,20,000/- देणे बाकी होते, म्‍हणून तक्रारकर्त्‍याने अपघातग्रस्‍त वाहनाच्‍या विमा रक्‍कम रु.7,94,365/- मधून रु.1,12,000/- विरुध्‍द पक्ष क्र.1 ला द्यावे व उर्वरीत रक्‍कम त्‍याला मिळण्‍याबाबत नमुद केले आहे.
5.          विरूध्‍द पक्ष क्र.2 चे चुकीमुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने बेकायदेशिररित्‍या वाहन विकले त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास भरपूर नुकसान झाले. तक्रारकर्त्‍यानुसार वाहनाचा अपघात नोव्‍हेंबर-2007 मध्‍ये झाला व माहिती देऊन सुध्‍दा जुलै-2008 पर्यंत सर्वे केला नाही, तसेच जानेवारी-2009 पर्यंत विरुध्‍द पक्षाने विम्‍याची रक्‍कम दिली नाही त्‍यामुळे सदर तक्रार दोन वर्षाचे आंत असल्‍याचे तक्रारकर्त्‍याने नमुद केले आहे.
6.          तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ निशाणी क्र.3 वर दाखल दस्‍तावेजांच्‍या यादीसोबत अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 10 ते 17 दस्‍तावेजांच्‍या छायांकीत प्रति दाखल केलेल्‍या आहेत.
 
7.          प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारांवर नोटीस बजावण्‍यांत आली असता, त्‍यांना नोटीस मिळाल्‍यानंतर ते मंचात हजर झाले असुन त्‍यांनी आपला लेखी जबाब खालिल प्रमाणे दाखल केलेला आहे.
 
8.          विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.1,2,3,4,5, व 6 मधील म्‍हणणे रेकॉर्डचा भाग असल्‍यामुळे उत्‍तर देण्‍याची आवश्‍यकता वाटत नसल्‍याचे नमुद केले आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने म्‍हटले आहे की, दि.17.11.2007 ला अपघात स्‍थळावर सर्वेअर नेमले होते, त्‍यानुसार श्री. गोपाल पनपालीया यांनी स्‍थळ सर्वे रिपोर्ट दि.28.11.2007 रोजी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना दिला. परंतु तक्रारकर्त्‍याने वाहनाचे इस्‍टीमेट विरुध्‍द पक्ष क्र.2 ला नागपूरला डिसेंबर-2007 रोजी वाहन शिफ्ट केल्‍यानंतर दिले. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने असेसमेंटकरीता व्‍ही.के. गर्ग, सर्वेअरची नेमणूक दि.09.12.2007 रोजी केली व दि.09.12.2007 ते 15.12.2007 पर्यंत सर्वे झाला, त्‍यामुळे सर्वे झाला नाही हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे खोटे आहे. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने अपघातग्रस्‍त वाहनाची नुकसान भरपाई देण्‍यांस नकार दिला हे म्‍हणणे नाकारले व म्‍हटले की, तक्रारकर्त्‍याला दि.29.01.2008, 13.06.2008 व 15.07.2008 रोजी पत्र पाठवुन दुरुस्‍तीचे मुळ बिल वअन्‍य काही कागदपत्रे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना देण्‍यांस सांगितले परंतु तक्रारकर्त्‍याने अजून पर्यंत सुध्‍दा मुळ बिल वअन्‍य काही कागदपत्रे सादर केली नाही. त्‍यामुळे दि.26.09.2008 रोजी तक्रारकर्त्‍याचा क्‍लेम बंद केला व त्‍याबाबतचे पत्र त्‍याला पाठविले. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याचे चुकीमुळे 2009 पर्यंत दस्‍तावेज दाखल न केल्‍यामुळे व स्‍वतः दुर्लक्ष केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षांवर खोटे आरोप लावलेले आहे.
9.          विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्‍यास रु.7,94,365/- विम्‍याची रक्‍कम देणे आहे हे चुकीचे आहे, तसेच इतर सर्व म्‍हणणे नाकारलेले आहेत. स्‍पॉट सर्वेअरनुसार दि.14.03.2008 ते 18.05.2008 पर्यंत केलेल्‍या सर्वे अहवालानुसार अंतिम नुकसानीचे मुल्‍यांकन रु.1,70,887/- रिपेअरींचे आधारावर व तक्रारकर्त्‍याव्‍दारे रिपेअरींग बिल विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे दाखल करण्‍यांचे अटीवर करण्‍यांत आले होते. परंतु तक्रारकर्त्‍याने बिल सादर न केल्‍यामुळे त्‍याने दाखल केलेला दावा हा खोटा आहे. तसेचा सदर तक्रार कालमर्यादेच्‍या आंत दाखल न केल्‍यामुळे ती खारिज करावी अशी मंचास विनंती केलेली आहे.
10.         विरुध्‍द पक्ष क्र.2 ने आपल्‍या विशेष बयाणात म्‍हटले आहे की, सन 2009 पर्यंत विरुध्‍द पक्षांनी काहीच केले नाही, हे चुकीचे आहे. विरुध्‍द पक्षांनी दोनदा सर्वेअर पाठविले होते व त्‍यांनी दि.17.11.2007, 09.12.2007, 15.12.2007 रोजी सर्वे करुन आपला रिपोर्ट दि.17.11.2007, 24.03.2008 व 18.05.2008 ला सादर केला. दि.18.05.2008 रोजीचे सर्वे रिपोर्टमध्‍ये नमुद केले आहे की, तक्रारकर्ता 3 महिन्‍यांनंतर आला व वाहन रिपेअर करण्‍याकरता तयार असल्‍यामुळे नुकसानीचे अंतिम मुल्‍यांकन रिपेअरींगचे आधारावर रु.1,70,887/- करण्‍यांत आले.
            तक्रारकर्त्‍याची तक्रार ही पॉलिसी प्रमाणे समय सिमेच्‍या आत नाही व खोटी असल्‍यामुळे ती खारिज करण्‍यांची विनंती मंचास केलेली आहे.
11.         विरेध्‍द पक्षाने उत्‍तरासोबत श्री. गोपाल पनपालिया यांचा सर्वे रिपोर्ट, फायनान्‍सर सर्वे रिपोर्ट दि.24.03.2008 व 18.05.2008, तक्रारकर्त्‍याचे पत्र दि.29.01.2008, पोलिस रिपोर्ट दि.13.07.2008, तक्रारकर्त्‍यास पाठविलेले दि.15.07.2008 चे पत्र, फाईल बंद केल्‍याबाबतचे दि.26.09.2008 व 19.09.2008 चे पत्र दाखल केलेले आहेत.
 
12.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने आपल्‍या उत्‍तरातील प्रा‍थमिक आक्षेपात संस्‍था कराराच्‍या क्‍लॉज 23 नुसार करारासंबंधाने काही विवाद असतील तर ते आरबीट्रेशन कंन्‍सीलेशन कायदा 1996 प्रमाणे सोडविण आवश्‍यक आहे. त्‍यामुळे सदर तक्रार चालविण्‍याचा मंचास अधिकार नाही व तक्रार खारिज करावी अशी मंचास विनंती केली आहे. तसेच आरबीट्रेशनची प्रक्रिया प्रलंबीत असल्‍याची बाब तक्रारकर्त्‍याने मंचापासुन लपवुन ठेवली आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्ता ट्रकचा मालक असुन त्‍याचेकडे दोन ट्रक आहेत, त्‍यामुळे स्‍वयंरोजगाराकरीता कर्ज रुपाने एम-909 ट्रक घेतला हे म्‍हणणे नाकारले. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्‍यास रु.6,40,000/- चे कर्ज मासिक हप्‍त्‍यात परतफेड करण्‍यासाठी दिलेले होते, परंतु कर्जाची परतफेड करण्‍यांत अनियमतता होती. तसेच 14 धनादेश बाऊंस झालेले होते व तक्रारकर्त्‍याने वाहनाचा अपघाताबाबत विरुध्‍द पक्ष क्र. 1 ला कळविले हे खोटे आहे असल्‍याचे नमुद केले आहे. तसेच वाहनाचे दुरुस्‍ती करता रु.7,94,365/- खर्च येणार होता हे म्‍हणणे नाकारले आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने हे ही नाकारले की मासिक हप्‍ता न भरु शकल्‍यामुळे त्‍याला त्रास दिलेला आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने म्‍हटले आहे की, दि.01.01.2009 रोजी सदर ट्रक जप्‍त केला असुन सदर ट्रक दिड वर्षांपासुन गॅरेजमध्‍ये होता, त्‍या अवधीत तक्रारकर्त्‍याने कोणतीही कारवाई केलेली नाही. सदर ट्रक दि.28.02.2009 ला ठिक करण्‍याकरीता रु.20,000/- खर्च करुन गॅरेजमधुन सोडवुन घेतला व तक्रारकर्त्‍याने नकार दिल्‍यामुळे त्‍याबाबत त्‍याला दि.12.03.2009 रोजी तक्रारकर्त्‍यास सुचना देण्‍यांत आली होती. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारकर्त्‍यास विनंती केली की, थकीत हप्‍ते नियमाप्रमाणे भरल्‍यानंतर ट्रक घेऊन जावा तसेच तकारकर्त्‍यास दिलेल्‍या दि.12.03.2009 चे सुचनेनंतर त्‍याने संपर्क साधला नाही म्‍हणून सदर वाहन रु.1,65,000/- ला विकावे लागले व त्‍याची सुचना दि.17.03.2010 रोजी तक्रारकर्त्‍यास दिली होती. तक्रारकर्त्‍यानुसार रु.6,40,000/- पैकी रु.3,50,000/- भरले हे म्‍हणणे खोटे आहे व रु.1,12,000/- ही समझोता रक्‍कम आहे हे सुध्‍दा नाकारले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.1 ने ट्रक बेकायदेशिर विकला हे सुध्‍दा म्‍हणणे नाकारले आहे. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने आपल्‍या विशेष कथनात म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याचे दोन्‍ही ट्रक बाबतची माहीती नमुद केली असुन तो वेळेवर कर्जाचे हप्‍ते भरीत नसल्‍याचे नमुद केले आहे. तसेच सदर तक्रार खोटी असल्‍यामुळे ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 26 अंतर्गत खारिज करण्‍यांची मागणी केलेली आहे.
13.         तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ करारनाम्‍याची प्रत, नोटीसची प्रत, दि.11.03.2009,12.03.2009 व 03.04.2009 चे स्‍टेटमेंट ऑफ अकाऊंट्स, आरबीट्रेशन अवार्ड, दि.20.08.2010 चे उत्‍तर इत्‍यादी दस्‍तावेज दाखल केलेले आहेत.
 
14.         तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या उत्‍तराला प्रतिउत्‍तर दाखल केले त्‍यात प्रकर्षाने त्‍यांचे म्‍हणणे नाकारले. तक्रारकर्त्‍याने म्‍हटले आहे की, श्री. व्‍ही.के. गर्ग अणि कंपनी नुसार वाहनाचे नुकसान पाहता रु.3,86,967/- द्यावे लागतील तर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला सदर रक्‍कम का दिली नाही, ही गैरअर्जदार क्र.2 चे सेवेतील त्रुटी आहे असे म्‍हटले आहे. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 ने उत्‍तरासोबत दाखल केलेले अनुक्रमे पृष्‍ठ क्र. 54,55 व 56 वरील दस्‍तावेज नोंदणीकृत डाकेव्‍दारा पाठविल्‍याचे म्‍हटले आहे. परंतु ती पत्रे तक्रारकर्त्‍यास मिळालेली नाही व पोष्‍टाची पावती सुध्‍दा जोडलेली नाही. यावरुन ही कागदपत्रे खोटी तयार केल्‍याचे म्‍हटले आहे व वाहनाचे रु.7,10,000/- चे नुकसान झालेले असुन विरुध्‍द पक्ष क्र.2 चे चुकीमुळे शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागला.
 
15.         प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.22.09.2011 रोजी आली असता मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद त्‍यांचे वकीलां मार्फत ऐकला तसेच मंचासमक्ष दस्‍तावेजांचे व दोन्‍ही पक्षांचे कथन यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
-// नि ष्‍क र्ष //-
 
16.         मंचाने तक्रारकर्ता त्‍याचे वकीलांनी केलेला युक्तिवाद, तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता विरुध्‍द पक्ष क्र.2 ने “No Claim” म्‍हणून दि.26.09.2008 रोजी विमा दावा बंद करण्‍यांत आलेला आहे व तक्रारकर्त्‍याने पॉलिसीच्‍या अटी अंतर्गत 12 महिन्‍याचे आत दावा दाखल करावयास पाहिजे होता. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दाखल केलेले अनुक्रमे पृष्‍ठ 54,55,56 वरील सुचना/ पत्र मिळाल्‍याचे नाकारले. जेव्‍हा की, विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तरात कथन केले आहे की, वरील पत्रे तक्रारकर्त्‍यास पाठविण्‍यांत आलेली होती हे तक्रारकर्त्‍याने नाकारले व म्‍हटले की,विरुध्‍द पक्षाने नोंदणीकृत पोष्‍टाने तक्रारकर्त्‍यास पत्र पाठविले तर त्‍याबाबत पावत्‍या मंचासमक्ष दाखल करणे आवश्‍यक होते. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दाखल केलेली तिनही पत्रे संदिग्‍ध स्‍वरुपाचे व बनवाबनवीचे दृष्‍टीकोनातून तयार केलेली आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. तसेच मंचाने छत्‍तीसगड राज्‍य ग्राहक वाद कमिशन-2009 (IV) CPR-6, ‘सुभाष अग्रावाल – विरुध्‍द – ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लि. चे निकालपत्रात खालिलप्रमाणे प्रमाणीत केले आहे...
            “When the file is simply closed, the cause of action was epsofacto continues”.  
 
            वरील निकालपत्रानुसार वादाचे कारण सतत सुरु आहे, असा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष निघतो, तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दि.26.09.2008 ला विमा दावा नाकारल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.06.08.2010 रोजी तक्रार दाखल केली. त्‍यामुळे सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 24(अ) नुसार मुदतीत दाखल केलेली असुन ती मुदतबाह्य नाही असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्ष क्रि.1 ने प्राथमिक आक्षेप घेतला आहे की, कर्ज करारानुसार सदर वाद हा Arbitration & Consolation Act 1996 च्‍या करारानूसार सोडवण्‍यांत यावा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने Fair Air Engineer Pvt. Ltd. –v/s- V.K. Modi या निकालपत्रात खालिल प्रमाणे प्रमाणीत केले आहे...
            “Consumer Forum is Civil Court- U/s 3 up CPA-1986 is compitant to processed rather than relegating to Arbitration Proceeding as per contract”.
      आरबीट्रेशनच्‍या क्‍लॉजबाबत करारनाम्‍यात असलेले बंधन ग्राहक मंचास लागू होत नाही.
17.         तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून कर्ज घेऊन सदर अपघातग्रस्‍त वाहनाचा विमा काढला होता व त्‍याकरीता विम्‍याची रक्‍कम रु.18,679/- विरुध्‍द पक्ष क्र.2 ला देण्‍यांत आले होते. तसेच दि.16.11.2007 रोजी सदर वाहनाचा नॅशनल हायवे क्र.6 वरु अपघात झाला, याबाबत दोन्‍ही पक्षांना काहीही वाद नाही, त्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्र.2 चा ग्राहक ठरतो. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याकडे दोन ट्रक व त्‍यांचेकडूनच कर्ज घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्याने स्‍वयंरोजगार व उदरनिर्वाहाकरीता कर्ज घेतले, हे म्‍हणणे चुकीचे आहे व तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्र.1 चा ग्राहक ठरत नाही या विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या म्‍हणण्‍याशी मंच सहमत आहे.
18.         विरुध्‍द पक्ष क्र.2 वाहनाचे पॉलिसी दस्‍तावेजानुसार विमा हा आयडीव्‍ही. नुसार रु.6,10,000/- चा काढण्‍यांत आलेला होता त्‍याचा अवधी 20.09.2007 ते 19.09.2008 असा होता. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने मान्‍य केले आहे की, दि.16.11.2007 रोजी अपघात झाल्‍यानंतर व त्‍यांना प्राप्‍त झालेल्‍या सुचनेनुसार दि.17.11.2007 ला श्री. पनपालिया यांना स्‍थळ सर्वेअर म्‍हणून नेमले होते, त्‍यांनी 28.11.2007 रोजी स्‍थळ सर्वे रिपोर्ट विरुध्‍द पक्ष क्र.2 ला सादर केला. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 ने मान्‍य केले आहे की, अपघातग्रस्‍त वाहनाचे इस्‍टीमेट डिसेंबर-2007 ला वाहन शिफ्ट केल्‍यानंतर दिले. म्‍हणून असेसमेंट करीता श्री. व्‍ही.के. गर्ग यांची नियुक्‍ती दि.07.12.2007 रोजी केली व दि.09.12.2007 व 15.12.2007 ला सर्वे झाला. विरुध्‍द पक्षाने म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍यास दि.29.01.2008, 13.06.2008 व 15.07.2008 ला पत्र पाठवुन दुरुस्‍तीचे मुळ बिल, लायसन्‍सची प्रत, रजिस्‍ट्रेशनची प्रत आणि एफ.आय.आर., लोड चालान, स्‍पॉट पंचनामा इत्‍यादी कागदपत्रे विमा कंपनीने जमा करण्‍यांस सांगितले. परंतु तक्रारकर्त्‍याने मुळ बिल व इतर दस्‍तावेज दाखल केले नाही, त्‍यामुळे दि.26.09.2008 रोजी क्‍लेम बंद करण्‍यांत आला.
 
19.         तक्रारकर्त्‍याने वरील परिच्‍छेदात नमुद केल्‍या प्रमाणे प्रतिउत्‍तरात दि.29.01.2008, 13.06.2008 व 15.07.2008 ला पत्र पाठविल्‍याचे पूर्णपणे नाकारले. त्‍याबाबत विरुध्‍द पक्षाने पत्रे पाठविल्‍याबाबतच्‍या पावत्‍या दाखल केल्‍या नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यास पृष्‍ठी मिळते व वरील परिच्‍छेदात निर्ष्‍कषीत केल्‍याप्रमाणे तिनही पत्रे मंचासमक्ष बनवाबनवी करण्‍याकरीता एकमेव उद्देशाने पाठविली असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. पृष्‍ठ क्र.54 वरील विरुध्‍द पक्ष क्र.2 चे पत्राचे अवलोकन केले असता त्‍यामधे “We are pleased to inform you that, having examined your claim file , it has been observed that following requirements are yet to be fulfilled by you. Every efforts have been made to speed up settlement of your claim. We solicit your cooperation in this regard and would request you to kindly furnish us the following”. याप्रमाणे तथाकथीत मागणी केल्‍याचे दिसते. परंतु पृष्‍ठ क्र.55 व 56 वरील विरुध्‍द पक्षाचे दस्‍तावेजानुसार त्‍यामध्‍ये मुळ बिलाची मागणी केल्‍याचे दिसते, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि.29.01.2008 चे पत्रानुसार विरुध्‍द पक्षाने केलेल्‍या मागणीनुसार मुळ बिला व्‍यतिरिक्‍त इतर दस्‍तावेज दाखल केले होते असा मंचाचा निष्‍कर्ष आहे. स्‍थळ सर्वेअर श्री. पनपालिया यांचे दि.22.11.2007 चे सर्वेरिपोर्टनुसार (पृष्‍ठ क्र.44 ते 46) वाहनाचा गंभीर स्‍वरुपाचा अपघात असल्‍यामुळे अतोनात नुकसान झालेले आहे, हे स्‍पष्‍ट होते व सदर रिपोर्ट बाबत खालिल प्रमाणे नोट दाखल केलेली आहे...
      “This report given here is based on the damages visually apparent at the time of spot survey. The possibility of other latent damages being existent can not be ruled over. Further damages if any can be checked & confirmed after vehicle removed from spot and through check up at workshop”.
 
20.         परंतु मंचास नमुद करावयाचे वाटते की विरुध्‍द पक्ष क्र.2 ने स्‍थळ सर्वेअर श्री. पनपालिया यांचे शपथपत्र मंचासमक्ष दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्ष क्र.2 ने पृष्‍ठ क्र.48 ते 50 वर दाखल फायनल सर्वे रिपोर्ट नुसार मुळ इस्‍टीमेटपुर्वी सर्वेअरने रु.3,86,967/- (Amount payable to Insured) असे नमुद केले आहे, त्‍याचे खाली साल्‍वेज रु.16,000/- May be deducted  अशी नोंद आहे. रु.3,86,967/- निर्धारीत करते वेळी सर्वेअरने डेप्रीसेशनची रक्‍कम कमी करुन रु. 3,62,567/- ठरविले आहे. श्री. व्‍ही. के. गर्ग यांनी दाखल केलेला सर्वेअर रिपोर्टच्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्र.50 वरुन इंजिन असेंम्‍ब्‍ली कंम्‍प्‍लीट रु.2,70,000/- च्‍या पुढे ‘केप्‍ट ओपन’, असा शेरा लिहलेला आहे. त्‍याबाबत व्‍ही. के. र्गग कंपनीने किंवा विरुध्‍द पक्षाने काहीही कारण रिपोर्टमध्‍ये नमुद केले नाही. 
 
21.         वरील फायनल सर्वे रिपोर्टनुसार फायनल असेसमेंटचे रु.3,86,967/- असुन दि.18.05.2008 चे रिपोर्ट नुसार फायनल असेसमेंट रु.1,70,887/- Full & Final Settlement of the claim म्‍हणून जाहीर केले. त्‍याबाबत विरुध्‍द पक्षाने कारण मिमांसा केली की, तक्रारकर्ता सदर वाहन दुरुस्‍त करण्‍यांस तत्‍पर नव्‍हता व 3 महिने पर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. तसेच दि.24.03.2008 व 18.05.2008 चा सर्वे रिपोर्ट विरुध्‍द पक्षाने न पुरविल्‍यामुळे व एकतर्फी भाष्‍य केल्‍यामुळे दि.18.05.2008 चा सर्वे रिपोर्ट हा अविश्‍वसनीय व संदिग्‍ध स्‍वरुपाचा आहे व ऐनकेन प्रकारे विमा कंपनीचे बाजूने करण्‍याचा प्रयत्‍न होता हे स्‍पष्‍ट होते. विरुध्‍द पक्षाने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ व्‍ही.के. गर्ग ऍन्‍ड कंपनी यांचे शपथपत्र दाखल केले नाही. त्‍यामुळे व्‍ही.के. गर्ग ऍन्‍ड कंपनी यांचा दि.18.05.2008 चा सर्वे रिपोर्ट हा अविश्‍वसनीय व संदिग्‍ध वाटतो म्‍हणून मंचाने नाकारला.
 
22.         सर्वोच्‍च न्‍यायालय व राष्‍ट्रीय आयोगाने वेगवेगळया निकालपत्राव्‍दारे हे स्‍पष्‍ट केले आहे की, सर्वेअर रिपोर्ट हा एक महत्‍वाचा दस्‍तावेज असतो. त्‍यानंतर दि.24.03.2008 चे अनुक्रमे पृष्‍ठ क्र.48 ते 50 वरील फायनल रिपोर्ट मंचाने विचारात घेणे संयुक्तिक वाटते. फायनल रिपोर्टनंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कुठलीही माहिती पुरविली नाही. उलटपक्षी दस्‍तावेजांची मागणी केली हे खोटे कथन बनवाबनवीच्‍या दस्‍तावेजाव्‍दारे मंचासमक्ष केले. तसेच फायनल रिपोर्टनंतर तक्रारकर्त्‍याने वाहनाची दुरुस्‍ती न केल्‍यामुळे Amount Payable to Insured Rs.3,86,967/- मधंन साल्‍वेजची रक्‍कम रु.16,000/- कमी करुन तक्रारकर्त्‍यास देणे संयुक्तिक होते. परंतु तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 ने तसे न करणे ही त्‍याचे सेवेतील गंभीर स्‍वरुपाची त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाच्‍या या गंभीर स्‍वरुपाचे सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्ष क्र.1 विमा कंपनीचे हप्‍ते व थकीत रक्‍कम भरु शकला नाही, त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.1 ने जानेवारी-2009 ला सदर वाहन जप्‍त करुन कवडीमोल किमतीत विकले या सर्व बाबींकरीता विरुध्‍द पक्ष क्र. 2 सर्वस्‍वी जबाबदार आहे. म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र.2 दावा निकाली काढण्‍याकरीता आय.आर.डी.ए. ने निर्धारीत केलेल्‍या नियमावलीचे उल्‍लंघन केले आहे. तसेच अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे, असा मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे. म्‍हणून व्‍ही.के. गर्ग ऍन्‍ड कंपनीने निर्धारीत केलेली Amount Payable to Insured Rs.3,86,967/- वजा साल्‍वेजची रक्‍कम रु.16,000/- = रु.3,70,967/- दि.24.03.2008 पासुन 12% व्‍याजासह देण्‍यांस बाध्‍य आहे, असा मंचाचा स्‍पष्‍ट निष्‍कर्ष आहे.
23.         विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या गैरकृतिमुळे व आय.आर.डी.ए. च्‍या नियमांचा भंग केल्‍यामुळे तसेच अनुचित व्‍यापार प्रथेच्‍या अवलंबामुळे तक्रारकर्त्‍यास मानसिक, आर्थीक व शारीरिक त्रास झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 ने रु.50,000/- नुकसान भरपाईपोटी द्यावे व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- द्यावे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
24.         तक्रारकर्त्‍याने राष्‍ट्रीय आयोगाचे वाहन जप्‍ती संबंधी “Citicorp Maruti Finance Ltd –v/s- S. Vijaylaxmi”, R.P. No 737 of 2005, ह्या निकालपत्रास आधारभुत मानले आहे.
25.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने वाहन जप्‍ती करण्‍याबाबत तक्रारकर्त्‍यास कुठलीही संधी न देता केलेली कृति ही दंड ठोठावण्‍यांस पात्र ठरते, परंतु तक्रारकर्ता वर नमुद केल्‍याप्रमाणे त्‍याने व्‍यावसायीक कारणासाठी कर्ज पुरवठा घेतल्‍यामुळे तो विरुध्‍द पक्ष क्र.1 चा ग्राहक ठरत नसल्‍यामुळे, विरुध्‍द पक्ष क्र.1 विरुध्‍द तक्रारकर्त्‍याने केलेली मागणी मंजूर करणे मंचास संयुक्तिक वाटत नाही. करीता खालिल प्रमाणे आदेश पारित करण्‍यांत येतो.
 
-// अंति दे //-
 
 
 
1.         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    विरुध्‍द पक्ष क्र.2 ला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास      रु.3,70,967/- दि.24.03.2008 पासुन रक्‍कम अदा होईपर्यंत 12% व्‍याजासह     द्यावी.
3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 ला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला शारीरिक,    मानसिक व आर्थीक त्रासाकरीता रु.50,000/- नुकसान भरपाई म्‍हणून व       तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    विरुध्‍द पक्ष क्र. 1 यांचे विरुध्‍दची तक्रार खारिज करण्‍यांत येते
5.    वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी आदेशाची प्रत  मिळाल्‍याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.