ग्राहक तक्रार क्रमांकः-287/2008 तक्रार दाखल दिनांकः-01/03/2008 निकाल तारीखः-20/09/2008 कालावधीः-00वर्ष06महिने19दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.सुभाष प्रभाकर कुलकर्णी 23/201, स्वाति, वसंतलीला कॉम्प्लेक्स, वाघबीळ, घोडबंदर रोड, ठाणे(प)400 601 ...तक्रारकर्ता विरुध्द मेसर्स.आय.सी.आय.सी.आय.बँक, ग्लेन मॉर्गन, राम मारुती रोड, ठाणे शाखा, ठाणे (प)400 602 ...वि.प. गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य उपस्थितीः-तक्रारकर्ताः- स्वतः हजर विरुध्दपक्ष्ाः-गैरहजर (एकतर्फा) एकतर्फा-निकालपत्र (पारित दिनांक-20/09/2008) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेद्वारे आदेशः- तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सदर तक्रार दिनांक 12/06/2008 रोजी दाखल केली आहे त्याचे थोडक्यात कथन पुढील प्रमाणेः- 1.तक्रारदार यांनी सदर तक्रार विरुध्द पक्षकार 2/- बँकेविरुध्द दाखल करुन नमूद केली आहे की, तक्रारदार यांना विरुध्द पक्षकार यांनी क्रेडीट कार्डावर परस्पर रक्कम वसुल करुन विमा पॉलीसी दिली व दरमहा क्रेडीट कार्डावरुन हप्ता भरणा करुन घेतले याची माहिती तक्रारदार यांना तक्रारदार यांचे बचत खाते क्र.003501034433 यामध्ये निदर्शनास आले व तक्रारदार यांनी विरुध्दपक्ष यांचेकडे कोणत्या प्रकारे पॉलीसी मागणी केलेली नव्हती. फॉर्मही भरणा केलेला नव्हता. तरीसुध्दा मनमानी व्यवहार करुन विरुध्दपक्ष यांनी एप्रिल 2007 ला मागील तीन महिन्याचे स्टेटमेंट दिले व त्यामध्ये जानेवारी 2007 पासून रक्कम कपात केली आहे हे समजल्याने तक्रारदार यांनी त्वरीत बँकेकडे तक्रार दाखल केली तरीही विरुध्दपक्ष यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही व हप्ते रक्कम कापून घेतली. तक्रारदार यांनी 20 नोव्हेंबर,2007 रोजी बँक मॅनेजर, क्रेडीट कार्ड विरुध्द यांना पत्र पाठविले त्याचे उत्तर 17 डिसेंबर,2007 ला आले म्हणून दोन्ही पत्रे ग्राहक तक्रार मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचेकडे तक्रारीसह दाखल केलीअसता आयसीआयसीआय बँकेला रजिष्टर पोष्टाने पत्र पाठविण्यात आले बाबत कल्पना दिली. त्याप्रमाणे पुन्हा रजिष्टर पोष्टाने पत्र पाठवले त्यास विरुध्दपक्षकार यांनी 17 मार्च,2008 रोजी उत्तर दिले. परंतू ते समाधानकारक दिले नाही म्हणून पुन्हा 9 एप्रिल,2008 रोजी पत्र पाठविले. त्यास अखेर पर्यंत दाद दिली नाही. म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार मंचात दाखल करुन विनंती मागणी केली आहे की, 1)तक्रारदर यांचे खातेतून 15,160/- विरुध्दपक्षकार बँकेने कापले आहे आणि 3/- अजून पैसे कापने चालूच आहे ते थांबवणे. 2)आर्थिक,शारीरीक त्रास व अर्जाचा खर्च मिळावा अशी मागणी केली आहे. 2.मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस रजिष्टर एडीने पाठविली असता ती पोहचल्यानंतर विरुध्द पक्षकार यांनी कोणतीही दखल घेतली नाही. म्हणून दि.5/8/2008 रोजी ''नोडब्लुएस'' आदेश करुन सदर प्रकरण 27/8/2008 रोजी ''एकतर्फा सुनावणी'' करता नेमण्यात आले. परंतू अखेरपर्यंत विरुध्दपक्ष यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे ''एकतर्फा आदेश'' पारीत करण्यात आला. 3.तक्रारदार यांनी दाखल केलेला अर्ज,कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांची सुक्ष्मरित्या पडताळणी व अवलोकन करुन कारणमिमांसा पुढील आदेश करण्यात आला आहे. 3.1)तक्रारदार यांचे विरुध्दपक्षकार बँकेमध्ये बचत खाते व क्रेडीटकार्ड नं.4477468127015001 असा आहे ते विरुध्दपक्षकार यांनी मान्य केले आहे. परंतु विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना जे पत्र दि.27 डिसेंबर, 2006 रोजी लेटर पॅडवर मॅनेजर यांचे सहीनुसार पाठवले आहे. त्यामध्ये क्रेडीट कार्ड नं.4477469882061008 असा नमूद केला आहे व त्याव्दारे दरमहा चे हप्ते आयसीआयसीआय लोंबार्ड जीन इन्शुरन्स या विमा करीता वसुल करुन घेतलेले आहेत हे स्पष्टपणे सिध्द होते. तक्रारदार यांनी आपले क्रेडीट कार्ड नंबर वेगळे आहे व विरुध्दपक्षकार यांनी नमूद केलेले क्रेडीट कार्ड वेगळे आहे. दोन्हीमध्ये फरक असल्याने विरुध्द पक्षकार यांनी चुकीचे क्रेडीट कार्डावर विमा पॉलीसी दिलेली 4/- आहे व त्याचे हप्ते तक्रारदार यांचे खातेतून वसूल केलेले आहेत हे स्पष्टपणे सिध्द होते म्हणून विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांचेवर जबाबदारी दिसत नाही. व्यावसायीक फायदा मिळण्याच्या उद्देशाने व वेगवेगळया शकल लढवून कोणत्याही प्रकारची पॉलीसी कुठेही कोणत्याही अर्जावर सही न घेता क्रेडीट कार्डाचे कोड नंबरसह सर्व माहिती आपल्याचकडे उपलब्ध असते म्हणून त्याचा विरुध्दपक्ष यांनी गैरफायदा घेऊन एखाद्या ग्राहकांस वेठीला धरणे न्यायोचीत, विधीयुक्त व संयुक्तीक नाही. तक्रारदार यांनी कोणत्याही अर्जावर कधीही सही केलेली नाही व लोंबार्ड पॉलीसीची मागणी केलेली नसतांना क्रेडीट कार्ड परस्पर रक्कम वसूल करुन घेणे व जबाबदार पॉलीसी देणे ही बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे म्हणून विरुध्दपक्षकार व तक्रारदार यांनी वसूल केलेली सर्व रक्कम परत करण्यास पात्र व जबाबदार व बंधनकारक आहेत. 3.2)विरुध्दपक्षकार यांनी दि.17डिसेंबर,2007 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठवून पॉलीसीची रक्कम 2,811/- व त्याचा दरमहा हप्ता 234.35 पैसे असून पॉलीसी कालावधी 23 डिसेंबर 2006 ते 24 डिसेंबर 2007 या कालावधीकरता होती व आहे. विरुध्द पक्षकार यांनी त्ोवढयाच कालावधीत हप्ते वसूल केलेले होते. तदनंतर हप्ते वसूल केलेले नाही. परंतू या ठिकाणी जर तक्रारदार यांनी पॉलीसी स्वीकारली नाही, अथवा मागणीच केलेली नाही तरीही विरुध्दपक्षांने त्यांच्या माथी जबरदस्तीने पॉलीसी काढली त्यानंतर तक्रारदार यांची लेखी पत्राव्दारे व प्रत्यक्ष संपर्क साधून ही 5/- बाब निदर्शनास आणून दिली होती तथापि विरुध्दपक्षकार यांनी त्वरीत दखल न घेता उलट 23 डिसेंबर 2006 ते 24 डिसेंबर 2007या कालावधीची रक्कम स्वीकारली होती हे कळवतात यावरुन विरुध्द पक्षकार बँकेने नामांकित जागतीक बँक आहे व त्याचा गैरफायदा (मोनोपॉली) घेवून जबरदस्तीने पॉलीसी उतरुन हप्ता भरणा करुन घेतलेला आहे हे स्पष्टपणे सिध्द होते. विरुध्दपक्ष यांनी तक्रारदार यांना दिलेल्या पत्रातून हे सर्व मुद्दे सिध्द झालेले आहे व ते रजिष्टर ए.डी.ने पाठवलेले होते त्याची पोच मिळाली आहे काही वेळा उत्तर दिलेले होते परंतू उपस्थित वादीत प्रश्न अखेरपर्यंत सोडवला नाही. म्हणून विरुध्दपक्षकार हे तक्रारदार यांचे नुकसानीस जबाबदार आहेत. म्हणून आदेशाप्रमाणे सर्व नुकसान भरपाई व व्याजासह रक्कम देण्यास जबाबदार आहेत. म्हणून आदेश. आदेश 1.तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अशंतः मंजूर करण्यात आला आहे. 2.तक्रारदार यांचे क्रेडीट कार्ड नं.4477468127015001 या क्रेडीट कार्ड ऐवजी दुसरे क्रेडीट कार्ड नं.4477469882461008 या क्रेडीट कार्डचे आधारे तक्रारदार यांना आयसीआयसीआय लोंबार्ड पॉलीसी जबरदस्तीने विना मागणी देऊन त्याचा दरमहा 234.25 पैसे प्रमाणे हप्ता भरणे दि.23 डिसेंबर 2006 ते 24डिसेंबर 2007 पर्यंत करुन घेतलेले आहेत. सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा व हलगर्जीपणा असल्याने ही रक्कम तक्रारदार यांना त्वरीत परत करावी. 6/- 3.तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडे कोणत्याही प्रकारची पॉलीसीची मागणी केलेली नसतांना खात्यातून रक्कम परस्पर वजा करुन पॉलीसी उतरवली होती ही बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर आहे हे सिध्द झाल्याने विरुध्द पक्षकार हे तक्रारदार यांना 5,000/-(रुपये पाच हजार फक्त) नुकसान भरपाई देण्यास पात्र व जबाबदार आहेत. तसेच सदर अर्जाचा खर्च 200/ -(रुपये दोनशे फक्त) विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांना द्यावा. 4.अशा आदेशाचे पालन विरूध्दपक्ष यांनी आदेशांची सही शिक्क्याची प्रत मिळणे पासून 30 दिवसात पुर्णपणे एक रक्कमी परस्पर (डायरेक्ट) देय करण्याचे आहे. असे विहीत मुदतीत न घडल्यास मुदती नंतर रक्कम फिटेपर्यंत सर्व रक्कमेवर द.सा.द.शे 10% व्याज दराने दंडात्मक व्याज (पिनल इंट्रेस्ट) म्हणुन रक्कम देण्यास पात्र व जबाबदार कायदेशिररीत्या बंधनकारक आहेत. असा आदेश 5.सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. 6.तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात. दिनांकः-20/09/2008 ठिकाणः-ठाणे (श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|