तक्रारदार : वकीलामार्फत हजर. सामनेवाले : -- *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- तक्रार दाखल करुन घेण्यासंबधीचा आदेश 1. तक्रारदार हे एव्होल या व्यायाम शाळेचे सदस्य होते, व ती व्यायामशाळा गोल्ड जीम या व्यायामशाळेत हस्तांतरीत झाली. तक्रारदारांनी व्यायाम शाळेकडे रु.28,000/- सभासद सदस्य व रु.7,000/- मसाज शुल्क अदा केले होते. परंतु व्यायाम शाळेने तक्रारदारांना पावती दिली नाही. तक्रारदार हे सा.वाले व्यायामशाळेचे दिनांक 1.10.07 ते 30.09.2013 पर्यत सदस्य होते. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार हे एव्होल व्यायाम शाळेमध्ये नोकरीत होते. परंतु एव्होल व्यायाम शाळा गोल्ड जीम या व्यायाम शाळेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर तक्रारदारांची बदली करण्यात आली व तक्रारदारांनी नोकरी सोडून दिली. तथापी तक्रारदारांचे व्यायाम शाळेत सदस्यत्व चालुच राहीले. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे सा.वाले व्यायाम शाळेने तक्रारदारांना दि.30.11.2010 पासून व्यायाम शाळेत प्रवेश बंद केला. तक्रारदारांना विविध प्रकारचे आजार असल्याने त्यांना व्यायाम शाळेत जावून व्यायाम व मसाज करुन घेणे आवश्यक होते. त्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांकडून फी स्विकारली नाहीतर तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यास नकार दिला. तक्रारदारांनी सा.वाले यांना नोटीस दिली. तसेच पोलीसांकडे तक्रार दाखल केली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांना प्रवेश चालु केला नाही. सबब तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सभासद सदस्यत्वाचे शुल्क रु.28,000/- + मसाज शुल्क रु.7,000/- एकूण रु.35,000/- 18 टक्के व्याजासह परत मिळावेत अशी दाद मागीतली. 2. तकारदारांच्या वकीलांचा दाखल सुनावणीकामी युक्तीवाद ऐकण्यात आला. प्रस्तुत मंचाने तक्रार व त्या सोबतची कागदपत्रे यांचे वाचन केले. 3. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सा.वाले यांना तक्रारीची नोटीस दिली होती, त्या उत्तराची प्रत हजर केलेली आहे. त्या नोटीसीचे उत्तर दिनांक 7 मार्च, 2011 मध्ये सा.वाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदार हया नोकरीस असताना तक्रारदारांनी सा.वाले यांचे कागदपत्रामध्ये फेरफार केले व सभासदस्यत्वाचे कागदपत्र तंयार केले. परंतु त्या कागदपत्रावर सा.वाले यांच्या कर्मचा-याची किंवा अधिका-याची सही नाही. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सभासद करारनामा दाखल केला त्यावर तक्रारदारांची सही नाही. तथापी सा.वाले यांचे वेतीने कुणाही कर्मचा-याची किंवा अधिका-याची सही नाही. तो रकाना कोरा आहे. तक्रारदारांनी मेंबरशिप कार्डवर भर दिला. त्यामध्ये सा.वाले यांचे नांवाने कार्डवर सदस्य म्हणून तक्रारदारांचे नांव लिहिले असून सदस्यत्वाचा कालावधी 1 ऑक्टोबर, 2007 ते 30 सप्टेंबर, 2013 असा नोंदविली आहे. त्या कार्डवर ज्या कर्मच्या-यानी/व्यक्तीनी सही केलेली आहे त्या व्यक्तीचे नांव कार्डावर दिसून येते नाही. युक्तीवादाचे दरम्यान तक्रारदारांच्या वकीलांना त्या कार्डावर ज्या कर्मचा-यांनी सही केलेली आहे किंवा ते कार्ड ज्या कर्मचा-यांनी सा.वाले यांच्या वतीने जारी केलेले आहे त्याचे शपथपत्र दाखल करण्याची तक्रारदारांची तंयारी आहे काय अशी विचारणा केली होती. तथापी त्या व्यक्ती सा.वाले यांचे कर्मचारी असल्याने तसे शपथपत्र दाखल करण्यास तक्रारदारांनी असमर्थता व्यक्त केली. या प्रमाणे केवळ तक्रारदारांनी दाखल केलेल्या सभासदस्यत्वाचे कार्ड वरुन तक्रारदार हे सा.वाले यांचे सदस्य झाले होते व आजही सदस्य आहेत असा निष्कर्ष काढणे प्रथमदर्शनीतरी शक्य दिसत नाही. मुळातच सभासदस्यत्वाचा करारनामा/अर्ज यावर सा.वाले यांनी सही करावयाचा रकाना कोरा आहे ती बाब सा.वाले यांनी तक्रारदारांना दिलेल्या नोटीसीच्या उत्तरातील कथनास पुष्टी देते. सबब तक्रारदार सा.वाले यांचे सदस्य आहेत हे प्रथम दर्शनी देखील सिध्द होत नसल्याचे सिध्द झाल्याने पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार दाखल करुन घेण्यात येत नाही. व ती ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12(3) प्रमाणे रद्द करण्यात येते. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |