Maharashtra

Nagpur

EA/143/2018

Smt. Shakuntala Prakash Choudhary(Expired), Legal Heirs of the Deceased, Dharamveer Prakash Choudhary - Complainant(s)

Versus

M/s. Gigeo Real Estate Through Prop. Shri Chhaganlal Kunwarjibhai Patel - Opp.Party(s)

ADV. DILIP N. KARKARE

02 Mar 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Execution Application No. EA/143/2018
( Date of Filing : 18 Dec 2018 )
In
Complaint Case No. CC/12/626
 
1. Smt. Shakuntala Prakash Choudhary(Expired), Legal Heirs of the Deceased, Dharamveer Prakash Choudhary
Juni Shukrawari, Sakkardara Chowk, Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
2. KU. DIPTI PRAKASH CHOUDHARY
Juni Shukrawari, Sakkardara Chowk,
NAGPUR
MAHARASHTRA
3. SAU. RACHNA ADASH JAISWAR/ KU. RACHNA PRAKASH CHOUDHARY
R/O. F/2-405, SWAPNA SRUSTI RESIDENCY, BHESTHAN, SURAT.
SURAT
GUJRAT
...........Appellant(s)
Versus
1. M/s. Gigeo Real Estate Through Prop. Shri Chhaganlal Kunwarjibhai Patel
Office- 5/1, Amar Palace, West Central Road, Opp. Yashwant Stadium, Dhantoli,
NAGPUR
MAHARASHTRA
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 02 Mar 2020
Final Order / Judgement

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये -

  1. प्रस्‍तुत दरखास्‍त गैरअर्जदार यांचे विरुध्‍द त्‍याने मंचाच्‍या आदेशाचे पालन केले नाही म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा १९८६  च्‍या कलम २५ अंतर्गत दाखल केली आहे.
  2. अर्जदाराने गैरअर्जदार विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रमांक ६२६/२०१२ मंचात दाखल केली होती. त्‍या  तक्रारीमध्‍ये मंचाने दिनांक २५/०२/२०१४ ला आदेश पारित करुन तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करतांना गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला व्‍यंकटेश नगर येथील नियोजीत बांधकाम योजनेतील डुप्‍लेक्‍स क्रमांक १३६ चे नोंदनीकृत विक्रीपञ करुन देऊन त्‍याचा ताबा देण्‍याचा आदेश केला होता. त्‍याचप्रमाणे तितक्‍याच क्षेञफळाचे  बांधकाम असलेल्‍या दुस-या डुप्‍लेक्‍सचे नोंदणीकृत विक्रीपञ करुन देण्‍याचा आदेश होता किंवा तक्रारकर्तीने त्‍यांचेकडे जमा असलेली रक्‍कम रुपये १३,७५,०००/- द.सा.द.शे. ११ टक्‍के व्‍याज दराने दिनांक २८/०३/२००५ पासुन ते तक्रारकर्तीच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत देण्‍याचा आदेश आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्तीला मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाकरीता रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्चाबाबत रुपये ५,०००/- देण्‍याचा आदेश आहे व सदरच्‍या आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याच्‍या दिनांकापासून एक महिन्‍याचे आत करावयाची होती.
  3. मंचाने तक्रार क्रमांक ६२६/२०१२ मध्‍ये दिनांक २५/०२/२०१४ रोजी पारित केलेल्‍या आदेशाप्रमाणे विरुध्‍द पक्षाने ३० दिवसाच्‍या मुदतीत पालन केले नाही आणि मंचाचे आदेशाची अवमानना केली. त्‍यामुळे अर्जदाराने प्रस्‍तुत दरखास्‍त मंचासमोर दाखल केली.
  4. अर्जदाराने सदर दरखास्‍त अर्ज दाखल करुन दिनांक २५/०२/२०१४ रोजीच्‍या  मंचाच्‍या मुळ आदेशाचे पालन करण्‍याकरिता तसेच दरखास्‍त अर्जात मागणी केलेल्‍या रुपये १३,७५,०००/- व त्‍यावर दिनांक २८/०३/२००५ पासुन ते तक्रारकर्तीच्‍या प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत देण्‍याचा आदेश व मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासाकरीता रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्चाबाबत रुपये ५,०००/- देण्‍याचा आदेश विरुध्‍द पक्षाकडुन वसुली प्रमाणपत्र देण्‍याची मागणी केली किंवा महाराष्‍ट्र जमीन महसूल कायद्याच्‍या कलम ४२१ प्रमाणे विरुध्‍द पक्षाच्‍या संपत्‍तीची / सामांनाची विक्री करुन तक्रारकर्तीची रक्‍कम वसूल करुन देण्‍यात यावी अशी मागणी केली. 
  5. अर्जदाराची दरखास्‍त दाखल झाल्‍यानंतर गैरअर्जदाराला मंचामार्फत नोटीस बजाविण्‍यात आली होती. परंतु गैरअर्जदार मंचात उपस्थित झाले नाही किंवा त्‍यांनी आपले म्‍हणणे सुद्धा दाखल केले नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द दिनांक १६/०३/२०१९ रोजी त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  6. या मंचाद्वारे दिनांक २५/०२/२०१४ रोजी पारित झालेल्‍या आदेशाची अंमलबजावणी करण्‍याकरिता गैरअर्जदार यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे वसुली करण्‍याकरिता जिल्‍हाधिकारी यांना  खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येते. 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. अर्जदाराचा दरखास्‍त अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
  2. जिल्‍हा दंडाधिकारी यांनी गैरअर्जदार यांच्‍या चल/अचल मालमत्‍ते मधून जमीन महसूलाच्‍या थकबाकी वसुली पध्‍दती प्रमाणे रक्‍कम रुपये १३,७५,०००/- व त्‍यावर दि. २८/०३/२००५ पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे.११ टक्‍के व्‍याज दराने व्‍याजसह रक्‍कम वसूल करुन अर्जदार/तक्रारकर्तीस द्यावी. तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- वसूल करुन तक्रारकर्त्‍यास द्यावा. 

 

  1. जिल्‍हा दंडाधिकारी नागपूर यांनी सदरच्‍या आदेशाप्रमाणे वसुली संबंधी योग्‍य ती कार्यवाही करुन त्‍याचा अहवाल जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांच्‍याकडे पाठवावा.

 

  1. प्रबंधक, जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मंचाचे आदेशाप्रमाणे रक्‍कम वसुलीकरिता जिल्‍हा दंडाधिकारी, नागपूर यांच्‍याकडे विहित नमुन्‍यातील वसुलीचे प्रमाणपत्र पाठवावे.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.