Dated the 29 Jul 2016
“ एकत्रित न्याय निर्णय ”
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. वर नमूद केलेल्या 09 तक्रारींमध्ये विरुध्दपक्ष हे सारखेच आहेत तसेच उभयपक्षांतील वादविषय सुध्दा समान आहेत, त्यामुळे कामकाजाच्या सोयीचे दृष्टीने या सर्व तक्रारी एकाच दिवशी निकालासाठी ठेवलेल्या आहेत. तसेच एकत्रित आदेशाद्वारे ही सर्व तक्रार प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
3. वरील सर्व तक्रार प्रकरणांतील तक्रारदार त्यांच्या तक्रार क्रमांकाखाली दिलेल्या पत्यावर रहातात. सामनेवाले नं.1 ही मे.गजानन होम्स या नावाची प्रोप्रायटरी कन्सर्न असुन श्री.स्वप्नील सुरेश पोळ हे त्याचे प्रोप्रायटर आहेत. सामनेवाले नं.2 व 3 हे मुळ जमिन मालक आहेत. सामनेवाले हे मे.गजानन होम्स या नांवाने इमारत बांधकामाचा व्यवसाय करतात. सामनेवाले यांचा कार्यालयीन पत्ता वर नमुद केल्या प्रमाणे आहे. तक्रारदार म्हणतात सामनेवाले यांनी वृत्तपत्राव्दारे नेवाळी, अंबरनाथ येथे स्वस्त दरात घरे बांधुन देण्याबाबतची मे.गजानन होम्स ची योजना असल्याचे वृत्तपत्रात जाहिरात देऊन प्रसिध्द केले, त्याबाबत ब्रोशर्स वाटली. जाहिरात पाहून तक्रारदार सारख्या अनेक इच्छुक सदनिका खरेदीदारांनी सामनेवाले यांचेकडे संपर्क केला, व सामनेवाले यांच्या नेवाळी अंबरनाथ येथील घरांच्या योजने अंतर्गत सदनिका आरक्षित केल्या. सामनेवाले नं.2 यांनी सदर नेवाळी अंबरनाथ येथील जमिन मिळकतीवर 13 चाळी बांधल्याचे तक्रारदारांनी नमुद केले आहे. सामनेवाले नं.1 व 2 यांनी सदर योजनेत भागीदारी असल्याचे तक्रारदार यांना सांगुन व सदनिकांचा ताबा तक्रारदार यांना लवकरात लवकर देण्याचे कबुल करुन तक्रारदार यांच्याकडून सामनेवाले यांनी सदनिका खरेदीबाबतच्या रकमा तक्त्यात दिल्याप्रमाणे स्विकारल्या. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सदनिकेचा क्रमांक सदनिका आरक्षित करतांना तक्रारदार यांना दिला नाही, व सदर बांधलेल्या सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना न देता परस्पर दुस-या त्रयस्थ व्यक्तीस दिला. तक्रारदार यांनी अनेकवेळा सामनेवाले यांना भेटून सदनिकेचा व्यवहार पुर्ण करुन त्यांचा ताबा तक्रारदार यांना देण्याची सामनेवाले यांना विनंती केली, परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतेही सहकार्य केले नाही व त्यांचे सदनिकेच्या व्यवहाराबाबत घेतलेले पैसेही परत केले नाहीत, त्यामुळे काही तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द पोलीस कंम्प्लेंटही दिली. तरीही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना काहीच दाद न दिल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर योजनेअंतर्गत बांधलेल्या सदनिकेचा ताबा दयावा अथवा सामनेवाले यांना तक्रारदार यांनी सदनिकेच्यचा व्यवहारात अदा केलेली रक्क्म व्याजासह परत दयावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे. तक्रारदार यांच्या इतर मागण्या तक्त्यात दिल्याप्रमाणे आहेत.
4. तक्रारदारांनी सदर प्रकरणांत तक्रारीसोबत पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद व इतर काही आवश्यक कागदपत्रे दाखल केली. वर नमूद केलेल्या सर्व तक्रार प्रकरणांत विरुध्दपक्ष नं.1 ते 3 यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसा “ Left व Refused ” या शे-यासह मंचात परत आल्याने, तक्रारदार यांनी प्रस्तुत दोन्ही तक्रारींमध्ये सामनेवाले यांचेवर जाहिर प्रगटनाव्दारे नोटीसची बजावणी केली असल्याबाबत त्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे सामनेवाले यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारित करणेबाबत मंचाने आदेश केले आहेत, व प्रकरण अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आले.
5. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून खरेदी केलेल्या सदनिकांचा तपशील खालील प्रमाणे.......
अ. क्र. | तक्रार क्रमांक व किरकोळ अर्ज क्र. | तक्रारदाराचे नांव | सामनेवाले यांचे नांव | एकूण मोबदला रुपये | तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली रक्कम | सदनिका क्रमांक, इमारत नांव,व एरिया | सामनेवाले यांना एकूण रक्कम दिल्याची तारीख | तक्रारदार यांनी मागणी केलेली रक्कम | समझोता कराराचा दिनांक |
1. | MA-171/14 CC-703/14 | Mr.Kiran Maruti Karawade | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.4,10,000/- | 2,01,100/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 350 चौरस फुट | ता.07.05.14 | मानसिक त्रासापोटी रु.2,48,900/-/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | समझोता करार केलेला नाही. |
2. | MA-175/14 CC- 707/14 | 1. Mr.Ravindra Shankar More 2. Mr. Shankar Dagdu More | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.3,10,000/- | 2,21,104/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.08.07.14 | मानसिक त्रासापोटी रु.2,28,896/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.01.04.13 |
3. | MA- 178/14 CC- 710/14 | Mr. Pramod Harichandra Patil | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.3,10,000/- | 1,98,884/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 350 चौरस फुट | ता.27.04.14 | मानसिक त्रासापोटी रु.2,51,116/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.11.03.13 |
4. | MA- 4/15 CC- 08/15 | Mr. Mahadev Maruti Magar | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.3,10,000/- | 1,67,776/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.10.07.14 | मानसिक त्रासापोटी रु.2,82,224/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.11.02.14 |
5. | MA-5/15 CC- 09/15 | Mr. Jagan Sambhaji Lokhande | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.2,10,000/- | 1,09,,165/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.09.07.13 | मानसिक त्रासापोटी रु.3,40,835/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.04.03.13 |
6. | MA-6/15 CC- 11/15 | Mr. Motiram Venkate Shikare | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.2,10,000/- | 1,45,825/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.16.03.14 | मानसिक त्रासापोटी रु.3,04,175/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.29.11.12 |
7. | MA- 7/15 CC- 31/15 | Mr. Dhirendra Shah | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.4,10,000/- | 2,29,300/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.17.08.14 | मानसिक त्रासापोटी रु.2,20,700/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.25.02.14 |
8. | 202/15 | Mr. Balu Ramnath Umap | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.3,10,000/- | 1,94,440/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.30.11.13 | मानसिक त्रासापोटी रु.2,55,560/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.11.02.13 |
9. | 203/15 | Mrs. Navratna Iragouda Patil | 1. M/s. Gajanan Homes Through its Proprietor Mr. Swapnil Suresh Pol & Ors. | रु.3,10,000/- | 1,92,328/- | भव्य घरकुल योजना गजाननर होम्स सर्व्हे नं.82, हिस्सा नं.6, नेवाळी नाका, ता.अंबरनाथ, 250 चौरस फुट | ता.06.07.14 | मानसिक त्रासापोटी रु.2,57,672/- तक्रार खर्च रु.10,000/- भाडयापोटी रु.20,000/- कर्जावरील व्याज रु.20,000/- | ता.22.04.13 |
6. तक्रारीमध्ये उपलब्ध असलेल्या कागदपत्रांव्दारे मंचाने खालील मुदयांचा तक्रारींच्या निराकणार्थ विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील तक्त्यात नमुद
केल्याप्रमाणे सदनिका विक्रीबाबत मोठयाप्रमाणात रक्कम
स्विकारुनही तक्रारदार यांना त्यांच्या सदनिकांचा ताबा न
दिल्यामुळे तक्रारदारप्रती सदोषपुर्ण सेवा दिली आहे का ?...............................होय.
ब. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून वरील तक्त्यामध्ये नमुद केल्याप्रमाणे
सदनिका खरेदीपोटी भरलेली रक्कम अंतिम आदेशामध्ये नमुद केल्याप्रमाणे
व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत का ?...................................................होय.
क. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटीची नुकसानभरपाई
व न्यायिक खर्च अंतिम आदेशात नमुद केल्याप्रमाणे मिळण्यास पात्र
आहेत का?.........................................................................................................होय.
ड. तक्रारदार सामनेवाले यांचेकडून कर्जावरील व्याज व भाडयापोटीची
रक्कम मिळण्यास पात्र आहेत का का ?..........................................................नाही.
इ. तक्रारीत काय आदेश ?.............................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
7.कारण मिमांसा
मुद्दा-अ. सामनेवाले यांनी मौजे-नेवाळी अंबरनाथ येथे स्वस्त घरांचा प्रकल्पाबाबत वृत्तपत्राव्दारे जाहिरात प्रसिध्द केल्यानुसार तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे संपर्क केला, व वरील तक्त्यात नमुद केल्यानुसार खोल्या आरक्षीत केल्या. सामनेवाले नं.2 व 3 हे सदर चाळी ज्या भुखंडावर बांधल्या आहेत त्यांचे जमिन मालक असल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. तसेच सामनेवाले नं.2 व तक्रारदार यांच्यामध्ये सदर प्रकल्पाबाबत अनुक्रमे 40 टक्के व 60 टक्के ची भागिदारी असल्याचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. त्यानुसार सामनेवाले नं.2 यांनी सदर भुखंडावर 13 चाळी बांधल्याबाबत तक्रारदार यांनी नमुद केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून जाहिरातीनुसार सदर चाळीमध्ये खोल्यांच्या व्यवहाराबाबत रक्कम स्विकारतांना तक्रारदार यांना त्यांनी आरक्षित केलेल्या खोलीचा क्रमांक दिला नसुन चाळ बांधुन झाल्यावर तक्रारदारांच्या खोलीचा क्रमांक त्यांना देण्यात येईल असे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना आश्वासन दिले, व त्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वर तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे मोठयाप्रमाणात मोबदल्याची रक्कमही स्विकारली, व सदर रक्कम स्विकारल्याबाबतच्या पावत्या मे.गजानन होम्स यांच्या लेटर हेडवर तक्रारदार यांना दिल्या. सदर पावत्यांवर गजानन होम्सचा रबरी शिक्का, व रक्कम स्विकारल्याबाबत अथोराइज्ड सिग्नेटरी म्हणून संबंधीत व्यक्तीची स्वाक्षरी दिसुन येते. तसेच सामनेवाले नं.2 व 3 सदर व्यवहाराबाबत सामनेवाले नं.1 यांचे कार्यालयीन कामकाज सांभाळत असल्याचे तक्रारदार यांनी नमुद केलेले आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर रक्कम स्विकारुनही तक्रारदार यांना त्यांच्या सदनिकांचा ताबा न दिल्यामुळे तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे चौकशी केली असता सामनेवाले यांनी तक्रारदारांशी वरील तक्त्यात दिल्याप्रमाणे समझोता करार स्वाक्षरीत केले, सदर समझोता करारानुसार तक्रारदार यांना त्यांच्या खोलीचा ताबा समझोता करारात नमुद केल्याप्रमाणे देण्याचे सामनेवाले यांनी मान्य केले. परंतु तक्रारदार यांच्याशी केलेला व्यवहार पुर्ण करुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना त्यांच्या खोल्यांचा ताबा अदयाप दिलेला नाही. तसेच तक्रार क्रमांक-703/2014 मध्ये सामनेवाले यांनी तक्रारदार यांचेशी समझोता करार केल्याचे दिसुन येत नाही. तक्रारदार यांनी याबाबत सामनेवाले नं.1 ते 3 यांचे विरुध्द कल्याण पोलीस स्टेशन येथे पोलीस कंम्प्लेंटही नोंदवलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून वरील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे सदनिकेच्या व्यवहारामध्ये रक्कम स्विकारुन, व समझोता करार करुन तक्रारदार यांना त्यांनी सामनेवाले यांचेकडे आरक्षीत केलेल्या सदनिकांचा ताबा अदयाप तक्रारदार यांना न दिल्यामुळे सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदारप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे दिसुन येते.
मुद्दा-ब. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्याकडून मे.गजानन होम्सच्या अंतर्गत बांधण्यात येणा-या चाळी मधील खोल्यांच्या व्यवहाराबाबत तक्रारदार यांच्याकडून मोठयाप्रमाणत रक्कम स्विकारली परंतु तक्रारदारांशी समझोता करारात नमुद केल्यानुसार संबंधीत व्यवहार पुर्ण करुन तक्रारदार यांना त्यांच्या संबंधीत सदनिकाचा ताबा अदयाप सामनेवाले यांचेकडून मिळाला नाही. तसेच तक्रारदारांच्या कष्टाचे पैसे नाहक सामनेवाले यांचेकडे इतकी वर्षे अडकून राहिले त्यामुळे तक्रारदार यांना दुसरीकडे घर घेणेही शक्य झाले नाही, व आर्थिक नुकसानीस व फसवणूकीला सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारदार सामनेवाले नं.1 ते 3 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या सदनिका खरेदीपोटी भरलेली संपुर्ण रक्कम सामनेवाले व तक्रारदार यांच्यात स्वाक्षरीत करण्यात आलेल्या तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे समझोता कराराच्या तारखेपासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजाने परत मिळण्यास पात्र आहेत. (तसेच तक्रार क्रमांक-703/2014 मध्ये ता.07.05.2014, संपुर्ण रक्कम दिल्याच्या तारखेपासुन दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजाने परत मिळण्यास पात्र आहेत) सदर रक्कम सामनेवाले 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या सर्व तक्रारदार यांना ता.29 सप्टेंबर-2016 पर्यंत दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह परत करावी. विहीत मुदतीत परत न केल्यास सदर संपुर्ण रक्कम संबंधीत तक्रारदाराशी केलेल्या वर नमुद समझोता कराराच्या तारखेपासुन (तक्रार क्रमांक-703/2014 मध्ये ता.07.05.2014) दरसाल दर शेकडा 15 टक्के व्याजासह सामनेवाले यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदार यांना परत करावी असे आदेश सामनेवाले नं.1 ते 3 यांना देण्यात येत आहेत.
मुद्दा-क. तक्रारीतील सर्व तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्या मे.गजानन होम्सच्या सदर योजनेत स्वस्त दरात घरे मिळण्याच्या अपेक्षेने सामनेवाले यांचेकडे त्यांच्या कष्टाचे पैसे गुंतवले, परंतु सामनेवाले यांनी, तक्रारदारांशी केलेला व्यवहार पुर्ण करुन सदर सदनिकांचा ताबा तक्रारदार यांना दिला नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणूक केली तसेच सामनेवाले यांचेकडे तक्रारदार यांचे पैसे नाहक इतकी वर्षे अडकून राहिल्यामुळे तक्रारदार यांना आर्थिक व मानसिक फसवणूकीलाही सामोरे जावे लागले. तसेच घराच्या वाढत्या किंमतींमुळे अदयाप दुसरीकडे घर घेणेही अशक्य झाल्याने तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला व वकीलाकरवी ग्राहक मंचात प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागली याबाबत, तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी रक्कम रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा हजार),व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) मिळण्यास पात्र आहेत.
मुद्दा-ड. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना सदनिका न मिळाल्याने तक्रारदार यांना भाडयाने जागा घेऊन रहावे लागले असे नमुद केले आहे, व सामनेवाले यांचेकडून भाडयापोटीची नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.20,000/- दयावेत. अशी तक्रारदार यांनी मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये त्यांनी भाडयाने जागा घेतल्याबाबत लिव लायसन्स अँग्रिमेंट किंवा भाडे पावती इत्यादी दाखल केलेली नसल्याने भाडे भरल्याबाबतच्या कागदोपत्री पुराव्या अभावी तक्रारदार यांची भाडयापोटीची नुकसानभरपाई मिळण्याबाबतची मागणी फेटाळण्यात येते. तसेच तक्रारदार यांनी सदर सर्व तक्रारींमध्ये तक्रारदार यांनी कर्ज सदनिकेच्या व्यवहाराबाबत कर्ज घेतले असुन सदर कर्जावरील व्याजापोटी रक्कम रु.20,000/- सामनेवाले यांनी तक्रारदार यांना अदा करावी अशी मागणी केली आहे. परंतु त्याबाबत तक्रारदार यांनी संबंधीत बँकेशी केलेला करार किंवा कर्जाची रक्कम संबंधीत बँकेला अदा केल्याचे सिध्द करणारा तक्रारदारांच्या बँकेचा खातेउतारा तक्रारीत सादर केलेला नाही. सबब कर्जावरील
व्याजापोटी नुकसानभरपाई म्हणून तक्रारदार यांनी मागितलेली नुकसानभरपाई बाबतची मागणी फेटाळण्यात येते.
सबब प्रस्तुत सर्व प्रकरणांमध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येतो.
- अंतिम आदेश -
1.तक्रार क्रमांक- 703/2014, क्रमांक-707/2014, क्रमांक-710/2014, क्रमांक-08/2015,
क्रमांक-09/2015, क्रमांक-11/2015, क्रमांक-31/2015, क्रमांक-202/2015, व तक्रार
क्रमांक-203/2015,अंशतः मंजुर करण्यात येतात.
2.सामनेवाले 1 ते 3 यांनी तक्रारदार यांच्याकडून वर नमुद तक्त्याप्रमाणे सदनिकेच्या
व्यवहारात रक्कम स्विकारुनही सदर सदनिकेबाबत रितसर करारनामे नोंदवून व स्वाक्षरीत
करुन तक्रारदार यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा न दिल्यामुळे तक्रारदार प्रती सदोषपुर्ण सेवा
दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले 1 ते 3 यांनी तक्रारदार यांच्याकडून सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली संपुर्ण
रक्कम वरील तक्त्यात नमुद केल्यानुसार समझोता कराराच्या तारखेपासुन म्हणजेच वर
नमुद तक्त्यातील समझोता कराराच्या तारखेपासुन (तक्रार क्रमांक-703/2014 वगळून)
दरसाल दर शेकडा शेकडा 12 टक्के व्याजासह तक्रारदार यांना वैयक्तिक व
संयुक्तीकरित्या ता.29.09.2016 पर्यंत परत करावी. (तक्रार क्रमांक-703/2014 मध्ये
ता.07.05.2014 पासुन 12 टक्के व्याजासह) दरसाल दर शेकडा 12 टक्के व्याजासह
सदर संपुर्ण रक्कम सामनेवाले नं.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या विहीत
मुदतीत तक्रारदार यांना अदा न केल्यास, समझोता कराराच्या तारखे पासुन (तक्रार
क्रमांक-703/2014 वगळून) दरसाल दर शेकडा 15 टक्के व्याजासह तक्रारदार यांना परत
करावी असे आदेश सामनेवाले नं.1 ते 3 यांना देण्यात येतात. (तक्रार क्रमांक-703/2014
मध्ये विहीत मुदतीत न दिल्यास ता.07.05.2014 पासुन द.सा.द.शे.15 टक्के व्याजाने
सामनेवाले नं.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना सदर संपुर्ण रक्कम व्याजासह वैयक्तिक व
संयुक्तीकरित्या दयावी.)
4. सामनेवाले 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या प्रत्येक तक्रारदारास
मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी रु.15,000/- (अक्षरी रुपये पंधरा
हजार),व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार)
ता.29.09.2016 पर्यंत दयावेत.
5. सामनेवाले यांचेकडून कर्जावरील व्याजापोटीची नुकसानभरपाई व भाडयापोटीची
नुकसानभरपाईबाबत तक्रारदार यांनी केलेली मागणी कागदोपत्री पुराव्या अभावी
फेटाळण्यात येते.
6. मुळ तक्रारींमध्ये वरीलप्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदार यांना व्याजासह सामनेवाले
यांना भरलेले पैसे परत करण्याचे आदेश असल्याने, मुळ तक्रारी निकाली काढतांना
त्यातील किरकोळ अर्ज निकाली (तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे क्रमांक वाचणे) निकाली
काढण्यात येतात.
7.आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
8.तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.29.07.2016
जरवा/