-ः आदेश ः- द्वारा- मा.सदस्या, सौ.ज्योती अभय मांधळे. 1. तक्रारदार हे ठाणे येथील रहिवासी असून त्यांनी सामनेवाले डेव्हलपर यांचेविरुध्द ही तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले लँड डेवहलपर आहेत. तक्रारदारानी सामनेवालेंसोबत एका भूखंडात पैसे गुंतवले. सदरचा भूखंड सर्व्हे क्र.147, इंदापूर, रायगड येथे 5000 चौ.फूटाचा आहे. सदरचे भूखंडासाठी तक्रारदारानी रु.52,000/-चा भरणा केला हाता. तक्रारदारानी सामनेवालेच्या कार्यालयात जाऊन सदर भूखंडासाठी अनेकदा चौकशी केली व अनेकदा तक्रारही नोंदवली. सदर भूखंडाबाबत किंवा त्यांनी भरलेले पैसे परत मिळण्याबाबत तक्रार नोंदवली, परंतु सामनेवालेनी त्याना काही प्रतिसाद दिला नाही. दि.20-5-11 रोजी त्यानी सामनेवालेकडे सदर भूखंडासाठी चेकने रकमेचा भरणा केला असल्यामुळे कारण उद्भवले आहे. तक्रारदारांची विनंती की, मंचाने सामनेवालेस त्यांचा भूखंड किंवा त्यांनी सामनेवालेस भूखंडासाठी भरलेली रक्कम व्याजासह परत मिळावी, तसेच त्यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.80,000/- नुकसानभरपाई तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.20,000/- मिळावेत. 2. सदरची तक्रार अँडमिशन स्टेजला आली असता तक्रारदाराचे वकीलांनी मंचापुढे युक्तीवाद केला, तो सदरची तक्रार मंचाकडे कशी दाखल होईल? याबाबतचा होता. मंचाने तक्रारीचे अवलोकन केले तसेच तक्रारदारांचे वकीलांचा युक्तीवाद यांचा विचार करता असे दिसते की, तक्रारदारानी सामनेवालेकडे रु.52,000/- एका भूखंडासाठी गुंतवले होते. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार सामनेवालेनी तक्रारदारास कोणतीही सेवा देण्याची नसल्यामुळे तसेच ट्रान्स्फर ऑफ अँक्टच्या तरतुदीनुसार उभय पक्षामध्ये झालेला हा खरेदी विक्रीचा व्यवहार आहे, तो या कक्षेत येत नाही. 3. सबब ही तक्रार अँडमिशन स्टेजलाच खर्चासह नामंजूर करण्यात येत आहे. 4. सदर आदेशाची सत्यप्रत तक्रारदाराना पाठविण्यात यावी. ठिकाण- कोकणभवन, नवी मुंबई. दि.1-7-2011. (ज्योती अभय मांधळे) (आर.डी.म्हेत्रस) सदस्या अध्यक्ष अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.
| Hon'ble Mrs.Jyoti A.Mandhle, MEMBER | Hon'ble Mr. R. D. Mhetras, PRESIDENT | , | |