Maharashtra

Nagpur

CC/473/2020

SMT. SULABHA AMIY KUMAR SINGH - Complainant(s)

Versus

M/S. FCM TRAVEL SOLUTIONS INDIA PVT. LTD., THROUGH BRANCH MANAGER - Opp.Party(s)

ADV. RAHUL SHUKLA

25 Aug 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/473/2020
( Date of Filing : 11 Nov 2020 )
 
1. SMT. SULABHA AMIY KUMAR SINGH
R/O. ROW HOUSE NO. G-20, MERCURY VILLA SOCIETY, DIXIT NAGAR, NARI, NAGPUR-440026
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. FCM TRAVEL SOLUTIONS INDIA PVT. LTD., THROUGH BRANCH MANAGER
BUSINESS AT, PUKHRAJ HOUSE, NEAR TRAFFIC PARK, VIP ROAD, DHARAM PETH, NAGPUR-440010
NAGPUR
MAHARASHTRA
2. M/S. TRAVEL TOURS ( PART OF M/S. FCM TRAVEL SOLUTIONS INDIA PVT. LTD.), THROUGH CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR
H.O. AT, CTSS-813/A, PRADEEP CHAMBERS, SHOP NO.1, APRT 2, BHANDARKAR ROAD, SHIVAJI NAGAR, PUNE-411004
PUNE
MAHARASHTRA
3. M/S. GO AIR LINES INDIA LTD., THROUGH CHAIRMAN AND MANAGING DIRECTOR
OFF.AT, FIRST FLOOR, C-1, WADIA INTERNATIONAL CENTRE, PANDURANG BUDHKAR MARG, WORLI, MUMBAI-400025
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. RAHUL SHUKLA, Advocate for the Complainant 1
 ADV. MR. PUSHKAR GHARE, Advocate for the Opp. Party 1
Dated : 25 Aug 2023
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 ही विरुध्‍द पक्ष 2 ची शाखा आहे. तक्रारकर्तीने Phuket (Thailand) येथे हनिमूनला जाण्‍याकरिता दिनांक 25.02.2020 ते 29.02.2020 या कालावधीचा विरुध्‍द पक्षाकडून टूर पॅकेज आरक्षित केला होता. याकरिता तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 कडे दि. 28.01.2020 रोजी रुपये NEFT द्वारे रुपये 44,000/- अदा केले होते.  तसेच दि. 20.02.2020 रोजी IMPS द्वारे तक्रारकर्ती तर्फे रुपये 50,000/- आणि तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या बॅंक खाते द्वारे रुपये 6000/- अदा करण्‍यात आले. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाला रुपये 1,00,000/- अदा केल्‍यानंतर  विरुध्‍द पक्ष 1 व 2  ने  विरुध्‍द पक्ष 3 Go Air या विमानाचे तक्रारकर्ती व तिच्‍या पतीच्‍या नावाचे दि. 25.02.2020 रोजीचे Bangalor to Phuket  आणि  Phuket to Bangalore असे तिकीट दिले होते. तसेच थायलंड येथील Ashlee Hotels, Patong Phuket येथील रुम आरक्षित केले परंतु त्‍यासंबंधीचे पत्र दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यांना विरुध्‍द पक्ष 1 व 2 वर अवलंबून राहावे लागले. त्‍याचप्रमाणे त.क.ने  दि. 22.02.2020 रोजी रुपये 60,030/- चे थायलंड  करन्‍सी मध्‍ये रुपांतरण केले होते.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, दि. 25.02.2020 रोजी नागपूर वरुन बैंगलोर येथे पोहचला असता वि.प. 1 व 2 ने त्‍याला थायलंडच्‍या विमानाचे तिकीट पाठविले. परंतु बोर्डींग काऊन्‍टरवर पोहचल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याला कळले की,  कोविड-19 या महामारीमुळे  थायलंड येथे लॉकडाऊन घोषित झाल्‍याने सदरचे विमान उडान  रद्द करण्‍यात आले असून तक्रारकर्त्‍याची रक्‍कम त्‍याला परत मिळणार आहे. त्‍यानुसार वि.प. 1 यांना सदरच्‍या विमानाचे उडान रद्द झाल्‍याने रक्‍कम परत मिळाली.  
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, सदरचा थायलंड टूर रद्द झाल्‍यामुळे त्‍यांनी त्‍याचे नातेवाईक वाराणसी येथे राहत असल्‍यामुळे त्‍यांनी बैंगलोर येथून वाराणसी येथे जाण्‍याकरिता विमान तिकिट बुक केले परंतु वि.प. 3 यांनीच वाराणसीचे तिकीट रद्द केल्‍यामुळे त.क.ला बैंगलोरवरुन गोवा येथे जावे लागले. त्‍यानंतर तक्रारकर्ता गोवा वरुन बैंगलोर येथे परत आला.  दि. 08.03.2020 पासून तक्रारकर्ता वि.प. 1 व 2 कडे त्‍याची जमा असलेली रक्‍कम परत करण्‍याची विनंती करुन सुध्‍दा वि.प.ने त.क.ची जमा असलेली रक्‍कम परत न केल्‍यामुळे दि. 02.09.2020 रोजी त.क.ने वि.प. 1 ला पत्र पाठवून रक्‍कमेची मागणी केली असता वि.प.ने दि. 23.09.2020 रोजी ई-मेल द्वारे कळविले की, त.क. जुन 2021 च्‍या आधि त.क. रक्‍कम रुपये 86,000/- चा लाभ वि.प.कडून घेऊ शकतात. परंतु तक्रारकर्ता सदर रक्‍कम घेण्‍यास तयार नसल्‍याने त्‍याने वि.प. ला दि. 29.09.2020 रोजी वकिला मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. त्‍यास विरुध्‍द पक्षाने दि. 14.10.2020 ला उत्‍तर दिले. परंतु विरुध्‍द पक्षाने आजपर्यंत तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली संपूर्ण रक्‍कम परत न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, त्‍याची विरुध्‍द पक्षामुळे खर्च झालेली रक्‍कम रुपये 3,60,000/- व्‍याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 ला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस प्राप्‍त होऊन देखील विरुध्‍द पक्ष 1 व 2 आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 11.02.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  5.      विरुध्‍द पक्ष 3 ने आपल्‍या विशेष कथनात तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीतील बहुतांश कथन अमान्‍य केले असून पुढे नमूद केले की,  तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केली असल्‍यामुळे सदरची तक्रार खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्ती – सुलभा नामदेव सोमकुंवर आणि अमिय कुमार सिंग यांनी दि. 25.02.2020 रोजी  Banglaluru to Thailand via Delhi या विमानाने जाण्‍याकरिता रुपये 37,806/- चे तिकीटचे आरक्षण वि.प. 1 व 2 द्वारे केले होते. तसेच त.क.ला एस.एम.एस.द्वारे कोविड-19 या महामारीमुळे विमानाचे उडान रद्द करण्‍यात आल्‍याचे कळविले होते. विरुध्‍द पक्ष 3 यांना कोणतेही विमानाचे उडान रद्द करणे, विलंब करणे किंवा रि-शेडयुल करणे ग्राहकास दुस-या विमानातील आसन (सीट) उपलब्‍ध करुन देणे इत्‍यादी सर्व संबंधीचे अधिकार त्‍यांनी राखून ठेवले आहे. त्‍याचप्रमाणे नैसर्गिक आपत्‍ती, दंगे, युध्‍द इत्‍यादी वि.प. 3 च्‍या अखत्‍यारित नसलेल्‍या घटनेच्‍या वेळेस विरुध्‍द पक्ष 3 हे  नियमानुसार त्‍यांनी ग्राहकांकडून स्‍वीकारलेली रक्‍कम परत करतात किंवा त्‍यांच्‍या आवश्‍यकतेनुसार पुढील प्रवासा दरम्‍यान समायोजित करतात.  विरुध्‍द पक्ष 3 यांना तक्रारकर्त्‍याच्‍या तिकिटाची रक्‍कम  विरुध्‍द पक्ष 1 च्‍या खात्‍यातून प्राप्‍त झाली असल्‍यामुळे दि. 25.02.2020 रोजी वि.प. 3 ने रुपये 37,806/- वि.प. 1 च्‍या खात्‍यात जमा केले. तसेच वि.प. 3 च्‍या नियमानुसार त्‍याचे अधिकार क्षेत्र मुंबई येथे असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मुंबई  येथे दाखल करणे आवश्‍यक होते.  अशा प्रकारे वि.प. 3 ने तक्रारकर्त्‍याची जमा रक्‍कम परत केली असल्‍यामुळे त्‍यानी तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याने प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी.

 

  1.      उभय पक्षांनी दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले. तसेच उभय पक्षांच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.
    1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?              होय
    2. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ?          होय

  1. विरुध्‍द पक्ष 3 ने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?   नाही.  
  2. काय आदेश   ?                          अंतिम आदेशानुसार

 

  • निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –   तक्रारकर्तीने Phuket (Thailand) येथे हनिमूनला जाण्‍याकरिता दिनांक 25.02.2020 ते 29.02.2020 या कालावधीचा विरुध्‍द पक्षाकडून टूर पॅकेज आरक्षित केला होता व त्‍याकरिता विरुध्‍द पक्ष 1 कडे दि. 28.01.2020 रोजी रुपये NEFT द्वारे रुपये 44,000/- आणि दि. 20.02.2020 रोजी IMPS द्वारे तक्रारकर्ती तर्फे रुपये 50,000/- आणि तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या बॅंक खाते द्वारे रुपये 6000/- अदा करण्‍यात आले होते हे नि.कं. 2 वर दाखल पावत्‍यांवरुन दिसून येते. अशा प्रकारे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 1,00,000/- जमा केल्‍यानंतर  विरुध्‍द पक्ष 1 तर्फे विरुध्‍द पक्ष 3 Go Air या विमानाचे तक्रारकर्ती व तिच्‍या पतीच्‍या नावाचे दि. 25.02.2020 रोजीचे Bangalor to Phuket  आणि  Phuket to Bangalore असे तिकीट दिले होते. तसेच थायलंड येथील Ashlee Hotels, Patong Phuket येथील रुम आरक्षित केले असल्‍याचे पत्र दिले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.
  2.    कोविड-19 या महामारीमुळे  थायलंड येथे लॉकडाऊन घोषित झाल्‍याने सदरचे विमान उडान रद्द करण्‍यात आल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष 3 तर्फे विरुध्‍द पक्ष 1 च्‍या खात्‍यात रक्‍कम परत करण्‍यात आली. तक्रारकर्तीची थायलंड येथील जाणे-येण्‍याची तिकिटचे आरक्षण हे विरुध्‍द पक्ष 1 मार्फत करण्‍यात आले होते. या ठिकाणी तक्रारकर्ती व विरुध्‍द पक्ष 3 चा प्रत्‍यक्ष संबंध आलेला नसून सदरचा व्‍यवहार हा विरुध्‍द पक्ष 1 मार्फत करण्‍यात आला असल्‍याचे दिसून येते. यावरुन विरुध्‍द पक्ष 3 यांनी तक्रारकर्तीला कुठलीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याचे दिसून येते.
  3.       तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष 1 कडे जमा केलेली रक्‍कम परत मिळण्‍याकरिता पत्र व नोटीस दिली असता वि.प. 1 यांनी तक्रारकर्त्‍याला रक्‍कम रुपये 86,000/- पुढील प्रवासा दरम्‍यान समायोजित करण्‍यास तयार असल्‍याचे लेखी उत्‍तरा द्वारे कळविले होते. परंतु विरुध्‍द पक्ष 1 ला विरुध्‍द पक्ष 3 तर्फे प्राप्‍त झालेली रक्‍कम वि.प. 1 यांनी तक्रारकर्तीला परत केली नाही. त्‍यानंतर तक्रारकर्ती दि. 25.02.2020 रोजी बैंगलोरवरुन गोवा येथे व दि. 28.02.2020 रोजी  गोवा वरुन बैंगलोर येथे विमानाने प्रवास केला व त्‍याचे तिकीट देखील वि.प. 1 यांनी काढले असल्‍याचे नि.क्रं. 2 वर दाखल तिकिटावरुन दिसून येते. तक्रारकर्तीने बैंगलोर ते गोवा व  गोवा ते  बैंगलोर या विमान प्रवासाचा उपभोग घेतलेला आहे. त्‍यामुळे तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 1 कडे जमा केलेल्‍या रक्‍कमेतून गोवा टूरच्‍या विमान तिकिटाची रक्‍कम कपात करुन उर्वरित रक्‍कम (रुपये 1,00,000 – 15474 (बैंगलोर ते गोवा व  गोवा ते  बैंगलोर या विमान तिकिटाची रक्‍कम) = 84,526) परत मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे. 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 84,526/- तक्रारकर्त्‍याला परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. वि.प. 3 विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

 

  1. उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.