Maharashtra

Nagpur

CC/517/2020

JAGDISH CHANDRA SATYANARAYAN SHUKLA (DEAD), THR. HIS LEGAL REPRESENTATIVES, SMT. VEENA JAGDISHCHANDRA SHUKLA, RAHUL JAGDISHCHANDRA SHUKLA, SMT. RICHA ANSHUL AWASTHI - Complainant(s)

Versus

M/S. EXCEL PRINTERS, A PARTNERSHIP FIRM THROUGH PARTNER SHRI. JAGDISH M. KOTHARI - Opp.Party(s)

ADV. JAGDISH C. SHUKLA

25 Mar 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/517/2020
( Date of Filing : 03 Dec 2020 )
 
1. JAGDISH CHANDRA SATYANARAYAN SHUKLA (DEAD), THR. HIS LEGAL REPRESENTATIVES, SMT. VEENA JAGDISHCHANDRA SHUKLA, RAHUL JAGDISHCHANDRA SHUKLA, SMT. RICHA ANSHUL AWASTHI
R/O. VIMAL VILLA, U-45, NARENDRA NAGAR, NAGPUR-440015
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. EXCEL PRINTERS, A PARTNERSHIP FIRM THROUGH PARTNER SHRI. JAGDISH M. KOTHARI
BUSINESS AT, KOTHARI MANSION 3, BEHIND LAXMI THEATRE, SITABULDI, NAGPUR-440012.
NAGPUR
MAHARASHTRA
2. SMT. BHAVNA JAGDISH KOTHARI
BUSINESS AT, KOTHARI MANSION 3, BEHIND LAXMI THEATRE, SITABULDI, NAGPUR-440012.
NAGPUR
MAHARASHTRA
3. M/S. RHYTHM INVESTMENTS, THROUGH PROPRIETOR SHRI. RAJESH KRIPLANI
BUSINESS AT, MIDC I.T.PARK, LINK ROAD, SADAR, NAGPUR-440001
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 25 Mar 2022
Final Order / Judgement

आदेश पारीत व्‍दारा  श्री. एस आर आजने मासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्‍या कलम ३५(1) नुसार दाखल केलेली आहे.
  2.  तक्रारकर्ते क्रं.अ,ब,क हे जगदिश प्रसाद सत्यनारायण शुक्ला यांचे कायदेशीर वारसदार आहेत. श्री जगदिशप्रसाद शुक्ला यांचे दिनांक 23.2.3021 रोजी निधन झाले. त्यांचा वि.प.शी व्यापारीक संबंध होता. वि.प.क्रं.3 यांनी तक्रारदाराचे वडीलांशी दिनांक 19.10.2015 संपर्क साधुन त्यांना वि.प.क्रं.1 व 2 यांचेकडे काही रक्कम जमा करण्‍याबाबत विनंती केली. तक्रारदाराचे वडीलांनी वि.प.क्रं.3 यांचे मार्फत वि.प.क्रं.1 यांचे कडे रुपये 5,00,000/- गुंतविले व वि.प.क्रं.1 यांनी त्याबाबतची पावती तकारदाराचे वडीलांना दिली. वि.प.ने तकारदाराला स्टेट बॅंक आफ इंडिया, किंग्जवे, नागपूर, या शाखेचा क्रं. 4868461 चा स्वाक्षरी नसलेला धनादेश दिला.
  3. तक्रारदाराचे वडीलांना घरगूती कामाकरिता रक्कमेची गरज असल्यामूळे त्यांनी वि.प.क्रं.1 ला रक्कम परत करण्‍याबाबत विनंती केली असता वि.प.क्रं.1 ने रक्कम परत करण्‍याची टाळाटाळ करीत होता. तक्रारदाराचे वडीलांनी वि.प.क्रं.3 यांना सुध्‍दा वि.प.कं.1 यांना रक्कम परत करण्‍याबाबत आग्रह करण्‍याचे सांगीतले. वि.प. हे दिनांक 06.10.2020 ला तक्रारदाराचे वडीलांकडे जमा रक्कम परत करण्‍याकरिता आला आणि त्यानंतर स्टेट बॅंक आफ इंडिया, किंग्जवे, नागपूर, या शाखेचा रुपये 5,00,000 धनादेश क्रं. 4868461 वर स्वाक्षरी केली.
  4. वि.प.कं.1 व 2 यांनी निर्गमीत केलेला धनादेश खात्यात पूरेशी रक्कम नसल्याकारणाने वटला नाही त्यामूळे तक्रारदाराने वि.प.ला 3.10.2020 ला कायदेशीर नोटीस पाठवून रक्कमेची मागणी केली. सदरची नोटीस वि.प.ला दिनांक 6.20.2020 ला प्राप्त झाली परंतु वि.प.ने सदर नोटीसची दखल घेतली नाही त्यामूळे तक्रारदाराचे वडीलांनी प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन पूढील प्रमाणे मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाला निर्देशीत करण्‍यात यावे की, वि.प.ने तक्रारकर्त्‍याला रुपये 5,95,000/-, व्याजासह रक्कम परत मिळेपर्यत द्यावी.
  5. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 3  आयोगा मार्फत नोटीस पाठविण्‍यात आली असता वि.प. नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा आयोगासमक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ०९.०३.२०२२. रोजी पारित करण्‍यात आला.
  6. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन करता व तोडी युक्तीवाद ऐकता खालील मुद्दे विचारार्थ घेण्‍यात आले.

मुद्दे                                                         उत्तरे

  1.  तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                          होय
  2.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?          होय
  3.  विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ?   होय
  4.  काय आदेश ?                                                             अंतिम आदेशानुसार

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराचे वडीलांनी वि.प.कं.3 यांचेमार्फत वि.प.क्रं.1 व 2 यांचेकडे रुपये 5,00,000/- धनादेश क्रं. 435027, युको बॅंक स्वावलंबीनगर नागपूर,व्दारे द.सा.द.शे. 18 टक्के व्याजदाराने गुंतवणुक केल्याचे व त्यापोटी सदर रक्कमेवर दिनांक 17.1.2016 ते 16.4.2016 , दिनांक 13.10.2016 ते दिनांक 11.1.2017 तसेच दिनांक 8.3.2020 ते 6.6.2020 या कालावधीकरिता व्याज वि.प.कडुन प्राप्त केल्याचे नि.क्रं.2 (1,2,) वर दाखल दस्तऐवजांवरुन निर्देशनास येते. यावरुन तक्रारकर्ता हा वि.प.क्रं.1 ते 3 चा ग्राहक आहे हे सिध्‍द होते. तक्रारदाराने वि.प.कडे गुंतविलेल्या रक्कमेची मागणी केली असता वि.प.ने तक्रारदाराला स्टेट बॅंक आफ इंडिया, किंग्जवे, नागपूर, या शाखेचा रुपये 5,00,000, दिनांक 16.9.2020 चा धनादेश क्रं. 4868461 दिला परंतु सदरचा धनादेश बॅंकेत वटविण्‍याकरिता सादर केला असता सदर धनादेश अपूरी रक्कम असल्याकारणाने वटला नाही हे नि.क्र.2(6) दाखल दस्तऐवजावरुन दिसून येते. वि.प.ने तक्रारदारचे वडीलांकडुन करारानूसार स्वीकारलेली रक्कम परत केली नाही. वि.प.ने तक्रारदाराचे प्रती त्रुटीपूर्ण सेवा असुन तक्रारदाराचे प्रती अनुचित  व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

                              अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.
  2. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 3 यांना आदेशीत करण्‍यात येते की, त्यांनी तक्रारकर्त्‍याला  रुपये 5,00,000/- रक्कम दिनांक 21.6.2020 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह येणारी रक्कम प्रत्यक्ष अदायगी पावेतो तक्रारदारास परत करावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,,000/- द्यावे.
  4. विरुध्‍द पक्ष क्रं.1 ते 3 यांनी  वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या आंत वैयक्तीक अथवा संयुक्तीरित्या करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

तक्रारकर्त्‍याला  प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.