( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे, मा.सदस्या ) आदेश ( पारित दिनांक :06 जानेवारी 2011) प्रस्तुत तक्रारकर्तीच्या म्हणण्यानुसार तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडुन त्यांच्या खास मौजा- वांजरा,पटवारी हलका नं.17, रा.िन.म. नांगपुर यांच्या हद्दीतील खसरा नं.13,15 हयावर मालीक मकबूजा लेआऊट मधील भुखंड क्रमांक 296,एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट, एकुण रक्कम रुपये 5400/- एवढया किमतीत खरेदी केला. दिनांक 22.5.1995 रोजी गैरअर्जदार यांनी सदर भुखंडाचे विक्रीपत्र तक्रारकर्तीच्या अख्यत्यारीत करुन दिले. परंतु सदर भुखंडाचा वास्तविक ताबा तक्रारकर्तीस दिला नाही. सदर भुखंड हा भानगडीत असल्यामुळे त्यांचे निवारण करुन सदर भुखंडाचा प्रत्यक्ष ताबा देण्यासाठी तक्रारकर्तीने गैरअर्जदारास विनंती केल्यावर त्याचा वास्तविक ताबा लवकरात लवकर देण्याचे गैरअर्जदार यांनी आश्वासन दिले. परंतु वारंवार तोंडी व लेखी विनंती करुनही अद्यापपावेतो सदर भुखंडाचा वास्तविक ताबा तक्रारकर्तीस दिला नाही. अथवा त्यांची किंमतही परत केली नाही. ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे. म्हणुन तक्रारकर्तीने सदरची तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने खास मौजा- वांजरा, प.ह.नं.17, रा.नि.म.नागपूर यांच्या मालीक मकबूजा लेआऊट मधील भुखंड क्रमांक 296 चा वास्तविक ताबा मोजमाप करुन तक्रारकर्तीस द्यावा. किंवा आजच्या बाजारभाव मूल्याप्रमाणे भुखंड क्रमांक 296 ची किंमत द्यावी. तसेच मानसिक व शारिरिक त्रासाबद्दल 1,00,000/-व तक्रारीचा खर्च रुपये 10,000/-मिळावा अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली भिस्त दाखल केलेल्या वरिष्ठ न्यायालयाच्या निवाडयांवर ठेवलेली आहे. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून दस्तऐवजयादी नुसार एकुण 3 कागदपत्रे दाखल केली. त्यात विक्रीपत्राची छायांकीत प्रत, नोटीसची छायांकीत प्रत,नोटीस पोचपावतीची छायांकित प्रत, तसेच निवाडे इत्यादी कागदपत्रांचा समावेश आहे. सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेने नोटीस देण्यात आली. नोटीस मिळुन गैरअर्जदार हजर झाले व लेखी जवाब दिनांक 23.7.2010 रोजी दाखल केला. तसेच निवाडे व दस्तऐवज दाखल केले. गैरअर्जदार याच्या कथनानुसार सदरची तक्रार या मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तसेच गुंतागुंतीची असल्यामुळे या मंचाला चालविता येणार नाही. गैरअर्जदार ही पंजीबध्द सहकारी संस्था असुन दिनांक 22.5.1995 रोजी सदरचा भुखंड खरेदीखताद्वारे तक्रारकर्तीस विकण्यात आलेला होता. सदर खरेदी खताची रितसर नोंदणी तक्रारकर्तीस करुन देण्यात आलेली होती व तिचा रितसर ताबा देखिल तक्रारकर्तीस देण्यात आलेला होता. त्यानंतर त्या भुखंडाचा ताबा टिकविण्याची जबाबदारी तक्रारदाराची होती ती तिने पार पाडली नाही. यास गैरअर्जदार यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारकर्तीने कुठलेही संयुक्तिक कारण नसतांना सदरची तक्रार दाखल केली म्हणुन ती खारीज करण्यात यावी अशी गैरअर्जदार यांनी विनंती केली. -: कारणमिमांसा :- प्रकरणातील एकंतर वस्तुस्थिती पाहता या मंचाच्या असे निर्देशनास येते की, निर्वीवादपणे तक्रारकर्तीने गैरअर्जदार यांचेकडुन त्यांच्या खास मौजा- वांजरा, पटवारी हलका नं.17, रा.िन.म. नागपुर यांच्या हद्दीतील खसरा नं.13,15 हयावर मालीक मकबूजा लेआऊट मधील भुखंड क्रमांक 296,एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट, एकुण रक्कम रुपये 5400/-एवढा मोबदला देऊन खरेदी केलेला होता. प्रकरणात दाखल दस्तऐवजावरून हे ही निर्देशनास येते की, गैरअर्जदार यांनी तक्रारकर्तीस विक्रीपत्र करुन दिलेले असले तरी, सदर भुखंडाचा वास्तविक ताबा तक्रारकर्तीस दिलेला नव्हता. (कागदपत्र क्रं.80,81) कागदपत्र क्रं.80 वरील दिनांक 23.11.2010 च्या पुरसिसचे अवलोकन करता असे निर्देशनास येते की, गैरअर्जदार यांनी सदरच्या भुखंडाऐवजी गैरअर्जदार यांच्या मालीक मकबूजा लेआऊट मधील भुखंड क्रमांक 296,एकुण क्षेत्रफळ 1200 चौ.फुट, देण्याचे कबुल केलेले होते. तक्रारकर्तीने ते मान्य केलेले होते. त्यानंतर कागदपत्र क्रं. 82 वर दिनांक 23.12.2010 रोजी तक्रारकर्तीने अर्ज दाखल करुन गैरअर्जदार यांनी एक महिना होऊन सदर भुखंडाचे विक्रीपत्र करुन दिले नाही व आपसी तडजोड झालेली नाही म्हणुन तक्रार गुणवत्तेवर निकाली काढावी अशी विनंती या मंचाला केली. वरील बाबींचा विचार करता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की, गैरअर्जदार यांनी भुखंडापोटी संपुर्ण मोबदला स्विकारुन त्याचे विक्रीपत्र करुन दिले. (कागदपत्र क्रं.8) परंतु त्याचा वास्तविक ताबा तक्रारदारास दिलेला नाही. ही गैरअर्जदार यांची कृती सेवेतील कमतरता आहे व त्याकरिता गैरअर्जदार तक्रारकर्तीच्या नुकसान भरपाईस जबाबदार आहे. सबब आदेश. -//-//- आदेश -//-//- 1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर. 2. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस वाजंरा येथील वादातील भुखंड क्रं.296 मधील खसरा क्रमांक 13,15 पैकी प.ह.न.17, एकुण क्षेत्रफळ 1200/- चा प्रत्यक्ष ताबा आदेश प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत द्यावा. किंवा तक्रारकर्तीस मान्य असल्यास गैरअर्जदाराच्या अन्य ले-आऊट (कागदपत्र क्रं.83 वरील पुरसीस प्रमाणे) मधील समान क्षेत्रफळाच्या भुखंडाचे विक्रीपत्र करुन द्यावे. 3. नागपुर सुधार प्रन्यासने मागणी केल्यानंतर विकास खर्च देण्याची जबाबदारी तक्रारकर्तीची राहील. किंवा तक्रारदारास विक्रीपत्र करुन दिलेल्या भुखंडाची आजच्या सरकारी बाजारभावाप्रमाणे येणारी किंमत तक्रारकर्तीस द्यावी. (आजच्या बाजाभावासाठी नोंदणी निबंधक, याचे परिगणणा पत्रकाचा आधार घ्यावा.) 3. गैरअर्जदाराने तक्रारदारास दाव्याच्या खर्चापोटी रुपये 2,000/-(रुपये दोन हजार केवळ) द्यावे. 4. सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन एक महिन्याचे आत करावे.
| [HONABLE MRS. Jayashree Yangal] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER | |