Maharashtra

Nagpur

CC/563/2020

MR. VIKRAM DILIP CHATTERJEE - Complainant(s)

Versus

M/S. EPSILON INFRATECH, A PARTNERSHIP FIRM, THROUGH ITS PARTNER, MR. ISHTIYAQUE AHMAD LIYAQUAT HUSSA - Opp.Party(s)

ADV. ALOK C. CHAUDHARI

03 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/563/2020
( Date of Filing : 21 Dec 2020 )
 
1. MR. VIKRAM DILIP CHATTERJEE
R/O. FLAT NO.811, UTKARSH NIRMAN, MANGALWARI BAZAR ROAD, SADAR, NAGPUR-01
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. EPSILON INFRATECH, A PARTNERSHIP FIRM, THROUGH ITS PARTNER, MR. ISHTIYAQUE AHMAD LIYAQUAT HUSSAIN
R/. C-7, RATHOD LAYOUT, ANANT NAGAR, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ALOK C. CHAUDHARI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 03 Dec 2021
Final Order / Judgement

         Final Order / Judgement

                                           आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.       तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षाचे प्लॉट नंबर 55,  जय दुर्गा गृहनिर्माण सहकारी समिती नागपूर यांचे मौजा- झिंगाबाई टाकळी,  खसरा नंबर 30/1,30/2 , नगर भूमापन क्रमांक 36, शिफ्ट नंबर 33, तहसिल जिल्हा नागपूर येथील M/S. EPSILON INFRATECH’S  ‘OLIVE HOMES’ WING-A’ या बहुमजली प्रस्तावित इमारती मधील सदनिका क्रमांक 201 एकूण बांधकाम क्षेत्रफळ 45.407 चौरस मीटर बालकनीसह एकूण रुपये 35,00,000/- इतक्या किंमतीत विकत घेण्याचा करार दिनांक 26.05.2015 रोजी केला. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षास करारनामा करण्यापूर्वी सदनिका क्रमांक 201 च्या खरेदीपोटी रुपये 11,00,000/- अदा केले होते.  त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने एपसिलोन इन्फ्राटेक ऑलिव्ह होम विंग - ए या इमारतीतील सदनिका क्रमांक 301 एकूण बांधकाम क्षेत्रफळ45.407 चौ.मी.बालकनीसह एकूण रुपये 35,00,000/- इतक्या किंमतीत विकत घेण्याचा करार दिनांक 22.01.2018 रोजी केला होता.  तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षास करारनामापूर्वी  सदनिका क्रमांक 301 च्या खरेदी पोटी रुपये 12,00,000/- अदा केले होते. तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षास सदनिका क्रमांक 201 व 301 च्या खरेदी पोटी करारनाम्यानुसार अ.क्रं. रुपये 18,75,000/- व रुपये 18,00,000/-  बँकेमार्फत अदा केली.  तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षास करारनाम्यातील शेड्युल नुसार रक्कम अदा केली. विरुध्‍द पक्षाला वाजवी पेक्षा जास्त रक्कम प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने सदनिकेचे बांधकाम पूर्ण केली नाही आणि तक्रारकर्त्याला सदनिकेचे विक्रीपत्र करून दिले नाही तसेच ताबा ही दिला नाही.  त्यामुळे तक्रारकर्त्याने वकिलामार्फत विरुध्‍द पक्षास दिनांक 11.06.2020 ला नोटीस पाठवली व  विरुध्‍द पक्षाने सदर नोटीस च्या अनुषंगाने दिनांक 23.06.2020 अन्वये उत्तर पाठविले,  परंतु नोटीसमधील  तक्रारकर्त्‍याच्‍या मागणीची दखल घेतली नाही, म्‍हणून तक्रारकर्त्याने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याला सदनिकेचा ताबा द्यावा व अॅग्रीमेन्‍ट स्‍पेसिकेशनप्रमाणे सदनिकेचे बांधकाम पूर्ण करुन देण्‍याचा व तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.  

 

  1.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष हजर झाले नाही अथवा आपला जबाब ही दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 09.08.2021 ला पारित करण्‍यात आला.

 

  1.       तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज, त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

 

         मुद्दे                                                                       उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?          होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देऊन

अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय ? होय

 

2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे

 

  • निष्‍कर्ष
  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या  प्लॉट नंबर 55,  जय दुर्गा गृहनिर्माण सहकारी समिती नागपूर मौजा- झिंगाबाई टाकळी,  खसरा नंबर 30/1,30/2 , नगर भूमापन क्रमांक 36, शिट नंबर 33, तहसिल जिल्हा नागपूर येथील EPSILON INFRATECH’S  ‘OLIVE HOMES’ WING-A’ या बहुमजली प्रस्तावित इमारती मधील सदनिका क्रमांक 201 एकूण बांधकाम क्षेत्रफळ 45.407 चौरस मीटर बालकनीसह एकूण रुपये 35,00,000/- मध्‍ये विकत घेण्याचा करार दिनांक 26.05.2015 रोजी केला होता व करारनामा करण्यापूर्वी सदनिका क्रमांक 201 च्या खरेदी पोटी रुपये 11,00,000/- अदा केले होते व बॅंके मार्फत रुपये 18,75,000/- अदा केले असे एकूण रुपये 29,75,000/- अदा केले असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते.  त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याने EPSILON INFRATECH’S  ‘OLIVE HOMES’ WING-A’ या इमारतीतील सदनिका क्रमांक 301 एकूण बांधकाम क्षेत्रफळ45.407 चौ.मी.बालकनीसह एकूण रुपये 35,00,000/- मध्‍ये विकत घेण्याचा करार दिनांक 22.01.2018 रोजी केला होता व   सदनिका क्रमांक 301 च्या खरेदीपोटी रुपये 12,00,000/- अदा केले होते व बॅंक मार्फत रुपये 18,00,000/- अदा केले असे एकूण रुपये 30,00,000/- अदा केले असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.   तक्रारकर्त्याने विरुध्‍द पक्षास करारनाम्यातील शेड्युल पेक्षा जास्त रक्कम अदा करून ही विरुध्‍द पक्षाने सदनिकेचे बांधकाम पूर्ण केले नाही व तक्रारकर्त्याच्‍या नांवे सदनिकेचे विक्रीपत्र ही करून दिले नाही, त्‍याचप्रमाणे ताबा ही दिला नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी कृती असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

             सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने दोन्‍ही सदनिकापोटी उर्वरित असलेली रक्‍कम अ.क्रं. रुपये 5,25,000/- व रुपये 5,00,000/- तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारुन  वि.प. च्‍या नांवे असलेला  प्लॉट नंबर 55,  जय दुर्गा गृहनिर्माण सहकारी समिती नागपूर मौजा- झिंगाबाई टाकळी,  खसरा नंबर 30/1,30/2 , नगर भूमापन क्रमांक 36, शिफ्ट नंबर 33, तहसिल जिल्हा नागपूर येथील EPSILON INFRATECH’S OLIVE HOMES’ WING-A या बहुमजली प्रस्तावित इमारती मधील सदनिका क्रमांक 201 एकूण बांधकाम क्षेत्रफळ 45.407 चौरस मीटर बालकनीसह व सदनिका क्रमांक 301 एकूण बांधकाम क्षेत्रफळ 45.407 चौरस मीटर बालकनीसह या दोन्‍ही सदनिकेचे कायदेशीररित्‍या विक्रीपत्र नोंदवून प्रत्‍यक्ष सदनिकेचा ताबा द्यावा. तसेच सदनिकेच्‍या विक्रीपत्राकरिता येणारा खर्च तक्रारकर्त्‍याने सोसावा.

अथवा

उपरोक्‍त वि.प. च्‍या नांवे असलेला प्लॉट नंबर 55,  जय दुर्गा गृहनिर्माण सहकारी समिती नागपूर,  मौजा- झिंगाबाई टाकळी,  खसरा नंबर 30/1,30/2 , नगर भूमापन क्रमांक 36, शिट नंबर 33, तह.जि. नागपूर येथील EPSILON INFRATECH’S OLIVE HOMES’ WING-A या बहुमजली प्रस्तावित इमारती मधील सदनिका क्रमांक 201 व 301 या दोन्‍ही सदनिकेचे विक्रीपत्र करुन देणे शक्‍य नसल्‍यास विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून सदनिका क्रं. 201 च्‍या विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 29,75,000/- व त्‍यावर दि. 24.05.2017 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द्यावी. तसचे   सदनिका क्रं. 301 च्‍या विक्रीपोटी स्‍वीकारलेली रक्‍कम रुपये 30,00,000/- व त्‍यावर दि. 28.01.2018 पासून द.सा.द.शे.18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत तक्रारकर्त्‍याला  द्यावी

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 30,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

                             

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.