Maharashtra

Nagpur

CC/10/720

Shri Sanjay Devraoji Nemad - Complainant(s)

Versus

M/s. Dipika Electronics Through Prop. - Opp.Party(s)

Adv. S.M.Kasture

28 Jun 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/720
1. Shri Sanjay Devraoji NemadPlot No. 29, Anand Apartment, Near Awale High School, Incom Tax Colony, Hingna Road, NagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. Dipika Electronics Through Prop.Pratap Nagar, Ring Road, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv. S.M.Kasture, Advocate for Complainant
ADV.R.S.AHUJA, Advocate for Opp.Party

Dated : 28 Jun 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्रीमती जयश्री येंडे - सदस्‍या यांचे आदेशांन्‍वये)
                       -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 28/06/2011)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 20.11.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.                प्रस्‍तुत प्रकरणातील तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍यानुसार गैरअर्जदार हे एल.जी. कंपनीचे अधिकृत विक्रेता असुन तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍याकडून दि.06.03.2010 रोजी एल.जी. कंपनीचे वातानुकूलीन यंत्र मॉडेल नं.एलएसए 5 एनडब्‍ल्‍यु 2 व्‍हीएफ 1 हे एकूण रक्‍कम रु.24,500/- एवढया मोबदल्‍यात विकत घेतले सदर यंत्राला प्रति दिवस 3 युनिट प्रमाणे निजेचा खर्च करावा लागेल असे अभिवचन गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला दिलेले असतांना देखिल सदर वातानुकूलीन यंत्र 16 ते 17 युनिट विज ओढत असल्‍याने व सदर उत्‍पादकीय दोष असल्‍यामुळे सदर बाबींसंदर्भात तक्रारदाराने गैरअर्जदारांना तक्रारक केल्‍यावर सुध्‍दा गैरअर्जदारांनी त्‍याची दखल घेतली नाही. तसेच सदर दोषपूर्ण वातानुकूलीन यंत्रामुळे तक्रारकर्त्‍याला मानसिक व आर्थीक त्रास सहन करावा लागला. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास सदोष वातानुकू‍लीन यंत्र विकून सेवेत करतरता दिली म्‍हणून गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिल्‍याचे घोषीत करावे, दोषपूर्ण वातानुकूलीन यंत्र खोटया आश्‍वासनाव्‍दारे विकल्‍यामुळे सदर यंत्राची किंमत रु.24,500/- वार्षीक 18% व्‍याजासह परत करावे, यंत्र बसविण्‍यांस आलेला खर्च रु.1,600/- व विजेवर अतिरिक्‍त झालेला खर्च रु.5,000/- तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.5,000/- मिळावा अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे पुष्‍टयर्थ वातानुकूलीन यंत्र खरेदी केल्‍याची पावती, विद्युत बिले, वारंटी कार्ड व गैरअर्जदाराला दिलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे.
 
3.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्‍यात आली असता ते मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी उत्‍तर दाखल केले असुन, त्‍यांनी आपल्‍या कथनात तक्रारकर्त्‍याने उत्‍पादन कंपनीला पार्टी न केल्‍यामुळे सदरच्‍या तक्रारीस Non Joinder of Necessary Party ची बाधा येत असल्‍याचे नमुद केले आहे.
 
4.         गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याने सदरचे वातानुकूलीन यंत्र एकूण रु.24,500/- एवढया किंमतीला विकत घेतल्‍याचे तसेच सदरचे यंत्र प्रशिक्षीत व्‍यक्तिव्‍दारे तक्रारकर्त्‍याकडे बसविल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे मान्‍य केलेले आहे. परंतु तक्रारकर्त्‍याचे इतर आरोप अमान्‍य केलेले आहेत. गैरअर्जदारांचे कथनानुसार त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास सदर यंत्रास प्रतिदिवस 3 युनिट विद्युत लागेल असे अभिवचन कधीही दिले नव्‍हते. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीवरुन गैरअर्जदारांच्‍या सुचनेवरुन कंपनीच्‍या प्रशिक्षीत व्‍यक्तिने सदर यंत्राची तपासनी केली असता त्‍यात कुठलीही त्रुटी आढळून आली नाही.
5.         वास्‍तविक सदर वातानुकूलीन यंत्रास किती विद्युत लागेल हे ते ज्‍या रुममधे बसविलेले आहे त्‍या रुमचे क्षेत्रफळ, त्‍याला किती आऊटलेट आहेत. सदर रुमचे दार दिवसातुन कितीवेळा उघडबंद होते यावर अवलंबुन असते. वातानुकूलीन यंत्राचा क्रॉम्‍प्रेसर जितका जास्‍त फिरेल तितका जास्‍त विजेचा वापर होतो व त्‍या आधारे युनिट फिरणार. तसेच उत्‍पादित दोष असल्‍यास तो दुर करण्‍याची जबाबदारी केवळ उत्‍पादित कंपनीची असते असे गैरअर्जदारांनी नमुद केले आहे. तक्रारकर्त्‍याने खोटी तक्रार दाखल केली म्‍हणून ती खारिज करण्‍यांत यावी अशी विनंती गैरअर्जदारांनी केलेली आहे.
 
6.         सदर तक्रार मंचासमक्ष मॉखिक युक्‍तीवादाकरीता दि.15.06.2011 रोजी आल्‍यानंतर मंचाने तक्रारकर्त्‍याचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
                    -// नि ष्‍क र्ष //-
 
 
5.          निर्वीवादपणे तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार यांचेकडून एलजी कंपनीचे वातानुकूलीन यंत्र एकूण रु.24,500/- एवढया मोबदल्‍यात खरेदी केलेले होते. सदर प्रकरणातील एकंदर वस्‍तुस्‍थीती पाहता या मंचाच्‍या विचारार्थ खलिल मुद्द येतात.
अ)    गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्‍यास सदर वातानुकूलीन यंत्राला प्रतिदिवस 3      युनिटप्रमाणे विजेचा खर्च येईल असे अभिवचन दिले होते का ?
ब)    सदरच्‍या यंत्रात उत्‍पादित दोष आहे का ?
 
मुद्दा क्र. 1ः- तक्रारकर्त्‍याने सदर म्‍हणण्‍या पृष्‍ठयर्थ कुठलाही योग्‍य पुरावा सादर न केल्‍यामुळे गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला सदर यंत्राला प्रतिदिवस 3 युनिट प्रमाणे विजेचा खर्च येईल हे अभिवचन दिल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे पुराव्‍या अभावी या मंचाला मान्‍य करता येणार नाही.
मुद्दा क्र.2ः- तक्रारकर्त्‍याने सदर वातानुकूलीन यंत्रात उत्‍पादीत दोष असल्‍यामुळे सदरचे यंत्र जास्‍त म्‍हणजेच 16 ते 17 युनिट विज ओढते या म्‍हणण्‍या पृष्‍ठयर्थ योग्‍य कागदोपत्री पुरावा अथवा तज्ञांचे मत दाखल केलेले नाही अथवा एखाद्या तज्ञाकडून सदर यंत्राची तपासनी करुन घ्‍यावी अशी मागणी देखील या मंचास केली नाही. याचा विचार करता तक्रारकर्त्‍याचे सदर वातानुकूलीन यंत्रात उत्‍पादीत दाष असण्‍याचे म्‍हणणे सुस्‍पष्‍ट पुराव्‍या अभावी या मंचाला मान्‍य करता येणार नाही.
6.          वरील सर्व बाबी लक्षात घेता गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यास सदोष वातानुकूलीन यंत्र देऊन सेवेत त्रुटी दिलेली असे म्‍हणता येणार नाही.
            सबब आदेश.
      -// अं ति म आ दे श //-
 
 
 
1.     वरील निरीक्षणासह सदरची तक्रार निकाली काढण्‍यांत येते.
2.    दोन्‍ही पक्षांनी तक्रारीचा खर्च आप-आपला सोसावा.
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT