Maharashtra

Additional DCF, Thane

EA/14/60

S.P.Mogre, - Complainant(s)

Versus

M/s. Dessch Waterproofing & Construction Pvt., Ltd., - Opp.Party(s)

M.P.Raj

07 Aug 2019

ORDER

THANE ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM
Room no. 428 and 429, Konkan Bhavan Annex Building, 4th Floor,
C.B.D. Belapur, Navi Mumbai 400 614
 
Execution Application No. EA/14/60
( Date of Filing : 20 Aug 2014 )
In
Complaint Case No. CC/12/50
 
1. S.P.Mogre,
Jai Bhavani CHS, Mankhurd, Mumbai 88 For Anushakti CHS Ltd., Kolkhe Village, Tal - Panvel, Dist - Raigad
...........Appellant(s)
Versus
1. M/s. Dessch Waterproofing & Construction Pvt., Ltd.,
Office 1002, Mayuresh Cosmos, Plot no.37, Sec - 11, CBD Belapur, Navi Mumbai 400 614.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V.K.Shewale PRESIDENT
 HON'BLE MS. Gauri M. Kapse MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 07 Aug 2019
Final Order / Judgement

सदरचा दरखास्‍त अर्ज ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 27 प्रमाणे मूळ तक्रार क्रमांक 50/2012 मध्‍ये दिनांक 10/12/2014 रोजी पारीत केलेल्‍या आदेशाची अमंलबजावणी करणेकामी दाखल केलेली आहे. आज रोजी जय भवानी सहकारी गृहनिर्माण संस्‍थेचे तत्‍कालीन खजिनदार एस. पी. मोगरे गैरहजर, परंतु त्‍यांचे ऐवजी विद्यमान सचिव अशोक चेंबूरकर हजर आहेत. त्‍यांच्‍या सहीने व त्‍यांच्‍या वकीलांच्‍या सहीने अर्ज देऊन आरोपीने सुरक्षा ठेव म्‍हणून रक्‍कम रुपये 5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र) अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेकडे  ठेवली असल्‍याने ती रक्‍कम मुदतठेवीमध्‍ये गुंतवल्‍याने त्‍याचेवर व्‍याज जमा होते ही बाब अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेचे विद्यमान सचिव अशोक चेंबूरकर यांनी या मंचास अवगत केले. सबब आरोपी फरार झाल्‍याने त्‍याचा व त्‍याचे जामीनदाराचे ठाव ठिकाण मिळत नसल्‍याने दरखास्‍त अर्ज विनाकारण पडून राहील म्‍हणून त्‍यांनी  वर नमूद केल्‍याप्रमाणे ठेवीची रक्‍कम व त्‍यावर होणा-या व्‍याजातून वादातीत इमारतीच्‍या दुरुस्‍तीकरीता खर्च करण्‍याची परवानगी देऊन दरखास्‍त अर्ज निकाली काढण्‍याबाबत तोंडी संमती दिली.

अंतिम आदेशातील मुद्दा क्रमांक4 प्रमाणे अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेने आरोपीला देय असलेली रक्‍कम, दिनांक15/12/2006 च्‍या कराराप्रमाणे दुरुस्‍तीकामी व पुर्न वसनाचे काम, तसेच ज्‍या ठिकाणी पाण्‍याची गळती होते ती पूर्णपणे (Waterproofing) बंद करणेकामी खर्च करण्‍याची परवानगी दिली आहे. परंतु वरीलप्रमाणे गळती संपूर्ण इमारतीच्‍या बाबतीत बंद झाल्‍याचे प्रमाणपत्र सक्षम अभियंत्याकडून घेण्‍याची जबाबदारी अर्जदारावर ठेवण्‍यात आली आहे. वरील आदेशाच्‍या अनुषंगाने जेव्‍हा आरोपी जाणून बुजून फरार झाला तक्रारीतील आदेशाची पूर्तता करत नाही तेव्‍हा अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेच्या पदाधिका-यांनी त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांची बैठक बोलवून त्‍यामध्‍ये महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था कायदा 1960 च्‍या तरतुदींप्रमाणे व त्‍या कायद्यांतर्गत स्विकृत केलेले नियम व नियमावलीचे पालन करुन इमारत दुरुस्‍त करुन राहण्‍याजोगी करणेकामी येणा-या खर्चाबाबत 3 सक्षम अभियंत्‍यांकडून अंदाजपत्रक घेणे, त्‍यापैकी कमी रक्‍कम राहील त्‍यास स्विकृती देणे व आरोपीने सुरक्षा ठेव म्‍हणून ठेवलेली रक्‍कम व त्‍यावर संचित झालेले व्‍याजाची रक्‍कम वरीलकामी वापरायची असा ठराव केल्‍यास आदेशातील मुद्दा क्रमांक 4 प्रमाणे अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेस कार्यवाही करता येईल. सबब वरीलप्रमाणे अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेस मुभा दिल्‍यानंतर दरखास्‍त अर्ज आरोपी हजरच राहत नसल्‍याने व तो फरार झाल्‍याने ते या दरखास्‍तीमध्‍ये हजर राहणे अशक्‍यप्राय असल्‍याने सदर दरखास्‍त अर्ज निकाली काढण्‍याशिवाय दुसरा पर्याय नाही. सबब वर नमूद केल्‍याप्रमाणे अर्जदारांना मुभा देऊन दरखास्‍त अर्ज निकाली काढण्‍यात आला.

वर नमूद केल्‍याप्रमाणे इमारतीचे दुरुस्‍तीचे काम आरोपीने ठेवलेल्‍या सुरक्षा ठेव रकमेमधून व त्‍यावरील व्‍याज रकमेतून करावी. सदर रकमेतून काम पूर्ण न झाल्‍यास सदर दरखास्‍त अर्ज आरोपी मिळून आल्‍यास दरखास्‍त दाखल करण्‍याची अर्जदार सहकारी गृहनिर्माण संस्‍थेस परवानगी राहील.

 
 
[HON'BLE MR. V.K.Shewale]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. Gauri M. Kapse]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.