Maharashtra

Sindhudurg

CC/13/22

Shri Dinesh Nandkumar Teli - Complainant(s)

Versus

M/s. Deshpande Industries, alias Shri Bharat Deshpande - Opp.Party(s)

Shri V. R. Naik

29 Mar 2014

ORDER

 
Complaint Case No. CC/13/22
 
1. Shri Dinesh Nandkumar Teli
R/o. Talebazar, Tal- Deogad, Sindhudurg
 
BEFORE: 
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Exh.No.17

सिंधुदुर्ग जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग

तक्रार क्र. 22/2013

                                          तक्रार दाखल झाल्‍याचा दि.06/08/2013         तक्रार निकाल झाल्‍याचा दि.25/04/2014

श्री दिनेश नंदकुमार तेली

वय 35 वर्षे, धंदा- व्‍यापार

रा.मु.पो. तळेबाजार, ता.देवगड,

जिल्‍हा– सिंधुदुर्ग.                       ... तक्रारदार

 

      विरुध्‍द

मे. देशपांडे इंडस्‍ट्रीज तर्फे

श्री भरत देशपांडे

वय- सज्ञान, धंदा- व्‍यापार

97, जुनेपोस्‍ट ऑफिस रोड,

इस्‍लामिया हायस्‍कुल जवळ,

कॅंप बेळगाव, 590 008

राज्‍य– कर्नाटक.                       ... विरुध्‍द पक्ष.

 

                                                                 

                        गणपूर्तीः-  1) श्रीम. अपर्णा  वा. पळसुले. अध्‍यक्ष                                                                                                                               

                                 2) श्रीमती सावनी  सं .तायशेटे सदस्‍य                     

                                 3) श्री. कमलाकांत ध.कुबल, सदस्‍य.

तक्रारदारतर्फे विधिज्ञ – श्री विरेश नाईक                                          

विरुद्ध पक्षातर्फे विधिज्ञ – श्री अमित देऊस्‍कर

निकालपत्र

(दि.25/04/2014)

द्वारा : मा.अध्‍यक्ष, श्रीम. अपर्णा वा. पळसुले.

  1.            

             तक्रारीचा थोडक्‍यात तपशील खालीलप्रमाणेः-

  1.  
  2.     तक्रारदारांनी रक्‍कम रु.1,10,000/- विरुध्‍द पक्ष यांचे मुलीकडे रोख स्‍वरुपात श्री प्रकाश उंबळकर रा. तळेबाजार, ता. देवगड यांचे समक्ष दिली. सदर रक्‍कम देतेवेळी उभय पक्षकारात असे ठरले होते की, बँकेकडे रक्‍कम रु.4,55,000/- चे कर्ज प्रकरण केलेले असून सदरची रक्‍कम थेट विरुध्‍द पक्ष यांस मिळावयाची होती सदर संपूर्ण रक्‍कम मिळाल्‍यानंर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचेकडून रु.1,10,000/- परत करावयाची होती. त्‍यानुसार ता.18/8/2012 रोजी तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष यांना जनरेटर सेटची संपूर्ण रक्‍कम रु.4,55,000/- अदा केली त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारास 63 के.व्‍ही.  क्षमतेचा लेलँड  इंजिन असलेला जनरेटर सेट, दोन बॅटरीज, एक डिझेल टँक व एक पॅनेल बोर्ड पाठवून दिला.  सदर जनरेटर बसवणेसाठी विरुध्‍द पक्ष यांचा कर्मचारी आलेला होता.  त्‍यावेळी बरेच प्रयत्‍न करुनही जनरेटर सेट चालू होईना.  त्‍यावेळी चौकशी केली असता विरुध्‍द पक्षाच्‍या कर्मचा-यांने सदर जनरेटर सेटला असलेला अल्‍टरनेटर नादुरुस्‍त असल्‍याचे कबुल केले व दि.30/8/2012 रोजी विरुध्‍द पक्ष यांनी किर्लोस्‍कर कंपनीचा अल्‍टरनेटर तक्रारदारास पाठवून दिला.  सदरचा जनरेटर अपेक्षित क्षमतेने चालत नव्‍हता ही बाब तक्रारदाराराने विरुध्‍द पक्ष यांच्‍या निदर्शनास आणली परंतू विरुध्‍द पक्ष यांचेकडून कोणीही कर्मचारी जनरेटर सेट दुरुस्‍त करणेस आला नाही त्‍यामुळे सदरचा जनरेटर सेट विनावापर पडून राहिला.
  3.     पुढे तक्रारदारांचे म्‍हणणे की, ऑक्‍टोबर 2012 च्‍या दुस-या आठवडयात वि.प.चे कर्मचारी सेट दुरुस्‍त करण्‍यास आले, परंतु जनरेटर सेट दुरुस्‍त झाला नाही म्‍हणून 14/10/2012 रोजी सदरचा जनरेटर सेट बेळगाव येथे नेला व 17/10/2012 रोजी दुरुस्‍त करुन खाणीवर बसवला तथापि सदरचा जनरेटर सेट अपेक्षित क्षमतेने काम करत नव्‍हता म्‍हणून तक्रारदाराने वि.प.कडे ब-याच वेळा तक्रारी नोंदविल्‍या.  त्‍यानंतर ता.10/11/2012 रोजी वि.प. कंपनीचे सर्व्‍हीस मॅनेजर जनरेटर सेटची पाहणी करण्‍याकरीता आले.  त्‍यांनी जनरेटर सेटची पाहणी  करुन तो कधीही कार्यक्षमतेने चालू शकणार नाही तसेच तो दुरुस्त होऊ शकणार  नाही असे त्‍यांनी तक्रारदार यांस  सांगितले.  सबब तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या वस्‍तुबाबत ती न वापरताच फसगत झाल्‍याचे तक्रारदारांच्‍या लक्षात आले.  त्‍यानंतर तक्रारदाराने वि. प. यांचेशी संपर्क साधला असता सामनेवालांनी चुक झाल्‍याचे कबूल  करुन त्‍याच किंमतीमध्‍ये महिंद्रा कंपनीचा नवीन पेटी पॅक जनरेटर सेट दिवाळी पर्यंत पाठवून देऊ असे सांगीतले.  तथापि वि.प. यांनी टाळाटाळ केली.  म्‍हणून ता.27/1/2013 रोजी पत्र पाठवून 4,55,000/- रुपये आणि प्रवास खर्च, वाहतूक खर्च, इंजिन ऑईल यांचे मिळून रु.8,500/- असे मिळून 4,63,000/- ची मागणी केली.  सदर पत्रास विरुध्‍द पक्ष यांनी 31/1/2013 रोजी उत्‍तर देऊन  त्‍यांनी तक्रारदार यांना केवळ रु.3,45,000/- मिळालेली असल्‍याचे  तसेच त्‍यांनी दिलेला जनरेटर सेट ओव्‍हरलोड, धुळ व अपु-या देखभालीअभावी  पूर्ण क्षमतेने काम करत नसल्‍याचे सांगून त्‍यांनी दिलेल्‍या एकूण रक्‍कमेपैकी घसा-याची रक्‍कम रु.2,35,000/-  वगळता रु.2,75,000/-  परत देण्‍यास तयार असल्‍याचे कळविले व त्‍या परिस्थितीत जनरेटर सेट पुन्‍हा पाठवण्‍यास सांगीतले.
  4.     तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार वि.प. यांनी तक्रारदारांना मुलतः दोष असलेला जनरेटर सेट विक्री करुन फसवणूक केली आहे त्‍यामुळे त्‍यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच तक्रारदारांनी उत्‍खनन परवाना मिळणेसाठी भरलेली अनामत रक्‍कम रु.53175/- ही वाया गेली तसेच उत्‍खनन कामासाठी आगावू मजूरी दिलेले रु.2,00,000/- हे ही वाया गेले तसेच बँक ऑफ इंडिया यांचेकडून जनरेटर सेट खरेदीसाठी कर्ज घेतलेले होते त्‍याचे हप्‍ते देखील तक्रारदार आजही भरत आहेत. सबब, तक्रारदारांना चिरेखाणच्‍या उपक्रमापासून होणा-या फायदयास मुकावे लागले म्‍हणून तक्रारदाराने जनरेटर सेटची रक्‍क्‍म 4,55,000/- इतर खर्च 8,500/-, रॉयल्‍टीपोटी भरलेली रक्‍क्‍म 5,3175/- कामगारांना दिलेली रक्‍क्‍म रु.2,00,000/- तसेच आर्थिक व मानसिक त्रासापोटी रु.3,00,000/-  व  18% व्‍याज व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवालांनी दयावेत असे आदेश होणेबाबत  विनंती केली आहे. 
  5.     वि.प. नी या कामी नि.11 कडे म्‍हणणे दाखल करुन तक्रारीतील सर्व मजकूर नाकारलेला आहे. तथापि तक्रारदाराने सामनेवालाने जनरेटर सेट 4,55,000/- ला खरेदी केल्‍याची बाब मान्‍य केली आहे.  परंतु सामनेवालाच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारांनी सदरचा जनरेटर चिरेखाणीचा व्‍यवसाय करण्‍याकरीता म्‍हणजेच व्‍यापारी हेतूने खरेदी केला होता म्‍हणून ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 2(1)(डी) नूसार तक्रारदार हे विरुध्‍द पक्षाचे ग्राहक या सदराखाली येत नाहीत सबब सदरची तक्रार फेटाळून लावणेत यावी. पुढे सामनेवालाचे म्‍हणणे की, प्रवास खर्च वाहतूक खर्च रु.8500/- वि.प.ला केव्‍हाही दिलेली नव्‍हती. सामनेवालाच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदार यांनी मागणी केलेप्रमाणे सुस्थितीत असलेला नवीन जनरेटर तक्रारदारांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आला होता.  तक्रारदार यांनी कार्यक्षमतेपेक्षा  जास्‍त वापर केला व काम झाल्‍यावर योग्‍य ती काळजी घेतलेली नाही तसेच सप्‍टें. 12 पासून सिंधुदुर्ग व रत्‍नागिरी जिल्‍हयामध्‍ये  अधिस्‍तगन सुरु केल्‍यामुळे या दोन्‍ही जिल्‍हयांमध्‍ये  गौण खनिज  उत्‍खननावर  बंदी घालण्‍यात आली त्‍यामुळे  जनरेटर कामाविना तसाच पडून राहिला  व तक्रारदार कडून योग्‍य ती काळजी घेतली न गेल्‍यामुळे व सर्व्‍हीसिंग न केल्‍यामुळे सदर जनरेटर सेट हा  पहिल्‍याप्रमाणे योग्‍य कार्यक्षमतेने काम करु शकत नाही.  तसेच बँकेने कर्जवसुलीसाठी तगादा लावल्‍याने विरुध्‍द पक्षाकडून पैसे मिळवण्‍याच्‍या हेतूने ही तक्रार दाखल केली आहे.  तक्रारदार हे स्‍वच्‍छ हात्‍याने या मंचासमोर आलेले नाहीत.  सबब सदरची तक्रार खर्चासह फेटाळून लावण्‍यात यावी तसेच विरुध्‍द पक्ष यांना नुकसान भरपाई तक्रारदार यांचेकडून देवविण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.

            7)    तक्रारीतील मजकुर, विरुध्‍द पक्षांचा बचाव, दोन्‍ही बाजूंचा पुरावा व युक्तिवाद यांचे अवलोकन करता  या मंचाच्‍या  विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ.क्र.

                   मुद्दे

निष्‍कर्ष

1

तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ?

 

होय

2

तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांनी जनरेटर खरेदीबाबत सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी केल्‍या आहेत काय हे शाबीत करतात काय ?

 

होय

3    

आदेश काय ?

 

अंतीम आदेशाप्रमाणे

 

             8)         मुद्दा क्रमांक 1 -             सामनेवाला यांनी तक्रारदार हे ग्राहक  संरक्षण कायदा 1986 कलम 2 (1)(डी) नुसार ग्राहक ठरत नाहीत सबब सदरची तक्रार प्रथमदर्शनी फेटाळून लावावी असा बचाव घेतलेला आहे.  कारण सामनेवालाच्‍या म्‍हणणनुसार तक्रारदारांनी सदरचा जनरेटर हा  व्‍यापारी हेतूने (commercial purpose)  व फायदा मिळवण्यासाठी घेंतलेला होता सदरच्‍या युक्‍तीवादाप्रित्‍यर्थ सामनेवाला हे खालील न्‍यायनिवाडयावर अवलंबून राहतात. 

  1.   Supreme Court of India 2010 LawSuit (SC) 1068

            Birla Technologies Ltd V/s Neutral Glass and Allied Industries Ltd.

  1. National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi

Gurbaksh Logistic India V/s Action Construction Equipments Ltd. & Anr.

  1. याउलट तक्रारदार वकीलांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सदरचा जनरेटर तक्रारदारांनी रोजगार कमावण्‍याच्‍या हेतूने खरेदी केला होता म्‍हणून तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदयानुसार सामनेवालाचे ग्राहक आहेत या युक्‍तीवादाकरीता तक्रारदाराचे वकील खालील न्‍यायनिवाडावर अवलंबून राहतात.
  2. National Consumer Disputes Redressal Commission, New Delhi

            Super Computer Centre V/s  Globiz Investment Pvt. Ltd.

सदर दोन्‍ही बाजूंचे न्‍यायनिवाडे मंचाने विचारात घेतले आहेत.  तक्रारदारांनी सामनेवालाकडून जनरेटर सेट हा रक्‍कम रु.4,55,000/- ला खरेदी केला होता ही बाब नि.4 सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन सिध्‍द होते. तसेच विरुध्‍द पक्षाने सदरची बाब नाकारलेली नाही.  तसेच एकूण कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, तक्रारदाराने सदरचा जनरेटर हा चिरेखाणीचा  व्‍यवसाय करणेसाठी म्‍हणजेच Self employment  करीता खरेदी केलेला होता. सदरचा जनेरटर हा विक्रीसाठी खरेदी केलेला नव्‍हता. तसेच सदरचा जनरेटर हा एक वर्षाच्‍या वॉरंटी पिरियडमध्‍ये नादुरुस्‍त झाला. सबब तक्रारदार हे विरुध्‍द  पक्ष यांचे ग्राहक आहेत या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.1चे  उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

            9)         मुद्दा क्रमांक  2 – तक्रारदाराने त्‍यांची तक्रार सिध्‍द करण्‍यासाठी नि.4 कडे काही कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदाराने 31/08/2012 रोजी उपविभागीय अधिकारी कणकवली यांनी  जांभा दगड उत्‍खनन करण्‍यास परवानगी दिल्‍याचे पत्र दाखल केलेले आहे.  सदर उत्‍खननाची  मुदत ता.7/4/2013 पर्यंत होती. सदर जनरेटरबाबतचे कोटेशन नि.4/2, डिलिव्‍हरी नोट नि.4/3 यांचा विचार करता सदरच्‍या जनरेटरची किंमत रु.4,55,000/- ठरवण्‍यात आलेली होती.  तक्रारदार व विरुध्‍द  पक्ष यांच्‍यातील ता.18/8/12, 30/08/12 ची पत्रे पाहता विरुध्‍द  पक्ष यांनी अल्‍टरनेटर बदलून दिल्‍याचे सिध्‍द होते. ता.27/01/2013 च्‍या पत्रानुसार विरुध्‍द  पक्ष यांनी नवीन महिंद्र कंपनीचा पेटीपॅक जनरेटर देतो असे कबुल केले होते तथापि दिवाळीचा कालावधी संपून गेल्‍यावर देखील विरुध्‍द  पक्ष यांनी सदर जनरेटर बदलून देण्‍याविषयी कार्यवाही केली नाही.  याउलट 31/01/2013 च्‍या नि.4/7 च्‍या पत्रानुसार  असे दिसून येते की, विरुध्‍द  पक्ष यांनी सदर जनरेटरची किंमत रु.2,75,000/- फक्‍त देण्‍याची तयारी दर्शवली होती. व सदरची किंमत घसारा रु.2,35,000/- वजा करुन दाखवली होती. विरुध्‍द पक्षाच्‍या म्‍हणण्‍यानुसार विरुध्‍द पक्ष यांचेकडे 3,45,000/- एवढीच रक्‍कम तक्रारदाराने दिलेली होती आणि रु.1,10,000/- ता.28/8/12 रोजी UTR NOTJS अन्‍वये तक्रारदाराच्‍या अकांऊटला ट्रान्‍सफर केली होती.  या सर्व पत्रव्‍यवहारावरुन असे दिसून येते की,सदरचा जनरेटर हा वर्कींग कंडीशनमध्‍ये नव्‍हता ही गोष्‍ट दोन्‍ही बाजूंना मान्‍य आहे. तसेच सुरुवातीपासूनच जनरेटर चालू होणेबाबत तक्रार होती हे ही सिध्‍द होते.  तथापि सामनेवाला यांनी सदरचा जनरेटर बदलून देण्‍याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही.  म्‍हणजेच विरुध्‍द  पक्ष यांनी तक्रारदारांना विक्री केलेल्‍या जनरेटर सेटबाबत सदोष सेवा किंवा सेवेत त्रुटी ठेवून अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे हे सिध्‍द होते.

      10)       सामनेवालाच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदाराने सदरचा जनरेटर हा क्षमतेपेक्षा जास्‍त वापरला व त्‍याची योग्‍य ती काळजी घेतली नाही म्‍हणून जनरेटर योग्‍य रितीने चालला नाही.  या म्‍हणण्‍याप्रित्‍यर्थ सामनेवाला यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. याउलट सदरचा जनरेटर सुरुवातीपासूनच पुर्ण क्षमतेने काम करत नव्‍हता ही बाब सामनेवालाच्‍या नजरेस आणन देखील सामनेवालाने कोणतीही काळजी घेतली नाही. सबब तक्रारदारास सदोष जनरेटर विरुध्‍द पक्ष यांनी विक्री केला हे सिध्‍द होते.

      11)       पुढे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांचे खात्‍यावर रक्‍कम रु.1,10,017/- ट्रान्‍सफर केलेबाबतची नोंद ता.28/08/2012 च्‍या  TJSB बॅंकेच्‍या डिटेल स्‍टेटमेंट ऑफ अकाऊंटवरुन  दिसून येत आहे. तसेच सदर स्‍टेटमेंटवरुन असे दिसून येते की, ता.2/8/12 रोजी रु.4,55,000/- विरुध्‍द पक्ष यांच्‍या खात्‍यावर तक्रारदाराने खरेदी केलेल्‍या मशीनबाबत जमा झालेले आहेत. सदर रक्‍कमेमधून रु.1,10,017/- तक्रारदाराना परत मिळाल्‍याचे दिसून येते.  सबब रक्‍कम रु.1,10,017/- ची तक्रारदाराची मागणी मान्‍य करता येणार नाही. तसेच कोटेशन पाहता इन्‍स्‍टॉलेशन, वायरिंग वगैरेसाठी वेगळे चार्जेस देण्‍याबाबत नमूद आहे. म्‍हणजेच तक्रारदाराने मागणी केलेले वाहतूक खर्च रु.3500, प्रवास खर्च रु.1000/- व ऑईलसाठी रु 4000/- असे एकूण 4,62,000/- मिळणे क्रमप्राप्‍त आहे.

      12)       तक्रारदाराने खाण कामासाठी  काही लोकांना काम देणेसाठी करारपत्र केलेली आहेत. सदरची करारपत्रे नि.4/,8, 4/9, 4/10 कडे हजर केलेी आहेत. नि.4/8 चे पत्र पाहता ता.10/7/12 रोजी व दि. 4/9 चे करारपत्र 15/01/2013 रोजीचे आहे. तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार तक्रारदारानी रक्‍कम रु.2,00,000 अॅडव्‍हांस या लोकांना दिलेला आहे.  तथापि  सदर रक्‍कम या इसमांना मिळालेबाबत एकाही इसमाचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्‍यात आलेले नाही. जरी सदरची करारपत्र नोटरीपूढे तयार केली असली तरी देखील  तो कायदेशीर पुरावा होऊ शकत नाही.  कारण तो शाबीत करणेसाठी संबंधित इसमांची  प्रतिज्ञापत्रे अथवा पुरावा  मंचासमोर आलेला नाही. सबब सदरचा पुरावा या कामी वाचता येणार नाही. सबब तक्रारदाराची रक्‍कम रु.2,00,000/- नुकसान भरपाईपोटीची मागणी मान्‍य करता येणार नाही. तथापि सदर जनरेटर नादुरुस्‍त झाल्‍याने तक्रारदारांचे चिरेखाणीचे काम थांबल्‍यामुळे तक्रारदारांचे थोडेतरी आर्थिक नुकसान झाले असणार सबब आर्थिक नुकसानीपोटी रु.50,000/- देणे न्‍याय व उचित ठरेल.  तक्रारदारांने मागणी केलेली रु.53,175/- रॉयल्‍टीपोटी भरलेली ही रक्‍कम सामनेवालाकडून वसुल होऊन मिळणेस पात्र नाही. कारण सदरची रक्‍कम ही जनरेटर खरेदी करावयाच्‍या आधी भरलेली आहे. व ती जनरेटर खरेदीकरणार म्‍हणून भरली हे पटण्‍यासारखे नाही. तसेच सदर जनरेटर हा अपेक्षेप्रमाणे काम करु शकला नाही. त्‍यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागला सबब तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करणेस पात्र आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. त्‍यामुळे मुद्दा क्र.2 व 3 चे उत्‍तर होकारार्थी देत आहोत.

      13)       वरील सर्व विवेचनावरुन तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे या निर्णयाप्रत हे मंच येत आहे. 

                        आदेश

 

  1. तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

2) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना रु.4,62,000/- तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच दि.2/8/2013 पासून 9%  व्‍याजाने रक्‍कम फिटेपर्यंत दयावेत. तसेच  शारीरिक व मानसिक त्रसापोटी रु.10,000, व्‍यवसायाच्‍या नुकसानी पोटी  रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- दयावा.

3)    तक्रारदारांनी सदरचा जनरेटर सामनेवाला यांना एक महिन्‍याच्‍या आत परत करावा. त्‍यानंतर 45 दिवसांत विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना वरील सर्व रक्‍कमा अदा कराव्‍यात. 

4)    वरीलप्रमाणे पुतर्ता न झाल्‍यास तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 25 व27 प्रमाणे विरुध्‍द पक्ष यांचेविरुध्‍द कार्यवाही करु शकतील.

 

ठिकाणः सिंधुदुर्गनगरी

दिनांकः 25/04/2014

 

 

 

                        Sd/-                                         Sd/-                                         Sd/-

(सावनी  सं. तायशेटे)                    (अपर्णा वा. पळसुले)              (कमलाकांत ध.कुबल)

सदस्‍य,                    अध्‍यक्ष,                 सदस्‍य

जिल्‍हा  ग्राहक तक्रार निवारण  मंच,  सिंधुदुर्ग

 

प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्‍टाने रवाना दि.

प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्‍टाने रवाना दि.

 

 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.