Maharashtra

Mumbai(Suburban)

CC/12/38

RAJEEV BHAGWAN AGARWAL - Complainant(s)

Versus

M/S. DEALS & YOU - Opp.Party(s)

SUBHASH CHAND AGRAWAL

08 Oct 2013

ORDER

ग्राहक तक्रार निवारण मंच,
मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.
प्रशासकीय इमारत, 3 रा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्याना जवळ,
वांद्रे (पूर्व), मुंबई 400051.
महाराष्‍ट्र राज्‍य
 
Complaint Case No. CC/12/38
 
1. RAJEEV BHAGWAN AGARWAL
A 14/12, SANMAN, NEW BEST COLONY, GOREGAON-WEST, MUMBAI-104.
...........Complainant(s)
Versus
1. M/S. DEALS & YOU
PLOT NO. 426, UDYOG VIHAR, PHASE-3, GURGAON, HARYANA.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande PRESIDENT
 HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER
 
PRESENT:
तक्रारदार स्‍वतः हजर.
......for the Complainant
 
सा.वाले एकतर्फा
......for the Opp. Party
ORDER

तक्रारदार      :  स्‍वतः हजर.       

      सामनेवाले      :  एकतर्फा.

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*

 निकालपत्रः- श्री.शां.रा. सानप, सदस्‍य                 ठिकाणः बांद्रा

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*  

                                                                                                   न्‍यायनिर्णय

                                                           एकतर्फा

 

1    सामनेवाले हे पर्यटन/व्‍यवसायीक आहेत. तर तक्रारदार हे दुरदर्शसाठी क्रमिक शृखंला, लेखक आहेत. उभयपक्षकारांचा पत्‍ता तक्रारीत नमुद आहे. तक्रारदारानी सामनवेाले यांच्‍या वेबसाईटवरील जाहिरातीनुसार थॉयलंड (बॅंकॉंक व पट्टया ) हया विदेश पर्यटनसासाठी सर्व एकत्रित खर्चासह (Tour Package ) सुखपर्यटन (Tour) साठी एकटयाने पर्यटन करण्‍यासाठी आपले पर्यटन निश्चित केले होते.

 2.     तक्रारदारांच्‍या तक्रारीमधील कथनानुसार सामनेवाले यांच्‍या सदर सवलतीच्‍या  वैधता ही 12.10.2011 ते 31.10.2011 पर्यंत होती, सवलतीची वैधता ही 31.10.2011 पर्यंत होती त्‍यानुसार  तक्रारदारानी दि. 21.05.2011 रोजी, प्रवासासाठी आगाऊ रककम रूपये 10999/-  सदर दि. 08.10.2011 ते 12.10.2011 च्‍या प्रवासाठी   अगाऊ रक्‍कम रू. 10.999/-, इलेक्‍ट्रॅानीक बँक क्लिअरींग द्वारे सामेनवाला यांना अदा केली. दिनांक 21.05.2011 ला सामनेवाले यांनी होकाराचे उत्‍तरही पाठविले. त्‍यानंतर तब्‍बल 4 महिन्‍यानी म्‍हणजेच  दिनांक 22.09.2011 रोजी सामनेवाले यांनी तक्रारदारांकडे ई-मेल करून रू 6000/-चे ज्‍यादा रक्‍कमेची मागणी केली व त्‍याचबरोबर प्रवासाचे ई-तिकीटही पाठविले. अर्थातच तक्रारदारानी सामनेवाले यांना दिनांक 30.09.2011 रोजी ई-मेल करून सदरची मागणी अमान्‍य करून, सदरची मागणी ही जाहिरातीतील अटी व शर्ती यांचे विरूध्‍द, आयोग्‍य, अनैतिक, बेकायदेशीर, असत्‍य व बनावट आहे असे कळविले  व अतिरीक्‍त रक्‍कम रूपये 6000/- देण्‍यास नकार दिला.  परंतू त्‍यास सामनवेाले यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही तसेच तक्रारदारची तक्रारीत असेही कथन आहे की सदरच्‍या जाहीरातीमध्‍ये असे कुठेही दर्शविलेले नव्‍हते की एकटयाने प्रवास करणा-या प्रवाशास अतिरीक्‍त रूपये 6000/-दयावे लागतील (सामनेवाले यांचा दिनांक 22.09.2011 चा ई-मेल मध्‍ये सदर बाब इंग्रजीमध्‍ये विशद केलेली आहे)पृष्‍ठ 17 निशाणी क ही एकप्रकारे सामनेवाले यांना धमकवण्‍याचा, अव्‍यवहारीकपणा, बेकायदेशीर व अनैतिक प्रकारे अतिरीक्‍त रक्‍कम ग्राहकाकडून उखळण्‍याचा प्रकार असून जाहीरातीत नसलेल्‍या अतिरीक्‍त अटी लादून मूळ कराराचे उल्‍लंघन करणारे असून, सामनेवाले यांनी सेवासुविधा पुरविण्‍यामधील कसुर केली असल्‍याचे जाहीर करून तक्रारदारानी सामनेवाले यांना कायदेशीर नोटीस दिनांक 23.11.2011 रोजी पाठविली व तक्रारीतील अनु क्र. 8 मध्‍ये दिनांक 08.10.2011 ते दि 12.10.2011 दरम्‍यानच्‍या प्रवासाच्‍या वेळेस सामनेवाले यांच्‍या अनुचित, बेकायदेशीरच्‍या अडवणुक व आडमुठया मागणीमुळे झालेला अतिरीक्‍त खर्च रूपये 12,800/- व कामाचे दिवस वाया गेल्‍यामुळे झालेले नुकसान रूपये 25,000/-(पृष्‍ठ क्र 33 अनु क्र. 10 वरील विधान हे पृष्‍ठ क्र 33 अनु क्र. 9 (vi)  शी सलंग्‍न आहे )  असे एकुण 37,800/- न्‍यायनिर्णय झाल्‍यानंतर एक महिन्‍याचे आत दयावे अन्‍यथा त्‍यानंतर 18% व्‍याज दयावे शिवाय मानसिक त्रास नुकसान भरपाई रू.15,000/- व तक्रारीचा झालेल्‍या  खर्चाचीही मागणी केलेली आहे.

 3.      सामनेवाले यांना तक्रारीची नोटीस दिनांक 13.02.2012 रोजी पाठवून दिनांक 16.02.2012 रोजी मिळाली असून पोचपावती प्राप्‍त आहे. सामनेवाले यांना नोटीस प्राप्‍त होऊनही त्‍यांनी मंचासमोर आपली कैफियत दाखल करण्‍याचे टाळले आहे. त्‍यामुळे सामनेवाले यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा निकाली करण्‍यात आले आहे.

4.     तक्रारदारानी पुराव्‍याचे, कागदपत्र व लेखीयुक्‍तीवाद दाखल केला व तोंडीयुक्‍तीवादही केला.

5.     प्रस्‍तुत मंचाने तक्रारदारानी दाखल केलेली तक्रार पुराव्‍याचे शपथपत्र, कागदपत्र व लेखीयुक्तीवाद यांचे वाचन केले तसेच तक्रारदाराचा तोंडीयुक्‍तीवादही ऐकण्‍यात आला त्‍यानुसार तक्रार एकतर्फा निकालकामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येतात.   

     

क्र.

मुद्दे

उत्‍तर

 1

सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून पर्यटन प्रित्‍यर्थ  अगाऊ रक्‍कम स्विकारूनही पर्यटनाच्‍या कालावधीत पर्यटनाच्‍या संबधातील, तक्रारदाराच्‍या हक्‍काच्‍या बाबी कि ज्‍या सामनेवाले यांनी मान्‍य केलेल्‍या  होत्‍या त्‍या पुरविण्‍यास सामनेवाले असमर्थ ठरले म्‍हणुन सामनेवाले यांच्‍या सेवासुविधा पुरविण्‍यामध्‍ये कसुर केली असल्‍याचे तक्रारदार सिध्‍द करतात काय ? 

 

 होय.

 2.

तक्रारदार हे सामनवेाले यांचेकडून झालेला अतिरीक्‍त खर्च अधिक कामाचे वाया गेलेले दिवस अधिक मानसिक त्रास अधिक तक्रार खर्च इत्‍यादी नुकसान भरपाई  मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

होय.

3.

अंतिम आदेश

तक्रार अंशतः मंजूर  करण्‍यात येते

              

कारण मिमांसा

6.     तक्रारदारानी, सामनवेाले यांच्‍या वेबसाईटवरील जाहीरातीनूसार अगाऊ रक्‍कम रूपये 10,999/- अदा करून पर्यटनाची दिनांक 16.09.2011 कळवून सुध्‍दा सामनवाले यांनी सदरची दिनांक निश्चित न करता पर्यटनाचा दिनांक 08.10.2011 हा अव्‍यवहारीकपणे निश्चित केला व तसा ई-मेल पाठवून त्‍या द्वारे ई-तिकीटही पाठवून दिले व त्‍यात अयोग्‍य अशा अतिरीक्‍त रक्‍कम रूपये 6000/-ची ज्‍यादा रक्‍कमेची मागणी केली. की जी जाहीरातीमध्‍ये एकटयाने प्रवास/पर्यटन केल्‍यास दयावी लागेल असे कुठेही नमूद केलेले नसतांनाही एकप्रकारे ज्‍यादा रक्‍कमेची मागणी करणे हे पर्यटन कराराच्‍या शर्ती व अटीचे उल्‍लंघन केले आहे हे स्‍पष्‍ट झाले आहे. तसे तक्रारदारनी सामनेवाले यांना वेळोवेळी ई-मेल करून सदर त्रृटीबाबत अवगत केले होते. त्‍याबाबतची सामनवेाले यांनी दाखल न घेता उलट ई-मेल द्वारे त्‍याच अनुचित ज्‍यादा रक्‍कमेची मागणी करून उध्‍दटपणे कळविले की जर आपण सदरची रक्‍कम न दिल्‍यास आम्‍ही आपणास पर्यटनाबाबतच्‍या सुखसोयी (Land Arrangement) पुरविणार नाही, तिकीट रद्द करणार नाही. व परतावाही मिळणार नाही. सदर बाब ही सामनेवाले यांच्‍या  ई-मेलमधील अनुचित असून व अयोग्‍य मागणी आहे की जे जाहीरातीच्‍या अटी व शर्तीचे उल्‍लंन करणारे आहेत. जाहीरातीनुसार पर्यटनाच्‍या दिवसात सर्व सेवासुविधा देणे हे अनिवार्य होते.  तसेच पर्यटनाचे पूर्ण पैसे स्विकारूनही सामनेवाले यांनी तक्रारदाराना सेवासुविधा देण्‍याचे नाकारले असे तक्रारदाराचे कथन आहे. या संदर्भात सामनेवाले यांना आपली कैफियत दाखल करण्‍याची संधी मिळून सुध्‍दा त्‍यांनी ती टाळली असल्‍याने तक्रारदाराची तक्रारीतील कथने अबाधीत राहतात. त्‍यामुळे पर्यटना प्रित्‍यर्थ संपूर्ण पर्यटन खर्चाची अगाऊ पुर्ण रक्‍कम स्विकारूनही जाहीरातीत नमूद केल्‍याप्रमाणे राहण्‍याची व्‍यवस्‍था न करणे, नास्‍ता न देणे, जेवण न देणे, पर्यटन स्‍थळ पाहण्‍याची प्रवासाची सोय न करणे या बाबी सामनेवाले यांच्‍या सेवा व सुविधा पुरविण्‍यामधील कसुर असल्‍याचे तक्रारदार सिध्‍द करतात. अतएव तक्रारदारानी पर्यटनाच्‍या दरम्‍यान केलेला खर्च रू. 12,800/- दिनांक 12.10.2011 पासून रक्‍कम पूर्ण देय होईपर्यत 9% व्‍याजासह तीन महिन्याचे आत तक्रारदारास दयावी अन्‍यथा मुदत संपल्‍यापासून त्‍यावर 12% व्‍याज देय होईल ही मागणी मंच मान्‍य करीत आहे.                            

7.    वरील सविस्‍तर चर्चेनुरुप व निष्‍कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.

                           आदेश

1.     तक्रार क्रमांक अंशतः 38/2012  मंजूर करण्‍यात येते.

2.     सामननेवाले यांनी तक्रारदाराकडून पर्यटना निमित्‍य अगाऊ रक्‍कम स्विकारून सुध्‍दा अयोग्‍य अशा ज्‍यादा रक्‍कमेची मागणी करणे व तक्रारदाराना पर्यटना दरम्‍यान राहण्‍याची,  जेवणाची व प्रवासाची व्‍यवस्‍था न करणे या बाबी सामनेवाले यांच्‍या सेवा व सुविधा पुरविण्‍यामध्‍ये कसुर केली असल्‍याचे जाहीर करण्‍यात येते.   

3.  सामनेवाले यांनी तक्रारदाराना  पर्यटना दरम्‍यान तक्रारदारानी  स्‍वतः केलेला खर्च रू.  12800/-, दिनांक 12.10.2011 पासून 9 % व्‍याजासह तीन महिन्‍याचे आत तक्रारदारास अदा करावे अन्‍यथा मुदत संपल्‍यानंतर त्‍यावर 12%  व्‍याज देय होईल.    

4.     तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारास मानसिक त्रासाबद्दल व नुकसान भरपाई म्हणून रू 5000/-, दयावेत व तक्रार खर्चापोटी रू. 2000/- सामनेवाले यांना दयावेत असा आदेश देण्‍यात येतो. 

5.    आदेशाच्‍या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'ABLE MR. Mr. J. L. Deshpande]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.