Maharashtra

Nagpur

CC/299/2020

SHRI. ANIL TULSIRAM SATHAWANE - Complainant(s)

Versus

M/S. CLASSIC CONSTRUCTION CO. PROPRIETOR SMT. NEHA SANAD KUMAR SHUKLA - Opp.Party(s)

ADV. SHRI. MOHAN S. POTDUKHE

12 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/299/2020
( Date of Filing : 17 Aug 2020 )
 
1. SHRI. ANIL TULSIRAM SATHAWANE
R/O. PLOT NO.37, SUBHASH NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. M/S. CLASSIC CONSTRUCTION CO. PROPRIETOR SMT. NEHA SANAD KUMAR SHUKLA
R/O. CLASSIC PAWAN APARTMENT, PLOT NO.5, T POINT, TAKLI(SIM), HINGNA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SHRI. MOHAN S. POTDUKHE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 12 Jul 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने प्रकाशित केलेल्‍या जाहिरातीनुसार मौजा – टाकळी (सिम) खसरा क्रं. 6/2, & 7 , तह.जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 5 वर तयार होत असलेल्‍या क्‍लासिक पवन अपार्टमेंट येथील दुकानाचा गाळा क्रं. एस-2-1, याचे एकूण क्षेत्रफळ 7.63 चौ.मी.(82.13 चौ.फु.) हा उदरनिर्वाहाकरिता खरेदी करण्‍याबाबत सदर योजनेचे मुळ मालक श्री. सनतकुमार नंदकुमार शुक्‍ला यांच्‍याशी सदर दुकानाचा गाळा खरेदी करण्‍यासंबंधी अंतिम बोलणी करुन दुकानाचा गाळा रुपये 78,000/- मध्‍ये खरेदी करण्‍याचे ठरले व त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने दि. 05.03.1999 रोजी विरुध्‍द पक्ष मे. क्‍लासिक कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी यांच्‍या सोबत विक्री व बांधकामाबाबतचा करारनामा केला व बयाणा रक्‍कम म्‍हणून  रुपये 19,000/- दिले यासंबंधीची रीतसर पावती अभिलेखावर दाखल केलेली आहे. तक्रारकर्ता हा जन्‍मतः शारीरिक दृष्‍टया अपंग असल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष श्री. सनतकुमार शुक्‍ला यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या सोयीनुसार रक्‍कम जमा करण्‍याची मुभा दिली होती. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने दि.19.10.2000 रोजी रक्‍कम रुपये 30,000/- विरुध्‍द पक्षाकडे जमा केले. सदर दुकानाच्‍या गाळयाचे बांधकाम हे डिसेंबर 2000 मध्‍ये पूर्ण झाले व विरुध्‍द पक्ष श्री. शुक्‍ला यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीनुसार त्‍याच्‍या उदरनिर्वाहाकरिता जानेवारी 2001 मध्‍ये टेलिफोन बुथचा व्‍यवसाय करण्‍याकरिता सदर दुकानाचा ताबा दिला. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दि. 10.10.2007 रोजी रुपये 26,000/- दिले व उर्वरित रक्‍कम रुपये 3000/- विक्रीपत्र नोंदणी करण्‍याच्‍या वेळेस देण्‍याचे ठरले. विरुध्‍द पक्षाने सदर दुकानाच्‍या गाळयामध्‍ये तक्रारकर्त्‍याच्‍या खर्चाने दि. 07.03.2014 रोजी विद्युत मीटर लावून दिले होते व कालांतराने सदरचे विद्युत मीटर हे तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे ही करुन देण्‍यात आले आणि त्‍यानुसार तक्रारकर्ता हा येणा-या विद्युत देयकाचा भरणा करीत आहे.
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, काही कालांतराने टेलिफोन बुथचा व्‍यवसाय हा लयास गेल्‍यामुळे त्‍याने याच गाळयामध्‍ये वैष्‍णवी इलेक्‍ट्रीकल्‍स अॅण्‍ड  इलेक्‍ट्रॉनीक्‍स या नावाने आपल्‍या उदरनिर्वाहकरिता व्‍यवसाय सुरु केला व या दरम्‍यान विरुध्‍द पक्ष श्री. शुक्‍ला यांची प्रकृती ठीक नसल्‍यामुळे सदरच्‍या गाळयाचे विक्रीपत्र करुन घेता आले नाही आणि त्‍या दरम्‍यान विरुध्‍द पक्ष श्री. शुक्‍ला यांचे निधन झाले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या वारसांना संबंधीत दुकानाच्‍या गाळयाचे विक्रीपत्र लावून देण्‍याची विनंती केली असता त्‍यांनी त्‍यासंबंधी टाळाटाळ केली. या दरम्‍यान सदरच्‍या भूखंडा जवळून नागपूर महा मेट्रोचे कामकाज सुरु झाले, त्‍यामुळे आजुबाजूचे प्‍लॉट धारक, सदनिका मालक किंवा दुकानदार यांना नियमाप्रमाणे बदला देण्‍याचे ठरले. संबंधीत क्‍लासिक पवन अपार्टमेंट यांना सुध्‍दा त्‍या अनुदानासंबंधीची सूचना देण्‍यात आली. परंतु तक्रारकर्ता याकरिता तयार नव्‍हते. सदरच्‍या गाळयाची  जवळपास संपूर्ण रक्‍कम विरुध्‍द पक्षाकडे अदा करण्‍यात आली असल्‍यामुळे व गाळयाचा प्रत्‍यक्ष ताबा तक्रारकर्त्‍याकडे असल्‍यामुळे त्‍यांनी विरुध्‍द पक्षाच्‍या वारसदारांना गाळयाची नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे दि. 18.01.2020 रोजी नोटीस पाठविली व सदरची नोटीस अपूर्ण पत्‍ता या शे-यासह दि. 20.01.2020 रोजी परत आली. विरुध्‍द पक्षाचे कार्यालय उपरोक्‍त पत्‍त्‍यावर सुरु असून सुध्‍दा त्‍यांनी जाणूनबुजून सदरची नोटीस नाकारलेली त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला वकिलामार्फत कायदेशीर नोटीस दि. 11.02.2020 रोजी पाठविली, परंतु सदरची नोटीस ही दि. 14.02.2020 रोजी लेफ्ट या शे-यासह परत आले. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे घोषित करावे. तसेच विरुध्‍द पक्षाने क्‍लासिक पवन अपार्टमेंटमधील गाळा क्रं. एस.2-1 या दुकानाचे नोंदणीकृत विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे करुन देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च ही देण्‍याचा आदेश द्यावा अशी मागणी  केली आहे.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस unclaimed या पोस्‍टाच्‍या   शे-यासह परत. त्‍यानंतर ही विरुध्‍द पक्ष गैरहजर असल्‍याने त्‍याच्‍या विरुध्‍द प्रकरण  एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 11.02.2021 रोजी पारित करण्‍यात आला.

 

  1.      तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले असतां मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यांवरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविलेले आहे.

 

अ.क्रं.      मुद्दे                                                                                   उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                           होय

2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय?       होय

  1. काय आदेश   ?                                                                     अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक  1 व 2 बाबत   - तक्रारकर्ता हा दिव्‍यांग असून त्‍याने आपल्‍या उदरनिर्वाहाकरिता मौजा- टाकळी(सिम)ए खसरा नं. 6/2 आणि 7, तह.जि. नागपूर येथील भूखंड क्रं. 5, वरील क्‍लासिक पवन अपार्टमेंट मधील दुकानाचा गाळा क्रं. एस 2 -1, हा रुपये 78,000/- मध्‍ये विकण्‍याचा करार मय्यत विरुध्‍द पक्षा सोबत रुपये 10/- च्‍या स्‍टॅम्‍प पेपरवर Agreement to Sell and Construction असा करार दि.05 मार्च 1999 ला केला होता हे नि.क्रं. 2(1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रक्‍कम जमा केलेल्‍या असल्‍याच्‍या पावत्‍या व नि.क्रं. 5 वरील तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे असलेल्‍या विद्युत देयकावरुन लक्षात येते की, सदरचे विद्युत मीटर हे तक्रारकर्त्‍याच्‍या नांवावर घेण्‍यात आलेले आहे. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याने दुकानाचे दाखल केलेल्‍या फोटोवरुन ही निदर्शनास येते की, विरुध्‍द पक्षाने सदरचे दुकान हे मंजुरी नकाशाप्रमाणेच बांधलेले आहे.

 

  1.      तक्रारकर्त्‍याच्‍या वकिलांनी असे कथन केले होते की, विरुध्‍द पक्ष हयातीत असतांना त्‍याने इतर दुकान धारकांचे विक्रीपत्र नोंदवून दिलेले होते. परंतु तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे दुकानाचे विक्रीपत्र नोंदविण्‍याच्‍या वेळी विरुध्‍द पक्षाची वारंवांर प्रकृती अस्‍वस्‍थ राहत होती व त्‍यातच त्‍यांचा मृत्‍यु झाल्‍याने विरुध्‍द पक्ष हे तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे विक्रीपत्र नोंदवून देऊ शकले नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या वारसदार श्रीमती नेहा सनद कुमार शुक्‍ला यांना दुकानाचे गाळयाचे नोंदणीकृत विक्रीपत्र नोंदवून देण्‍याकरिता अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाच्‍या वारसदारांने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केले व विक्रीपत्र नोंदवून देण्‍यास टाळाटाळ करीत आहे व ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

                    सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नांवे क्‍लासिक पवन अपार्टमेंट येथील दुकानाचा गाळा क्रं. एस-2-1, एकूण क्षेत्रफळ 7.63 चौ.मी.(82.13 चौ.फु.) हा उर्वरित रक्‍कम रुपये 3,000/- स्‍वीकारुन नोंदणीकृत विक्रीपत्र करुन द्यावे आणि विक्रीपत्राचा खर्च तक्रारकर्त्‍याने स्‍वतः सोसावा व तक्रारकर्त्‍याचा सदरच्‍या दुकानाचा ताबा कायम करावा.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला  शारीरिक , मानसिक त्रासाकरिता रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5000/- द्यावा.

 

  1. उभय पक्षानां आदेशाची प्रथम निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.