(आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, मा. अध्यक्ष ) आदेश ( पारित दिनांक : 06 ऑगस्ट, 2011 ) तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक सरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. यातील तक्रारदाराचे थोडक्यात निवेदन असे आहे की, तक्रारदार दहेगाव जोशी येथील रहिवासी असुन खापा ते दहेगाव जोशी येथे सावनेर-रामटेक रोडवरुन दुचाकी गाडीने रोज जाणे- येणे करतो व सावळी रोडवरील मे.काळे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याकरिता जात असतो. तक्रारदाराने दिनांक 3/5/2010 रोजी सदर पेट्रोलपंपावर डबकीत पेट्रोल घेतले परंतु तक्रारदारास पेट्रोलचे मापाविषयी शंका आल्याने त्यांनी पेट्रोल पंपावर उपलब्ध असलेल्या डेंसीटी मापाने वरील पेट्रोल मोजले असता 200 मीली. पेट्रोल कमी भरले. ही बाबत तेथील कर्मचा-याने ही बाब कबुल केली. तक्रारदाराकडुन दोन लिटरचे पैसे घेऊन देखील तक्रारदारास केवळ 1800 मीली पेट्रोल दिले. अशारितीने गैरअर्जदाराने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन 200 मीली पेट्रोल कमी दिले ही गैरअर्जदाराचे सेवेतील त्रुटी आहे म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन नुकसान भरपाई म्हणुन 50,000/- रुपये मिळावे अशी मागणी केली. तक्रारदाराने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 15 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात पोलीस रिपोर्ट पेपर कटिंग, ट्रान्समिशन अहवाल, वकीलाची नोटीस, पोचपावती इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत. तक्रारदाराने प्रतिउत्तर दाखल केले.. यात गैरअर्जदार क्रं.1 ते 4 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार क्रं 1,2 व 4 हजर होऊन आपला लेखी जवाब दाखल केला. गैरअर्जदार क्रं.3 यांना पाठविलेली नोटीस “ या नावाचा इसम येथे राहत नाही. पुढील पत्ता लागत नाही म्हणुन सेंडरला परत ” या शे-यासह मंचात परत आली आहे. पुढे तक्रारदारास गैरअर्जदार क्रं.3 बाबत स्टेप्स घेण्याबाबत सुचविण्यात आले परंतु तक्रारदाराने त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. गैरअर्जदार क्रं 1 यांचे कथनानुसार त्यानी तक्रारदाराची सर्व विपरित विधाने नाकबुल केली व पुढे नमुद केले की, तक्रारदार हा गैरअर्जदार यांना ग्राहक नाही कारण गैरअर्जदाराने त्यांना कोणतीही सेवा प्रदान केलेली नाही. गैरअर्जदाराचे पेट्रोल पंपावर तीन डिस्पेन्सींग युनिट्स आहेत. तीनही डिस्पेन्सींग युनिट्स मोनोटाईप म्हणजे एक नोझलचे आहेत. यातील डिस्पेंसींग युनीट क्रं. मीडको8ए2139 (डिझल पम्प) दिनांक 12/4/2010 पासुन तांत्रिक त्रुटीमुळे वापरात नव्हते. डिस्पेंसींग युनिट क्रं.सीवायएलएनटी10354 हे डिझल पम्प आहेत. डिस्पेंसींग युनिट क्रं.04एमसह1313 व्ही द्वारे गैरअर्जदार क्रं.2 चे पेट्रोल पंम्पावर वितरण केल्या जाते. तक्रारदाराची तक्रार डिस्पेंसींग युनिट क्रं.04एसी1314व्ही बाबत आहे. तक्रारकत्याने घेतलेले पेट्रोल हे डेनसिटी मापाने मोजले असता ते कमी मिळाले असा तक्रारदाराचा आरोप आहे. परंतु डेनसिटी माप हे आकारमान मोजणीकरिता योग्य माप नाही. आकारमान मोजणीकरिता मानक वजने व मापे अधिनियम प्रमाणे 5 लिटरचे प्रमाणीत माप हे योग्य माप आहे. गैरअर्जदार क्रं.2 च्या पेट्रोल पम्पाचे निरिक्षण वैधमापन शास्त्र विभागातील अधिका-यांद्वारे करण्यात आले व तपासणी अहवालानुसार डिलीव्हरी बरोबर आढळुन आली. तपासणी करुन वैधमापन शास्त्र विभागातील कर्मचारी सील लावतात व दररोज विक्री करण्याआधी पेट्रोल पम्प चालक डिस्पेंसींग युनिटची तपासणी करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रं.2 दररोज तपासणी करतात. कारण सिल तोडल्याशीवाय डिस्पेन्सींग युनिटची सेटींग बदलता येत नाही व तसे सिल तुटल्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे तपासणी अहवालात नमुद नाही म्हणुन सदर तक्रार खारीज करण्यात यावी अशी मागणी केली. गैरअर्जदार क्रं.2 यांचे कथनानुसार त्यांचा खापा-पारशिवनी रोड पेट्रोलपंप असल्याची बाब मान्य केली आहे. मात्र पेट्रोल पम्पावर तीन डिस्पेन्सींग युनिट्स आहेत. तीनही डिस्पेन्सींग युनिट्स मोनोटाईप म्हणजे एक नोझल चे आहेत. यातील डिस्पेंसींग युनीट क्रं. मीडको8ए2139 (डिझल पम्प) दिनांक 12/4/2010 पासुन तांत्रिक त्रुटीमुळे वापरात नव्हते. डिस्पेंसींग युनिट क्रं.सीवायएलएनटी10354 हे डिझल पम्प आहेत. डिस्पेंसींग युनिट क्रं.04एमसह1313 व्ही द्वारे गैरअर्जदार क्रं.2 चे पेट्रोल पंपावर वितरण केल्या जाते. तक्रारदाराची तक्रार डिस्पेंसींग युनिट क्रं.04एसी1314व्ही बाबत आहे. तक्रारकत्यांने घेतलेले पेट्रोल हे डेनसिटी मापाने मोजले असता ते कमी मिळाले असा तक्रारदाराचा आरोप आहे. परंतु डेनसिटी माप हे आकारमान मोजणीकरिता योग्य माप नाही. आकारमान मोजणीकरिता मानक वजने व मापे अधिनियम प्रमाणे 5 लिटरचे प्रमाणीत माप हे योग्य माप आहे. गैरअर्जदार क्रं.2 चे पेट्रोल पम्पाचे निरिक्षण वैधमापन शास्त्र विभागातील अधिका-यांद्वारे करण्यात आले व तपासणी अहवालानुसार डिलीव्हरी बरोबर आढळुन आली. तपासणी करुन वैधमापन शास्त्र विभागातील कर्मचारी सील लावतात व दररोज विक्री करण्याआधी पेट्रोल पम्प चालक डिस्पेंसींग युनिटची तपासणी करणे आवश्यक असते. त्याप्रमाणे गैरअर्जदार क्रं.2 दररोज तपासणी करतात. कारण सिल तोडल्याशीवाय डिस्पेन्सींग युनिटची सेटींग बदलता येत नाही व तसे सिल तुटल्याचे वैधमापन शास्त्र विभागाचे तपासणी अहवालात नमुद नाही. यास्तव तक्रारदाराची तक्रार खारीज करावी अशी मागणी केली. गैरअर्जदार क्रं.4 आपल्या जवाबात, सदरचे प्रकरण त्यांचे कार्यालयाशी संबंधीत नसल्यामुळे, त्यांना सदर प्रकरणातुन वगळण्यात यावे अशी विनंती केली. तक्रारदारातर्फे वकील श्री डी.आर.भेदरे व गैरअर्जदार क्रं. 2 तर्फे वकील श्री. विश्वास कुकडे व गैरअर्जदार क्रं.1 तर्फे श्री रोहीत जोशी यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रं.4 गैरहजर. #0#- कारणमिमांसा -#0# सदर प्रकरणात ज्या मापाने तक्रारदार यांनी संबंधीत पेट्रोल मोजले व ते कमी आले ते माप गैरअर्जदार यांनी मंचात जमा केले व त्यानंतर ते माप उपनियंत्रक, वैध मापन, शास्त्र, नागपूर विभाग, नागपूर यांचेकडे तपासणी करुन ते कीती क्षमतेचे नेमके आहे याबाबतचा अहवाल मागविण्यात आला. त्यावर दिनांक 11/5/2011 चे पत्रान्वये उपनियंत्रक, वैध मापन, शास्त्र, नागपूर विभाग, नागपूर यांनी सदर माप अप्रामाणीत असल्याने त्याची तपासणी करणे शक्य नाही असे उत्तर दिले. पुढे याबाबत त्यांना पुन्हा कळविण्यात आले की, सदर माप अप्रमाणीत आहे असे असुन ते नेमके कीती क्षमतेचे आहे व ते 500 मिली पेक्षा कमी किंवा जास्त क्षमतेचे आहे याबाबतचा अहवाल प्रमाणीत मापाने तपासुन पाठवावा. त्यावर उपनियंत्रक, वैध मापन, शास्त्र, नागपूर विभाग, नागपूर यांनी दिनांक 26/5/2011 रोजी अहवाल सादर केला. त्यांचे म्हणण्याप्रमाणे ते 20 मिली पेक्षा जास्त आहे. प्रत्यक्षात ते 520 मिली असे आहे. या मापासंबंधी तक्रारदाराची तक्रार असल्याने व ते माप कमी मापाचे नसुन ते जास्त मापाचे आहे असे आढळुन आले. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीत कोणतेही तथ्य उरलेले नाही. यास्तव ही तक्रार खारीज करण्यात येते. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. आपआपला खर्च सोसावा.
| [HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONORABLE Shri V. N. Rane] PRESIDENT | |