Maharashtra

Nagpur

CC/10/226

Anwar S. Daud - Complainant(s)

Versus

M/s. C Stone Travelers Pvt. Ltd. - Opp.Party(s)

Adv. Shabana Karim

16 Mar 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/226
1. Anwar S. DaudNagpurNagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. M/s. C Stone Travelers Pvt. Ltd. 66, TAGOR MARG, CIVIL LINES,NagpurNagpurMaharashtra2. SKYWARD SERVICES C/O EMIRATIS CONTACT CENTER, INTERFACE-II, UNIT NO. 301, 3 RD FLOOR, NEW LINK ROAD, MALAD(W) MUMBAI-440064MUMBAIMAHARASHTRA3. EMIRATESC/O ALMAKTOUM STREET, DEIRA, POST BOX NO.686, DUBAI( UNITED ARAB EMIRATES)ARAB EMIRATES ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :

Dated : 16 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

   मंचाचे निर्णयान्‍वये - श्री. मिलींद केदार, सदस्‍य
//- आदेश -// 
(पारित दिनांक – 16/03/2011)
 
1.           तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्‍वये मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍याची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 प्रवास तिकिटांची सेवा देतात आणि गैरअर्जदार क्र. 3 यांच्‍याकरीता काम करतात व गैरअर्जदार क्र. 3 हे सुप्रसिध्‍द इंटर नॅशनल एअर ट्रांसपोर्टर आहेत. तक्रारकर्ता वारंवार व्‍यवसायाच्‍या निमित्‍ताने जगभरात फिरत असतात, त्‍यांचा हा प्रवास बघुन गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्‍याला जुलै 2003 ते फेब्रुवारी 2009 या कालावधीकरीता सिलव्‍हर कार्ड मेंबरशिप दिली.
            दि.20.07.2009 रोजी तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 1 कडून नागपूर वरुन दुबई ते मॉस्‍को करीता फ्लाईट क्र. EK-131 करीता तिकिट बुक केले.  दि.23.07.2009 रोजी फ्लाईट क्र. EK-134 ने मॉस्‍कोवरुन दुबईला परत आले. दुबई ते मॉस्‍को प्रवासाकरीता गैरअर्जदार क्र. 1 कडून इकॉनॉमिक क्‍लासचे तिकिट बूक केले होते व रु.26,935/- अदा केले होते. तक्रारकर्त्‍याने इकॉनॉमिक फ्लाईट तिकिट हे बिझनेस क्‍लॉस तिकिटमध्‍ये श्रेणी वाढ होण्‍याचा निर्णय घेतला आणि स्‍कायवर्ड मेंबरशीप अकाऊंट क्र. 107770795 मध्‍ये 13338 स्‍कायवर्ड माईल्‍स असता, त्‍यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचे वेबसाईटवरुन/स्‍कायवर्ड यांचे वेबसाईटवरुन दि.18.07.2009 रोजी संध्‍याकाळी 9-00 वा. ABN AMRO Credit Card No. 542 XXXX 6949 वापर करुन 12175 स्‍कायवर्ड विकत घेतले व गैरअर्जदार क्र. 2 यांना रु.26,935/- रक्‍कम दिली आणि त्‍यांनी रक्‍कम मिळाल्‍यानंतर माईल्‍स विक्रीचा स्विकार करुन दुबई ते मॉस्‍को ईकॉनॉमी तिकिटच्‍या श्रेणीमध्‍ये वाढ करुन बिझनेस क्‍लासमध्‍ये बदल केला. याबाबत गैरअर्जदार क्र. 3 यांनी तक्रारकर्त्‍याला दि.18.07.2009 रोजी त्‍यांच्‍या बूकिंगमध्‍ये केलेला बदल त्‍यांना प्राप्‍त झाल्‍याचे कळविले व श्रेणीवाढ देऊन दि.19.07.2009 चे फ्लाईट क्र. EK-131 चे दुबई ते मॉस्‍को ई-तिकिट मेलने पाठविले. गैरअर्जदार क्र. 2 यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या मेंबरशिप अकाऊंट क्र. EK 107770795 मध्‍ये 121175 माईल्‍स जमा केले. तसेच श्रेणीवाढ करुन तक्रारकर्त्‍याच्‍या सदर अकाऊंटमधून 25000 स्‍कायवर्ड कपात करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 व 3 च्‍या वेबसाईटवर बुकींगचा आढावा घेतला असता श्रेणीवाढ निश्चित करण्‍यात आली होती.
दि.20.07.2009 रोजी दुबई येथील इंटरनॅशनल एयरपोर्ट टरमीनल क्र. 3 वर चेकींग काऊंटरवर विचारणा केली असता तक्रारकर्त्‍याला असे कळले की, त्‍यांच्‍या तिकिट श्रेणीमध्‍ये वाढ करण्‍यात आली नव्‍हती. याबाबत गैरअर्जदार क्र. 2 व 3 ला कळविले असता त्‍यांच्‍या कर्मचा-याने तिकिटाच्‍या श्रेणीत वाढ करण्‍याकरीता अतिरिक्‍त अंदाजे रु.66727.77 भरावयास भाग पाडले. याबाबत तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदाराच्‍या विविध कार्यालयांना तक्रार केली. परंतू त्‍यांनी कुठलाही प्रतिसाद न दिल्‍याने तक्रारकर्त्‍याने मंचासमोर सदर वाद दाखल करुन अतिरिक्‍त भरलेली रक्‍कम रु.66727.77 परत मिळावे, मानसिक, शारिरीक त्रासाबाबत भरपाई मिळावी अशा मागण्‍या केलेल्‍या आहेत.
2.          सदर तक्रार मंचासमोर दाखल झाल्‍यानंतर मंचाने गैरअर्जदारांवर नोटीस बजावला. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने खालीलप्रमाणे आपले लेखी उत्‍तर दाखल केले.
3.          गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने तक्रारीवर प्राथमिक आक्षेप घेऊन तक्रारकर्त्‍याची तक्रार ग्रा.सं.का.अंतर्गत येत नसल्‍याचे नमूद केले आहे. पुढे परिच्‍छेदनिहाय उत्‍तरात तक्रारकर्त्‍याला गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने सिल्‍वर कार्ड मेंबरशिप दिले होते ही बाब मान्‍य केली आहे. तक्रारकर्त्‍याने आगाऊ रक्‍कम भरुन आगाऊ तिकिट मुंबई - मॉस्‍को – दुबई इकॉनॉमी वर्गाचे घेतले होते. वारंवार प्रवासामुळे मिळालेले माईलेजमध्‍ये कमतरतेमुळे तक्रारकर्त्‍याने क्रेडीट कार्डद्वारे उर्वरित माईल्‍स विकत घेतले. परंतू दुबई येथे तिकिट चेकिंगचे वेळेस तक्रारकर्त्‍याचे वरच्‍या श्रेणीतील तिकिट निश्चित झाले नव्‍हते आणि सदर निश्चितीकरणे हे संगणकीय दोषामुळे चुकीने झाले होते. म्‍हणून तक्रारकर्त्‍याला बिझनेस क्‍लासमध्‍ये अतिरिक्‍त रक्‍कम भरुन तिकिट काढण्‍याचे सुचविले. तक्रारकर्त्‍याचे तिकिट संगणकीय चुकीमुळे अपडेट झाले नव्‍हते आणि म्‍हणून त्‍यांनी कुठलीही हरकत न नोंदविता रु.26,935/- देऊन सदरचे तिकिट घेतले. ग्राहकांसोबत सतत कायम संबंध ठेवण्‍याचे उद्देशाने सदर रक्‍कम परत करण्‍याची मान्‍य केले. परंतू या उत्‍तराला तक्रारकर्त्‍याने कोणतेही उत्‍तर दिले नाही. त्‍यांच्‍या सेवेत कोणतीही त्रुटी नसून सदर तक्रार खारीज करण्‍याची विनंती केलेली आहे.
 
4.          गैरअर्जदार क्र. 1 यांनी सदर तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली असून ते आय आर डी आर यांचे नियमाप्रमाणे आंतरराष्‍ट्रीय प्रवासी तिकिट विक्री करीत असतात असे नमूद केले आहे. तक्रारीतील बहुतांश मजकुर गैरअर्जदार क्र. 1 यांना मान्‍य असून ते तिकिटांच्‍या या व्‍यवहारावर नाममात्र कमिशन घेतात व तक्रारकर्त्‍याच्‍या आक्षेपांबाबत त्‍यांचा काहीही संबंध नसून सदर सेवेतील कथीत त्रुटी ही गैरअर्जदार क्र. 2 व 3 कडून झाल्‍याचे नमूद केले आहे.
5.          सदर तक्रार मंचासमक्ष दि.04.03.2011 रोजी युक्‍तीवादाकरीता आली असता तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचा युक्‍तीवाद त्‍यांच्‍या वकिलांमार्फत ऐकला. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्‍कर्षाप्रत आले.
 
-निष्‍कर्ष-
6.          तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 1 कडून तिकिट खरेदी केले होते व गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडून सिल्‍वर कार्ड मेंबरशिप घेतली होती व सदर तिकिट हे गैरअर्जदार क्र. 3 च्‍या प्रतिनीधी स्‍वरुपात गैरअर्जदार क्र. 1 ने विकले. गैरअर्जदार क्र. 1 चे कार्यालय नागपूर येथे आहे. यावरुन तक्रारीचे कारणाचा काही भाग नागपूर येथे घडला असल्‍याने सदर तक्रार मंचाचे कार्यक्षेत्रात येते असे मंचाचे मत आहे. तिकिट खरेदी करण्‍याकरीता तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना रकमेचे भुगतान केले व सेवा घेतली आहे, त्‍यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ग्राहक ठरतो असे मंचाचे मत आहे.
7.          तक्रारकर्त्‍याने मॉस्‍को ते दुबई येण्‍याकरीता एकॉनॉमी क्‍लासचे तिकिट खरेदी केले होते ही बाब उभय पक्षांच्‍या कथनावरुन सिध्‍द होते. परंतू त्‍यामध्‍ये वाढ करण्‍याचे दृष्‍टीने तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदार क्र. 2 आणि 3 कडे संपर्क साधला आणि 12175 स्‍कायवर्ड विकत घेऊन सदर तिकिट हे बिझनेस क्‍लासमध्‍ये वाढ करण्‍याची विनंती केली. गैरअर्जदार क्र. 2 आणि 3 ने या बाबी मान्‍य केल्‍या आहे व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते.
8.          तक्रारकर्त्‍याने एकॉनॉमी क्‍लासचे तिकिट बिझनेस क्‍लासमध्‍ये श्रेणीवाढ करण्‍याची विनंती गैरअर्जदार क्र. 2 व 3 ला केली आणि त्‍यांनी ई-मेलद्वारे त्‍यासंबंधीची सुचना पाठविली. परंतू प्रत्‍यक्षात दि.20.07.2009 रोजी दुबई येथील इंटरनॅशनल एयरपोर्टवर तक्रारकर्ता गेला असता तिकिटाची श्रेणीवाढ झालेली नसल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे लक्षात आले. त्‍यांनी गैरअर्जदारांशी संपर्क साधला असता तक्रारकर्त्‍यांना AED 4890 (अंदाजे रु.66727.77) इतकी भरावयास सांगितली. गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने आपल्‍या उत्‍तरात नमूद केले आहे की, सदर बाब संगणकीय चुकीमुळे झालेली आहे आणि त्‍याकरीता त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला सदर रक्‍कम परत करण्‍याची तयारी दर्शविली. परंतू त्‍यांनी आपल्‍या उत्‍तरात नमूद केले आहे की, सदर बाबीला तक्रारकर्त्‍यांनी काहीही उत्‍तर दिलेले नाही. तक्रारकर्त्‍यांनी मंचासमक्ष दाखल केलेले दस्‍तऐवज क्र.18, पृष्‍ठ क्र. 76 चे अवलोकन केले असता त्‍यातील शेवटच्‍या परिच्‍छेदामध्‍ये (पृष्‍ठ क्र.77) नमूद आहे.
 
“Although we cannot change what has happened, as a gesture of goodwill, without prejudice or admission of liability, I have arranged to refund AED 4890.00 paid for the upgrade in the form of a Miscellaneous Charges Order (MCO), which can be used on Emirates for travel related services such as air tickets or excess baggage and is valid for one year from the date of issue. The MCO will be dispatched to your mailing address, under separate cover.”
 
यामध्‍ये तक्रारकर्त्‍याची संमती मागितल्‍याचे स्‍पष्‍ट होत नाही. त्‍यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदाराने घेतलेला सदर बचाव हा चुकीचा असून त्‍यांनी कबूल केल्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍याचे पैसे परत करावयास पाहिजे होते आणि ही त्‍यांची सेवेतील त्रुटी आहे. तसेच संगणकाच्‍या आधारे व संगणकाच्‍या चुकीमुळे तिकिटाच्‍या श्रेणीत वाढ झालेली नाही असे म्‍हणणे सुध्‍दा गैरअर्जदारांच्‍या सेवेतील निष्‍काळजीपणा दर्शविते. त्‍यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडून एकलपणे किंवा संयुक्‍तपणे रु.66727.77 तक्रार दाखल केल्‍याचे दि.07.04.2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज रक्‍कम अदा होईपर्यंत मिळण्‍यास तक्रारकर्ते पात्र ठरतात.
 
 
9.          तक्रारकर्त्‍याने नुकसान भरपाईबाबत रु.10,00,000/- ची मागणी केलेली आहे. मंचाचे मते सदर मागणी अवास्‍तव व अवाजवी आहे. परंतू तक्रारकर्त्‍याचे तिकिटाचे श्रेणीत वाढ झालेली असतांना सुध्‍दा गैरअर्जदाराने संगणकाचे चुकीमुळे त्‍याबाबत वाढ न दर्शविल्‍याने तक्रारकर्त्‍याला पुन्‍हा रु.66727.77 इतकी रक्‍कम भरावी लागली व त्‍याकरीता त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास झाला. याकरीता तक्रारकर्ता हा न्‍यायोचितदृष्‍टया रु.20,000/- मिळण्‍यास पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. तसेच मंचासमोर तक्रार दाखल करावी लागली, म्‍हणून तक्रारीच्‍या खर्चाबाबत रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे.
 
10.         सदर तक्रारीमध्‍ये गैरअर्जदार क्र. 1 यांची सेवेतील त्रुटी प्रदर्शित होत नसल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे. उपरोक्‍त निष्‍कर्षावरुन व दाखल कागदपत्रांवरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1)    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
2)    गैरअर्जदार क्र. 1 विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.
3)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने सेवेत त्रुटी केल्‍याचे घोषित करण्‍यात येते.
4)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 ला आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी एकलपणे किंवा      संयुक्‍तपणे रु.66727.77 ही रक्‍कम तक्रारकर्त्‍याला तक्रार दाखल केल्‍याचे    दि.07.04.2010 पासून प्रत्‍यक्ष संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के  व्‍याजासह द्यावी.
5)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने एकलपणे किंवा संयुक्‍तपणे शारिरीक व मानसिक     त्रासाबाबत रु.20,000/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.
6)    गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने एकलपणे किंवा संयुक्‍तपणे तक्रारीच्‍या खर्चाबाबत     रु.3,000/- तक्रारकर्त्‍याला द्यावे.
7)    सदर आदेशाचे पालन गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने एकलपणे किंवा संयुक्‍तपणे     आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसाचे आत करावे.
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT