Maharashtra

Thane

CC/669/2015

Shri Sachin Madhukar Thakur - Complainant(s)

Versus

M/s. Blossom English school - Opp.Party(s)

08 Feb 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/669/2015
 
1. Shri Sachin Madhukar Thakur
At 105/106, Woodbine everest one, Kolseth Rd,Thane west 40607
Thane
MH
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Blossom English school
Everest world, Near siddeshwar Garden, Kolsheth Rd, Thane west
Thane
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER
 

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

  1.              तक्रारदारांनी त्‍यांची मुलगी कु. दृष्‍टी सचिन ठाकूर हिच्‍या नर्सरी वर्गातील प्रवेशाकरीता सामनेवाले यांचेकडे दि. 08/12/2015 रोजी रक्‍कम रु. 20,700/- चेकद्वारे तसेच रु. 3,200/- रोख स्‍वरुपात भरणा केले. सामनेवाले यांनी रक्‍कम रु. 3,200/- बाबतची पोचपावती तक्रारदारांना दिली असून मंचात दाखल आहे.
  2.  
  3.        कु. दृष्‍टी हीस सामनेवाले यांचे शाळेपेक्षा उत्‍तम स्थितीतील इंटरनॅशनल शाळेत प्रवेश प्राप्‍त झाल्‍यामुळे तक्रारदारांनी सदर शाळेचा प्रवेश रद्द करण्‍याचे ठरवले. सामनेवाले यांनी शाळेची फीस व मूळ जन्‍म दाखला देण्‍यास नकार दिला. सामनेवाले यांनी फीस रक्‍कम परत मिळणार नाही असे तक्रारदारांनी लेखी कबूल केल्‍यानंतरच मूळ जन्‍मदाखला परत देण्‍याची तयारी दर्शविली. सबब तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे भरणा केलेली फीस रक्‍कम रु. 23,900/- परत मिळण्‍यासाठी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  4.         सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते गैरहजर असून लेखी कैफियत दाखल नाही. प्रस्‍तुत प्रकरण सामनेवाले यांचेविरुध्‍द एकतर्फा चालविण्याबाबत मंचाने आदेश पारीत केला.
  5.         तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद, यांचे मंचाने वाचन केले. तक्रारदारांचा युक्‍तीवाद ऐकला. यावरुन खालीलप्रमाणे मंच निष्‍कर्ष काढीत आहेः
  6. कारणमिमांसाः

 

  1.         तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दि. 08/01/2015 रोजी रक्‍कम  रु. 3,200/- कु. दृष्‍टी सचिन ठाकूर हिच्‍या शाळेतील प्रवेशाकरीता फीस भरणा केल्‍याबाबतची पावती मंचात दाखल आहे.

ब.          तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिलेला रु. 20,700/- रकमेचा चेक तक्रारदारांच्‍या खात्‍यातून सामनेवाले यांनी वटवल्‍याबाबतचा Axis Bank चा खातेउतारा मंचात दाखल आहे.

क.          सामनेवाले यांना तक्रारदारांकडून कु. दृष्‍टी हीच्‍या शाळेतील प्रवेशापोटी एकूण रक्‍कम रु. 23,900/- प्राप्‍त झाल्‍याचे तक्रारीत आलेल्‍या पुराव्‍यावरुन स्‍पष्‍ट होते.

ड.         तक्रारदारांनी त्‍यांचे मुलीच्‍या जून 2015-16 या शैक्षणिक वर्षाकरीता नर्सरी ग्रेड प्रवेशासाठी 8 जानेवारी, 2015 रोजी भरणा केलली फीस प्रवेश रद्द करावयाच्‍या कारणास्‍तव परत देण्‍याबाबत सामनेवाले यांना दि. 10/03/2015 रोजी लेखी पत्राने कळवले आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांना प्रवेश रद्द करण्‍याबाबत 27 फेब्रुवारी, 2015 व दि. 04 मार्च, 2015 रोजी माहिती दिली होती. सामनेवाले यांनी कु. दृष्‍टी हिचा प्रवेश रद्द करुन फीस व मूळ जन्‍माचा दाखला परत न दिल्‍यामुळे दि. 10/03/2015 व दि. 18/03/2015 रोजी यासंदर्भात सामनेवाले यांचेकडे लेखी तक्रार दिली.

इ.         सामनेवाले यांच्‍या शाळेचे शैक्षणिक वर्ष जून, 2016 मध्‍ये चालू होते. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी शैक्षणिक वर्ष चालू होण्‍यापूर्वी सुमारे 3 ते 3½  महिनेआधी कु. दृष्‍टीचा प्रवेश रद्द करण्‍यासाठी अर्ज दिला आहे. तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांची प्रवेश प्रक्रीया चालू असल्‍यामुळे सदर जागा इतर विदयार्थ्‍याला देणे शक्‍य आहे. तक्रारदारांच्‍या पाल्‍याने सामनेवाले यांच्‍या शाळेच्‍या कोणत्‍याही सुविधांचा उपयोग केला नाही. प्रस्‍तुत प्रकरणात सामनेवाले यांचा कोणताही आक्षेप दाखल नसल्‍यामुळे तक्रारदारांचा पुरवा अबाधित आहे. सामनेवाले यांनी त्‍यांच्‍या शाळेची प्रवेश प्रक्रीया चालू असूनही तक्रारदारांच्‍या पाल्‍याचा प्रवेश रद्द करुन प्रवेशापोटी प्राप्‍त झालेल्‍या फीसची रक्‍कम परत करणे सामनेवले यांचेवर बंधनकारक होते. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या पाल्‍याची फीस परत न करुन तसेच जन्‍माचा दाखला देण्‍यास नकार देऊन अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केल्‍याचे स्‍पष्‍ट होते असे मंचाचे मत आहे.

ई.        सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेली रक्‍कम रु. 3,200/- एवढया रकमेच्‍या पावतीवर “Amount paid towards school fees, Registration & Admission is not refundable or adjusted on any ground please note” असे नमूद केले आहे. परंतु प्रवेश फी संदर्भातील नियमांची कोणतीही माहिती तक्रारदारांना दिली नाही. सामनेवाले यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.

      तक्रारदारांनी यासंदर्भात “University Grants Commission, New Delhi” यांची F.No. 1-3/2007 (CPP-II) दि. 23/4/2007 रोजीची “Public Notice” मंचात दाखल केली आहे. सदर नोटीसमधील परिच्‍छेद क्र. 3 मध्‍ये खालीलप्रमाणे नमूद केले आहेः

 

3. The Ministry of Human Resource Development and University Grant Commission have considered the issue and decided that the institutions and universities , in the public interest, shall maintain a waiting list of students/candidates. In the event of student/candidate withdrawing before the starting of course, the waiting candidates should be given admission against the vacant seat. The entire fee collected from the student, after a deduction of the processing fee of not more than Rs.1000/- (One Thousand only) shall be refunded and returned by the institution/University to the student/candidate withdrawing from the programme. Should a student leave after joining the course and if the seat consequently falling vacant has been filled by another candidate by the last date of admission, the institution must return the fee collected with proportionate deductions of monthly fee and proportionate hostel rent, where applicable.

 

           वरील पब्लिक नोटीसीमधील UCG च्‍या मार्गदर्शनानुसार सामनेवाले संस्‍थेने प्रवेश प्रक्रीया चालू असतांना विदयार्थ्‍यांनी प्रवेश रद्द केल्‍यास प्रोसेसिंगपोटी जास्‍तीत जास्‍त रक्‍कम रु. 1,000/- कपात करुन उर्वरीत फीस परत देणे तसेच प्रवेशाचेवेळी विदयार्थ्‍यांनी दाखल केलेली मूळ प्रमाणपत्र परत देणे उचित आहे असे मंचाला वाटते.

ड.       सामनेवाले संस्‍थेची प्रवेश प्रक्रिया चालू असतांना व शैक्षणिक वर्ष चालू होण्‍यापूर्वी सुमारे 3 महिने तक्रारदारांनी प्रवेश रद्द करण्‍याची विनंती केली आहे. तक्रारदारांच्‍या पाल्‍याला इतर संस्‍थेत प्रवेश प्राप्‍त होत असल्‍यामुळे सदर संस्‍थेतील प्रवेश रद्द करण्‍याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. अशा परिस्थितीत सामनेवाले यांनी प्रोसेसिंग फीसपोअी जास्‍तीत जास्‍त रक्‍कम रु. 1,000/- कपात करुन उर्वरीत रक्‍कम परत देणे योग्‍य आहे असे मंचाचे मत आहे. मंचाने यासंदर्भात मा. राज्‍य आयोगाच्‍या FA 1457 (Swapnil Kadam Vs. The Principal Indira Gandhi Engineering College) मध्‍ये दि. 13/08/2009 रोजी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयाचा मंचाने आधार घेतला आहे.

      सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः    

                 आ दे श

  1. तक्रार क्र. 669/2015 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.
  2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना प्रवेश फीसची रक्‍कम रु. 23,900/- परत न देऊन अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला असे जाहिर करण्‍यात येते.
  3. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना रक्‍कम रु. (रु. 23,900/- - रु. 1,000/-) रु. 22,900/- (अक्षरी रुपये बावीस हजार नऊशे) तक्रार दाखल तारखेपासून दि. 31/3/2016 पर्यंत 6% व्‍याजदाराने दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्‍यास दि. 01/04/2016 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत 9% व्‍याजदराने दयावी.
  4. सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्‍कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार) व तक्रारीचा खर्चाची रक्‍कम रु. 2,000/-) दि. 31/3/2016 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत अदा न केल्‍यास दि. 01/04/2016 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत 9% व्‍याजदराने दयावी.
  5. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात   याव्‍यात.
  6. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.  
 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.