Complaint Case No. CC/1/2021 | ( Date of Filing : 02 Jan 2021 ) |
| | 1. RAHUL BHOSLE | 302, AJAY APARTMENTS, PAKHADI, KHAREGAON, OPP. PARSIK BANK, KALWA WEST, THANE- 400 605 | THANE | MAHARASHTRA |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. M/S. BHOOMI AND ARCADE ASSOCIATES | ACROPOLIS, MMRDA LAYOUT, SECTOR 3, OFF. CHIKHALDONGARI ROAD, VIRAR WEST, THANE | THANE | MAHARASHTRA | 2. MR. CHAITYA AJAY MEHTA | ACROPOLIS, MMRDA LAYOUT, SECTOR 3, OFF. CHIKHALDONGARI ROAD, VIRAR WEST, THANE | THANE | MAHARASHTRA | 3. MR. AMIT MANGILAL JAIN | ACROPOLIS, MMRDA LAYOUT, SECTOR 3, OFF. CHIKHALDONGARI ROAD, VIRAR WEST, THANE | THANE | MAHARASHTRA | 4. INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED | INDIABULLS HOUSE, INDIABULLS FINANCE CENTRE, TOWER 1, 4TH FLOOR, SENAPATI BAPAT MARG, FITWALA ROAD, MUMBAI | MUMBAI | MAHARASHTRA | 5. ICICI BANK LIMITED | ICICI BANK TOWERS, BANDRA KURLA COMPLEX, MUMBAI | MUMBAI | MAHARASHTRA |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | मा.अध्यक्षपद रिक्त. तक्रारदार स्वत: हजर. तक्रारदारांच्या वकीलांचा दि.27/01/2021 रोजी युक्तीवाद ऐकण्यात आलेला आहे. तक्रार व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता दिसून येते की, प्रस्तुतची तक्रार तक्रारदारांनी सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेकडून खरेदी केलेल्या सदनिका क्र.1504, 1505 व 1506 बाबत असून, तक्रारदारांच्या मते, प्रस्तुतची तक्रारीतील वादाचे कारणे वर नमुद सदनिका सामनेवाले क्र.4 (इंडीया बुल्स हौसिंग फायनान्स लिमीटेड) व सामनेवाले क्र.5 (आयसीआयसीआय बँक लिमीटेड) यांचेद्वारे अनुक्रमे दि.08/02/2018, 16/02/2018 व 28/03/2019 रोजी लिलावाद्वारे विक्री करण्यात आलेल्या दिवशी घटीत झालेले आहे. तक्रारदारांनी वर नमुद तीन सदनिका तीन स्वतंत्र करारानाम्याद्वारे विकत घेतल्या असून, त्या सामनेवाले क्र.4 व सामनेवाले क्र.5 यांनी स्वतंत्र लिलावाद्वारे विक्री केल्या आहेत. आयोगाच्या मते, प्रस्तुत तक्रारीतील वादग्रस्त सदनिकांबाबतच्या वादाची कारणे स्वतंत्र असल्याने, तक्रारदारांनी तीन स्वतंत्र तक्रारी दाखल करणे आवश्यक आहे. सबब, तक्रारदारांना प्रस्तुतच्या तक्रारीतील वादाबाबत तीन स्वतंत्र तक्रारी दाखल करण्याची मुभा देऊन, प्रस्तुतची ग्राहक तक्रार क्र.1/2021 दाखल न करता दाखल टप्प्यावर खारीज करण्यात येते. खर्चाबद्दल आदेश नाहित. आदेशाची साक्षांकित प्रत तक्रारदारांना विनाविलंब व विनामुल्य पाठविण्यात यावी. प्रकरण समाप्त. | |