रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 10/2014
तक्रार दाखल दिनांक :- 30/01/14
निकालपत्र दिनांक 05-08-2014
श्री. राजकुमार शंकर जगताप,
रा. फ्लॅट नं. ए – 601,
श्री शांतीनिकेतन “C”, सीएचएस लि., प्लॉट नं. 12 ए,
सेक्टर 8, खारघर, नवी मुंबई. ..... तक्रारदार
विरुध्द
1. मे. बेस्ट आयटी वर्ल्ड (इं.) प्रा.लि.,
रिजनल ऑफीस – 87, मिस्त्री इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स,
एम.आय.डी.सी. क्रॉस रोड, “A” अंधेरी (पूर्व),
मुंबई – 400083.
2. श्री. संदीप परसरामपुरिया, डायरेक्टर,
बेस्ट आयटी वर्ल्ड (इं.) प्रा.लि.,
रिजनल ऑफीस – 87, मिस्त्री इंडस्ट्रीअल कॉम्प्लेक्स,
एम.आय.डी.सी. क्रॉस रोड, “A” अंधेरी (पूर्व),
मुंबई – 400083.
3. मे. विजय सेल्स,
ब्रँच ऑफीस – लीला महादेव कॉम्प्लेक्स,
पनवेल बस डेपोजवळ, पनवेल, ता. पनवेल,
जि. रायगड. ..... सामनेवाले क्र. 1 ते 3
उपस्थिती - तक्रारदार स्वत: हजर.
विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 गैरहजर.
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. ए. झेड. तेलगोटे
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
– नि का ल प त्र –
(05/08/2014)
1. सदर प्रकरण आज रोजी सुनावणीस आले असता, तक्रारदार स्वत: हजर होते. विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 गैरहजर होते.
2. सदर प्रकरणात तक्रारदारांनी केलेली मागणी विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी पूर्ण केलेली असल्याने उभयपक्षांत कोणताही वाद राहिलेला नसल्याने प्रकरण निकाली काढण्यात यावे असे तक्रारदारांनी मंचासमक्ष नमूद करून सदर प्रकरण मागे घेत असल्याबाब विड्रॉवल (Withdrawal) पुरशीस दिली. तक्रारदारांचे वकीलांनी दिलेली सदर पुरशिस रेकॉर्डवर घेण्यात येऊन ती मंजूर करण्यात आली व नि. 1 वर तसा अंतिम आदेश पारीत करण्यात येऊन तक्रार प्रकरण निकाली काढण्यात आले.
3. सदर आदेशाची सत्यप्रत उभयपक्षकांराना पाठविण्यात यावी. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 05-08-2014
(ए. झेड. तेलगोटे) (रमेशबाबू बी. सिलीवेरी)
अध्यक्ष सदस्य
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.