Maharashtra

Ahmednagar

CC/16/27

Brahmadeo Laxman Ravtale - Complainant(s)

Versus

M/s. Bafna Furniture, - Opp.Party(s)

self

10 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/16/27
( Date of Filing : 14 Jan 2016 )
 
1. Brahmadeo Laxman Ravtale
Ganesh Peth,Main Road,Pathardi,Tal Pathardi
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Bafna Furniture,
Opp.Navin Bus Stand,Shevgaon Road,Pathardi,Tal Pathardi,
Ahmednagar
Maharashtra
2. L.G.Electronics India Pvt.Ltd.
D-3,District Centre Saket,New Delhi-110 017
New Delhi
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:self, Advocate
For the Opp. Party: V.B.Todmal, Advocate
Dated : 10 Jan 2019
Final Order / Judgement

 

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती.चारु वि.डोंगरे, मा.सदस्‍या)

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाचे सेवेत त्रुटी ठेवली आहे. म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केलेली आहे.

2.   तक्रारदार यांची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणेः-

     तक्रारदार हे मौजे पाथर्डी येथील रहिवासी असून त्‍यांचा स्‍वतःचा छोटासा व्‍यवसाय आहे. तक्रारदार यांनी दिनांक 03.04.2013 रोजी बाफना फर्निचर पाथर्डी यांचेकडून एल. जी. कंपनीचा एल. सी. डी. मॉडेल नं.22 एल.एस. 53300 सि.नं.210/सी.डब्‍ल्‍यु.सी.006993 किंमत रक्‍कम रु.12,500/- ला खरेदी केला. तो  दिनांक 25.05.2015 रोजी नादुरुस्‍त झाला, त्‍यानंतर तक्रारदार यांनी बाफना फर्निचर यांच्‍याकडे सदरहू टी.व्‍ही. दुरुस्‍त करुन देण्‍याची मागणी केली असता, कंपनीचा फोन नंबर देऊन कंपनीशी संपर्क साधण्‍यास सांगितले. त्‍यानंतर तक्रारदाराने अहमदनगर येथील श्री.सर्व्‍हीसेस शॉप नं.31415 यांचेकडे तक्रार केली त्‍यानुसार कंपनीचे इंजिनियर येऊन टी.व्‍ही.ची प्रत्‍यक्ष पाहणी करुन सदर टी.व्‍ही.चा वॉरंटी पिरीयड संपलेला असल्‍यामुळे त्‍याचे स्‍पेअर पार्ट बदलण्‍यासाठी तुम्‍हाला अंदाजे 2,000/- रुपये खर्च येईल तो जमा करण्‍यास सांगितले. त्‍यानंतर टी.व्‍ही. दुरुस्‍त करुन दिला जाई असे सांगितले. तक्रारदार यांनी इंजिनियरकडे रु.2,000/- जमा केले. त्‍यानंतर एक महीन्‍याने तो स्‍पेअर पार्ट घेऊन आला. परंतू तो पार्ट बसविल्‍यानंतरही सदरहू टी.व्‍ही.चालू झाला नाही. त्‍यामुळे तो स्‍पेअर पार्ट काढून परत नेला व कंपनीकडे तक्रार करण्‍यास सांगितले. त्‍यांनी 2,000/- रुपये तक्रारदाराला परत केले नाही. तक्रारदाराने कंपनीला संपर्क साधल्‍यानंतर कंपनीकडून श्री.गौरव यांचा फोन आला व तुमचा टी.व्‍ही.चालू होणार नाही, तरी कंपनीचे पॉलीसीनुसार तुमचा जुना टी.व्‍ही.परत घेऊन त्‍याची कंपनीच्‍या इंजिनियरकडून पाहणी करुन तुमच्‍या जुन्‍या टी.व्‍ही.ची योग्‍य किंमत धरुन तुम्‍हाला मॉडेलप्रमाणे वरील किंमतीचा फरक घेऊन आम्‍ही तुम्‍हाला नविन टी.व्‍ही. देऊ असे सांगितले. त्‍यानंतर 15 दिवसानंतर परत फोन करुन 5,500/- रुपये कंपनीच्‍या दिल्‍ली येथील मुख्‍य शाखेतील बँक खाते नं.एसी/नं.35569029 वरती आर.टी.जी.एस. करण्‍यास सांगितले असता, तक्रारदार यांनी दिनांक 13.10.2015 रोजी रेणुकामाता मल्‍टीस्‍टेट को.ऑपरेटिव्‍ह बँक, शाखा पाथर्डी या शाखेतून माझ्या खात्‍यातून 5,500/- रुपये दिल्‍ली येथील कंपनीच्‍या दिलेल्‍या खाते नंबरवर आर.टी.जी.एस. केले. त्‍यानंतर वेळोवेळी त्‍यांच्‍याशी संपर्क साधून टी.व्‍ही. कधी मिळेल याची चौकशी केली. दोन महिन्‍यानंतर श्री.गौरव यांनी सांगितले की, दोन चार दिवसात तुम्‍हाला नविन टी.व्‍ही. देऊन कंपनीचा माणूस तुमचा जुना टी.व्‍ही. परत घेऊन जाईल. त्‍यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतू नविन टी.व्‍ही. दिला नाही. व तक्रारदारास सांगितले की, तुमच्‍या बाफना फर्निचरचे दुकानदाराचे फेक बील सादर केल्‍यामुळे तुमचे प्रपोजल कंपनीच्‍या वरील अधिका-यांनी नामंजुर केले आहे. तुम्‍हाला नविन टी.व्‍ही. मिळणार नाही व तुमचे आर.टी.जी.एस. केलेले 5,500/- रुपये कंपनी परत देईल. त्‍याप्रमाणे दिनांक 18.12.2015 रोजी धनादेश क्रमांक 51534103010003 दिनांक 02.01.20916 रोजी तक्रारदाराला परत केला आहे. मात्र तक्रारदाराचा टी.व्‍ही.दुरुस्‍त करुन दिला नाही. व घेतलेली रक्‍कम रुपये 2,000/- तक्रारदाराला परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी मंचात तक्रार दाखल करुन परीच्‍छेद क्र.5 प्रमाणे मागणी केली केली आहे.    

3.   सामनेवाला नं.1 यांना नोटीस बजावणी होऊनही ते प्रकरणात हजर झाले नाही. त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द निशाणी 1 वर तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

4.   सामनेवाला नं.2 यांनी त्‍यांची लेखी कैफियत निशाणी क्र.9 वर दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाला नं.2 यांनी असे कथन केले की, सामनेवाला नं.2 हे एल.जी.इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रा.लि. कंपनी असून तक्रारदाराने त्‍याच कंपनीचा एल.सी.डी. टी.व्‍ही. खरेदी केला आहे. टी.व्‍ही.खरेदी केल्‍याचे बिल हे वेगवेगळया तारखेचे आहे, बिलावर खाडाखोड दिसून येते. त्‍यामुळे सदरचा टी.व्‍ही. हा खरेदी केला होता किंवा काय अशी शंका उपस्थित होते असे नमुद केले. तसेच सदरचा टी.व्‍ही. दिनांक 03.04.2013 रोजी खरेदी केल्‍यानंतर दिनांक 25.05.2015 रोजी नादुरुस्‍त झाला. त्‍यामुळे सदरचा टी.व्‍ही. हा वॉरंटी व गॅरंटीचा काळ संपल्‍यानंतर नादुरुस्‍त झालेला दिसुन येत आहे. त्‍यामुळे कंपनी विरुध्‍द कायदेशिर मागणी अथवा तक्रार तक्रारदार यांना करता येणार नाही. सदरच्‍या टी.व्‍ही.मध्‍ये कोणताही उत्‍पादकीय दोष नव्‍हता. व सामनेवाला कंपनीने सेवेमध्‍ये कोणतीही कमतरता केलेली नाही. तसेच कंपनीने उत्‍पादीत केलेला माल हा पुर्णपणे तपासुन नंतरच विक्रीसाठी पाठविलेला असतो. यामध्‍ये कंपनीने कोणतीही सेवेत त्रुटी दिलेली नाही. सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी. तक्रारदार हे सदर प्रकरणामध्‍ये कंपनीची कोणतीही चुक नाही. यास सामनेवाला जबाबदार नाहीत. तक्रारदाराने कंपनीने सुचविलेप्रमाणे वस्‍तुची व्‍यवस्थित हाताळणी न केल्‍यामुळे सदरचा टी.व्‍ही. खराब झालेचे तक्रार अर्जावरुन निष्‍पन्‍न होते. म्‍हणून सदरची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी अशी सामनेवाला यांनी मंचाला विनंती केली आहे.

5.   तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार, शपथपत्र, कागदपत्र, रिजॉईंडर यांचे अवलोकन केले. तसेच सामनेवाला नं.2 यांची कैफियत, शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले व न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.  

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय.?                                                         

 

... होय.

2.

तक्रारदार हे तक्रारीत नमुद केलेली मागणी मिळणेस पात्र आहेत काय.?                                                         

 

... होय.

3.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

6.   मुद्दा क्र.1 ः- तक्रारदार यांनी सामनेवाला नं.2 एल.जी.कंपनीचा एल.सी.डी. मॉडेल नं. नं.22एल.एस.53300 सि.नं.210/सीडब्‍ल्‍युसी 006993 किंमत रु.12,500/- ला दिनांक 03.04.2013 रोजी खरेदी केला. त्‍याबाबतचे खरेदीचे बिल प्रकरणात दाखल केलेले आहे. सदरचे बिल हे निशाणी 4/2 वर दाखल आहे. त्‍यामध्‍ये सामनेवाला नं.1 यांचे दुकानातून टी.व्‍ही.खरेदी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारदार हे सामनेवालाचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

7.   मुद्दा क्र.2 ः- तक्रारदाराने सन 2013 मध्‍ये सामनेवाला नं.1 यांचे दुकानातून सामनेवाला नं.2 या कंपनीचा एल.सी.डी. टी.व्‍ही. खरेदी केला. सदरचा टी.व्‍ही हा दिनांक 25.05.2015 रोजी नादुरुस्‍त झाला, त्‍यामुळे तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार सामनेवाला नं.1 यांचेकडे केली. सामनेवाला नं.1 यांनी सामनेवाला नं.2 कंपनीचे सर्व्‍हीस सेंटरचा फोन नंबर दिला, त्‍यानुसार तक्रारदाराने सामनेवाला नं.2 यांचे सर्व्‍हीस सेंटरशी फोनवरुन संपर्क साधून टी.व्‍ही.विषयी तक्रार दाखल केली. त्‍यानुसार कंपनीचे इंजिनियर येऊन पाहणी करुन तुमचा टी.व्‍ही. हा वॉरंटी पिरीयडमध्‍ये नाही. त्‍यामुळे स्‍पेअर पार्ट बदलण्‍यास 2,000/- रुपये खर्च येईल असे सांगितले, 2,000/- रुपये दिल्‍यानंतर तुमचा टी.व्‍ही.दुरुस्‍त करु असे सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी इंजिनियरकडे रु.2,000/- दिले. त्‍याबाबतचा दस्‍त निशाणी 4/4 वर दाखल आहे. त्‍यामध्‍ये टी.व्‍ही.मध्‍ये कोणता दोष आहे या विषयी नमुद केलेले आहे. सदरचे रिटेल इनव्‍हाईस दिनांक 01.08.2015 चे आहे. त्‍यानंतर कंपनीचे इंजिनियर येऊन टी.व्‍ही.चे पार्ट बदलूनही टी.व्‍ही. चालू झाला नाही. त्‍यामुळे कंपनीने आम्‍ही कंपनीच्‍या पॉलीसीनुसार तुमचा जुना टी.व्‍ही.परत घेऊन कंपनीचे इंजिनियर पाहणी करुन जुन्‍या टी.व्‍ही. परत घेऊन तुमच्‍या जुन्‍या टी.व्‍ही.ची योग्‍य किंमत धरुन तुम्‍हाला मॉडेलप्रमाणे वरील किंमतीचा फरक घेऊन आम्‍ही तुम्‍हाला नविन टी.व्‍ही. देऊ असे कंपनीचे व्‍यक्‍तीने दुरध्‍वनीवरुन सांगितले. त्‍यानुसार कंपनीचे व्‍यक्‍तीने पुन्‍हा 15 दिवसांनी फोन करुन रक्‍कम रुपये 5,500/- रुपये कंपनीच्‍या दिल्‍ली येथील मुख्‍य शाखेतील बँक खाते नं.एसी/नं.35569029 वरती आर.टी.जी.एस. करण्‍यास सांगितले. त्‍यानुसार तक्रारदार यांनी दिनांक 13.10.2015 रोजी रेणुकामाता मल्‍टीस्‍टेट को.ऑपरेटिव्‍ह बँक शाखा पाथर्डी या शाखेतून तक्रारदार यांचे खात्‍यातून 5,500/- रुपये दिल्‍ली येथील कंपनीच्‍या दिलेल्‍या खाते नंबरवर आर.टी.जी.एस. केले. त्‍याबाबतचा दस्‍त तक्रारदाराने निशाणी 4/5 वर दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचेशी ई-मेल व्‍दारे संपर्क साधला होता. सदरचा ई-मेल निशाणी 4/6 वर दाखल केला आहे. सदरचे 5,500/- रुपये सामनेवाला कंपनीला प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी तक्रारदारला कळविले की, तुमचे बिल फेक बिल असल्‍यामुळे तुमचे प्रपोजल कंपनीने नामंजुर केलेले आहे. आर.टी.जी.एस. रक्‍कम रु.5,500/- तक्रारदार यांनी सामनेवाला दिल्‍याचे त्‍याबाबतचे दस्‍त तक्रारदाराने 4/6 वर दाखल केलेले आहे. आणि तक्रारदाराने तक्रारीमध्‍ये पैसे परत केल्याबद्दल मान्‍य केले आहे. सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये कथन केले आहे की, तक्रारदार कंपनी विरुध्‍द कोणतीही तक्रार करु शकत नाही. परंतु तक्रारदाराने दाखल केलेला र्इ-मेल व इतर दस्‍त यावरुन कंपनीला सदरचा टी.व्‍ही. विषयी कळविले होते ही बाब स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे सामनेवाला यांनी केलेले कथन हे ग्राहय धरता येणार नाही. सामनेवालाने पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराने घेतलेल्‍या टी.व्‍ही.ची वॉरंटी / गॅरंटी संपल्‍यानंतर नादुरुस्‍त झालेला आहे. त्‍यात कंपनीचा कोणताही दोष नाही. तक्रारदाराने दाखल केलेल्‍या कागदपत्रामध्‍ये टी.व्‍ही. ला वॉरंटी किंवा गॅरंटी आहे या विषयी नमुद नाही, बिलावरती नमुद नाही. तसेच सामनेवाला यांनीसुध्‍दा टी.व्‍ही.ला किती वर्षाची वॉरंटी होती व केव्‍हा संपली याबबात काहीही कथन केले नाही किंवा त्‍यासंबंधीचा कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. तसेच सामनेवाला कंपनीने तक्रारदाराने दाखल केलेल्‍या रिटेल इनव्‍हाईस व इतर दस्‍तांना नाकारलेले नाही. केवळ बिलामध्‍ये खाडाखोड आहे असे कथन केले. मात्र सामनेवाला नं.1 बाफना फर्निचर हा त्‍यांचा डिलर आहे. त्‍यामुळे सामनेवाला कंपनीने सामनेवाला नं.1 यांना सदरच्‍या बिलाविषयी विचारणा करणे गरजेचे होते. तसेच तक्रारदाराने केलेल्‍या तक्रारीप्रमाणे कंपनीने त्‍यावर सेवा पुरविली आहे. म्‍हणजेच टी.व्‍ही. नादुरुस्‍तीच्‍या सर्व बाबी सामनेवाला यांना माहित आहेत. पुढे सामनेवालाने कथन केले की, तक्रारदाराने व्‍यवस्थित हाताळले नाही. त्‍यामुळे टी.व्‍ही. नादुरुस्‍त झाला. परंतु या कथनाचे पृष्‍ठयर्थ कोणताही तज्ञाचा अहवाल किंवा कागदोपत्री पुरावा दाखल केला नाही. केवळ कथन केले आहे. त्‍यामुळे सामनेवाला कंपनीचे सदरचे कथन संयुक्‍तीक वाटत नाही. तसेच सामनेवाला यांचे सर्व्‍हीस सेंटरचे इंजिनिअर येऊन टी.व्‍ही.ची तपासणी केली व रिटेल इनव्‍हाईस तक्रारदाराला दिले त्‍यावर टी.व्‍ही. चे पार्ट खराब झालेबाबत नमुद केलेले आहे व तक्रारदाराने त्‍याला 2,000/- रुपये दुरुस्‍तीसाठी दिले असे नमुद केले. त्‍या कथनाचे पृष्‍ठयर्थ निशाणी 14 प्रमाणे दाखल केलेले दस्‍त त्‍यामध्‍ये 2,000/- रुपये तक्रारदाराने सामनेवाला यांना दिल्‍याची बाब नमुद केली आहे. तक्रारदाराचा टी.व्‍ही.ची वॉरंटी पिरीयडमध्‍ये नादुरुस्‍त झाला. तरीही तक्रारदाराने तक्रार केल्‍यानंतर त्‍यांचे इंजिनियर येऊन तपासणी केली. पार्ट बदलण्‍यासाठी 2,000/- रुपये घेतले ही बाब सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी कैफियतीमध्‍ये नाकारलेले नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांचे सर्व्‍हीस सेंटरने तक्रारदाराला टी.व्‍ही. दुरुस्‍त करुन देणे गरजेचे आहे किंवा नाही, सदरील 2,000/- रुपये तक्रारदाराला परत करणे आवश्‍यक होते. त्‍यांनी तसे केले नाही. तक्रारदाराचे या कथनाला सामनेवाला यांनी नाकारलेले नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांचे सर्व्‍हीस सेंटरचे इंजिनियरनी पैसे घेऊन पार्ट बदलून दिले नाही, अशा प्रकारे निश्‍चीतच सेवेत त्रुटी केलेली आहे. त्‍यामुळे टी.व्‍ही.चा पार्ट जरी वॉरंटी पिरीयडमध्‍ये नसला तरी तक्रारदाराकडून त्‍यामध्‍ये दुरुस्‍ती बाबतचे पैसे घेतलेले आहेत. त्‍यामुळे सदरचा पार्ट तक्रारदाराला बदलून त्‍याचा नादुरुस्‍त टी.व्‍ही. दुरुस्‍त करुन द्यावा या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

8.   तक्रारदाराने संपुर्ण कागदपत्रावरुन त्‍यांची तक्रार सिध्‍द केलेली आहे. तक्रारदाराला सदरच्‍या कारणामुळे तक्रार दाखल करावी लागली त्‍यासाठी तक्रारदार यांना निश्चितच मानसिक, शारीरीक त्रास सहन करावा लागला व आर्थिक खर्च करावा लागला. सबब सदरच्‍या नुकसानीपोटी काही खर्च देणे न्‍यायोचित ठरेल. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.  

9.   सामनेवाला नं.1 यांचेकडे तक्रारदाराने तक्रार केल्‍यानंतर सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांना सर्व्‍हीस सेंटरचा नंबर दिला व तक्रार करण्‍यास सांगितले. यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, सामनेवाला नं.1 यांनी त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केलेली नाही. त्‍यामुळे सामनेवाला नं.1 यांचे विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

10.   मुद्दा क्र.2   मुद्दा क्र.1 व 2 चे विवेचनावरुन मुद्दा क्र.3 चे उत्‍तरार्थ खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ  दे  श –

1)   तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

2)   सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराचे टी.व्‍ही.चा पार्ट बदलून टी.व्‍ही. दुरुस्‍त करुन या आदेशाची प्रत मिळालेपासून 30 दिवसाचे आत तक्रारदारास द्यावा.

3)   सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/- [रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त] व या तक्रारीचा खर्च रक्‍कम रु.2,000/- [रक्‍कम रुपये दोन हजार फक्‍त] तक्रारदार यास द्यावा.

4)   सामनेवाला नं.1 यांचे विरुध्‍द कोणताही आदेश नाही.

5)   या आदेशाची प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क दयावी.

6)   या प्रकरणाची  “ ब ” व “ क ” फाईल तक्रारदारास परत करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.