Maharashtra

Nagpur

CC/11/366

Suresh Dhondbaji Wanjari - Complainant(s)

Versus

M/s. Automotive Manufacturers Ltd., Agent Maruti Insurance Agency Solutions Ltd., Through Branch Man - Opp.Party(s)

Jayesh Vora

03 Mar 2015

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/366
 
1. Suresh Dhondbaji Wanjari
154, Sidharth Nagar, Kamptee Road,
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. M/s. Automotive Manufacturers Ltd., Agent Maruti Insurance Agency Solutions Ltd., Through Branch Manager
Plot No. 573, Kamptee Road,
Nagpur
Maharashtra
2. The New India Assurance Co.Ltd. Through Principal Officer
New India Assurance Building, 87, Mahatma Gandhi Road, Fort,
Mumbai
Maharashtra
3. The New India Assurance Co.Ltd. Through Branch Manager
Office- 2nd floor, Jeevan Deep Building, 8, Parliament Street,
New Delhi 110001
New Delhi
4. The New India Assurance Co.Ltd., Branch No. 110601, Through Branch Manager
Office- 9th floor, New India Centre, 17/A, Kuprej Road
Mumbai 400039
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

श्री. मनोहर चिलबुले, मा. अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये.

 

                          आ दे श  -

 

 (पारित दिनांक – 03 मार्च, 2015)

 

  1.             तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्‍या कलम 12 अन्‍वये दाखल केलेल्‍या तक्रारीचे संक्षिप्‍त तक्रार अशी की, वि.प. क्र.1 हे मारुती उद्योग लि.यांनी त्‍यांचे वाहन विक्रीसाठी नेमलेले अधिकृत विक्रेता आहेत. मारुती इन्‍शुरन्‍स एजन्‍सी सोल्‍युशन्‍स लि. ही कंपनी दि न्‍यु इंडिया अश्‍योरन्‍स कं. लि. या वाहन विमा विक्री करणा-या कंपनीची  यांचे कार्पोरेट सेलिंग एजन्‍ट आहे. सदर कंपनी मारुती उद्योग लि. यांनी त्‍यांचे वाहन विक्रीसाठी नियुक्‍त केलेल्‍या अधिकृत विक्रेत्‍यांना आपले सब डिलर नेमुन त्‍यांच्‍याव्‍दारे वि.प.क्र. 2 ते 4 यांचा वाहन विमा विकण्‍याचा व त्‍यातून कमीशनव्‍दारे नफा मिळविण्‍याचा व्‍यवसाय करते.

 

                  तक्रारकर्त्‍याने 2005 साली वि.प.क्र.1 कडून मारुती उद्योग लि. उत्‍पादित ओमनी व्‍हॅन विकत घेतली. तिचा नोंदणी क्र. एमएच-31/सीएम-5504 आहे. सदर वाहन वि.प.क्र. 1 मार्फत पहिल्‍या वर्षी वि.प.क्र. 2 व 3 कडे विमाकृत करण्‍यांत आले. त्‍यानंतर प्रत्‍येक वर्षी वि.प.कडे आवश्‍यक विमा हप्‍ते भरुन तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र. 2 व 3 कडून विमा पॉलीसी विकत घेतली आहे. दि.12.01.2010 ते 11.01.2011 या कालावधीची सदर वाहनाची पॅकेज विमा पॉलीसी क्र. 460262668 वि.प.क्र. 1 कडे रु.3,812/- विमा हप्‍ता भरुन विमामुल्‍य रु.94,500/- करिता विकत घेतली. सदर पॉलीसीमध्‍ये 8 प्रवाशांसाठी रु.1,00,000/- पर्यंतचे विमा संरक्षण वि.प.क्र. 2 व 3 यांनी दिले होते.

 

                  दि.30.05.2010 रोजी तक्रारकर्त्‍याचे लहान भाऊ सुधाकर धोंडबाजी वंजारी, मावस भाऊ विनोद श्रा. मेश्राम, त्‍यांची पत्नी विशाखा विनोद मेश्राम, पुतणी कु. हर्षुला आणि पारिवारिक मित्र श्रीमती मीना चंदन पुरी यांच्‍यासह पांढरकवळा येथे लग्‍न सोहळयास जाण्‍यासाठी नागपूरवरुन सकाळी निघाले असता जाम जिल्‍हा वर्धाजवळ पो.स्‍टे. समुद्रपूरचे हद्दीत समोर असलेल्‍या अज्ञात ट्रकने कुठलाही इशारा न देता एकाएकी जोरात वाहन थांबविल्‍याने तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन सदर ट्रकवर आदळून अपघात झाला व त्‍यांत वाहन क्षतीग्रस्‍त झाले, तसेच वाहनातून प्रवास करणा-या तक्रारकर्त्‍याच्‍या कुटुंबातील लोकांना गंभीर इजा पोहोचली. तक्रारकर्त्‍याचा मावसभाऊ विनोद मेश्राम यांस गंभीर इजा झाल्‍याने तो दि.04.06.2010 रोजी शुअरटेक हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्‍यान मरण पावला.

 

                  पोलीस स्‍टेशन समुद्रपूर येथे सदर अपघाताची नोंद दि.30.05.2010 रोजी स्‍टेशन डायरी क्र. 7/10 प्रमाणे करण्‍यांत आली व घटनास्‍थळ पंचनामा करण्‍यांत आला. सदर अपघातात तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन पूर्ण क्षतीग्रस्‍त (टोटल लॉस) झाल्‍याने तक्रारकर्त्‍याने रु.1,94,500/- चा विमा दावा सादर केला. वि.प.क्र. 2 ते 4 यांनी दावा क्र. CL/460262668/00000980898 अन्‍वये नोंदला. माहे नोव्‍हेंबर, 2010 च्‍या पहिल्‍या आठवडयात वि.प.2 ते 4 यांनी इन्‍व्‍हेस्‍टीगेटर म्‍हणून नियुक्‍त केल्‍याबाबत श्रीमती भारती तामगाडगे यांनी तक्रारकर्त्‍यास मोबाईल फोनवरुन कळविले आणि चौकशीस आल्‍या व अपघातात जखमी झालेल्‍या सर्व सदस्‍यांचे हस्‍तलिखित बयान लिहून घेतले. त्‍यानंतर 3-4 दिवसांनी भारती तामगाडगे यांनी तक्रारकर्त्‍याशी मोबाईलवर संपर्क साधून रु.10,000/- ची मागणी केली व पैसे न दिल्‍यास व्‍यवस्थित रिपोर्ट पाठविणार नाही व तुम्‍हाला अपघात नुकसान भरपाई मिळणार नाही असे सांगितले. तक्रारकर्त्‍याच्‍या वाहनात त्‍याच्‍या कुटुंबातीलच लोक असतांना केवळ तक्रारकर्त्‍याने इन्‍व्‍हेस्टिगेटरला पैसे दिले नाही, म्‍हणून 10-15 दिवसानंतर त्‍यांनी तक्रारकर्त्‍याची वहिनी विशाखा विनोद मेश्राम यांच्‍या घरी जाऊन तिने दिलेल्‍या बयानात खोडतोड असल्‍याने ते चालणार नाही असे सांगून कुठल्‍यातरी कागदावर त्‍यांची सही घेतली.  तक्रारकर्त्‍याची वहीनी अर्धशिक्षित असल्‍याने इन्‍व्‍हेस्‍टीगेटरच्‍या म्‍हणण्‍यावर विश्‍वास ठेवून तिने कागद न वाचताच त्‍यावर सही केली होती. त्‍यानंतर इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने व्‍देषभावनेने वि.प.क्र. 2 ते 4 यांचेकडे काय अहवाल सादर केला याची जाणीव किंवा अहवालाची प्रत तक्रारकर्त्‍यास देण्‍यांत आलेली नाही.

 

                  तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनीव्‍दारे वि.प.क्र. 2 ते 4 यांच्‍याशी वारंवार संपर्क साधुनही त्‍यांनी आयआरडिऐने ठरवून दिलेल्‍या 30 दिवसांचे मुदतीत तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली काढला नाही. अपघातानंतर 9 महिन्‍यांनी वि.प.क्र.4 यांनी दि.28.02.2011 च्‍या पत्रान्‍वये “Since your vehicle was registered as private vehicle, hiring of the vehicle is not covered under the policy”  असे खोटे कारण देऊन तक्रारकर्त्‍याचा दावा बेकायदेशीरपणे फेटाळला.  सदर पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वि.प.क्र.4 यांना 15.03.2011 रोजी वि.प.क्र. 4 ला स्पिड  पोष्‍टव्‍दारे  पत्र देऊन दाव्‍याचे पुनर्विलोकन करुन दावा लवकरात लवकर मंजूर करण्‍याकरिता व चौकशी अधिका-यावर सख्‍त कारवाई करण्‍याची विनंती केली. आणि दि.05.05.2011 रोजी स्‍मरणपत्र देखिल दिले, परंतु  वि.प.ने सदर पत्रास प्रतिसाद दिला नाही. वाहनातून प्रवास करणा-या 8 प्रवाशांसाठी प्रत्‍येकी रु.1,00,000/- चे विमा संरक्षाणाबाबत वि.प.ने विमा प्रिमियम घेतले असल्‍यामुळे अपघातात मयत झालेल्‍या विनोद मेश्राम यांच्‍या वारसानांना वि.प.ने रु.1,00,000/- नुकसान भरपाई देणे आवश्‍यक होते. परंतु वि.प.ने त्‍यांना नुकसान भरपाई दिलेली नाही.  वि.प.ची सदरची कृती ही सेवेतील न्‍युनता आणि अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब आहे. म्हणून  तक्रारकर्तीने खालीलप्रमाणे मागणी केली आहे.

1)    अपघातग्रस्‍त वाहनाचे विमाकृतमुल्‍य रु.94,500/- अपघाताचे तारखेपासून द.सा.द.शे     12 टक्‍के व्‍याजासह देण्‍याचा  वि.प. 2 ते 4 विरुध्‍द आदेश व्‍हावा.

2)    मानसिक व शारिरिक त्रासाबाबत नुकसानभरपाई रु.1,00,000/- मिळावी.

3)    तक्रारीचा खर्च रु.15,000/- देण्‍याचा वि.प. विरुध्‍द आदेश व्‍हावा.

    

तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ  विमा पॉलीसी, अपघाताची प्रथम खबरी, घटनास्‍थळ पंचनाम्‍याची प्रत, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनाम्‍याची प्रत, विनोद मेश्राम याचा पोस्‍टमार्टेम अहवाल, पो.स्‍टे. समुद्रपुर यांनी दिलेले प्रमाणपत्र, ’अ’ फायनल समरीची प्रत, अंतम अहवाल नमुना ए-ई ची प्रमाणित प्रत, वि.प.ने विमा दावा नामंजूरीचे दिलेले पत्र, तक्रारकर्त्‍याने वि.प.ला दिलेले पत्र इ. दस्‍तावेजांच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत.

 

2.                वि.प.क्र. 1 ने आपले लेखी उत्‍तर दाखल केले आहे.  त्‍यात त्‍यांनी नमूद केले आहे की, विमा पॉलिसी संबंधाने कोणतीही सेवा देण्‍याची जबाबदारी त्‍यांची नाही. तसेच तक्रारकर्त्‍याने देखील त्‍यांचेविरुध्‍द कोणतीही मागणी केली नसल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍दची तक्रार खारिज करावी अशी विनंती केली आहे.                  

 

3.                वि.प.क्र. 2 ते 4 यांनी लेखी जवाब दाखल केला असून तक्रारकर्त्‍याने त्‍यांच्‍या विमा कंपनीकडून त्‍याचे तक्रारीत नमूद वाहनाबाबत विमा पॉलिसी काढली असल्‍याचे कबूल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद वाहन खाजगी वापराकरीता विकत घेतले होते व खाजगी वापराबाबतची विमा पॉलिसी वि.प.क्र. 2 व 3 कडून काढला होता. मात्र अपघाताचेवेळी सदरचे वाहन भाडयाने प्रवासी वाहतूक करण्‍यासाठी वापरले असल्‍याने विमा शर्तीचा तक्रारकर्त्‍याने भंग केला आहे व म्‍हणून तक्रारकर्ता कोणताही विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही. तसेच त्‍याचे म्‍हणणे असे आहे की, अपघाताचेवेळी वाहन चालवित असलेल्‍या चालकाबद्दल वैध चालक परवाना नव्‍हती. यासंबंधाने वि.प.ने नेमलेल्‍या चौकशी अधिका-याचा चौकशी अहवाल आणि शपथपत्र दाखल केले आहे.

 

                  30.05.2010 रोजी तक्रारकर्त्‍याचे लहान भाऊ सुधाकर वंजारी, मावसभाऊ विनोद मेश्राम त्‍यांची पत्‍नी विशाखा मेश्राम, पुतणी हर्षूला आणि पारिवारिक मित्र मीना चंदनपूरी हे सदर वाहनाने विवाह सोहळयासाठी नागपूर येथून जात होते हे नाकबूल केले आहे. वि.प.चे म्‍हणणे असे की, सदर वाहनातील प्रवास करणारे व्‍यक्‍ती तक्रारकर्त्‍याचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी नसून ते भाडयाने प्रवास करणारे प्रवासी होते. सदर प्रवासा दरम्‍यान समोरच्‍या ट्रक चालकाने एकाएकी ट्रक थांबविल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे सदर वाहन ट्रकवर धडकून अपघात झाला हे नाकबूल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, अपघातग्रस्‍त वाहनाचे चालक हे निष्‍काळजीपणाने व भरधावपणे वाहन चालवित असल्‍याने त्‍याचे चुकीमुळे अपघात झाला असल्‍याने तक्रारकर्ता नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र नाही. सदर अपघातात तक्रारकर्त्‍याचे वाहन पूर्णपणे क्षतिग्रस्‍त झाल्‍याचे वि.प.ने नाकबूल केले आहे.

 

                  अपघाताची चौकशी करण्‍यासाठी वि.प.ने ऍड. भारती तामगाडगे यांना चौकशी अधिकारी म्‍हणून नियुक्‍त केले होते व त्‍यांनी अपघाताचेवेळी वाहनात बसलेल्‍या व्‍यक्‍तींना स्‍वतः भेटून व त्‍यांची विचारपूस करुन त्‍यांचे हस्‍ताक्षरानिशी जवाब नोंदविला आहे हे मान्‍य केले आहे. चौकशी अधिकारी यांनी तक्रारकर्त्‍याला दूरध्‍वनीवरुन रु.10,000/- ची मागणी केली आणि पैसे न दिल्‍यास अहवाल व्‍यवस्थित पाठविणार नाही व तुम्‍हाला अपघाताबाबत रक्‍कम मिळणार नाही असे सांगितले हे नाकबूल केले आहे. त्‍यांचे म्‍हणणे असे की, तक्रारकर्त्‍याने मंचाची सहानूभूती मिळण्‍यासाठी चौकशी अधिका-यावर काल्‍पनिक व खोटे आरोप लावलेले आहे. चौकशी अधिका-यांनी 10-15 दिवसानंतर तक्रारकर्त्‍याची वहीनी विशाखा मेश्राम हिला तिच्‍या बयानात खोडातोड असल्‍याचे सांगून अन्‍य कागदावर सही घेतली आणि तक्रारकर्त्‍याची वहीनी अर्धशिक्षीत असल्‍याने सदर कागद न वाचता चौकशी अधिका-यावर विश्‍वास ठेवून सही केली हे नाकबूल केले आहे. तक्रारकर्त्‍यानेच विमा दाव्‍यासाठी आवश्‍यक कागदपत्रे वेळेवर पुरविली नाही, त्‍यामुळे आय आर डी ए चे निर्देशाप्रमाणे 30 दिवसाचे आत वि.प.ने दावा निकाली काढला नाही हे नाकबूल केले आहे. वि.प.ने 28.02.2011 च्‍या पत्राप्रमाणे वाहनाचा विमा खाजगी वाहन म्‍हणून काढला असतांना ते भाडयाने दिल्‍यामुळे विमा दावा नामंजूर करण्‍यात आला असे कारण देऊन निकाली काढला हे मान्‍य केले आहे. विमा पॉलिसीमध्‍ये वाहनातील प्रवाशांचा विमा काढण्‍यात आला असून प्रती प्रवासी रु.1,00,000/- विमा संरक्षण दिल्‍याचे वि.प.ने नाकबूल केले आहे. तसेच अपघातात मृत्‍यु झाल्‍याने विनोद मेश्राम यांच्‍या वारसांना वि.प.ने रु.1,00,000/- देण्‍याची जबाबदारी असल्‍याचे नाकबूल केले आहे. वि.प.ने विमा पॉलिसीच्‍या अटी व शर्तीच्‍या अधीन राहून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला असून सेवेत कोणतीही न्‍यूनता किंवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केलेला नाही. म्‍हणून तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह खारिज करावी अशी विनंती केली आहे.

 

                  वि.प.ने आपल्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रीपोर्ट, हर्षुला मेश्राम, विशाखा मेश्राम व मीना चंदनपूरी यांचे बयान, स्‍पॉट पंचनामा, सर्व्‍हेयर रीपोर्ट, जी.टी.हुसेन साल्‍व्‍हेज बायर यांचे पत्र व इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचे शपथपत्र या दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत.                

 

4.                तक्रारीच्‍या निर्णितीसाठी खालिल मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यांत आले. त्‍यावरील मंचाचे निष्‍कर्ष व त्‍याबाबतची कारणमिमांसा पुढीलप्रमाणे.

 

            मुद्दे                                            निष्‍कर्ष

    

1) विरुध्‍द पक्षाने सेवेत न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार किंवा

   अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब केला आहे काय ?              होय.

2) तक्रारकर्ता मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यांस पात्र आहे काय ?          अंशतः

3) आदेश काय ?                                       अंतिम आदेशाप्रमाणे

              

  •  कारणमिमांसा  -

 

4.          मुद्दा क्र.1 बाबत -  सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या मालकीची मारुती व्‍हॅन नोंदणी क्र. एमएच-31/सीएम-5504 वि.प.क्र. 1 मार्फत वि.प.क्र. 2 व 3 कडे दि.12.01.2010 ते 11.01.2011 या कालावधीसाठी पॅकेज विमा पॉलीसी क्र. 460262668 अन्‍वये रु.94,500/- मुल्‍याकरिता विमाकृत केली होती, याबाबत उभय पक्षात वाद नाही. तक्रारकर्त्‍याने सदरची पॉलिसी दस्‍तऐवज क्र. 1 वर दाखल केलेली आहे. त्‍यात वाहनाची किंमत रु.94,500/- याशिवाय वाहन चालक, मालक तसेच वाहनातील आठ प्रवासी यांच्‍यासाठी प्रत्‍येकी रु.1,00,000/- पर्यंतचे विमा संरक्षण दिल्‍याची नोंद आहे.  सदर विमाकृत वाहन  दि.30.05.2010 रोजी तक्रारकर्त्‍याचे लहान भाऊ सुधाकर धोंडबाजी वंजारी, मावस भाऊ विनोद श्रा. मेश्राम, त्‍यांची पत्नी विशाखा विनोद मेश्राम, पुतणी कु. हर्षुला आणि पारिवारिक मित्र श्रीमती मीना चंदन पुरी यांच्‍यासह पांढरकवळा येथे लग्‍न सोहळयास जाण्‍यासाठी नागपूरवरुन सकाळी निघाले असता जाम जिल्‍हा वर्धाजवळ पो.स्‍टे. समुद्रपूरचे हद्दीत समोर असलेल्‍या अज्ञात ट्रकने कुठलाही इशारा न देता एकाएकी जोरात वाहन थांबविल्‍याने तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन सदर ट्रकवर आदळून अपघात झाला व त्‍यांत वाहन क्षतीग्रस्‍त झाले, तसेच वाहनातून प्रवास करणा-या तक्रारकर्त्‍याच्‍या कुटुंबातील लोकांना गंभीर इजा पोहोचली आणि अपघातात जखमी झालेला तक्रारकर्त्‍याचा मावसभाऊ विनोद मेश्राम दि.04.06.2010 रोजी शुअरटेक हॉस्पिटल नागपूर येथे उपचारादरम्‍यान मरण पावला.  याबाबत समूद्रपूर पोलिस स्‍टेशनचे ए.एस.आय. मारोती कांबळे बक्‍कल क्र. 294 यांनी पोलिस स्‍टेशनला एफ आय आर क्र. 91/10 भा.दं.वि.चे कलम 279, 337, 304-ए, 427 आणि 438 आणि मोटार वाहन कायदा कलम 184, 134-ब अज्ञात ट्रक चालकाविरुध्‍द दि.08.07.2010 रोजी दाखल केला आहे. त्‍यात नमूद केल्‍याप्रमाणे अपघाताची तारीख 30.05.2010 आणि पोलिस ठाण्‍यावर माहिती मिळाल्‍याची तारीख देखील 30.05.2010 नमूद आहे. पोलिसांनी दि.30.05.2010 रोजी अपघाताच्‍या ठीकाणी जाऊन तयार केलेला घटनास्‍थळ पंचनामा दस्‍तऐवज क्र. 3वर दाखल केलेला आहे. अपघातात मृतक झालेला विनोद मेश्राम याचा इंक्‍वेस्‍ट पंचनामा तसेच पोस्‍ट मॉर्टेम रीपोर्ट देखील तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला आहे. वरील सर्व दस्‍तऐवजात अज्ञात ट्रक चालकाने कोणताही ईशारा न देता एकाएकी ब्रेक मारल्‍यामुळे विमाकृत वाहन सदर ट्रकवर आदळल्‍याने अपघात झाल्‍याचे नमूद केले आहे.

 

                  वि.प. यांनी अपघातग्रस्‍त वाहनाची तपासणी करण्‍यासाठी सरबजितसिंग तुली यांना सर्व्‍हेयर म्‍हणून नियुक्‍त केले व त्‍यांनी वाहनाच्‍या नुकसानीबाबत दि.12.08.2010 रोजी अहवाल दाखल केला आहे. त्‍यात अपघाताच्‍यावेळी सुधाकर वंजारी हा अपघातग्रस्‍त वाहन चालवित होता आणि त्‍याचेकडे दि.31.05.1995 पासून दि.07.08.2010 पर्यंत वैध असलेला LMV (TR), Motor Cycle (with gear) चालक परवाना होता असे नमूद केले आहे. तसेच सदर अपघातात वाहनाचे रु.94,000/- चे नुकसान झाले असून सदर वाहनाच्‍या अवशेषाची किंमत रु.54,000/- वजा जाता नेट लॉस बेसिसवर नुकसान भरपाई देण्‍याची वि.प.ची जबाबदारी रु.40,000/- नमूद केले आहे आणि “The claim may be settled on Net Loss Basis.”  असा अभिप्राय दिला आहे.

 

                  वि.प.क्र. 2 ते 4 यांनी अधिवक्‍ता भारती तामगाडगे यांना चौकशी अधिकारी म्‍हणून नियुक्‍त केले, त्‍यांनी अपघातग्रस्‍त वाहनातील हर्षुला विनोद मेश्राम, विशाखा विनोद मेश्राम, मीना चंदनपूरी यांचे बयान नोंदवून घेतले. त्‍यांनी आपल्‍या बयानात ते दि.30.05.2010 रोजी सकाळी 5-30 वाजता सुधाकर धोंडबाजी वंजारी यांचे मारोती व्‍हॅन क्र. एम एच 31 सी एम 5504 ने विनोद मेश्राम यांचे सहकारी कर्मचारी श्री. कोवे यांच्‍या मुलीच्‍या लग्‍नासाठी जात असता जाम येथे अपघात झाल्‍याचे नमूद केले आहे. त्‍यापैकी विशाखा विनोद मेश्राम हिच्‍या बयानात नंतर ‘’(विशाखा विनोद मेश्राम) किरायानी घेतली होती’’. असा मजकूर लिहिण्‍यात आला आहे. वि.प.चे म्‍हणणे असे की, विशाखा हिल्‍या बयानाप्रमाणे तक्रारकर्त्‍याचे सदर वाहन विशाखाचे पती विनोद मेश्राम यांनी किरायाने घेतले होते. म्‍हणून अपघाताचेवेळी सदर वाहनाचा उपयोग हा व्‍यावसायिक कारणासाठी करण्‍यात आला असल्‍याने व विमा पॉलिसी ही Package Policy (Private Vehicle) असल्‍याने विमा शर्तीचा भंग झाला आहे व म्‍हणून वि.प.4 यांनी दि.28.02.2011 च्‍या पत्राप्रमाणे (तक्रारकर्त्‍याचे दस्‍तऐवज क्र. 10) “Since your vehicle was registered as private vehicle, hiring of the vehicle is not covered under the policy”  असे कारण देऊन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती पॉलिसीच्‍या अटी व शर्तीस अनुसरुन असल्‍याने सेवेत कोणताही न्‍यूनतापूर्ण व्‍यवहार अथवा अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब झालेला नाही.

 

                  याउलट, तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍त्‍यांनी आपल्‍या युक्‍तीवादात असे प्रतिपादन केले की, वि.प.चे चौकशी अधिकारी यांनी अपघाताचे वेळी वाहनातून प्रवास करणा-या तीन व्‍यक्‍तींचे बयान नोंदविले, तेव्‍हा कोणीही सदरचे वाहन किरायाने घेतले होते असे सांगितले नव्‍हते. हर्षूला विनोद मेश्राम हिने ‘’माझे काका श्री सुधाकर धोंडबाजी वंजारी यांचे मारोती व्‍हॅनने लग्‍नास गेल्‍याचे सांगितले होते, तसेच विशाखा मेश्राम हिनेदेखील ‘’माझे दीर सुधाकर धोंडबाजी वंजारी यांचे मारोती व्‍हॅनने आम्‍ही सगळे लग्‍नास नीघालो होतो’’ असे सांगितले होते. मिना चंदनपूरी हिने देखील माझा भाऊ श्री सुधाकर धोंडबाजी वंजारी यांचे मारोती व्‍हैनने पांढरकवडा येथे लग्‍नासाठी जाण्‍याकरीता नीघालो असे सांगितले होते. यापैकी कोणीही किती रु. भाडयाने गाडी घेतली असे सांगितले नव्‍हते. मात्र चौकशी अधिका-यांनी दहा पंधरा दिवसांनी विशाखा विनोंद मेश्राम हिच्‍याकडे येऊन बयानात खोडतोड झाली आहे असे सांगून तिची सही घेतली. मात्र कोणताही मजकूर वाचून दाखविला नाही. वि.प.ने दाखल केलेल्‍या विशाखा विनोंद मेश्राम हिच्‍या बयानातील‘’(विशाखा विनोद मेश्राम) किरायानी घेतली होती’’.  हा मजकूर चौकशी अधिकारी यांनी वि.प.च्‍या सुचनेवरुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍यासाठी कारण निर्माण करण्‍याकरीता विचाराअंती समाविष्‍ट केलेला आहे. त्‍यामुळे केवळ तेवढया कारणाने तक्रारकर्त्‍याचा मावसभाऊ आणि त्‍याच्‍या परीवाराने सदरचे वाहन किरायाने घेतले होते हे सिध्‍द होत नाही. वरील तिनही प्रवाशांच्‍या बयानातून हे स्‍पष्‍ट आहे की, ते तक्रारकर्त्‍याचे निकटचे नातेवाईक आहेत. तक्रारकर्त्‍याचा सख्‍खा भाऊ सुधाकर वंजारी हादेखील सदर वाहनातून वरील लग्‍नासाठी जात होता व तक्रारकर्त्‍याचे वाहन चालवित होता आणि त्‍याचेकडे वैध चालक परवाना होता, त्‍यामुळे सदर वाहनातून अपघाताचेवेळी प्रवास करणारे सर्व जण तक्रारकर्त्‍याचे नातेवाईक होते व त्‍यामुळे त्‍यांना वाहन किरायाने देण्‍याचा प्रश्‍नच नव्‍हता. चौकशी अधिका-याच्‍या खोटया अहवालाचा आधार घेऊन वि.प.ने बेकायदेशीर तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केलेला आहे. वस्‍तूतः कायद्याने चौकशी अधिकारी नेमण्‍याची कोणतीही तरतूद नाही आणि त्‍यामुळे चौकशी अधिका-याच्‍या अहवालावरुन विमा दावा नाकारण्‍याची वि.प.ची कृती गैर आहे. आपल्‍या युक्‍तीवादाचे पुष्‍टयर्थ खालील न्‍याय निर्णयाचा दाखला दिला आहे.

 

II (2008)  CPJ  381  (NC), National Insurance Co. vs. Ajay Kumar

 

वरील प्रकरणात विमा कंपनीने अपघातग्रस्‍त वाहनाचे नुकसानीचे मुल्‍यमापन करण्‍यासाठी सर्व्‍हेयरची नियुक्‍ती केली होती. त्‍यांनी नुकसानीचे मुल्‍यांकन दुरुस्‍तीसाठी रु.2,15,756/- ( On repair basis) आणि अवशेषांची किंमत वजा जाता रु.1,89,000/- (On the basis of solvage) असल्‍याचे अहवालात नमूद केले होते. त्‍यानंतर विमा कंपनीने चौकशी अधिकारी नेमून त्‍यांचा अहवाल मा‍गविला असता सदर चौकशी अधिका-याने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा खरा नाही या कारणाने विमा दावा नामंजूर करण्‍याबाबत शिफारस केली होती. वरील परिस्थितीत मा. राष्‍ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय व्‍यक्‍त केला आहे.

 

“Appointment of Investigator neither back by any statute nor they licensed by Regulatory Authority – Investigators report no way reduced importance of observations made by Surveyor.”  

 

 तक्रारकर्त्‍याच्‍या अधिवक्‍त्यांनी आपल्‍या युक्‍तीवादात सांगितले की, सर्व्‍हेयरने आपल्‍या अहवालात विमाकृत वाहनाचे मुल्‍य रु.94,000/- दर्शविले असून अवशेषांची किंमत रु.54,000/- दर्शविली आहे. सर्व्‍हेयरने दर्शविलेली अवशेषांची किंमत ही अतिशय जास्‍त असल्‍याने ती तक्रारकर्त्‍यास मान्‍य नाही. म्‍हणून वि.प.ने टोटल लॉस बेसिसवर तक्रारकर्त्‍यास रु.94,000/- विमा दावा मंजूर करावा आणि अपघातग्रस्‍त वाहनाचे अवशेष (सॉल्‍व्‍हेज) स्‍वतः घ्‍यावे यास तक्रारकर्त्‍याची हरकत नाही.

 

                  याउलट, वि.प.च्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा की, अपघातग्रस्‍त वाहनातून प्रवास करणा-या विशाखा मेश्राम हिने तिच्‍या जवाबात तिच्‍या पतीने तक्रारकर्त्‍याचे वाहन किरायाने घेतले होते असे सांगितले आहे. स्‍वतःच्‍या वापरासाठी घेतलेल्‍या वाहनाचा विमा प्रायव्‍हेट कार पॉलिसीप्रमाणे तक्रारकर्त्‍याने काढला असून सदरचे वाहन किरायाने देऊन त्‍याचा व्‍यावसायिक वापर केला असल्‍याने विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे व म्‍हणून तक्रारकर्ता कोणताही विमा दावा मिळण्‍यास पात्र नाही आणि तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती ही सेवेतील न्‍यूनता अगर अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब ठरत नाही.

 

                  उभय पक्षांच्‍या अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद, त्‍यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज आणि न्‍याय निर्णयांचा विचार करता सदरच्‍या प्रकरणात तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन अपघातग्रस्‍त झाले आणि त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास विमाकृत वाहनाची किंमत रु.94,000/- इतके नुकसान झाले हे स्‍पष्‍ट आहे. वि.प.ने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍यासाठी ज्‍या विशाखा मेश्राम हिच्‍या चौकशी अधिका-याने नोंदविलेल्‍या बयानाचा आधार घेतला आहे, त्‍याचे अवलोकन केले असता मुळ बयानात सदरचे वाहन लग्‍नाला जाण्‍यासाठी किरायाने घेतले होते याबाबत कोणताही उल्‍लेख नव्‍हता. मात्र नंतर सदर बयानात ‘’(विशाखा विनोद मेश्राम) किरायानी घेतली होती’’ असा उल्‍लेख घुसविण्‍यात आला आहे. याशिवाय, सदर वाहन विनोद मेश्राम याने किरायाने घेतले होते याबाबत कोणताही पुरावा नाही. सदरचे वाहन किती रुपये भाडे ठरवून किरायाने घेतले होते आणि ती भाडयाची रक्कम तक्रारकर्त्‍यास दिली होती किंवा नाही याबाबत देखील चौकशी अधिका-याने नोंदविलेल्‍या बयानात कोणताही उल्‍लेख नाही. याउलट सर्व बयानदारांनी ते तक्रारकर्त्‍याचे जवळचे नातलग असल्‍याचे आपल्‍या बयानात स्‍पष्‍टपणे सांगितले आहे. म्‍हणून तक्रारकर्त्‍याने सदरचे वाहन विनोद मेश्राम आणि त्‍याचे कुटुंबियांना लग्‍नाला जाण्‍यासाठी किरायाने दिले होते या वि.प.च्‍या म्‍हणण्‍याला कायदेशीर आधार नाही. त्‍यामुळे सदर कारणाने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करण्‍याची वि.प.ची कृती ही निश्चितच सेवेतील न्‍यूनता आणि अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब ठरते, म्‍हणून मुद्दा क्र. 1 वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविला आहे.

 

5.          मुद्दा क्र.2 बाबत -  सदरच्‍या प्रकरणात अपघातात क्षतीग्रस्‍त झालेल्‍या वाहनाचे विमाकृत मुल्‍य रु.94,500/- होते. वि.प.ने नियुक्‍त केलेल्‍या इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने चौकशीचे वेळी सदर वाहनाचे मुल्‍य रु.94,000/- गृहित धरले आहे. यातून सॉल्‍व्‍हेजची किंमत रु.54,000/- वजा करुन तक्रारकर्त्‍याचा विमा दावा रु.40,000/- देऊन नेट लॉस बेसिसवर मंजूर करावा अशी शिफारस केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने सदर सर्व्‍हेयरने लावलेली सॉल्‍व्‍हेजची किंमत रु.54,000/- अतिशय जास्‍त असल्‍याने ती मान्‍य नाही म्‍हणून सॉल्‍व्‍हेज वि.प.ने ठेवावे आणि टोटल लॉस बेसिसवर रु.94,000/- क्‍लेम मंजूर करावा अशी मागणी केलेली आहे. प्रकरणातील सर्व परिस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्‍याची सदर मागणी अत्‍यंत वाजवी आहे. म्‍हणून तक्रारकर्ता वरील रक्‍कम  तक्रार दाखल तारखेपासून रक्‍कम हातात पडेपर्यंत द.सा.द.शे.9% व्‍याजासह मिळण्‍यांस पात्र आहे. याशिवाय, तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- आणि या तक्रारीचा खर्च रु.5,000/- मंजूर करणे न्‍यायोचित होईल. म्‍हणून मुद्दा  क्र.2 व 3  वरील निष्‍कर्ष त्‍याप्रमाणे नोंदविले आहेत.

 

            वरील निष्‍कर्षास अनुसरुन मंच खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

          

                         -  आदेश  -

 

            तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्‍या कलम 12 खालिल तक्रार वि.प.क्र. 2 व 4 विरुध्‍द संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या खालिलप्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यांत येते.

 

1)    विरुध्‍द पक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास त्‍याच्‍या क्षतीग्रस्‍त मारुती व्‍हॅन नोंदणी क्र. एमएच-31/सीएम-5504 ची सर्व्‍हेयरने निश्चित केलेली किंमत रु.94,000/-  तक्रार दाखल दि.05.07.2011 पासून रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या हातात पडेपर्यंत द.सा.द.शे. 9% व्‍याजासह अदा करावी आणि तक्रारकर्त्‍याने  क्षतीग्रस्‍त व्‍हॅन (साल्‍वेज) वि.प.च्‍या सुपुर्द करावे. 

2)    वरील रकमेशिवाय विरुध्‍द पक्षाने संयुक्‍त व वैयक्तिकरित्‍या तक्रारकर्त्‍यास शारीरिक व मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- व तक्रारीचा खर्च  रु.5,000/-    द्यावा.

3)    वि.प.क्र. 1 विरुध्‍द तक्रार खारिज करण्‍यात येत आहे.

4)    आदेशाची पूर्तता आदेश प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसांचे आंत करावी.

5)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

6)    तक्रारकर्त्‍यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'ABLE MR. MANOHAR CHILBULE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.