तक्रारदारास पुकारले असता त्यांच्या वकिलांसह गैरहजर. प्रस्तुत प्रकरणात तक्रार दाखलपूर्व युक्तीवाद करणेकामी तक्रारदारास दिनांक 09/12/2020 पासून ते आजपावेतो वारंवार संधी देऊन देखील ते गैरहजर आहेत. सबब तक्रार व त्यासोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन प्रस्तुत तक्रारीचे आयोगातर्फे अवलोकन करण्यात आले. सदर तक्रार तक्रारदाराने दोन वाहनतळाच्या जागा, तसेच वाहनतळाच्या जागेची रक्कम रुपये 6,75,000/- हे सामनेवाले यांना मिळाल्यापासून 24% व्याजासह होणारी रक्क्म मिळणेकामी, तसेच मानसिक त्रासापोटी व आर्थिक नुकसानीपोटी रक्कम रुपये 12,00,000/- नुकसानभरपाई म्हणून मिळणेकामी सामनेवालेंविरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराच्या तक्रारीचे अवलोकन केले असता सदरची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या अंतर्गत दाखल केली आहे. तक्रारीत सदनिकेची किंमत ही रक्कम रुपये 57,73,700/- इतकी नमूद आहे. सबब तक्रारदाराच्या सदनिकेची एकूण किंमत, तसेच तक्रारीतील मागण्या विचारात घेता सदरची तक्रार चालविण्याचे मंचास/आयोगास ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या तरतुदींनुसार आर्थिक अधिकार आहेत किंवा नाहीत हे पाहणे आवश्यक आहे. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11 नुसार, तसेच अमरिश शुक्ला विरुध्द फेरिअस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या न्यायनिवाड्यानुसार प्रस्तुतची तक्रार चालविण्याचे आर्थिक अधिकार निश्चितच मंचास/आयोगास नसल्याचे स्पष्ट होते. सबब प्रस्तुतची तक्रार तक्रारदारास मुदतीचा कायदा कलम 14 प्रमाणे मुभा देऊन दिवाणी प्रक्रिया संहिता आदेशिका 7 नियम 10 प्रमाणे परत करण्याचा आदेश केल्यास न्यायोचित होईल. तसेच तक्रारदारास ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्या तरतुदींचा लाभ घेऊन नविन तक्रार दाखल करावयाची असल्यास मुभा देण्यात येते. सबब अंतिम आदेश पारीत करण्यात येतो. अंतिम आदेश - ग्राहक तक्रार क्रमांक 37/2020 ही तक्रारदारास मुदतीचा कायदा कलम 14 प्रमाणे मुभा देऊन दिवाणी प्रक्रिया संहिता आदेशिका 7 नियम 10 प्रमाणे सदर तक्रार परत करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- सदर आदेशाची प्रत तक्रारदाराना निःशुल्क
|